उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार | Ubhyanvayi Avyay in Marathi | उभयान्वयी अव्यय उदाहरण [With PDF]

उभयान्वयी अव्यय – नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार | Ubhyanvayi Avyay in Marathi | उभयान्वयी अव्यय उदाहरण [With PDF] घेऊन आलो आहे.

सदर पोस्टमध्ये आपन काय बघणार आहोत.
उभयान्वयी अव्यय

उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार
प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये.
गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यये

ubhyanvayi avyay in marathi

उभयान्वयी अव्यय म्हणजे काय

उभयान्वयी अव्यय उदाहरण

उभयान्वयी अव्यय examples in marathi

ubhyanvayi avyay in marathi example

उभयान्वयी अव्यय उदाहरण वाक्य

मिश्र वाक्य संयुक्त वाक्

Table of Contents

उभयान्वयी अव्यय म्हणजे काय

दोन किंवा त्यापेक्षा अधिक वाक्य किंवा शब्द जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

उभयान्वयी अव्यय हे अविकारी आहे.

उभयान्वयी अव्ययाची या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. उभय म्हणजे दोन आणि अव्यय म्हणजे संबंध.

दोन वाक्याचा संबंध दर्शविण्यासाठी ते वाक्य ज्या अव्ययाने जोडले जाते त्यास उभयान्वयी अव्यय म्हणतात.

उभयान्वयी अव्यय उदाहरण ubhyanvayi avyay in marathi example

१) रामूने बाजारातून खेळणी व कपडे आणले.

विद्यार्थी मित्रांनो ह्या वाक्यामध्ये पहा खेळणी व कपडे या दोन शब्दांना जोडणारा शब्द आहे व, म्हणून व या वाक्यातील उभयान्वयी अव्यय आहे.

२) अजय आणि अतुल दोघे खेळत होते.

मित्रांनो ह्या वाक्यामध्ये अजय आणि अतुल या दोन शब्दांना जोडणारा शब्द आहे आणि, त्यामूळे आणि या वाक्यातील उभयान्वयी अव्यय आहे.

३) ढग जमले अन पावसाला सुरुवात झाली.

विद्यार्थी मित्रांनो ह्या वाक्यामध्ये ढग जमले अन पावसाला सुरुवात झाली दोन वाक्यांना जोडणारा शब्द आहे अन, त्यामूळे अन या वाक्यातील उभयान्वयी अव्यय आहे.

४) आम्ही पोहोचलो आणि गाडी सुरू झाली.

विद्यार्थी मित्रांनो ह्या वाक्यामध्ये आम्ही पोहोचलो आणि गाडी सुरू झाली या दोन वाक्यांना जोडणारा शब्द आहे आणि, त्यामूळे आणि या वाक्यातील उभयान्वयी अव्यय आहे.

उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार

उभयान्वयी अव्ययांचे मुख्य दोन प्रकार आहेत

१) प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय

२) गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय

१) प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय

प्रधान म्हणजे मुख्य.

प्रधान वाक्य + प्रधान वाक्य

दोन स्वतंत्र आणि अर्थपूर्ण वाक्ये जी एकमेकांवर अवलंबून नसून स्वतंत्र असतात अश्या वाक्यांना जोडणाऱ्या शब्दाला प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात.

प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय दोन समान दर्जाची वाक्ये जोडतात.

जेव्हा, प्रधान वाक्य + प्रधान वाक्य = संयुक्त वाक्य

प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय जेव्हा दोन वाक्यांना जोडते तेव्हा जोडली गेलेली वाक्ये संयुक्त वाक्ये असतात.

प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांचे प्रकार

प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांचे एकूण ४ प्रकार पडतात.

१) समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय

२) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय

३) न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय

४) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय

संयुक्त वाक्य

समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय + विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय + न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय + परिणामबोधक उभयान्वयी अव्यय या सर्व प्रधानत्वसूचक अव्ययांनी जोडणाऱ्या वाक्यांना = संयुक्त वाक्य म्हणतात.

