१७. ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ स्वाध्याय नववी मराठी | Olympic vartulacha gof Swadhyay navvi marathi

१७. ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ स्वाध्याय नववी मराठी | Olympic vartulacha gof Swadhyay navvi marathi | 9th marathi swadhyay 

प्र. १. आकृती पूर्ण करा.

 

(अ)

 

(आ)

                ऑलिंपिक सामन्यातून विकसित
                     होणाऱ्या भावना.
                      सद्भावना
                        शिस्त
                       समता
                         मैत्री
                        ऐक्य
                     विश्र्वबंधुत्व

 

प्र. २. योग्य पर्याय निवडून वाक्ये पुन्हा लिहा.

(१) पहिले ऑलिंपिक व्हिलेज……… येथे वसले.

(अ) ग्रीस (आ) मेलबोर्न (इ) फ्रान्स (ई) अमेरिका

उत्तर – (आ) मेलबोर्न

(२) ……… पासून ऑलिंपिक सामने दर चार वर्षांनी वेगवेगळ्या देशांत भरवले जातात.

(अ) १८९६ (आ) १९५६ (इ) इ. स. ७७६ (ई) इ. स. पूर्व ३९४

उत्तर – (इ) इ. स. ७७६

प्र. ३. खालील वाक्य वाचा. अधोरेखित केलेल्या शब्दांबाबत माहिती भरून तक्ता पूर्ण करा. एखाद्या शब्दाला

खालील मुद्दे लागू नसतील तर तिथे –  हे चिन्ह लिहा. उदा., ‘व’ यासाठी लिंग, वचन, विभक्ती सगळीकडे –  हेचिन्ह येईल.

(१) पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात.

अ. क्र शब्दमूळ शब्दशब्धजातप्रकारलिंगवचन  विभक्ती
(१)पुरुषांसाठीपुरुषनामसामान्य ज्ञानपुल्लिंगअनेकचतुर्थी
(२)उभयान्वयी अव्यय  –  –  –
(३)स्त्रियांसाठीस्त्रीनामसामान्य ज्ञान स्त्रीलिंगअनेकचतुर्थी
(४)वेगवेगळेवेगवेगळेविशेषणगुणविशेषपुल्लिंगअनेक  –
(५)सामनेसामनानामसामान्य ज्ञानपुल्लिंगअनेक  प्रथमा
(६)होतातहोणेक्रियापद –  –  –   –

 

प्र. ४. स्वमत.

(१) ‘ऑलिंपिक म्हणजे विश्वबंधुत्व’ ही संकल्पना स्पष्ट करा.

उत्तर : ऑलिंपिक सामन्यात पृथ्वीवरील बहुसंख्य राष्ट्रांचे खेळाडू सहभागी होतात. ते त्या राष्ट्रांचे प्रतिनिधी असतात. संपूर्ण जगाचे या सामन्यांकडे लक्ष असते. या क्रीडास्पर्धा आहेत. त्यांत जातिभेद, धर्मभेद व वर्णभेद नसतो. सगळेजण समान असतात. अमेरिका हा गौरवर्णीय लोकांचा देश. तरीही जेसी ओवेन्स या आफ्रिकी वंशाच्या खेळाडूचा अमेरिकेने केवढा गौरव केला! त्या खेळाडूचा अमेरिकेला केवढा अभिमान वाटला! या क्रीडास्पर्धांमुळे माणसामाणसांतील द्वेष, वैर या भावना नष्ट होतात. माणसे एकमेकांशी प्रेमाने, बंधुभावाने ‘वागतात. म्हणून ऑलिंपिक म्हणजे विश्वबंधुत्व होय.

 

 

Print Friendly, PDF & Email
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.