नाम म्हणजे काय, नामाचे प्रकार, मराठी व्याकरण, marathi grammar pdf – नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी नाम म्हणजे काय, नामाचे प्रकार किती व् कोणते, मराठी व्याकरण, marathi grammar pdf घेऊन आलो आहोत.
नाम म्हणजे काय?
नाम म्हणजे कोणत्याही वस्तुला दिलेले नाव.
जगातील कोणत्याही दृश्य अदृश्य सजीव निर्जीव वस्तूला अथवा पदार्थाला जे नाव दिले जाते त्याला नाम असे म्हणतात.
किंवा
जगातील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा विकारी शब्द म्हणजे नाम होय. वास्तविक अथवा काल्पनिक इंद्रियगम्य आणि मनोगम्य वस्तूंसाठी नामे वापरली जातात.
किंवा
प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तू, पदार्थ किंवा व्यक्तीच्या नावाला किंवा त्यांच्या गुणधर्माला दिलेल्या नवाला नाम असे म्हणतात.
नामाची वैशिष्ट्ये
१) शब्दाच्या जातीमध्ये सर्वाधिक संख्येने असणारी शब्दजाती
२) नामाला लिंग, वचन व विभक्तीचे तसेच शब्दयोगी अव्यायाचे विकार होतात.
३) सामान्यरूप होणे हा नामाचा गुणधर्म आहे.
४) विशेषनामे एकवचनी असतात.
नामाची नाम उदाहरण मराठी वाक्य –
१) रमेश सुरेश दोघे भाऊ आहे.
२) रमेश शाळेत उशीरा आल्याने गुरुजींनी त्याला चांगलाच धडा शिकवला.
३) पाकिटात पैसे कमी होते.
५) आकाश तिथे उभा होता.
६) गंगा नदीचा उगम हिमालयात होतो.
नामाचे प्रकार Namache Prakar in Marathi
नामाचे मुख्यतः एकूण ३ प्रकार आहेत. त्या सर्वांची माहिती आपण बघणार आहोत.
१) सामान्य नाम (जातीवाचक नाम)– Common Nouns
२) विशेष नाम (व्यक्तिवाचक नाम)– Proper Nouns
३) भाव वाचक नाम (धर्मवाचक नाम)– Abstract Nouns

१) सामान्य नाम – Common Nouns
सामान्य नाम म्हणजे काय?
प्रत्येक नामाला विशिष्ट असे नाव आहे जसे सामान्य नामाला जातिवाचक नाम.
एकाच गटातील प्रत्येक वस्तूला समान गुणधर्मामुळे जे एकच नाम दिले जाते त्याला ‘सामान्यनाम’ असे म्हणतात.
सामान्य नामाची वैशिष्ट्ये
१) सामान्यनाम त्या जातीतील प्रत्येक घटकासाठी वापरले जाते.
२) सामान्य नाम परंपरेने, रूढीने किंवा व्यवहाराने मिळते.
३) कोणत्याही भाषेत सामान्य नामांची संख्या इतर नामांपेक्षा जास्त असते.
४) सामान्यनामाचे अनेकवचन होते.
५) परभाषेतून जे शब्द येतात त्यामध्ये सर्वाधिक समावेश सामान्य नामांचा असतो.
सामान्य नाम उदाहरण मराठी वाक्य
१) गंगा नदी आहे.
२) तो चांगला मुलगा आहे.
३) हिमालय उंच पर्वत आहे.
४) शाळेत भरपूर झाडे आहेत.
५) पक्षी झाडावर बसलेले आहेत.
सामान्य नामाचे प्रकार किती
सामान्य नामाचे एकूण २ प्रकार आहेत.
१) पदार्थवाचक नाम Material Noun
२) समूहवाचक नाम Collective Noun
१) पदार्थवाचक नाम Material Noun –
जे घटक शक्यतो लिटर, मीटर किंवा कि. ग्रॅममध्ये मोजले जातात/ संख्येत मोजले जात नाहीत, त्या घटकांच्या नावांना पदार्थवाचक नामे म्हणतात.
