५. एक होती समई स्वाध्याय | ek hoti samai swadhyay itatta navvi

एक होती समई स्वाध्याय | ek hoti samai swadhyay itatta navvi | 9th Swadhyay marathi 

 

प्र. १. चौकटी पूर्ण करा.

(अ) कोसबाडच्या टेकडीवरील समई म्हणून ओळख – अनुताई वाघ

(आ) रोपट्याचा वटवृक्ष झालेली संस्था – बाल ग्रामशिक्षण केंद्र 

(इ) आयुष्याचा पाया भक्कम करणारे – प्राथमिक शिक्षण

(ई) भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणारे –आदिवासी बालक

 

प्र. २. खालील घटनांचे परिणाम लिहा

        घटना       परिणाम
(अ) अनुताईंचे निधन.कोसबाडच्या परिसरातील आदिवासी दुःखी झाले.
(आ) ताराबाईंनी अनुताईंचे अश्रू पुसले. डोंगराएवढे दुःख त्यांनी फेकून दिले आणि जिद्दीने उभ्या राहिल्या.
(इ) ताराबाईंचे निधनअनुताई ताराबाईंच्या संस्थेच्या संचालक झाल्या.

 

प्र. ३. कार्यक्षेत्र लिहा.

शिक्षणशेक्त्राव्यातिरिक्त असलेली अनिताईंची कार्यक्षेत्रे

बालकल्याणमहीलविकासअंधश्रद्धा निर्मुलनआरोग्य

 

प्र. ४. का ते लिहा.

(अ) शिक्षणक्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्यानं आकर्षण राहिलं.

उत्तर – (१) शिक्षण सर्वांगीण असले पाहिजे. ते एकांगी असता कामा नये. तसेच, केवळ चाकोरीबद्ध रितीने न शिकवता अनेक प्रयोग केले पाहिजेत, असा दृष्टिकोन बाळगून अनुताईंनी कार्य केले. त्यांच्या या कार्याविषयी अनेकांना कुतूहल होते. म्हणून शिक्षणक्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचे सातत्याने आकर्षण राहिले.

(आ) अनुताईंच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध झाला.

उत्तर – (१) अनुताईंच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध झाला. त्यामागे रूढी, परंपरा, अज्ञान व अंधश्रद्धा ही प्रमुख कारणे होती. प्रचंड अज्ञानामुळे लोकांना स्वतंत्र बुद्धीने विचार करता येत नाही. त्यामुळे ते अंधश्रद्धेने ग्रासलेले असतात. त्यांना नवीन सुधारणा नको असतात. सुधारणांमुळे आपले नुकसान होईल, अशी त्यांना भीती वाटते. म्हणून ते शिक्षणाला विरोध करतात.

प्र. ५. खालील शब्दांमधील कल्पना स्पष्ट करा.

भातुकलीचा खेळ, ज्ञानयज्ञ, ज्ञानगंगा, पाऊलखुणा

(१)भातुकलीचा खेळ

उत्तर – लहान मुलांचा, विशेषत: मुलींचा खेळ. यात खोटा खोटा संसार उभारला जातो. संसारोपयोगी चिमुकली भांडी आणली जातात. प्रत्यक्ष संसारात मोठी माणसे जशी वावरतात, त्याचे अनुकरण करीत खेळ मांडला जातो. बाहुला बाहुलीचे लग्नही लावले जाते. थोडक्यात, भातुकलीचा खेळ म्हणजे खोटा खोटा, आभासमय असा संसार अनुताईंच्या वाट्याला खरा संसार आलाच नाही. जणू काही भातुकलीचा खेळ होता तो.

 

(२) ज्ञानयज्ञ

उत्तर – विधिपूर्वक अग्नी पेटवला जातो आणि त्यात आपल्या जवळच्या पदार्थाची आहुती दिली जाते. अग्नी ती आहुती परमेश्वरापर्यंत पोहोचवतो, अशी श्रद्धा आहे. अनुताईंनी शिक्षणप्रसाराचे कार्य सुरु केले. त्या कार्यात त्यांनी आपले सर्वस्व ओतले. यज्ञात आहुती देतात, तशी अनुताईंनी स्वतःच्या जीवनाची आहुती दिली. म्हणून त्यांचे कार्य म्हणजे ज्ञानयज्ञ होय.

