5+ मी पाहिलेला अपघात मराठी निबंध | Mi pahilela Apghat Marathi Nibandh | Mi Pahilela Apghat Marathi Essay [With PDF]

5+ मी पाहिलेला अपघात मराठी निबंध, Mi pahilela Apghat Marathi Nibandh, Mi pahilela Apghat Marathi Essay, मी पाहिलेला अपघात 

मी पाहिलेला अपघात मराठी निबंध – नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी Mi pahilela Apghat Marathi Nibandh, Mi pahilela Apghat Marathi Essay या विषयावर निबंध घेऊन आलो आहे.

सदर पोस्टमध्ये आपन काय बघणार आहोत.

1.मी पाहिलेला अपघात मराठी निबंध | Mi pahilela Apghat Marathi Nibandh
2.मी पाहिलेला अपघात मराठी निबंध | Mi Pahilela Apghat Marathi Essay
3.मी पाहिलेला अपघात मराठी निबंध। Mi Pahilela Apghat Marathi Prasang Lekhan
4.मी पाहिलेला अपघात मराठी निबंध | Mi pahilela Apghat Marathi Nibandh
5.रस्ते अपघातांची मुख्य कारणे | रस्तेअपघात का होतात

 

मित्रांनो, दररोज वृत्तपत्रात आपण रस्ते अपघातांबद्दल वाचतो ज्यात लोक गंभीर जखमी होतात, तर काहींचा मृत्यू देखील होतो. तुम्‍ही स्‍वत: अपघात झाला असल्‍याची किंवा एखादी घटना घडताना पाहिली असल्‍यास. आपल्यापैकी बर्‍याच जणांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन वाहनांभोवती गर्दी करताना पाहिले असेल. मोठ्या शहरांमध्ये जिथे हजारो कार, मोटारसायकल, ऑटो-रिक्षा, ट्रक, बस आणि इतर वाहने आहेत तिथे रस्ते अपघात हे काही सामान्य नाहीत. रस्ते अपघात हे बहुतेक वेळा वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे होतात.

वाहतुकीचे नियम बनवण्याचे कारण आहे. तथापि, लोक त्यांना नेहमीच तोडतात, विशेषत: जेव्हा त्यांना माहित असते की पोलिस त्यांना असे करताना पकडू शकणार नाहीत. नियम मोडून पळून जाणाऱ्यांना पकडले न जाण्याचे भाग्य लाभले असले तरी या गैरप्रकारात ते जीव धोक्यात घालत आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने सामान्यतः दंड आकारला जातो, परंतु वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने रस्ते अपघात होतात आणि सर्वात वाईट परिणाम म्हणजे मृत्यू.

सिग्नल तोडणे, हेल्मेट न वापरणे,लायसेन्स नससे, ट्रिपल सीट, सीट बेल्ट न वापरणे असे वाहतुकीचा नियम लोक सर्वात जास्त मोडतात, याचा अर्थ सिग्नल लाल असतानाही ते वाहन चालवत राहतात. रस्ते अपघातांना कारणीभूत असलेली दुसरी वाईट सवय म्हणजे दारू पिऊन गाडी चालवणे. त्यांना कळत नाही की जेव्हा त्यांच्यासाठी प्रकाश लाल असतो तेव्हा तो दुसर्‍यासाठी हिरवा असतो आणि यामुळे ते आपला जीव धोक्यात घालत असतात. पुष्कळ वेळा, लोक असे करण्यासाठी त्यांचे इंडिकेटर न लावता रस्त्यावर वळण घेतात आणि यामुळे रस्ते अपघात देखील होऊ शकतात. अशाप्रकारे, वाहतुकीचे नियम मोडणे अत्यंत हानिकारक आहे, आणि लोकांनी असे करणे केवळ पोलिसांच्या भीतीनेच नव्हे तर त्यांच्या जीवाला धोका असल्याने टाळावे.

मी पाहिलेला अपघात मराठी निबंध | Mi pahilela Apghat Marathi Nibandh

आज रविवारचा दिवस सर्वांना सुट्टी होती, मी आणि ताईने आज कुठेतरी फिरायला जायचे असा बेत आखला. आणि आमच्या गावच्य डोंगरदरीमध्ये वसलेल्या एका जुन्या किल्ल्यावर जायच ठरलं. आईबाबां सोबत पूर्ण दिवस निसर्गदर्शन घ्यायला मिळणार म्हणून मी खूप खूश होतो.

मी ताई आणि आई बाबा किल्ला थोडासा लांब असल्याने एका चारचाकी गाडीमध्ये निघालो होतो. रस्त्यावरून तिथे जाऊन काय करणार याचा बेत आखत असताना अचानक काय करणार कोणत्याही व्यक्तीला हालवून टाकेल असा आवाज झाला… आम्ही अचानक आलेल्या आवाजाने क्षणार्धासाठी स्तब्ध झाली आणि काय झाले, ते पाहण्यासाठी मी गाडीतून बाहेर डोकावून पाहिले असता अगदी काळजाला भीडणारा प्रसंग माझ्या नजरेसमोर होता.