मिश्र वाक्य व संयुक्त वाक्यांतील फरक

मिश्र वाक्य संयुक्त वाक्य
(१) एकच प्रधान वाक्य असते. बाकीची गौण
वाक्ये असतात.
(१) दोन किंवा त्यापेक्षा अधिक प्रधान वाक्ये
असतात.
(२) गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी
जोडलेली असतात.
(२) प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली
असतात.
(३) जोडलेली वाक्ये ही अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र
नसतात.
(३) जोडलेली वाक्ये ही अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र
असतात.
उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार | Ubhyanvayi Avyay in Marathi | उभयान्वयी अव्यय उदाहरण [With PDF]
Ubhyanvayi Avyay

१) समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय

अधिक माहिती सांगितलेली असते

समुच्चय म्हणजे भर टाकणे

हि अव्यये पहिल्या वाक्यामध्ये अधिक भर घालतात म्हणजेच पहिल्या विधानाला मुख्य स्थान प्राप्त करुन देत्तात.

अन्, आणखी, आणि, आणिक, न, नि, व, शिवाय या उभयान्वयी अव्ययांनी जे दोन वाक्य जोडले जातात त्यांना समुच्चबोधक उभयान्वयी अव्यय म्हणतात.

ज्या वाक्यामध्ये अन्, आणखी, आणि, आणिक, न, नि, व, शिवाय ही उभयान्वयी अव्यय वापरलेली असतात ती वाक्य संयुक्त वाक्य असतात.

समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययांची उदाहरणे

१) पाऊस पडला आणि हवेत गारवा आला.

विद्यार्थी मित्रांनो उदाहरनाद्वारे नीट समजून घ्या, बघा पाऊस पडला अन् हवेत गारवा आला ह्या वाक्यामध्ये उभयान्वयी अव्यय आहे ‘आणि’. पाहिलं वाक्य आहे पाऊस पडला, दुसर वाक्य आहे हवेत गारवा आला, पहिल्या वाक्याची अधिक माहिती आपल्याला दुसऱ्या वाक्यात दिसते त्यामुळेच त्याला समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय म्हणतात.

२) सुसाट वारा सुटला आणि पत्रे उडून गेले.

३) तू शाळेत जाणार अन घरी केव्हा येणार?

४) माझी गाडी चुकली, शिवाय मी वेळेत पोहोचलो.

२) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय

विकल्प म्हणजे पर्याय

अथवा, अगर, की, किंवा, वा, नाहीतर या उभयान्वयी अव्ययांनी जे दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडले जातात. त्यालाच विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय म्हणतात.

विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययांची उदाहरणे

१) तुम्ही चहा घेणार की कॉफी घेणार?

विद्यार्थी मित्रांनो उदाहरनाद्वारे नीट समजून घ्या, तुम्ही चहा घेणार की कॉफी घेणार? ह्या वाक्यामध्ये उभयान्वयी अव्यय आहे की, या वाक्यात दिसते एकतर चहा किंवा कॉफी दोन्ही पैकी एक निवडायचे की नाही म्हणजेच आपल्याला दोन्हीपैकी एक निवडण्याचा विकल्प ( पर्याय) दिलेला आहे.त्यामुळेच त्याला विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय म्हणतात.

२) देह जावो अथवा राहो.

३) दूरदर्शन, शाप की वरदान?

४) यश मिळो, वा न मिळो मी प्रयत्न करणार

५) तुम्ही चहा घेणार का जेवण करणार?

३) न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय

न्यूनत्व = कमीपणा, उणीव

न्यूनत्वबोधक वाक्यांमध्ये कमीपणा,उणीव किंवा दोन वाक्यांमध्ये विरोध दर्शवलेला असतो.

हि उभयान्वयी अव्यये पहिल्या वाक्यातील कमीपणा दाखवतात.

पण, परंतु, बाकी, तरी, किंतु या उभयान्वयी अव्ययांनी जे दोन वाक्य जोडले जातात, त्यास न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय म्हणतात. या अव्ययांनी जोडलेल्या वाक्यात कुठेतरी कमीपणा दर्शविला जातो.

न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्ययांची उदाहरणे

१) काकांनी खूप कमवल पण सगळं वाया गेलं.

विद्यार्थी मित्रांनो उदाहरनाद्वारे नीट समजून घ्या, बघा पहिल्या वाक्यामध्ये जे दर्शवले आहे त्याचातला कमिपणा त्यातील उणीव दुसऱ्या वाक्यात आहे. काकांनी खूप कमवल ( पहिलं वाक्य) सगळं वाया गेलं ( दुसरं वाकय)

२) विजा चमकल्या पण पाऊस आला नाही.

