बालसाहित्यिका-गिरिजा कीर (स्थूलवाचन १)
गिरिजा कीर स्थूलवाचन स्वाध्याय ( FULL QUESTIONS AND ANSWERS )
(१) आकृत्या पूर्ण करा.
(अ)

(आ)

यांनी लिहिलेल्या चरित्रांची वैशिष्ट्ये
(२) टिपा लिहा.
(अ) गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष.
उत्तर : गिरिजाबाईंनी बालकांसाठी सुद्धा ;लक्षणीय साहित्यनिर्मिती केली. त्यांनी नऊ ते बारा वर्षे वयोगटासाठी आणि खास बालवर्गासाठी (सुमारे पाच ते नऊ वर्षे) नाटिका लिहिल्या. बालकांचे वय लक्षात घेऊन त्यांनी साध्या, सोप्या व जोडाक्षरविरहित बालनाटिका देण्याचाही प्रयत्न केला.
गिरिजाबाईंच्या बालनाटिकांचे त्या काळाच्या तुलनेत एक खूप महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. साधारणपणे लहान मुलांना अद्भुतरम्य व चमत्कारावर आधारित कथानके आवडतात, असा समज असतो. गिरिजाबाईंनी या समजाला छेद दिला. त्यांनी वास्तवावर आधारित बालनाटिका लिहिल्या. मुलांचे भावविश्व व त्यांच्या गरजा यांना प्राधान्य देऊन बालनाटिका लिहिल्या. त्यांच्या बालनाटिकांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची चित्रदर्शी शैली. त्यांच्या नाटिकांमधला प्रसंग समोर जिवंतपणे घडत आहे, असे वाटत राहते. त्यामुळे त्यांच्या बालनाटिका पाहताना प्रेक्षक खिळून बसतात. एकंदरीत त्यांच्या बालनाटिका वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
(आ) ‘यडबंबू ढब्बू’ या गिरिजा कीर यांच्या बालकादंबरीतील विनोद.
उत्तर : कुणालाही दुःखी ठेवू नये.” असा आईने ढब्बूला उपदेश केला होता. ढब्बूने तो शिरोधार्य मानला. व्यायांना देण्यासाठी ठेवलेले मिठाईचे ताट ढब्बूने भिकाऱ्यांना वाटले. भिकाऱ्यांना अर्थातच प्रचंड आनंद झाला. पण घरातली मंडळी खूप कातावली. आईचा उपदेश ढब्बूने शब्दशः पाळला. भिकारी म्हणजे माणसेच. त्यांना तरी दुःखी का ठेवावे, असा व्यापक विचार त्याने केला. पण लोक जेव्हा असा व्यापक विचार .मांडतात, तेव्हा त्यांच्या मनात खराखुरा व्यापक विचार नसतो. लोक संकुचितच विचार करतात.
सर्वांशी प्रेमाने वागावे, असे म्हणताना त्यांच्या मनात सर्व म्हणजे घरातली माणसे असतात किंवा फार फार झाले. तर नातेवाईक, शेजारीपाजारी, मित्रमंडळी इत्यादी असतात. जात-धर्म यांचा विचार करू नये, असे त्यांच्या मनात नसते. यातून विसंगती निर्माण होते. ढब्बू स्वतःच्या वागण्यातून समाजातली ही विसंगती दाखवून देतो. त्यामुळे विनोद निर्माण होतो.
(३) ‘मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे’ या विधानाबाबत तुमचा अभिप्राय स्पष्ट करा.
उत्तर : आईवरील प्रेमापोटी कोणतीही कृती करायला मधू तयार होतो. तो एका गृहस्थाचे पाकीट मारतो. पुढे पाकिटातील चिठ्ठीवरून मधूला सत्य स्थिती कळते. आपण चोरलेल्या पैशांमुळे त्या गृहस्थाच्या. आईला जीव गमवावा लागू शकतो. या विचाराने तो व्याकूळ होतो आणि पाकिटात असलेल्या पत्त्यावरून ताबडतोब पैसे परत करण्याचा तो निर्णय घेतो. त्याची ही कृती त्याच्या संवेदनशील मनाचे उदाहरण आहे. आपल्या कृतीमुळे कोणाचातरी मृत्यू ओढवणे हा क्रूरपणाच होय, ते त्याला जाणवते. आपली जशी आई आहे, तशीच दुसऱ्या व्यक्तीलासुद्धा आई असते. त्या व्यक्तीलासुद्धा स्वतःच्या आईविषयी प्रेम असणारच. आपण स्वार्थाने आंधळे होऊन फक्त स्वतःचे आईवरील प्रेम लक्षात घेतो; दुसऱ्याच्या मनाचा विचारच करीत नाही, हे मधूच्या लक्षात येते. त्याची तीव्र संवेदनशीलता प्रत्ययाला येते.
(४) साहित्यकृतीचा आस्वाद घेताना लक्षात घ्यायचे मुद्दे, तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर : आपण एखादया कलाकृतीचा आस्वाद घेतो. आपल्याला ती कलाकृती खूप आवडते. इतरांनीही त्या कलाकृतीचा आस्वाद घ्यावा, असे आपल्याला मनोमन वाटते. अशा वेळी आपण बोलतो किंवा लिहितो रसास्वाद असतो. रसास्वाद परिपूर्ण होण्यासाठी पुढील बाबी लक्षात घ्यायला हव्यात :
कलाकृतीचा आशय किंवा कथानक, व्यक्तिरेखा मनाला पटणाऱ्या असल्या पाहिजेत. त्यांच्या स्वभावात वाचकांना किंवा प्रेक्षकांना भारावून टाकण्याची शक्ती असली पाहिजे. लेखकाची भाषाशैली,वर्णनशैली वाचनीय व प्रभावी असली पाहिजे. कथानक उत्कंठा वाढवणारे असले पाहिजे. आपल्या समोरची कलाकृती ही कविता असेल तर त्या कवितेतून कवी कोणता भाव व्यक्त करू पाहतो, हे लक्षात घेतले पाहिजे. त्याला अनुसरून भाषा, अलंकार, प्रतिमा-प्रतीके इत्यादी आहेत का, हेसुद्धा पाहिले पाहिजे. कवितेतून उत्कट भावना व्यक्त झाल्या पाहिजेत.
कथा, कादंबरी वा नाटक असा कोणताही साहित्यप्रकार असो, साहित्यातून व्यापक मानवी मूल्ये प्रकट झाली पाहिजेत. उच्च, उदात्त असे संदेश साहित्यातून मिळायला हवेत.
या सर्व गोष्टी आपल्या रसास्वादामध्ये असल्या पाहिजेत.
गिरिजा कीर स्थूलवाचन स्वाध्याय