समोरच्या रस्त्यावर बस आणि बाइक चा अपघात झाला होता त्याचाच हा आवाज होता. काही वेळात त्या ठिकाणी येवढ्या मोठ्या आवाजामुळे खूप गर्दी जमा झाली.बाईकवरील व्यक्ती रक्तबंबाळ झाला होता. त्याला खूप लागलं होत आणि बस मधील व्यक्तीलाही थोडस लागला होत. पण दोघांमधील कोणीही दवाखन्यापर्यंत स्वतः पोहोचण्याच्या परिस्थीतीत नव्हते. शेजारी येवढी गर्दी जमली होती; परंतू त्यांना कोणीही दवाखान्यात घेवून जात नव्हते…

माझे बाबा आणि मी ते पाहून थोड्या वेळेसाठी विचारमग्न झालो होतो. मला हे पाहून खरचं खूप वाईट वाटत होतं. मी स्वतःलाच म्हटलं. आज जग वेवळ्या प्रगतीपथावर आहे; प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याने आपलं शहाणपण वापरून वर्चस्व गाजवलं आहे- पन जर हे शहाणपण आपल्या बंधुभावांच्या कामाला येणार नसेल तर त्याचा काय उपयोग ? मी आणि बाबांनी ताईला आणि आईला एका गाडीत बसूवून घरी पाठवल आणि ताबडतोब त्याला घेऊन दवाखान्यात निघालो.

पण जाताना रस्त्यामध्ये एकच विचार मनामध्ये सतत गुरफटत होता; की किती शरमिंदेची बाब आहे ना! येवढ्या गर्दीमध्ये! देखील माणसाच्या कामाला मदतीला येणारा माणूस आज लोप पावत चालला आहे…. या माणसांच्या ओसाड वाहणाऱ्या गर्दीमध्येच माणसाला शोधण्याची गरज पडत आहे… हीच का ती माणूसकी…..| अशावेळी खरंच म्हणावसं वाटतं;

“गर्दीत मानसाच्या माणूस शोधतो मी”असो। बाबांनी जाताजाताच पोलीसांना देखील कळवलं होत आम्ही त्यांना दवाखान्यात दाखल केलं आणि मी आणि बाबां तीथून घरी नीघालो.

पण आज आयुष्याचा खूप मोठा पाठ मला कळाला होतो, की आजच्या या धकाधकीच्या जीवनात कोणाला कोणासाठी वेळ नाही त्यामुळे “तूच तुझा रक्षक “|

माझी शाळा निबंध । मेरी पाठशाला पर निबंध । Essay On My School

मी पाहिलेला अपघात मराठी निबंध | Mi Pahilela Apghat Marathi Essay

जेव्हा मी 11 वर्षांचा होतो, तेव्हा मी माझ्या बाबा सोबत कुठेतरी बाहेर जात होतो, आणि आम्ही सिग्नलवर प्रकाश हिरवा होण्याची वाट पाहत होतो, तेव्हा अचानक काय करणार कोणत्याही व्यक्तीला हालवून टाकेल असा आवाज झाला… मी आणि माझे बाबा अचानक आलेल्या आवाजाने क्षणार्धासाठी स्तब्ध झालो आणि काय झाले, ते पाहण्यासाठी मी गाडीतून बाहेर डोकावून पाहिले असता अगदी काळजाला भीडणारा प्रसंग माझ्या नजरेसमोर होता.रस्त्यावर बस आणि स्कूटरचा चा अपघात झाला होता त्याचाच हा आवाज होता. तेव्हा गर्दी खूप वाढू लागली होती. अचानक, बरेच लोक काय घडलं आहे हे पाहण्यासाठी त्यांच्या कारमधून बाहेर आले होते. स्कूटरवरून पडलेल्या माणसाभोवती रस्त्यावर गर्दी खुप झाली होती, त्याला खूप लागलं होत आणि बस मधील व्यक्तीलाही थोडस लागल होत. पण दोघांमधील कोणीही दवाखन्यापर्यंत स्वतः पोहोचण्याच्या परिस्थीतीत नव्हते.काही लोक मदतयंत्रणेला व ऍम्ब्युलन्सला फोन करू लागले तर काही लोक अपघातग्रस्त व्यक्तीला पाणी पाजत होते.

ही वेळाने तेथे जवळपसाच तैनात असलेले पोलीस ही आले.आणि सर्वजण त्याला उठण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करत होते. लोकांनी त्याला थेट हॉस्पिटलमध्ये नेले, जिथे त्याला काही टाके घालून घरी जावे लागले.