३) कुत्रा भुंकला परंतू चावला नाही.

४) साप चावला पण बिनविषारी होता.

४) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय

पहिल्या वाक्यातील घटनेचा किंवा कृतीचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दर्शविलेला असतो.

परिणाम नेहमी भूतकाळ दर्शवितो.

म्हणून, सबब, यास्तव, की, अतएव, तस्मात, त्यामुळे, तेव्हा, याकरिता या उभयान्वयी अव्ययांनी दोन प्रधान वाक्य जोडले जातात.

परिणामबोधक उभयान्वयी अव्ययांची उदाहरणे

१) पवन ने शाळेला दांडी मारली त्यामुळे त्याला सहलीला जाता आले नाही.

विद्यार्थी मित्रांनो उदाहरनाद्वारे नीट समजून घ्या, बघा पहिल्या वाक्यात घटना आहे तर दुसऱ्या वाक्यात त्या घटनेचा परिणाम आहे. पवन ने शाळेला दांडी मारली ( पहिल वाक्य ), त्याला सहलीला जाता आले नाही ( दुसर वाक्य)

२) बाबांनी खूप कष्ट केले म्हणून तर ते आता सुखात आहेत.

३) दिनेश ने अभ्यासाकडे दुर्लक्ष केले सबब दिनेश नापास झाला.

४) ऋषिकेश ने उत्तम निबंध लिहिला; म्हणून त्याला बक्षिस मिळाले.

 

२) गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय

गौण म्हणजे मुख्य नसलेला.

प्रधान वाक्य + गौण वाक्य = मिश्र वाक्य

ज्या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्य ही मिश्र वाक्य बनतात त्या वाक्यांना गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

गौण वाक्य म्हणजे वाक्याच्या दृष्टीने प्रधान वाक्यावर अवलंबून असतात, म्हणजेच गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय असमानदर्जाची असतात.

गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांना व्याधीकरण अव्यये असे सुद्धा म्हणतात.

प्रधान वाक्य + उभयान्वयी अव्यय + गौण वाक्य = गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय

प्रधान वाक्य व गौण वाक्य यांना यांना जोडणाऱ्या उभयान्वयी अव्ययांना गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणतात.

गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांचे प्रकार

गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांचे एकूण ४ प्रकार पडतात.

१) स्वरुपबोधक उभयान्वयी अव्यय

२) कारणबोधक उभयान्वयी अव्यय

३) उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय

४) संकेतबोधक उभयान्वयी अव्यय

१) स्वरुपबोधक उभयान्वयी अव्यय

प्रधान वाक्य+ गौण वाक्य = स्वरुपबोधक

स्वरुपबोधक वाक्यामध्ये पहिल्या वाक्यात जे काही आहे त्या वाक्यच स्पष्टीकरण, स्वरूप, खुलासा दुसऱ्या वाक्यात दिलेलं असत.

म्हणून, म्हणजे, की, जे या उभयान्वयी अव्ययांनी जे एक प्रधानवाक्य व एक गौण वाक्य जोडले जाते त्यास स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय म्हणतात.प्रधान वाक्याचे स्वरूप किंवा खुलासा गौण वाक्यांनी दाखविला जातो.

स्वरुपबोधक उभयान्वयी अव्ययांची उदाहरणे

१) गुरुजी म्हणाले की पृथ्वी गोल आहे.

विद्यार्थी मित्रांनो उदाहरनाद्वारे नीट समजून घ्या, बघा पहिल्या वाक्यात जे काही आहे त्या वाक्यच स्पष्टीकरण, स्वरूप, खुलासा दुसऱ्या वाक्यात दिलेलं असत. गुरुजी म्हणाले ( पहिलं वाकय ) पृथ्वी गोल आहे ( दूसर वाक्य )

२) एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर होय.

२) कारणबोधक उभयान्वयी अव्यय

प्रधान वाक्य + गौण वाक्य = कारणबोधक वाक्य

कारण, का की, कारण की या उभयान्वयी अव्ययांनी एक प्रधान वाक्य व गौण वाक्य जोडले जाते. त्या अव्ययांना कारणबोधक उभयान्वयी अव्यय म्हणतात. प्रधान वाक्यातील कारण हे गौण वाक्यांनी दाखविले जाते.

