थोडं आ भारनियमन करूया स्वाध्याय | thoda aa bharniyman karuya swadhyay marathi navvi
प्र. १. काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा.
(अ) आदर मनात तुडुंब भरून असल्यास ……………………
उत्तर – तो कृतीत सहजासहजी उतरतो.
(आ) खूप जवळच्या गहिऱ्या नात्यात शब्दांनी आभार मानल्यास ……………………
उत्तर – उभयपक्षी अवघडलेला येतो.गाहिरेपणा उगाऊन नुसती औपचारिकता उरते.
(इ) मित्र-मैत्रिणीने आभार मानल्यास……………………
उत्तर – आपल्या पाठीत एक सणसणीत धपाटा मिळतो आणि जादा आगाऊपणा केलास तर याद राख’ अशी धमकीही मिळते.
(ई) लेखिकेच्या मते ‘आ’ भारनियमन केल्यास ……………………
उत्तर – त्या शब्दांमधला जिव्हाळा आणि भावनांची ऊब संपून जाणार नाही.
प्र. २. पाठातील उदाहरणे शोधा
शब्दांशिवाय मानलेले आभार | स्पर्शाने | कटाक्षाने |
ऑपरेशनच्या गुंगितून नुकताच बाहेर आलेला रुग्ण डॉक्टरांचे हात घट्ट धरतो. | आईच्या आजारपणात खूप मदत करणाऱ्या मित्रमैत्रिणींनिकडे कुतज्ञतेने टाकलेला कटाक्ष. |
प्र. ३. चूक की बरोबर ते ओळखा.
(अ) आभार आणि अभिनंदन या शब्दांत माणसं अनेकदा गल्लत करतात.
उत्तर – बरोबर
(आ) भारतीय संस्कृतीत भावनांचे प्रदर्शन करणे आदर्श मानले जाते.
उत्तर – चूक
(इ) मनात आदर असेल तर तो कृतीत दिसतो.
उत्तर – बरोबर
(ई) आभार मानण्याचा अतिरेक चांगला नव्हे.
उत्तर – बरोबर
प्र. ४. कारणे लिहा.
आकाशवाणीवरील आभारप्रदर्शनाची कारणे
आकाशवाणीवरील आभारप्रदर्शनाची कारणे |
गाणे कळवले. |
हवे ते गाणे एकवले. |
पत्राची दखल घेतली. |
आभराचे पत्र पाठवले. |
उत्तर –
प्र. ५. पाठातील विनोद निर्माण करणारी वाक्ये शोधा.
उत्तर :
(१) साध घोटभर पेय दिलं तरी हातभर थँक्यू म्हणतात.
(२) थँक्यू म्हणता येण हा सुसंस्कृतपणाचा कडेलोट आहे, असं काही काळ वाटून गेलं.
(३) तू कसली ग माझी थँक्यू? मीच तुझी थँक्यू
(४) त्याला थँक्यू दिलेस का पण?
(५) तुला कितीही थँक्यू केलं तरी कमीच.
(६) आभार न मानण्याचा मॅनरलेसपणा त्याच्या खाती रुजू होणार नव्हता.
(७) जन्मल्या जन्मल्या आईबापांचे आभार मानणारे कार्ड आणि वर गेल्यावर खालून वेळच्या वेळी आपल्याला नीट वर पोचवणाऱ्यांचे आभार कार्ड अजून माझ्या पाहण्यात आलेलं नाही.
(८) थँक्स फॉर मॅरिंग हं. लग्न केल्याबद्दल मनःपूर्वक आभार. (९) भारनियमन खूप झालं, त्याविषयी खूप लिहून बोलून झालं. आता थोडं (आ) भारनियमन करायला लागूया.
(१०) शस्त्रक्रियेसाठी दाबून फी घेणाऱ्या तज्ज्ञाने आपल्या पोटातला हवा तोच (म्हणजे, खरा तर, नको तो) अवयव कापून काढला आणि वर चाकू-सुरी-कात्री खुणेसाठी आपल्या पोटात मागे ठेवली नाही तर त्याचे आभार मानायला नकोत?
(११) प्लंबर, इलेक्ट्रिशियन ही मंडळी सांगितलेल्या वेळीच घरी कामाला आली आणि त्यांनी जुनं काम करताना नवीन काम निर्माण करून
ठेवलं नाही, तर त्याबद्दल त्यांची आरती ओवाळायला नको?
(१२) इस्त्रीवाल्याने दिलेल्या तारखेला कपडे दिले, तर त्यांना घसघशीत पुष्पहार घालायला नको?
प्र. ६. खाली दिलेल्या शब्दांसाठी मराठी भाषेतील शब्द लिहा.