रस्ते अपघात हे खूप भयानक असतात, त्यामुळे वाहन चालवताना आपण अत्यंत सुरक्षिततेची खात्री केली पाहिजे. एखाद्याने नेहमी सीट बेल्ट लावला पाहिजे, सिग्नल हिरवा असेल तेव्हाच गाडी चालवा, वेग मर्यादेला चिकटून राहा, स्वतःच्या लेनमध्ये राहा, दुचाकी चालवताना हेल्मेट घाला, इ. रस्ता अपघात टाळण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे याची खात्री करणे. तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व नियमांचे तुम्ही पालन करा. शेवटी, आपले फक्त एकच जीवन आहे आणि त्याची काळजी घेणे महत्वाचे आहे जेणेकरून आपण त्याचा पुरेपूर आनंद घेऊ शकू.

दिवाळी मराठी निबंध Essay on Diwali in Marathi

मी पाहिलेला अपघात मराठी निबंध। Mi Pahilela Apghat Marathi Prasang Lekhan

एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत अहमदनगरला जाताना मी पहिल्यांदाच खूप जवळून अपघात पाहिला होता.मला अजून आठवतो तो दिवस. सोमवार होता, सकाळचे ८ वाजले होते मी आणि बाबा बसमधून अहमदनगरला चाललो होतो.

तेवढ्यात बस रस्ता ओलांडत असताना अचानक बससमोर एक दुचाकी आली. बस चालकाने पूर्ण ताकदीने ब्रेकवर पाय ठेवला, आणि अचानक झालेल्या या ब्रेकमुळे कर्कशssss असा आवाज झाला. अक्षरशः बसमधील बहुतांश प्रवाशी अचानक ब्रेक मारल्याने सीटवरून पडले होते इतका जोरात तो झटका बसला होता.बसमध्ये कुणालाही जास्त दुखापत झाली नव्हती.

बसच्या ड्राइवर काकांनी इतक्या जोरात ब्रेक मारला असला तरी ही, बसची आणि दुचाकीची धडक मात्र टळली नव्हती.काही वेळातच त्या ठिकाणी खूप गर्दी जमा झाली.दुचाकीवरील व्यक्ती रक्तबंबाळ झाला होता, त्याच्या डोक्याला मार बसला होता.दवाखान्यापर्यंत स्वतः पोहोचण्याच्या परिस्थीतीतही तो नव्हता.दुचाकीवरील तो एक २४-२५ वर्षाचा तरुण मुलगा होता. त्यावेळी माझे बाबा आणि काही लोकांनी मदतयंत्रणेला व ऍम्ब्युलन्सला फोन करू लागले तर काही लोक अपघातग्रस्त व्यक्तीला पाणी पाजत होते.परंतू त्या मुलाभोवती एवढी गर्दी जमा असतानाही कोणीही त्या मुलाला आपल्या गाडीमधून दवाखान्यात नेण्यास तयार नव्हते, तेव्हा जग किती स्वार्थी बनले आहे हे मला जाणवले.येथे एका व्यक्तीच्या जीवाचा प्रश्न असून प्रत्येकजण वेळेवर कार्यालयात जाण्याची चिंता करत आहे.माझे बाबा आणि मी ते पाहून थोड्या वेळेसाठी विचारमग्न झालो होतो. मला हे पाहून खरचं खूप वाईट वाटत होतं. पोलिसांच्या भीतीने काही जण तर त्या जखमी झालेल्या मुलाजवळही गेले नाहीत.

थोड्याच वेळात रुग्णवाहिका आली. अपघात ठिकानवून दवाखान्यात पोहोचायला आम्हाला 20 मिनिटे लागली.तेव्हा त्या जखमी झालेल्या मुलाला इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले.यानंतर पोलिसही तेथे आले, आणि पोलिसांनी त्वरित त्या गंभिर झालेल्या मुलाच्या घरी संपर्क साधून त्यांना कळवळ. त्यानंतर पोलिसांनी घटनेची सविस्तर माहिती घेतली. मी,माझे बाबा आणि इतर काही व्यक्ती जवळपास दीड तास हॉस्पिटलमध्ये होतो. थोड्याच वेळात डॉक्टरांनी सांगितले घाबरण्याचे काही कारण नाही, तो मुलगा आता ठीक आहे. त्या मुलाला जास्त काही लागलं नव्हतं आणि सगळं काही आता शांत झालं होत.यानंतर त्या तरुणांचे कुटुंबीय तेथे आले.