उदा. पाणी, लाकूड, साखर, तांबे, कापड, पीठ, प्लास्टिक, सोने इ.
२) समूहवाचक नाम Collective Noun –
एकाच जातीच्या किंवा समान असणाऱ्या अनेक व्यक्ती किंवा वस्तू यांच्या समुदायाचा एकत्रित उल्लेख ज्या शब्दाने केला जातो, त्याला ‘समूहवाचक नाम’ असे म्हणतात.
उदा. थवा, सैनिक, मोळी, टिम, ग्रुप इ.
२) विशेष नाम – Proper Nouns
विशेष नाम म्हणजे काय?
ज्या नामाने त्या जातीतील किंवा गटातील विशेष ओळख दर्शवण्यासाठी व्यक्ती, प्राणी किंवा वस्तू यांना विशेष नाम दिले जाते. त्या नामाला ‘विशेषनाम’ असे म्हणतात.
विशेष नाम उदाहरणे: चंद्र, सूर्य, अजय, गंगा, कोपरगांव
विशेष नामाची वैशिष्ट्ये
१) विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते, सामान्य नाम है जातिवाचक असते.
उदाहरण. प्रशांत (व्यक्तिवाचक) मुलगा (जातिवाचक)
२) विशेष नाम मात्र मुद्दाम ठेवलेले नाव असते.
३) विशेष नाम हे प्रामुख्याने ठेवलेले नाम असते.
४) विशेष नाम हे एकवचनी असते.
५) विशेष नाम हे एका घटकापूरते मर्यादित असते.
विशेष नाम उदाहरणे
१) हिमालय पर्वत खुप उंच आहे.
२) मी भारत देशाचा नागरिक आहे.
३) अजय मुंबईला गेला.
४) आज शिर्डीला खूप पाऊस झाला.
५) माझी मातृभाषा मराठी आहे.
सामान्यनाम | विशेष नाम |
नदी | गंगा, यमुना, तापी, कावेरी |
पक्षी | पोपट, चिमणी, कावळा |
पर्वत | हिमालय |
मुल | अजय, अभय, आकाश, ऋषिकेश, प्रशांत |
मुली | श्रेया, परी, ऋषाली, प्रतिभा, संगिता |
देश | भारत, अमेरिका, पाकिस्तान, जापान, रशिया |
शहर | मुंबई, पुणे, शिर्डी, अहमदनगर, नाशिक |
३) भाववाचक नाम – Abstract Nouns
भाववाचक नाम म्हणजे काय
अशे घटक ज्याना आपन हाथ लाऊ शकत नाही ज्याला स्पर्श करता येत नाही, ज्याची चव घेता येत नाही, ज्यांना आपन डोळ्यांनी पाहू शकत नाही अशा कल्पनेने मानलेल्या गुण, अवस्था व कृती यांच्या नामाला भाववाचक नाम म्हणतात.
उदाहरण. हुशार, प्रमाणिकपना, कपटीपना, आनंद, विश्रांति, चांगुलपना
मित्रान्नो वरील उदाहरणद्वारे तुम्हाला लक्षात आले असेल भाववाचक नाम म्हणजे काय. जसे हुशारी, प्रमाणिकपाना, आनंद आनी विश्रांति हया गोष्टी आपन बघु शकत नाही, आपन हया गोष्टीना हात देखिल लाऊ शकत नाही , आनी आपन या घटकांची चव देखील घेऊ शकत नाही. यालाच मित्रान्नों भाववाचक नाम म्हनतात.
भाववाचक नामाची वैशिष्ट्ये
१) हे घटक वस्तुस्वरूपात दाखविता येत नाहीत.
