महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया स्वाध्याय | Maharashtravaruni tak ovalun Kaya swadhyay

महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया स्वाध्याय | Maharashtravaruni tak ovalun Kaya swadhyay | ९ वी मराठी 

 

प्र. १. वैशिष्ट्ये लिहा.

(१) महाराष्ट्रातील सांस्कृतिक वैशिष्टे

        महाराष्ट्रातील सांस्कृतिक वैशिष्टे
(१) यशाची ज्योत पाजळत ठेवणारे मंदिर
(२) सोन्याची धरती खाली नी वर नीले आकाश
(३) महारथीनी भूषवलेली , किल्ले व जिडे पोवाडे गताता.
(४) अरबी समुद्र तिचे चरण धुतो.

 

(२) कवितेत आलेली महाराष्ट्र भूमीतील व्यक्तिवैशिष्ट्ये

     कवितेत आलेली महाराष्ट्र भूमीतील व्यक्तिवैशिष्ट्ये
(१) धैर्यवंत शासनकर्ते वीर
(२) श्रम करणारे शेतकरी
(३) संत व शाहीर
(४) धुरंधर श्रीछत्रपती शिवराय

प्र. २. असत्य विधान ओळखा.

(१) धुरंधर शिवरायांना स्मराव

(२) असत्यास्तव शिंग फुंकावे.

(३) स्वातंत्र्याची आण घ्यावी.

(४) जन्मभूमीचे उपकार फेडावे.

उत्तर – (२) असत्यास्तव शिंग फुंकावे.

प्र. ३. कवितेतून व्यक्त झालेली ‘महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता’ हा विचार स्पष्ट करा.

उत्तर – महाराष्ट्र हे मंदिर आहे. त्याच्या पुढ्यात यशाची ज्योत पाजळते. महाराष्ट्राची धरती सोने पिकवणारी आहे नि वर निळ्या आकाशाची छाया आहे. गडकिल्ले महाराष्ट्रभूमीचे पोवाडे गातात. रथीमहारथींनी तिला भूषविले आहे. अरबी समुद्र जिच्या चरणांशी लीन आहे. महाराष्ट्र हा धैर्यवंत शासनकर्त्यांचा, साधुसंतांचा, शाहिरांचा, कष्टकरी शेतकऱ्यांचा, त्यागाच्या सामर्थ्याचा व धुरंधर शिवरायांचा आहे. या प्रिय महाराष्ट्रासाठी छातीवर घाव झेलायला व त्यावर जान कुर्बान करायला मी तयार आहे. अशा प्रकारे कवितेतून महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता व्यक्त झाली आहे.

प्र. ४. महाराष्ट्राची बलस्थाने तुमच्या शब्दांत सांगा.

उत्तर : या महाराष्ट्ररूपी मंदिरात यशाची ज्योती अखंड पाजळते आहे. नील अंबराच्या छायेखाली महाराष्ट्र ही सोने पिकवणारी धरती आहे. हिच्या कर्तृत्वाचे पोवाडे गडकिल्ले गातात. महारथी, शूर पराक्रमी योद्ध्यांनी या भूमीला वैभव प्राप्त करून दिले आहे. ही भूमी धैर्यवान शासनकर्त्यांची, कष्टकऱ्यांची, संतमहंत व शाहिरांची आहे. येथे पराक्रमाला त्यागाचे अस्तर आहे. अरबी समुद्र महाराष्ट्रभूमीच्या चरणांशी लीन आहे. स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकून महाराष्ट्राची मान ताठ ठेवणाऱ्या श्रीछत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने उज्ज्वल झालेला हा महाराष्ट्र आहे. ही महाराष्ट्राची बलस्थाने आहेत.

 

प्र. ५. काव्यसौंदर्य.

(अ) ‘धर ध्वजा करी ऐक्याची । मनीषा जी महाराष्ट्राची’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य लिहा.

उत्तर : मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली, तेव्हा त्याला काहीजणांनी विरोध दर्शवला. खूप साधकबाधक चर्चा झाली.परंतु मराठी मनाने संयुक्त महाराष्ट्र साकार करण्याचा ध्यास घेतला होता. निष्ठेने हे कार्य मराठी माणसे करीत होती. त्यांच्या एकजुटीत फूट पडू नये; म्हणून शाहीर म्हणतात, की ऐक्याचा हा झेंडा हातात घ्या. अशीच अवघ्या महाराष्ट्राची मनोकामना आहे. ती पूर्ण करण्यास कटिबद्ध होऊ या.

(आ) कवितेतून व्यक्त होणाऱ्या रसाचे तुमच्या शब्दांत सोदाहरण वर्णन करा.

उत्तर: या कवितेत जागोजागी वीररसाची प्रचीती येते. मराठी मनः आंदोलनासाठी जागृत करण्याकरिता कवींनी वीररसाचा मुक्त वापर केला आहे. ‘कंबर बांधून ऊठ घाव झेलाया। महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया’ या पहिल्या दोन ओळींत शाहिरांनी मर्दमराठी मनाला प्राणार्पणाचे व मर्दुमकीचे आवाहन केले आहे. शिवरायांच्या कर्तृत्वाची ग्वाही दिली आहे. ‘करी कंकण बांधून साचे, ‘सत्यास्तव शिंग फुंकाया, ‘पर्वत उलथून यत्नाचे, ‘घर ध्वजा करी ऐक्याची,’ ‘पाऊले टाक हिंमतीची,’ ‘घे आण स्वातंत्र्याची अशा प्रकारच्या ओळींमधून ओजगुण ओतप्रोत भरला आहे. मराठी मन पेटून उठेल अशा प्रकारे ही कविता वीररसाने ओतप्रोत भरली आहे.

प्र. ६. अभिव्यक्ती.

(अ) तुम्हांला जाणवलेल्या महाराष्ट्रातील अभिमानास्पद बाबींचे वर्णन करा.

उत्तर : महाराष्ट्र हा दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश आहे. संतांच्या शिकवणीने पावन झालेली महाराष्ट्रभूमी आहे. इथे पराक्रमाची व त्यागाची गाथा लिहिली गेली. नर्मदा, गोदावरी, कृष्णा, भीमा, वैनगंगा इत्यादी नदयांनी सुपीक केलेली महाराष्ट्राची भूमी आहे. येथे शौर्य व वैराग्य हातात हात घालून नांदतात. विदयेचा उगम व प्रसार महाराष्ट्रातून आरंभी झाला. भारताची सांस्कृतिक व ऐतिहासिक जडणघडण महाराष्ट्राने केली. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर या थोर विभूतींनी महाराष्ट्राचे वैचारिक वैभव व सामाजिक समता जोपासली. औद्योगिक क्रांती व सामाजिक क्रांतीचे महाराष्ट्र हे माहेरघर आहे. सत्य, शिव, सुंदर या मूल्यत्रयींची जपणूक करणे हे महाराष्ट्राचे ब्रीद आहे.

 

 

 

 

Print Friendly, PDF & Email
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.