२०. आपुले जगणे आपुली ओळख स्वाध्याय मराठी नववी

प्र. १. खालील कोष्टक पूर्ण करा.
मानवाने करायच्या गोष्टी | मानवाने टाळायच्या गोष्टी |
(१) दिवा होऊन जगाला उकळावे | (१) एक क्षणही कार्यविन दडवू नको |
(२) पावित्र्याची वस्त्रे पांघरावित | (२) कुनाबाबतीत मनात अढी नको |
(३) नम्र रहावे, सौम्य पहावे | (३) उगाच कुणाला खिजवू नको |
(४) दुसऱ्यासाठी करुणा असावी | (४) हांजी हांजि करू नको |
प्र. २. आकृती पूर्ण करा.
जगणे अर्थपूर्ण होण्यासाठी नियमित कराव्यात अशा कृती |
(१) वाचन |
(२) लेखन |
(३) परंपरा |
(४) व्यायाम |
प्र. ३. खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.
(अ) पटकुर पसरु नको.
उत्तर – अंगावर पवित्रतेची वस्त्रे पांघरावीत. मंगलमय जीवन असावे. चिंध्या झालेले जीर्ण वस्त्र पांघरू नये. म्हणजे आपल्या व्यक्तिमत्त्वात केविलवाणेपणा व दीनवाणेपणा नसावा. दुसऱ्यांनी आपली कीव करावी, असे वर्णन करू नये.
(आ) व्यर्थ कोरडा राहु नकाे.
उत्तर – स्वतःच्या दुःखाचे प्रदर्शन करीत रडत न राहता, हृदयात इतरांविषयी करुणा असावी. समाजातील दु:खांविषयी अंतःकरणात ओलावा असावा. उगाचच कोते मन करून भावनाशून्यतेने वागू नये. म्हणजेच कोरडे राहू नये.
(इ) कर्तृत्वाचे घडवी वेरुळ.
उत्तर – पूर्वीच्या कलाकारांनी औरंगाबादजवळील डोंगरात वेरूळ येथे भव्य लेणी कोरली. पिढ्यान्पिढ्या हे शिल्प कोरण्यात खर्ची पडल्या. आजमितीस वेरूळचे हे शिल्प जगप्रसिद्ध आहे. त्याप्रमाणे जीवन जगताना आपल्या कर्तबगारीचे वेरूळ घडवावे, असे कवी म्हणत आहेत.
प्र. ४. काव्यसौंदर्य.
(अ) ‘पावित्र्याची पांघर वस्त्रे, होऊन पटकुर पसरु नको’, या ओळीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर : माणसाने आपले आयुष्य कसे जगावे हे सांगताना कवी म्हणतात – श्रीमंतीचा बडेजाव दाखवणारी किमती वस्त्रे घालणे, योग्य नव्हे. म्हणजे श्रीमंतीचे प्रदर्शन करू नये. मनाची शुद्धता महत्त्वाची आहे. मन पवित्र हवे. मंगलतेची वस्त्रे ल्यावीत. स्वतःचे जीवन चिंध्या झालेल्या पटकुराप्रमाणे दीनवाणे, लाचार असू नये. स्वतःच्या मनाचे मलीन, घाणेरडे वस्त्र करू नये. मनाच्या पावित्र्याचा विचार या ओळींत मांडला आहे.
(आ) ‘शोभेहुनही श्रेष्ठ स्वच्छता, आदिमंत्र हा विसरू नको’, या ओळीत दडलेल्या अभियानाची गरज तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर : दिखाऊ प्रदर्शनापेक्षा स्वच्छता महत्त्वाची आहे. शोभेचा बडेजाव करणे व्यर्थ आहे. मनाची शुद्धता व परिसराची स्वच्छता असावी, हा बीजमंत्र कधी विसरू नये, अशी कवींनी या ओळीतून शिकवण दिली आहे. या ओळीत स्वच्छता अभियान दडलेले आहे. स्वच्छता राखली की रोगराई होत नाही. आरोग्य धोक्यात येत नाही. शुद्ध मोकळी हवा व निर्मळ पाणी मिळते. गाडगेबाबा गावेच्या गावे झाडून स्वच्छ करीत. सेनापती बापटांनी स्वच्छतेचा वसा आपणांस दिला आहे. ‘स्वच्छता हा परमेश्वर आहे, असे सुवचन आहे. ‘शोभेपेक्षा स्वच्छता श्रेष्ठ आहे’ या मूलमंत्रात स्वच्छतेची महती कवींनी सांगितली आहे व स्वच्छता अभियानाचा पुरस्कार केला आहे.
प्र. ५. स्वमत.
(अ) स्वकर्तृत्व घडवताना कवितेतील विचार कसा मार्गदर्शक ठरेल, ते सविस्तर लिहा.
उत्तर : स्वतःचे उत्तुंग कर्तृत्व हीच स्वतःची ओळख आहे, हे सांगताना कवींनी कवितेतून काही सुविचारांचे मार्गदर्शन केले आहे.
दिवा होऊन जगाला प्रकाश दयावा. चाकूसारखी धार आपल्या वागण्यात नसावी. नित्य वाचन, लेखन, मनन, व्यायाम करावा एकही क्षण कामाशिवाय वाया दवडू नये, मन पवित्र असावे. शोभेहून स्वच्छता श्रेष्ठ हा मूलमंत्र ध्यानी ठेवावा. नम्र असावे, उगाच अढी ठेवून कुणालाही खिजवू नये. उदात्त विचार बाळगावेत. लाचारी पत्करू नये. कुणाला छळू नये, वाद घालू नये. स्वसामर्थ्याने संकटाचा गोवर्धन पेलावा. दुसऱ्याविषयी मनात करुणा असावी. नवनवीन विचारांचे मार्ग अंगिकारावेत. चांगल्या मूल्यांवर श्रद्धा असावी. भेदरून न जाता, धैर्याने वागावे. मातृभूमीचे व मातीचे ऋण फेडावे. अशा प्रकारे स्वकर्तृत्वाचे वेरूळ (शिल्प) उभारावे असे मार्गदर्शक विचार कवितेत मांडले आहेत.
(आ) आपल्या जगण्यातून आपली ओळख व्हावी, यासाठी पाळायची पथ्ये कवितेच्या आधारे लिहा.
उत्तर – आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो. आपल्या वर्तनातून आपली ओळख जगाला होते. त्यासाठी जगताना काही पथ्ये पाळणे आवश्यक आहे.
एकही क्षण कार्याशिवाय वाया दवडू नये, कार्यरत असावे, पावित्र्याचे वास्तव्य मनात असावे. नम्रतेचे वर्णन असावे, दुसऱ्यांना खिजवून त्रास देऊ नये. उदात्त विचार मनी बाळगावेत. शोभेपेक्षा स्वच्छता श्रेष्ठ, हे मनी ठसवावे. वाद, भांडण करू नये. उलट दुसऱ्यांबद्दल मनात अपार करुणा असावी. उत्तम मूल्यांवर निष्ठा ठेवून संकटांचा मुकाबला करावा. न घाबरता धैर्याने व हिमतीने आयुष्य कंठावे. स्वकर्तृत्वाचे वेरूळसारखे शिल्प उभारून मातृभूमी व माती यांचे उपकार फेडावेत.
आपुले जगणे आपुली ओळख
********