 

(३) ज्ञानगंगा

उत्तर – गंगा नदी पवित्र मानली जाते. गंगेचे पाणी प्याल्यास पुण्य मिळते, पाप नाहीसे होते अशी श्रद्धा आहे. गंगा नदी घरोघर पोहोचवणे म्हणजे सर्वांचे दुःख, दैन्य दूर करणे असा अर्थ रूढ झाला आहे. अनुताईंनी आदिवासी बालकांपर्यंत शिक्षण नेले. एक प्रकारे त्यांचे जीवन अनुताईंनी पवित्र केले, म्हणून त्यांच्या कार्याला लाक्षणिक अर्थाने ज्ञानगंगा म्हटले आहे.

(२) पाऊलखुणा

उत्तर– या शब्दाचा शब्दशः अर्थ, चालताना वाटेवर निर्माण झालेल्या पावलांच्या खुणा. त्या खुणांवरून, कोण चालत गेले, हे सांगता येते. अनुताईंनी शिक्षणप्रसाराचा जो मार्ग अवलंबिला तो मार्ग आणि त्यांनी काय, काय केले ते त्यांचे कार्य या गोष्टी म्हणजे त्यांच्या पाऊलखुणा आहेत. या पाऊलखुणा जपल्या पाहिजेत.

प्र. ६. खालील शब्दसमूहांसाठी एक शब्द लिहा.

(अ) व्रताने स्वत:ला बांधणाऱ्या- व्रतस्थ

(आ) नेमाने स्वत:ला बांधणारा- नेमस्त

(इ) गावातील रहिवासी- ग्रामस्थ

(ई) तिऱ्हाइताच्या भूमिकेतून बघणारा – तटस्थ

 

प्र. ७. खाली दिलेल्या शब्दांचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा.

उदा., (१) सापेक्ष × निरपेक्ष (२) अनावृष्टी ×अतिवृष्टी

(१) अनाथ × सनाथ (४) पुरोगामी × प्रतिगामी

(२) दुश्चिन्ह × सुचिन्ह (५) स्वदेशी × परदेशी

(३) सुपीक × नापिक (६) विजातीय × सजातीय

 

प्र. ८. स्वमत.

(१) अनुताई वाघ यांना दिलेल्या समईच्या उपमेची सार्थकता तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर : समईचा प्रकाश मंद, शांत, स्निग्ध असतो. तिच्या प्रकाशात शांत, निवांत वाटते. ती गाभारा उजळून टाकते. त्या शांत प्रकाशात बसावे आणि देवाचे नाव घ्यावे अशी इच्छा होते. तिचा प्रकाश भगभगीत नसतो. भगभगीत प्रकाशात मनाला शांती मिळतच नाही. अनुताई वाघांचे व्यक्तिमत्त्व समईसारखे होते. त्यांच्याजवळ डामडौल नव्हता. भपका नव्हता. त्या कडक शिस्तीच्या नव्हत्या. मुलांवर रागावून, त्यांना दम देऊन गप्प बसवणाऱ्या नव्हत्या. त्यांना आदिवासी मुलांबद्दल अमाप माया होती. त्यामुळे आदिवासी मुलांना अनुताईंच्या सहवासात असताना मायेची ऊब मिळे, अनुताईंचा सहवास त्या मुलांना जणू समईचा प्रकाशच वाटे. अनुताईंना दिलेली समईची उपमा यथार्थ आहे.

(२) ‘समई हे सातत्याचे, संयमी वृत्तीचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे’. या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.

उत्तर : समई देवाजवळच लावली जाते. घरात प्रकाश मिळावा, म्हणून अन्य दिवे वापरतात; समई नव्हे, देवाजवळची, गाभाऱ्यातली समई सतत तेवती राहावी याची काळजी घेतली जाते. म्हणून सतत तेवणारी ती समई. समईमध्येच सातत्य सामावलेले आहे. समई संपूर्ण घर, संपूर्ण महाल किंवा संपूर्ण परिसर उजळून टाकण्याची ईर्षा बाळगत नाही. ती फक्त देवघर किंवा मंदिरातला गाभारा उजळते. पण उजळते म्हणजे झगझगीत प्रकाश पसरवीत नाही. तिचा मंद प्रकाश डोळ्यांना, मनाला शांत, निवांत करणारा असतो. मर्यादित प्रमाणात राहावे, ही तिची वृत्तीच जणू असते, म्हणून ती संयमी वाटते. समईच्या प्रकाशात असलेला परिसर उच्च, उदात्त भावनेने भारलेला असतो. ही भावना माणसाला फार मोठे समाधान देते. असे समाधान देता येणे हे समईचे सामर्थ्य आहे.

 

 

 

 

Print Friendly, PDF & Email
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.