(१) कॅप्शन – घोषवाक्य
(२) टेन्शन – ताणतणाव
(३) आर्किटेक्ट – वास्तुविशारद
(४) ऑपरेशन – शस्त्रक्रिया
प्र. ७. खाली दिलेल्या शब्दांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
(१) सुसंस्कृतपणाचा कडेलोट
उत्तर – शिष्टाचार पाळणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण मानले जाते. इंग्रज आपल्यापेक्षा श्रेष्ठच आहेत, असे मनोमन मानणारे खूप लोक आहेत. इंग्रज म्हणजे सुसंस्कृतच; ते जे जे करतात, ते ते सर्व सुसंस्कृतपणाचे लक्षणच होय; असे या लोकांना वाटते. इंग्रज लोक उठता बसता थँक्यू म्हणतात, म्हणून त्यांचे आंधळे अनुकरण करणारेही सतत थँक्यू म्हणतात. या लोकांच्या मते, थँक्यू म्हणणे हा सुसंस्कृतपणाचा अत्युच्च बिंदू होय. हा सर्व भाव ‘सुसंस्कृतपणाचा कडेलोटच’ या शब्दांतून व्यक्त होतो.
(२) घाऊक आभार –
उत्तर – अलीकडच्या लहान मुलाच्या खात्यावर ‘मॅनरलेसपणा’ रुजू होणार नाही; कारण अगदी लहानपणापासून शिकवल्याप्रमाणे तो वेळच्या वेळी सर्वांचे न विसरता आभार मानतो.
प्र. ८. स्वमत.
(अ) ‘आभार मानणे’, या शिष्टाचाराविषयीचे तुमचे मत लिहा.
उत्तर : आपण अनेक कामे पार पाडतो. ही कामे आपण पूर्णांशाने केलेली नसतात. त्या कामांना अनेकांचा हातभार लागलेला असतो. तरी कामाचे श्रेय आपल्याला मिळते. त्याचे फायदेही आपल्याला मिळतात. वास्तविक आपल्या एकट्याचा तो अधिकार नसतो. त्यावर इतरांचाही अधिकार असतो. पण श्रेय व फायदे मात्र आपण एकटेच घेतो. हे अनुचित होय. इतरांच्या सहकार्याशिवाय आपण काहीही करू शकत नाही. म्हणून इतरांच्या सहकार्याबद्दल, त्यांच्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आभार मानणे हा कृतज्ञता व्यक्त करण्याचाच प्रकार आहे.
लेखिका मंगला गोडबोले म्हणतात, तेही खरेच आहे. आभाराचा अतिरेक चालू आहे. क्षुल्लक कारणासाठीसुद्धा आभार मानले जातात. बऱ्याच वेळा समोरच्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी आपण स्वतः सुसंस्कृत आहोत, असे दाखवण्यासाठी आभार मानले जातात. असे होते तेव्हा आभाराचा मूळ उद्देशच नष्ट होतो. म्हणून आभार मानताना तारतम्य बाळगले पाहिजे. मुख्य म्हणजे अत्यंत प्रामाणिकपणे आभार मानले पाहिजेत.
(आ) पाठाच्या शीर्षकातून तुम्हांला समजलेला विनोद तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर : भारनियमन म्हणजे विजेच्या पुरवठ्यात केलेली काटकसर. भारनियमन, काटकसर हे गोंडस शब्द झाले. वस्तुस्थिती अत्यंत विदारक आहे. मुंबईसारख्या शहरात २४ तास वीजपुरवठा चालू असतो. पण ग्रामीण भागात मात्र १०- १०, १५-१५ तास वीजपुरवठा बंद असतो. ग्रामीण जनतेला यामुळे अनेक हालअपेष्टांना तोंड दयावे लागते. शासन या हालअपेष्टा कमी करीत नाही, मात्र या हालअपेष्टांना गोंडस नाव देते-‘भारनियमन’ !
उलटी परिस्थिती दुसऱ्या ठिकाणी दिसते. लोक सुसंस्कृतपणाच्या कल्पनेच्या ओझ्याखाली ‘आभार’, ‘सॉरी’ वगैरे शब्दांचा वारेमाप वापर करतात. अत्यंत क्षुल्लक कारणासाठीसुद्धा या शब्दांची उधळमाधळ केली जाते. अनेकदा ही उधळण हास्यास्पद पातळीवर जाऊन पोहोचते. म्हणून लग्न करणाऱ्या नवऱ्या मुलाचे ‘लग्न केल्याबद्दल आभार’ मानले जातात. खरे तर ‘आभारा’ची काटकसर करणे आवश्यक आहे.
वीजपुरवठ्यातील अपुरेपणा ‘आभार’ इत्यादी शब्दांची उधळण या दोन विपरीत स्थितींचा निर्देश करण्यासाठी आणि ‘आभार’ मानण्याबाबत लोकांनी विवेक बाळगावा म्हणून ‘भार’ ‘आभार’ या शब्दांची कोटी – करीत लेखिकांनी ‘आभारनियमन’ हा शब्द घडवला आणि त्यावरून पाठाचे शीर्षक तयार केले आहे.