नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी आई संपावर गेली तर निबंध मराठी | aai sampavar geli tar essay in marathi या विषयावर निबंध घेऊन आलो आहे.
आई संपावर गेली तर निबंध मराठी | aai sampavar geli tar essay in marathi
‘आई, माझं गणिताचे पुस्तक कोठे आहे?” आई, हा निबंध कसा लिहू ग? काही मुद्दे सांग ना.” आई, या रविवारी जिमखान्याची सहल आहे. काय देशील डबा?” आई, यंदा दिवाळीत फराळाचे पदार्थ भरपूर करायचे हं!’ ‘आई, मला बॅडमिंटनची रॅकेट हवी आहे. कधी घेशील सांग?’ अशी आपली हर एक कामे आईशी निगडित असतात. पण समजा, आई संपावर गेली, तर …
आई संपावर गेल्यास घराचे घरपणच हरवेल. सकाळी उठायला हमखास उशीर होईल; कारण नेहमीप्रमाणे लवकर जागे करण्यास आई नसेल. न्याहारीला टेबलावर केवळ कोरडा पाव असेल. लोणी स्वत: लावून घ्यायचे म्हणजे केवढे कठीण! जवळजवळ उपासमारच !
शाळेत जातानाही किती तरी गडबड झालेली असेल. कंपासपेटीच विसरल्यामुळे लिहायला पेन्सिल, पेन काहीच नसणार! मग त्यासाठी शिक्षकांची बोलणी खावी लागणार. मधल्या सुट्टीसाठी डबाही नसणार, कारण न विसरता सुट्टीसाठी डबा देणारी आई संपावर गेलेली असणार.
शाळेतून दमून भागून घरी यावे, तर स्वयंपाकघरातील सारा पसारा आवरणार कोण? टेबलावर ब्रेड, लोणचे, चटणी ठेवलेली असणार आणि बरोबर एक चिठ्ठीही असणार, ‘आई संपावर आहे.’ या नुसत्या कल्पनेनेच माझे डोळे पाझरू लागले. आईच्या अपार वात्सल्याची ती जणू पावतीच होती !