२) गुणधर्म व भाव दर्शविणाऱ्या शब्दांना भाववाचक नाम म्हणतात.
भाववाचक नामाचे वाक्य
१) प्रत्येकाने माणुसकीने वागले पाहिजे.
२) प्रामाणिकपणापेक्षा मोठा धर्म नाही.
३) आपल्या बागेला फुलांमुळे सौंदर्य आहे.
४) निलेशच्या आवाजात खूप गोडवा आहे.
५) आजकाल महागाई खुप वाढली आहे.
भाववाचक नामाचे प्रकार
१) स्तिथि दर्शक भाववाचक नाम
२) गुण दर्शक भाववाचक नाम
३) कृति दर्शक भाववाचक नाम
१) स्तिथि दर्शक भाववाचक नाम
जी भाववाचक नाम एखादया व्यक्तिची स्तिथि दाखवतात त्यांना स्तिथि दर्शक भाववाचक नाम म्हणतात.
उदाहरण. श्रीमंती, गरीबी, स्वातंत्र्य
२) गुण दर्शक भाववाचक नाम
जे भाववाचक नाम एखादया व्यक्तिचा गुण दाखवतात त्यांना गुण दर्शक भाववाचक नाम म्हणतात.
उदाहरण. हुशारी, नम्रता, प्रमाणिकपणा, फुगिर, आपुकली, शौर्य
मित्रान्नो वरील उदाहरणद्वारे तुम्हाला लक्षात आले असेल गुण दर्शक भाववाचक नाम म्हणजे काय. जसे हुशारी, नम्रता, प्रमाणिकपणा आणि फुगिरपना आपल्याला एखादया व्यक्तीचा गुण दाखवते. यालाच मित्रान्नों गुण दर्शक भाववाचक नाम असे म्हणतात.
३) कृति दर्शक भाववाचक नाम
ज्या भाववाचक नामाने एखादया वस्तुची कृति दाखवाली जाते त्याला कृति दर्शक भाववाचक नाम असे म्हणतात.
उदाहरण. लेखन, वाचन, धावने , अभिनय, नृत्य, चोरी, खेळणे
मित्रान्नो वरील उदाहरणद्वारे तुम्हाला लक्षात आले असेल कृति दर्शक भाववाचक नाम म्हणजे काय. जसे लेखन, वाचन, धावने , अभिनय, नृत्य, चोरी आणि खेळणे आपल्याला एखादया व्यक्तीची कृति दाखवते.यालाच मित्रान्नों कृति दर्शक भाववाचक नाम असे म्हणतात.
खालील प्रत्यय वापरून भाववाचक नामे साधता येतात.
१) | य | सुंदर सौदर्य, गंभीर – गांभीर्य, मधुर माधुर्य, धीर धैर्य, क्रूर क्रौर्य, शूर शौर्य, उदार औदार्य, नवीन नाविन्य |
२) | त्व | माणूस मनुष्यत्व, शत्रू शत्रुत्व, मित्र मित्रत्व, प्रौद प्रौढत्व, जड जडत्व, प्रभाव प्रभुत्व, नेता – नेतृत्व |
३) | पण पणा | देव देवपण बाळ बालपण, शहाणा शहाणपण, बेडा वेडेपणा, चांगला चांगुलपणा, म्हातारा-म्हातारपण, मूर्ख मूर्खपणा |
४) | ई | श्रीमंत – श्रीमंती , गरीब – गरिबी , देवाचे प्रेम , चोराची चोरी , चतुर चतुराई |
५) | ता | नम्र नम्रता, सम समता, वक्र वक्रता, वीर वीरता, एक एकता, बंधु बंधुता |
६) | की | माल मालकी, आपला आपुलकी, गाव गावकी, माणूस माणुसकी, फुशारी फुशारकी |
७) | गिरी | गुलाम – गुलामगिरी, फसवा फसवेगिरी, लुच्चा लुच्चेगिरी, भामटा भामटेगिरी, दादा दादागिरी |
८) | वा | गोड – गोडवा, गार- गारवा, ओला ओलावा, दूर दुरावा, सुंगणे सुगावा, पुरवणे पुरावा, थकणे थकवा |
९) | आई | नवल नवलाई, चपल चपलाई, चतुर चतुराई, दिरंग – दिरंगाई, महाग महागाई, दांडगा दांडगाई |
१०) | वी | थोर थोरवी |
सामान्य नाम विशेषनाम आणि भाववाचक नाम कसे ओळखायचे?
