मी पंतप्रधान झालो तर मराठी निबंध । mi pantpradhan zalo tar nibandh। if i become the prime minister of india essay
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी मी पंतप्रधान झालो तर मराठी निबंध । mi pantpradhan zalo tar nibandhh या विषयावर निबंध घेऊन आलो आहे.
भारताच्या पंतप्रधानांच्या शपथविधीचा सोहळा पाहिला आणि मनात आले की, मी पंतप्रधान झालो, तर….
तर काय मजा येईल! पण खरेच मजा येईल का? पंतप्रधान म्हणजे मोठा बंगला, सुंदर मोटारी, भरपूर जगप्रवास, अनेक सभासमारंभांत प्रचंड स्वागत. सदा सभोवती रक्षक व सेवक.
पण… पण खरे सांगू का! मी पंतप्रधान झालो तर प्रथम सारा डामडौल कमी करीन. आपल्या भारतावर जागतिक बँकेचे केवढे कर्ज आहे! मोठमोठ्या योजना पूर्ण करण्यासाठी भरपूर पैसा हवा, आम्ही मंत्रिमंडळातील लोकांनी आपले खर्च कमी केले तर खूप बचत होईल.
मी पंतप्रधान झालो, तर… प्रथम सभांना व घोषणांना बंदी घालीन. प्रत्यक्ष ‘कृतीवर ‘ माझा भर असेल. गरिबी हटवण्याचा संकल्प आम्ही कित्येक वर्षांपूर्वी सोडला आहे; पण गरिबी तसूभरही हटलेली नाही. उलट वाढतच आहे. ती दूर करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन.
आज देशात अराजक वाढत आहे. देशवासीयांत एकात्मता व ज्वलंत राष्ट्रभक्ती निर्माण करण्यासाठी मी अविरत झटेन. मी कोणा एका राज्याचा विचार करणार नाही, तर संपूर्ण भारताचाच सदैव विचार करीन. त्याच्या विकासासाठीच झटेन, पण त्यासाठी मी पंतप्रधान व्हायला पाहिजे ना ?