१५. निरोप स्वाध्याय | Nirop Swadhyay| Nirop Swadhyay navvi marathi| निरोप स्वाध्याय इयत्ता नववी मराठी

प्र. १. योग्य पर्याय निवडा व विधान पुन्हा लिहा.
(अ) कवितेतील आई आपल्या मुलाला औक्षण करत आहे, कारण …………………….
(१) मुलाचा वाढदिवस आहे.
(२) तो रणांगणावर जाणार आहे.
(३) त्याने रणांगणावर शौर्य गाजवले आहे.
(४) त्याने क्रीडास्पर्धेत नैपुण्य प्राप्त केले आहे.
उत्तर – (२) तो रणांगणावर जाणार आहे.
प्र. २. खालील शब्दांतून सूचित होणारा अर्थ लिहा.
(अ) अशुभाची साऊली
उत्तर – शत्रूशी झुंज देण्यासाठी सैनिक जातात, तेव्हा त्यांच्या प्राणांची शाश्वती नसते. लढाईमध्ये कधी प्राण गमवावे लागतील, याचा नेम नसतो. या गोष्टीला कवयित्रींनी अशुभ म्हणजे वाईट छाया असे म्हटले आहे.
(आ) पंचप्राणाच्या ज्योतींनी औक्षण
उत्तर – रणांगणावर लढायला चाललेल्या बाळाचे रक्षण व्हावे, म्हणून पंचारतीने ओवाळणे याला औक्षण म्हणतात. इथे आईला आपला बाळ सुखरूप परत यावा, अशी मनापासून इच्छा आहे. म्हणून तिच्या मायेचे प्रतीक म्हणून ‘पंचप्राणांच्या ज्योतींचे औक्षण’ असा उल्लेख कवयित्रींनी कवितेत केला आहे.
प्र. ३. कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.
कवितेचा विषय | कवितेतील पात्रे | कवितेत उल्लेख केलेल्या थोर व्यक्ती | आईने व्यक्त केलेली इच्छा |
रनांगणावर जाणाऱ्या मुलाला आई निरोप देत आहे. | आई व मुलगा | जिजामाता, राणी लक्ष्मीबाई,शिवाजी महाराज | विजयी होऊन आलास की माझ्या हाताने दुधभात भरविन. |
प्र. ४. काव्यसौंदर्य.
(अ) ‘तुझ्या शस्त्रांना, अस्त्रांना शक्ति देईल भवानी, शिवरायाचे स्वरूप आठवावे रणांगणी’, या काव्यपंक्तीतून व्यक्त होणारा अर्थ स्पष्ट करा.
उत्तर : रणांगणावर लढायला जाणाऱ्या बाळाला धीराने निरोप देताना आई म्हणते – तुझ्यावर अशुभाची सावली पडणार नाही. तू लढताना श्रीछत्रपती शिवरायांचा पराक्रम आठव. त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करताना जे शौर्य दाखवले त्याचे मनोमन स्मरण कर. शिवरायांच्या कर्तृत्वाला जसा भवानीमातेने आशीर्वाद दिला होता, तसाच तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना भवानीमाता शक्ती देईल.
बाळाला निरोप देताना विकल न होणाऱ्या वीरमातेचे दर्शन व तिची मनोकामना या ओळींतून व्यक्त होते.
(आ) ‘धन्य करी माझी कूस, येई विजयी होऊन, पुन्हा माझिया हाताने दूधभात भरवीन’, या काव्यपंक्तीतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर : रणांगणावर लढायला जाणाऱ्या मुलाला निरोप देताना या कवितेतील आई दुःखी होत नाही. तिला स्वतःच्या बाळाच्या पराक्रमावर
विश्वास आहे. ती महाराष्ट्रकन्या आहे. वीरमाता आहे. काही अशुभ घडणार नाही, याची तिला खात्री आहे. शिवरायाचे स्वरूप आठवून झुंज दे व भवानीमातेचा वरदहस्त तुझ्यावर आहे, हे मनात उसव, अशी ती निर्धाराने सांगते. आपला बाळ विजयी होऊन घरी नक्की पोहोचेल. तो विजयी होऊन येईल तेव्हा आईला आपण बाळाला जन्म दिल्याचे सार्थक होईल. मग ती त्याला लहानपणी जशी प्रेमाने दूधमात भरवायची तशी आताही भरवील.आईची बाळाच्या कर्तृत्वावर असलेली खात्री आणि शाश्वत निरंतर माया या ओळींतून दिसून येते.
प्र. ५. अभिव्यक्ती.
(अ) कवितेतील वीर मातेच्या भावना तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर : रणांगणावर लढायला जाणाऱ्या बाळाला निरोप देणारी कवितेतील आई, ही सामान्य आई नाही. ती वीरमाता आहे. ती या प्रसंगी आनंदाने घराला तोरण बांधते. पंचप्राणांच्या ज्योतींनी बाळाचे औक्षण करते. ती बाळाला म्हणते तुझ्या पराक्रमी बाहूंनी या देशाच्या स्वतंत्रतेचे रक्षण तुला करायचे आहे. तुझ्या खांदयावर भविष्यातील सुखशांती विसावलेली आहे. माझ्या डोळ्यांत अश्रू येणार नाहीत की गळ्यात हुंदकाही दाटणार नाही. मी वीरांचा धर्म जाणणारी महाराष्ट्रकल्या आहे. मला जिजाई व राणी लक्ष्मीबाईंचा वारसा लाभला आहे. मीच तुझ्या तलवारीला धार लावून ठेवली आहे. तुझ्या कोणत्याही संकटाची सावलीदेखील पडणार नाही. तू शिवरायांचे कर्तृत्व स्मर. माय भवानी तुला शक्ती देईल. विजयी होऊन ये, मग मला तुला जन्म दिल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटेल. माझ्या हातांनी माझ्या बाळाला मी दूधभात भरवीन,हिंमत, ठाम निर्धार व माया यांचे दर्शन वीरमातेच्या बोलण्या व्यक्त झाले आहे.
(आ) ‘भारतभू ही वीरांची भूमी आहे’, याबाबत तुमचे मत लिहा.
उत्तर – : भारतभूमीचा इतिहास हा पराक्रमाचा इतिहास आहे. रामायण-महाभारत काळापासून याची साक्ष आपणांस मिळते. दुष्टांना सजा देण्यासाठी प्राचीन काळापासून या भूमीत प्रबळ योद्धे निर्माण झाले आहेत. या भारतवर्षावर अनेक परकीय आक्रमणे झाली; पण धैर्याने व शौर्याने परतून लावण्याचे धाडस मातृभूमीतील वीरांनो दाखवले. बलाढ्य इंग्रजी जुलमी सत्तेविरुद्ध देशभक्त व क्रांतिकारकांनी दिलेला लढा अद्वितीय असाच आहे. अगदी कालच्या कारगिल युद्धापर्यंत हेच ठासून म्हणावे लागते की भारतभू ही वीरांची भूमी आहे.