कारणबोधक उभयान्वयी अव्ययांची उदाहरणे

१) त्याला शिक्षा झाली कारण त्याने चोरी केली.

विद्यार्थी मित्रांनो उदाहरनाद्वारे नीट समजून घ्या, बघा पहिल्या वाक्यात जी घटना आहे त्या वाक्यच कारण दुसऱ्या वाक्यात आहे.त्याला शिक्षा झाली ( पहिल वाक्य ) त्याने चोरी केली ( दुसर वाक्य )

२) तो डॉक्टर झाला कारण त्याने खूप अभ्यास केला.

३) उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय

गौण वाक्य + प्रधान वाक्य = उद्देशबोधक वाक्य

उद्देश भविष्य काळाशी संबंधित असतो.

म्हणून, सबब, यास्तव, कारण की या उभयान्वयी अव्ययांनी पहिले गौण व दुसरे प्रधाण वाक्य जोडले जातात. त्यांना उद्देशबोधक उभयान्वी अव्यय म्हणतात.

उद्देशबोधक उभयान्वयी अव्ययांची उदाहरणे

१) चांगले गुण मिळावेत म्हणुन तो अभ्यास करतो.

२) चांगली नोकरी मिळावी यास्तव तो पुण्याला गेला.

३) सुवर्णपदक मिळावे यास्तव त्याने खूप मेहनत घेतली.

४) संकेतबोधक उभयान्वयी अव्यय

गौण वाक्य + प्रधान वाक्य = संकेतबोधक वाक्य

जर-तर, जरी तरी, म्हणजे, की, तर या उभयान्वयी अव्ययांनी पहिले गौण व दुसरे प्रधान वाक्य जोडले जातात. त्यांना संकेतबोधक उभयान्वयी अव्यय म्हणतात.

संकेत म्हणजे अट यासारख्या वाक्यात गौण वाक्याच्या अटीवर प्रधान वाक्यातील गोष्ट घडत असते.

संकेतबोधक उभयान्वयी अव्ययांची उदाहरणे

१) जर ढगफुटी झाली तर नदीला पुर येईल.

२) जर प्रयत्न केला तर यश मिळेल.

३) चांगला अभ्यास केला तर चांगले गुण मिळतील.

४) मी पास झालो, की मी पेढे वाटील.

केवल वाक्य

केवल वाक्य – केवल वाक्य ना प्रधान असते ना गौण असते जेव्हा ते एकच असते तेव्हा ते केवल वाक्य असते.

केवल वाक्यात कर्ता + क्रियापद एकच असते

कधी कर्ते २ असू शकतात परंतू क्रिया मात्र एकच असते.

रमेश व सुरेश खेळायला गेले.

बघा वाक्यात कर्ते २ आहे ( रमेश व सुरेश ) परंतू क्रिया (खेळायला) मात्र एक आहे.

उभयान्वयी अव्यय examples in marathi

उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार | Ubhyanvayi Avyay in Marathi | उभयान्वयी अव्यय उदाहरण [With PDF]
उभयान्वयी अव्यय उदाहरण [With PDF]

मरावे परी किर्ती रूपे उरावे. अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.

१) समुच्चयबोधक

२) विकल्पबोधक

३) परिणाम बोधक

४) न्यूनत्व बोधक

४) न्यूनत्व बोधक

 

पुढीलपैकी कोणते अव्यय उभयान्वयी अव्यय आहे?

१) अथवा

२) देखील

३) पुढे

४) बद्दल

१) अथवा

 

खालील वाक्यातील अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा? नौकरी मिळावी म्हणून तो शहरात आला.

१) परिणाम बोधक

२) स्वरूपबोधक

३) उद्देशबोधक

४) संकेतबोधक

३) उद्देशबोधक

 

जे शब्द, दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडतात त्यांना काय म्हणतात?

१) विशेषण

२) शब्दयोगी

३) केवलप्रयोगी

४) उभयान्वयी

४) उभयान्वयी

 

दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतात?

१) केवलप्रयोगी अव्यय

२) शब्दयोगी अव्यय

३) उभयान्वयी अव्यय

४) क्रियाविशेषण अव्यय

३) उभयान्वयी अव्यय

 

देह जावी अथवा राहो। पांडुरंगी दृढ भावो। या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा?

