दुपार स्वाध्याय | dupar swadhyay| दुपार स्वाध्याय मराठी इयत्ता नववी | 9th marathi swadhyay | दुपार स्वाध्याय नववी
प्र. १. तुलना करा.
उत्तर –
कष्टकऱ्यांची दुपार | लेखनिकाची दुपार |
(१) कष्टकरी उन्हातान्हात काम करतात. | कार्यालयात खुर्चीत बसून काम करतात |
(२) सुखदूखाच्या गोष्टी पत्नीशी बोलतात. | सहकाऱ्यांशी सुखदूखाच्या गोष्टी बोलतात. |
(३) शारीरिक कष्ट घेतात | शारीरिक कष्ट कमी |
(४) साधने कष्टाची असतात | संगनकासारखे आधुनिक उपकरण |
प्र. २. कोण ते लिहा.
(अ) दुपारला अभिमान वाटणारा मानवी घटक – शेतकरी
(आ) दुपारला आनंद देणारा घटक – मधल्या सुट्टीत खेळणारी मुले
(इ) दुपारच्या दृष्टीने एकविसाव्या शतकातील श्रमजीवी- कार्यालयातील लेखनिक व हिशोबतपासणीस
(ई) सृष्टिचक्रातील महत्त्वाचे काम करणारा घटक – दुपार
(उ) मानवी जीवनक्रमातील दुपार – तारुण्य
(ऊ) वृद्ध व्यक्ती दररोज आपल्या आयुष्याचे सिंहावलोकन करतात तो काळ – दुपार
प्र. ३. आकृतिबंध पूर्ण करा.
दुपारची मानवीय गुणवैशिष्ट्ये
शेतकऱ्यांकडे आदराने पाहते |
छान आराम करा , असा जाणवणारा सल्ला. कष्टकऱ्यांना सलाम करतें. |
मधल्या सुट्टीत मुलांच्या खेळाचा आनंद घेते |
दमल्याभागल्या जीवाला दुपारी विश्रांती घेऊ देते |
प्र. ४. ‘डौलदार गिरिशिखरे धापाच टाकू लागतात’ या विधानातील अलंकार ओळखून स्पष्ट करा.
उत्तर : हा चेतनगुणोक्ती अलंकार आहे. स्पष्टीकरण : खूप जलद चालल्यावर माणसाला धापा लागतात. इथे डोंगराची शिखरे धापा टाकत आहेत. म्हणजे गिरिशिखरांवर (निर्जीव वस्तूवर) मानवी भावनांचे आरोपण केले आहे. म्हणून हा चेतनगुणोक्ती अलंकार आहे.
प्र. ५. खाली काही शब्दांचे गट दिले आहेत. त्या गटांतून वेगळ्या अर्थाचा शब्द शोधा.
उदा., मित्र – दोस्त, मैत्री, सखा, सोबती = मैत्री
(१) रस्ता – वाट, मार्ग, पादचारी, पथ
उत्तर – पादचारी
(२) पर्वत – नग, गिरी, शैल, शिखर
उत्तर – नग
(३) ज्ञानी – सुज्ञ, सुकर, डोळस, जाणकार
उत्तर – सुकर
(४) डौल – जोम, ऐट, दिमाख, रुबाब
उत्तर – जोम
(५) काळजी – चिंता, जबाबदारी, विवंचना, फिकीर
उत्तर – जबाबदारी
प्र. ६. स्वमत.
(अ) ‘माझी मे महिन्यातील दुपार’ याविषयी आठ ते दहा वाक्ये लिहा.
उत्तर – मे महिन्यातील दुपार आणि तीही मुंबईतील म्हणजे फक्त घामाच्या धारा तरीही दुपारच्या वेळी तळपत्या उन्हात एकच खेळ रंगतो तो म्हणजे क्रिकेट. आठवीपासूनच दहावीची तयारी करावी 7 लागते. त्यामुळे आठवीनंतरच्या मे महिन्यापासून सक्तीने क्लास सुरू होतो. त्या बदल्यात आम्ही मित्र घरून मांडून क्रिकेटची परवानगी मिळवतो. खेळातल्या धावा आणि घामाच्या धारा यांत आमची दुपार चिंब भिजून जाते. तळमजल्यावरचे काका खिडकीत पाण्याने भरलेले छोटे पिंप व ग्लास ठेवतात. तो आमचा मोठाच आधार असतो. क्वचित केव्हातरी टीव्हीवर सिनेमा बघण्यात दुपार जाते. किंवा बाबांच्या लॅपटॉपवर गेम खेळण्यात दंग होतो. पण हे किरकोळ झाले. क्रिकेट खालोखाल मे महिन्यातला दुपारचा आनंदोत्सव म्हणजे पार्टी! पिझ्झा पार्टी, आइस्क्रीम पार्टी किंवा भेळपुरी पार्टी. कोणाचा तरी वाढदिवस असतो, कोणाला तरी काहीतरी मिळालेले असते, खेळून खेळून भूकही लागलेली असते. अशा वेळी पार्टी होतेच. मग काय, वर्गणी काढतो आणि पार्टी करतो. ही दुपारची वेळ आम्हांला खूप आवडते. त्या वेळी आम्ही आमचे राजे असतो. त्या वेळी “पुरे झाले, आता चला घरी,” असे कोणी सांगत नाही. मला नेहमी वाटते वर्षातून दोन-तीन वेळा तरी मे महिना यायला हवा!
(आ) ‘दुपार’ या ललितलेखातील कोणता प्रसंग तुम्हांला अधिक आवडला, ते सविस्तर लिहा.
उत्तर –
कष्टकऱ्यांची दुपार | लेखनिकांची दुपार |
(१) कष्टकरी उन्हातान्हात काम करतात. | कार्यालयात खुर्चीत बसून काम करतात |
(२) सुखदूखाच्या गोष्टी पत्नीशी बोलतात. | सहकाऱ्यांशी सुखदूखाच्या गोष्टी बोलतात. |
(३) शारीरिक कष्ट घेतात. | शारीरिक कष्ट कमी |
(४) साधने कष्टाची असतात. | संगणकासारखे आधुनिक उपकरण |