त्यानंतर मी आणि माझे बाबा घराकडे निघालो,घरी जात असताना मात्र खूप विचार मनामध्ये येऊ लागले.त्या मुलाची ती गंभीर अवस्था बघून मी खूप घाबरुन गेलो होतो, आज जग वेवळ्या प्रगतीपथावर आहे; प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याने आपलं शहाणपण वापरून वर्चस्व गाजवलं आहे- पन जर हे शहाणपण आपल्या बंधुभावांच्या कामाला येणार नसेल तर त्याचा काय उपयोग ? असे प्रश्न मनामध्ये येऊ लागले.

येवढ्या गर्दीमध्ये! देखील माणसाच्या कामाला मदतीला येणारा माणूस आज लोप पावत चालला आहे…. या माणसांच्या ओसाड वाहणाऱ्या गर्दीमध्येच माणसाला शोधण्याची गरज पडत आहे… हीच का ती माणूसकी…..| अशावेळी खरंच म्हणावसं वाटतं;“गर्दीत मानसाच्या माणूस शोधतो मी”.

मी पाहिलेला अपघात मराठी निबंध | Mi pahilela Apghat Marathi Nibandh

रोजच्याप्रमाणे सकाळी शाळेत जाण्यासाठी मी बाहेर पडलो होतो. माझ्याबरोबर माझा एक वर्गमित्र होता. रस्त्यावर नेहमीचीच वर्दळ होती. मित्राबरोबर मी गप्पा मारत चाललो असताना ‘कर्रऽऽ’ असा आवाज आमच्या कानी आला. बसचे ब्रेक लावल्याचा तो विलक्षण कर्कश आवाज होता. त्या राक्षसी आवाजाने माझ्या अंगाचा थरकाप उडाला.

मी चमकून समोर पाहिले तो एक दुमजली बस थडथडत उभी होती. रस्त्यावरचे लोक बसच्या दिशेने पळत होते. पाहता पाहता बघ्यांची अलोट गर्दी तेथे लोटली. बसमधील उतारू डोकावून बघत होते. मोठा अपघात झाला असणार अशी शंका माझ्या मनात आली. म्हणून मी त्या गर्दीत थोडे पुढे शिरण्याचा प्रयत्न केला.लोकांच्या बोलण्यावरून मला समजले की, दोन छोट्या मुली बसखाली आल्या होत्या. मला आठवले की, दररोज या वेळी दोन छोट्या मुली आपल्या नर्सरी शाळेत जाण्यासाठी शाळेच्या बसची वाट पाहत उभ्या असत. त्यांचे ते हसरे, बोलके, निरागस चेहरे माझ्या डोळ्यांसमोरून तरळून गेले.

आज शाळेच्या बसच्या आधी आलेली ही बस त्यांचा घात करून बसली होती. गर्दी वाढत होती. त्या मुलींचे पालक ओक्साबोक्शी रडत होते. पोलीस गर्दी हटवण्याची पराकाष्ठा करत होते. शाळेला उशीर होईल म्हणून मी तेथून जड पावलांनी पुढे गेलो; पण ते दृश्य काही केल्या माझ्या डोळ्यांपुढून हलत नव्हते.

What Does Vitamin D do, What is Vitamin D good for, What is Vitamin D

रस्ते अपघातांची मुख्य कारणे | रस्तेअपघात का होतात

आपल्या देशात रस्ते अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहे.  आज एकेकाळी रस्ता अपघात हा महत्त्वाचा विषय बनला आहे.रस्त्यावर वाहन चालवताना लोकांच्या चुकांमुळे अपघात होतात. अनेक लोक रस्ता सुरक्षेचे नियम पाळत नाहीत.  त्यामुळे नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागते.

रस्त्यावरील वाहनांची संख्या आणि रस्ता सुरक्षा ही भारतासाठी सर्वात मोठी समस्या बनली आहे.

रस्त्याचे नियम:

रस्ते अपघातांचे मुख्य कारण म्हणजे लोक रस्त्यावरील वाहतुकीचे नियम पाळत नाहीत.  अनेक लोक रस्त्याचे नियम पाळत नाहीत.  ते त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी रस्ता सुरक्षेचे नियम मोडतात.

बरेच लोक अतिवेगाने गाडी चालवतात, दारू पिऊन गाडी चालवतात, चुकीच्या दिशेने गाडी चालवतात, या सगळ्यामुळे रस्ते अपघात होतात.

रस्ता सुरक्षेची गरज

रस्त्यावर दररोज अनेक अपघात होत असून त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागतो.  मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतांश तरुण आहेत.

लोकांच्या वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि रस्ते अपघात रोखण्यासाठी रस्ता सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे.

हे देखील वाचा: मराठी निबंध लेखनअणि भाषण

10+ माझी आई निबंध मराठी | Mazi Aai Marathi Nibandh | My Mother Essay in Marathi

5+ माझे गाव निबंध मराठी 2022 | Maze Gav Marathi Nibandh | My village essay in marathi

Print Friendly, PDF & Email
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.