१) अथवा

२) देह

३) भावो

४) यापैकी नाही

१) अथवा

 

या अव्ययांचा प्रकार ओळखा ‘आणि, पण, किंवा’

१) केवलप्रयोगी अव्यय

२) क्रियाविशेषण अव्यय

३) उभयान्वयी अव्यय

४) शब्दयोगी अव्यय

३) उभयान्वयी अव्यय

 

माझा पहिला क्रमांक आला, की मी पेढे वाटीन. अधोरेखित शब्दाने कोणते उभयान्वयी अव्यय सुचित होते?

१) स्वरूपबोधक

२) विकल्पबोधक

३) परिणामबोधक

४) संकेतबोधक

४) संकेतबोधक

 

गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडून तयार होणारे वाक्य —–असते .

गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडून तयार होणारे वाक्य मिश्र वाक्य असते.

 

खालीलपैकी कोणते उभयान्वयी अव्यय आहे?

१) राम

२) अबब

३) बापरे

४) आणि

४) आणि

 

‘सुधा आणि राधा खेळत होत्या’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा?

१) नाम

२) क्रियापद

३) कर्म

४) उभयान्वयी अव्यय

४) उभयान्वयी अव्यय

उभयान्वयी अव्यय उदाहरण

म्हणजे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?

१) स्वरूपबोधक

२) विकल्पबोधक

३) कारणबोधक

४) संकेतबोधक

१) स्वरूपबोधक

 

संकेतार्थ वाक्य ओळखा?

१) शांत बसा

२) तो शांत बसला

३) त्याने शांत बसावे

४) तू शांत बसलास तर मी सांगेन

४) तू शांत बसलास तर मी सांगेन

 

आभाळामध्ये गडगडाट झाला आणि जोराचा पाऊस सुरू झाला. या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा?

१) विकल्पबोधक

२) समुच्चयबोधक

३) न्यूनत्वबोधक

४) स्वरूपबोधक

२) समुच्चयबोधक

 

पुढील वाक्यातील संकेतबोधक अव्यय कोणते? ‘प्रयत्न केला तर फायदाच होईल.’

१) फायदा

२) तर

३) प्रयत्न

४) होईल

२) तरतर

 

खालील शब्दांपैकी अविकारी शब्द कोणता?

१) हिमालय

२) कोण

३) चांगला

४) आणि

४) आणि

 

‘आम्ही पोहोचलो आणि गाडी सुरू झाली’ या वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता?

१) उभयान्वयी अव्यय

२) शब्दयोगी अव्यय

३) क्रियाविशेषण अव्यय

४) केवलप्रयोगी अव्यय

१) उभयान्वयी अव्यय

 

‘जर मी पुण्यात्त आलो तर तुझ्याकडे येईन.’ या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा?

१) परिणाम बोधक

२) स्वरूपबोधक

३) उद्देशबोधक

४) संकेतबोधक

४) संकेतबोधक

 

न्यूनत्वबोधक संयुक्त वाक्य तयार करताना कोणत्या उभयान्वयी अव्ययांचा वापर होतो?

१) आणि, व

२) अथवा, किंवा

३) पण, परंतु

४) म्हणून, सबब

३) पण, परंतु

 

आईने पोळ्या वाढल्या आणखी वरून तुपाची धार सोडली. अधोरेखित शब्दाची जात ओळखा?

१) उभयान्वयी अव्यय

२) क्रियाविशेषण अव्यय

३) क्रियापद

४) शब्दयोगी अव्यय

१) उभयान्वयी अव्य

 

हेतुदर्शक उभयान्वयी अव्यय असलेले वाक्य कोणते?

१) पैसा मिळावा; म्हणून त्याने सेवा केली.

२) सेवा केली; म्हणून त्याला पैसा मिळाला.

३) पैसा मिळाला कारण त्याने सेवा केली.

४) यांपैकी नाही.

१) पैसा मिळावा; म्हणून त्याने सेवा केली.

उभयान्वयी अव्यय उदाहरण मराठी

अथवा, किंवा ही उभयान्वयी अव्यये काय सुचवितात?

१) विकल्प

२) नैपुण्य

३) अधिक्य

४) वर्णन

१) विकल्प

 

‘अगर’ हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?

१) परिणामबोधक

२) समुच्चयबोधक

३) न्यूनत्व बोधक

४) विकल्पबोधक

४) विकल्पबोधक

 

पुढील वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा. ‘एकदा हरलो म्हणजे संपलेलो नाही.’

