माझ्या आठवणीतील काही आनंदाचे क्षण मराठी निबंध। Majhya athavanitil kahi Anandache kshan Essay in Marathi। Majhya athavanitil kahi Anandache kshan Marathi Nibandh

माझ्या आठवणीतील काही आनंदाचे क्षण मराठी निबंध। Majhya athavanitil kahi Anandache kshan Essay in Marathi। Majhya athavanitil kahi Anandache kshan Marathi Nibandh

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी माझ्या आठवणीतील काही आनंदाचे क्षण मराठी निबंध। Majhya athavanitil kahi Anandache kshan Essay in Marathi या विषयावर निबंध घेऊन आलो आहे.

माझ्या आठवणीतील काही आनंदाचे क्षण मराठी निबंध। Majhya athavanitil kahi Anandache kshan Essay in Marathi

‘सुख पाहता जवापाडे दुःख पर्वताएवढे ।।’ असे संत तुकाराम महाराज सांगून गेले; पण या बालवयात मात्र मला सुखच पर्वताएवढे अनुभवायला मिळते आहे. सुखाच्या क्षणांपैकी काही क्षण अगदी चिरस्मरणात राहिले आहेत.

पाचवीत मी माझ्या नव्या शाळेत प्रवेश घेतला. तेव्हाचा एक आनंदाचा प्रसंग मला आठवतो. तो माझा शाळेतील पहिलाच आठवडा होता. शाळेच्या मुख्याध्यापकांनी एके दिवशी मला आपल्या खोलीत बोलावून घेतले. भीतभीतच मी मुख्याध्यापकांच्या खोलीत प्रवेश केला. सरांनी आनंदी मुद्रेने माझ्याकडे पाहिले आणि मला जवळ घेऊन शाबासकी दिली. कारण फेब्रुवारी महिन्यात चौथीत असताना जी शिष्यवृत्तीची परीक्षा मी दिली होती, त्या परीक्षेत मी पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो होतो. साऱ्या जिल्ह्यात मी पहिला आलो होतो. ते ऐकून मला विलक्षण आनंद झाला. मग त्या आठवड्याभरात माझ्यावर बक्षिसांचा वर्षाव झाला. वृत्तपत्रात माझा फोटो छापून आला. त्या वेळच्या माझ्या आनंदाचे वर्णन करणे अशक्य आहे.

गेल्या वर्षी माझे बाबा अचानक खूप आजारी पडले. त्यांना इस्पितळात दाखल करावे लागले. मी बाबांना यापूर्वी कधी आजारी पडलेले पाहिलेच नव्हते. सुमारे महिनाभर सर्वजण चिंतेत होते. पण ते पूर्ण बरे होऊन घरी आले, तेव्हा मला किती आनंद झाला म्हणून सांगू!

यंदा जून महिन्यात एस्. एस्. सी. परीक्षेत आपच्या शाळेतील दहा विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले, तेव्हाही मला खूप आनंद झाला. असे हे आनंदाचे क्षण आठवणीच्या मखमली मंजूषेत जपून ठेवावेसे वाटतात.

मी पाहिलेला अपघात मराठी निबंध | Mi pahilela Apghat Marathi Nibandh

Print Friendly, PDF & Email
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.