१) सामान्य नामाचे अनेकवचन होते परंतु विशेषनामाचे आणि भाववाचक नामाचे अनेक वचन होत नाही.
उदा. सामान्यनाम – पुस्तक – पुस्तके (अनेकवचन होते)
विशेष नाम – सूर्य, चंद्र (अनेक वचन होत नाही)
२) सामान्य नामाचे अनेकवचन होते कारण त्या विशिष्ट जातीत गटात अनेकांचा समूह असतो.
उदा. नदी – नदया
३) विशेषनामाचे अनेकवचन होत नाही कारण त्या नामाने त्या व्यक्तीला विशेष ओळख दिलेली असते.
उदा. सूर्य, चंद्र , पृथ्वी,
४) सामन्य नाम व विशेषनाम यांना धर्मिवाचक नाम म्हणतात.
Faq’s –
भाववाचक नामाचे एकून किती प्रकार पडतात व कोणते?
भाववाचक नामाचे एकून ३ प्रकार पडतात.
१) स्तिथि दर्शक भाववाचक नाम
२) गुण दर्शक भाववाचक नाम
३) कृति दर्शक भाववाचक नाम
‘ सूर्य ‘ नामाचा प्रकार ओळखा?
विशेषनाम
नामाच्या प्रकारातील कोणत्या नामाचे अनेकवचन होते?
नामाच्या प्रकारातील सामाण्यनामाचे अनेकवचन होते.
नामाच्या प्रकारातील कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही?
विशेषनाम आणि भाववाचक नामाचे अनेकवचन होत नाही.
समान गुणधर्मामुळे दिलेल्या नावाला काय म्हणतात?
समान गुणधर्मामुळे दिलेल्या नावाला सामान्य नाम म्हणतात.
थवा, सैनिक, मोळी, टिम, ग्रुप ही कोणती नामे आहेत?
समूहवाचक नाम
हे देखील वाचा: मराठी निबंध लेखनअणि भाषण
10+ माझी आई निबंध मराठी | Mazi Aai Marathi Nibandh | My Mother Essay in Marathi
5+ माझे गाव निबंध मराठी 2022 | Maze Gav Marathi Nibandh | My village essay in marathi
चंद्र समानार्थी शब्द मराठी 20+ | Moon Synonyms | Chandra Samanarthi Shabd In Marathi
मराठी म्हणी 100+ | मराठी म्हणी संग्रह व अर्थ | Marathi Mhani with Meaning List
पत्र लेखन मराठी 9वी, 10वी | Marathi Letters Writing | Patra Lekhan Marathi [With PDF]
निष्कर्ष
तर मित्रांनो नाम म्हणजे काय, नामाचे प्रकार, मराठी व्याकरण, marathi grammar pdf चा आपण योग्य पद्धतीने सराव करावा अशी आमची इच्छा आहे. खास करून आपण सर्वांकरीता या लेखात उत्तम माहिती चा समावेश करण्यात आलेले आहेत. आशा आहे आपणास हा लेख आवडला असतील. आपले विचार कमेन्ट करून नक्की कळवा.
धन्यवाद…
marathi grammar pdf
विद्यार्थी मित्रांनो खाली दिलेले PDF button वर क्लीक करून तुम्ही pdf download करू शकता, PRINT काढू शकता आणि Email द्वारे मित्रांना share करू शकता.