१) एकदा

२) हरलो

३) म्हणजे

४) संपलेलो

३) म्हणजे

 

‘तस्मात’ हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?

१) परिणामबोधक

२) समुच्चयबोधक

३) न्यूनत्व बोधक

४) विकल्पबोधक

१) परिणामबोधक

आम्ही पोहोचलो आणि दिवे लागणी झाली. अव्यय ओळखा?

१) उभयान्वयी अव्यय

२) क्रियाविशेषण अव्यय

३) केवलप्रयोगी अव्यय

४) शब्दयोगी अव्यय

१) उभयान्वयी अव्यय

 

‘तेव्हा’ हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?

१) परिणामबोधक

२) समुच्चयबोधक

३) न्यूनत्व बोधक

४) विकल्पबोधक

१) परिणामबोधक

 

‘तुला संपत्ती हवी की सुख हवे?’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे अव्यय ओळखा?

१) परिणामबोधक

२) समुच्चयबोधक

३) न्यूनत्व बोधक

४) विकल्पबोधक

४) विकल्पबोधक

उभयान्वयी अव्यय उदाहरण in marathi

संकेतार्थी वाक्ये कोणत्या अव्ययावरून ओळखावीत.

१) आणि व

२) किंवा-परंतु

३) वा-अन्

४) जर-तर

४) जर-तर

 

योग्य पर्याय निवडुन गाळलेली जागा भरा.

किंवा, अथवा, वा, की, ही———– आहेत.

१) समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय

२) गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय

३) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय

४) न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय

३) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय

 

सबब हे…… बोधक उभयान्वयी अव्यय आहे.

१) समुच्चयबोधक

२) विकल्पबोधक

३) परिणामबोधक

४) उद्देशबोधक

३) परिणामबोधक

 

‘म्हणून’ हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?

१) विकल्पबोधक

२) न्यूनत्व बोधक

३) परिणामबोधक

४) कारणबोधक

३) परिणामबोधक

 

तुला शिकवावे; म्हणून मी येथे आलो आहे. या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा.

१) आलो

२) म्हणून

३) शिकवावे

४) येथे

२) म्हणून

 

‘तो अचानक मेला कारण त्याच्या पोटात चुकीने विष गेले.’

१) स्वरूपबोधक

२) कारणबोधक

३) उद्देशबोधक

४) संकेतबोधक

२) कारणबोधक

 

घर सोडताना माणुसकीची, निरासक्तीची आणि कष्टाळूपणाची भक्कम शिदोरी डेबुजीजवळ होती. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

१) केवलप्रयोगी

२) उभयान्वयी

३) शब्दयोगी

४) क्रियाविशेषण

२) उभयान्वयी

खालीलपैकी न्यूनत्वबोधक नसलेले उभयान्वयी अव्यय कोणते?

१) बाकी

२) शिवाय

३) कींतु

४) परी

१) बाकी

 

‘गड आला पण सिंह गेला’ हे…… उपवाक्य आहे.

१) विकल्पबोधक

२) परिणामबोधक

३) न्यूनत्वबोधक

४) समुच्चयबोधक

३) न्यूनत्वबोधक

 

पुढील वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.

जर मला वेळ मिळाला तर मी तुम्हाला भेटेन.

१) संकेतबोधक उभयान्वयी अव्यय

२) कारणबोधक उभयान्वयी अव्यय

३) स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय

४) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय

१) संकेतबोधक उभयान्वयी अव्यय

 

‘लोक आपली स्तुती करोत किंवा निंदा’ हे संयुक्त वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?

१) विकल्पबोधक

२) परिणामबोधक

३) न्यूनत्वबोधक

४) समुच्चयबोधक

१) विकल्पबोधक

उभयान्वयी अव्यय sentences in marathi

यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार. यातील की या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा?

१) संकेतबोधक

२) परिणामबोधक

३) स्वरूपबोधक

४) विकल्पबोधक

४) विकल्पबोधक

 

‘वाटेत मोटार नादुरुस्त झाली म्हणून मला यावयास उशीर झाला. ‘ वरील वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे?

