३. कीर्ती कठीयाचा दृष्टान्त स्वाध्याय। Kirti Kathiyacha Drushtant Swadhyay। 9th Marathi Kumarbharti

कीर्ती कठीयाचा दृष्टान्त स्वाध्याय । Kirti Kathiyacha Drushtant swadhyay। 9th Marathi Kumarbharti

प्र. १. काेणांस उद्देशून म्हटले आहे ते लिहा.

(१) वानरेया – नागदेवाचार्य
(२) सर्वज्ञ – श्रीचक्रधरस्वामी
(३) गोसावी – श्रीचक्रधरस्वामी

 Kirti Kathiyacha दृष्टांत swadhyay

प्र. २. आकृती पूर्ण करा.

निष्ठापूर्वक काम करण्याची वृत्ती कठीयाची जाणवलेली स्वभाववैशिस्ट्ये लोकांची स्तुती केल्यावर फुषारून जाण्याची सवय

 Kirti Kathiyacha Drushtant  Swadhyay

प्र. ३. प्रस्तुत दृष्टान्तातील उपदेश तुमच्या शब्दांत सांगा.

उत्तर –  गोसावीयांचा ठायी उदयाचे मातीकाम होत होतेः ते | सी बाजत होते: तेणे भक्तीजनासी व्यापार होववे ना: आन भट व्यापार करू लागले: नाथोबाए म्हणीतलें: “नागदेया: तू कैसा काही हींवसी ना?” तवं भटी म्हणीतलें: “आम्ही वैरागी: काइसीया हीवुः” यावरी सर्वज्ञे म्हणीतलें: “वानरेयाः पोरा जीवासी वैराग्य मिरवु आवडे: हाही एकू विकारुचि कीं गाः” यावरि भटी म्हणीतलें: “जी जी: निर्वीकार तो कवणः’ :” सर्वज्ञे मह्णीतलें: “वानरेया: पोर जीव वीकारावेगळा केव्हेळाही जालाचि नाही: मा तु काइ वेगळा अससि:” “हो कां जी:” यावरि गोसावी कीर्ती कठीयाचा दृष्टान्त निरोपीला: ‘कव्हणी ऐकू कठीया असे: तो भोगस्थानाची सुश्रुषा करी: झाडी: सडा संमार्जन करी: ते देखौनि गावीचे म्हणति: ‘कठीये हो नीके करीत असा: बरवे करीत असा:’ ते आइकौनि दीसवडीचा दीसवडी हात हात चढवी: तयासि देवता आपुले फळ नेदी: तयासि कीर्तीचेचि फळ झाले:”

 Kirti Kathiyacha Drushtant swadhyay

प्र. ४. पुढील शब्दांना प्रमाणभाषेतील शब्द सांगा.

कठीया – पुजारी

सी – थंडी

काइसीया – कसली

कव्हणी – कोणी

 Kirti Kathiyacha Drushant Swadhyay

प्र. ५. ‘आपल्यातील गुण हाच अवगुण होऊ शकतो’, हा विचार प्रस्तुत पाठाच्या आधारे स्पष्ट करा.

उत्तर : नागदेवाचार्य हे महानुभाव पंथातील एक ज्येष्ठ शिष्य होते. त्यांची पंथाच्या विचारांवर निष्ठा होती. ते अगदी निष्ठेने पंथाच्या विचारांनुसार आचरण करीत असत. त्यामुळेच असे आचरण करताना ते कष्टाची पर्वा करीत नसत. एके दिवशी सकाळी सकाळी ते पंथासाठी मातीकाम करीत होते. कडाक्याची थंडी पडली होती. सर्व शिष्यांना थंडीत काम करणे अवघड बनले होते. पण कष्टांची पर्वा न करता नागदेवाचार्य काम करीत राहिले. हा त्यांचा खूप चांगला गुण होता. मात्र, आपण वैरागी आहोत, आपण हे कष्ट सहन करू शकतो, असा अहंकार त्यांच्या मनात निर्माण झाला. म्हणजेच नागदेवाचार्यांचा चांगला गुण त्यांना हानिकारक ठरला; अवगुण ठरला.

 Kirti Kathiyacha Drushtant  Swadhyay

प्र. ६. पाठातील दृष्टान्त वेगळ्या उदाहरणाद्वारे स्पष्ट करा.

उत्तर : आमच्या परिसरात अगदी अलीकडेच घडलेली घटना आहे. आमच्या परिसरातील शाळेचा एस.एस.सी. परीक्षेचा निकाल खूप चांगला लागला. यशस्वी विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना व पालकांनाही शिक्षकांबद्दल कृतज्ञता वाटत होती. त्यातही श्री. वसंतराव या शिक्षकांबद्दल तर खूप आदर वाटत होता. ते भाषणाला उभे राहिले, तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला.

आपण विद्यार्थ्यांसाठी किती कष्ट घेतले, रात्ररात्र जागरणे केली, जेवणाखाण्याची पर्वा केली नाही. स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष दिले नाही, वगैरे त्यागाचे वसंतरावांनी भरभरून वर्णन केले. हे सर्व खरेच होते. पण बोलता बोलता ते स्वतःची स्तुती करू लागले. तेव्हा लोक नाराज होऊ लागले. शेवटी तर “मी नसतो तर विदयार्थ्यांना एवढे यश मिळालेच नसते,” असेही ते म्हणाले. यावरून त्यांना प्रचंड गर्व झाल्याचे दिसत होते. म्हणजे केवळ चांगला गुण असून उपयोगाचे नाही. गर्वामुळे चांगला गुणही वाया गेला. पाठातील तत्त्व आम्हांला या प्रसंगात पाहायला मिळाले.

Print Friendly, PDF & Email
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.