१) विकल्पबोधक

२) परिणामबोधक

३) न्यूनत्वबोधक

४) समुच्चयबोधक

२) परिणामबोधक

 

तो उठला आणि चटकन निघून गेला. (अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा)

१) उभयान्वयी अव्यय

२) शब्दयोगी अव्यय

३) केवलप्रयोगी अव्यय

४) यापैकी नाही

१) उभयान्वयी अव्यय

 

खालील वाक्यातील अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.

‘माईंनी खूप त्रास काढला, म्हणून तर आता ते सुखात जगताहेत.

१) उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय

२) न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय

३) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय

४) स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय

३) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय

 

व, आणि, किंवा ही उभयान्वयी अव्यये जोडून कोणते वाक्य तयार होते?

१) मिश्रवाक्य

२) संयुक्तवाक्य

३) केवलवाक्य

४) यापैकी नाही

२) संयुक्तवाक्य

 

पुढील वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता? ‘अभ्यासात सातत्य म्हणजे हमखास यश’

१) विकल्पबोधक

२) परिणामबोधक

३) कारणबोधक

४) स्वरूपबोधक

४) स्वरूपबोधक

 

शेतकऱ्यांनी शेते नांगरली, पण पाऊस पडलाच नाही पण या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा?

१) विकल्पबोधक

२) परिणामबोधक

३) न्यूनत्वबोधक

४) समुच्चयबोधक

३) न्यूनत्वबोधक

 

‘तू लवकर घरी आलास म्हणजे आपण बागेत जाऊ’. अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.

१) विकल्पबोधक

२) संकेतबोधक

३) स्वरूपबोधक

४) कारणबोधक

२) संकेतबोधक

 

गड आला पण सिंह गेला है………..उपवाक्य आहे?

१) परिणामबोधक

२) न्यूनत्वबोधक

३) पर्यायबोधक

४) समुच्चयबोधक

२) न्यूनत्वबोधक

 

अरूणाने प्रामाणिकपणे काम केले, म्हणून तिला यश आले. मधील अव्ययाचा प्रकार सांगा?

१) न्यूनत्वबोधक

२) परिणामबोधक

३) प्रधानत्वबोधक

४) विकल्पबोधक

२) परिणामबोधक

 

मरावे परी किर्तीरूपे उरावे. वाक्यातील अधारेखित उभयान्वय अव्ययाचा प्रकार सांगा?

१) परिणामबोधक

२) समुच्चयबोधक

३) विकल्पबोधक

४) न्यूनत्वबोधक

४) न्यूनत्वबोधक

 

दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांना जोडणाऱ्या शब्दांना ……… म्हणतात?

१) शब्दयोगी

२) केवलप्रयोगी

३) उभयान्वयी

४) नामे

३) उभयान्वयी

मधुला गोरी नी शिकलेली वधू पाहिजे. या वाक्यातील नि हे अव्यय कोणते ?

१) विकल्पबोधक

२) समुच्चयबोधक

३) परिणामबोधक

४) न्यूनत्वबोधक

२) समुच्चयबोधक

निष्कर्ष

उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार | Ubhyanvayi Avyay in Marathi | उभयान्वयी अव्यय उदाहरण [With PDF] चा आपण योग्य पद्धतीने सराव करावा अशी आमची इच्छा आहे. खास करून आपण सर्वांकरीता या लेखात उत्तम माहिती चा समावेश करण्यात आला आहे. आशा आहे आपणास हा लेख आवडला असेल. आपले विचार कमेन्ट करून नक्की कळवा.

धन्यवाद…

हे देखील वाचा: नाम म्हणजे काय, नामाचे प्रकार, मराठी व्याकरण, marathi grammar pdf

 मराठी निबंध लेखनअणि भाषण

10+ माझी आई निबंध मराठी | Mazi Aai Marathi Nibandh | My Mother Essay in Marathi

हे देखील वाचा: 5+ मी पाहिलेला अपघात मराठी निबंध | Mi pahilela Apghat Marathi Nibandh | Mi Pahilela Apghat Marathi Essay

5+ माझे गाव निबंध मराठी 2022 | Maze Gav Marathi Nibandh | My village essay in marathi

 

विद्यार्थी मित्रांनो खाली दिलेले PDF button वर क्लीक करून तुम्ही pdf download करू शकता, PRINT काढू शकता आणि Email द्वारे मित्रांना share करू शकता.

Print Friendly, PDF & Email
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.