यंत्रांनी केलं बंड स्वाध्याय | yantrani kel band Swadhyay | std 9th | iyatta navvi | मराठी स्वाध्याय नववी
प्र. १. फरक सांगा.
यंत्रांद्वारे केली जाणारी कामे माणसांद्वारे केली जाणारी कामे
यंत्राद्वारे केली जाणारी कामे | मांनसाद्वारे केली जाणारी कामे |
(१) नाटक, सिनेमा, प्रवास यांची तिकिटे काढणे. | (१) स्वयंपाक करणे |
(२) घरातला हिशेब ठेवणे | (२) कपडे धुणे, भांडी घासणे |
(३) बँका वगैरे कचेरीतील कामे | (३) घर – इमारतीची स्वच्छ्ता |
(४) पुस्तक छपाई इत्यादी | (४) मुलांना सांभाळणे |
प्र. २. पाठात खालील यंत्रे कोणती कार्ये करतात?
यंत्र | कार्य |
(१) रोबी फोन | फोन करने व घेणे |
(२) यंत्रमानव | कार्यालयीन कामे |
(३) सह्याजी | कोणाच्याही सह्यांची हुबेहूब नक्कल करणे |
प्र. ३. दीपकला पडलेल्या स्वप्नात यंत्रांनी ताबा घेतल्यावर यंत्राबाबत दीपकने केलेली भाकिते.
उत्तर – (१) यंत्रे किंवा यंत्रमानव यांना जगाचा ताबा कधीच घेता येणार नाही.
(२) यंत्रे कधीही बाबांवर अधिकार गाजवू शकणार नाहीत.
प्र. ४. खालील शब्दांची विशेषणे, विशेष्य शोधा व लिहा.
उदधट -उद्गगर
अमानुष -यंत्र
हुबेहूब – नक्कल
परिपूर्ण – मनोव्यापार
प्र. ५. खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थयांच्या जोड्या जुळवा.
‘अ’ गट ‘ब’ गट
(१) हकालपट्टी करणे. (अ) आश्चर्यचकित होणे.
(२) स्तंभित होणे. (आ) योग्य मार्गावर आणणे.
(३) चूर होणे. (इ) हाकलून देणे.
(४) वठणीवर आणणे. (ई) मग्न होणे.
उत्तरे -(१)हकालपट्टी करणे – (इ) हाकलून देणे.
(२)स्तंभित होणे – (अ) आश्चर्यचकित होणे.
(३) चूर होणे – (ई) मग्न होणे.
(४) वठणीवर आणणे – (आ) योग्य मार्गावर आणणे.
प्र. ६. खाली काही शब्दांची यादी दिली आहे. त्यांतील शब्दांचे उपसर्गघटित व प्रत्ययघटित शब्द असे वर्गीकरण करा व लिहा.
अवलक्षण, भांडखोर, दांडगाई, पहारेकरी, पंचनामा, दरमहा, विद्वत्ता, नाराज, निर्धन, गावकी, दररोज, बिनतक्रार, दगाबाज, प्रतिदिन
उत्तरे :
उपसर्गघटित शब्द – दररोज, बिनतक्रार, प्रतिदिन. अवलक्षण, दरमहा, नाराज, निर्धन,
प्रत्ययघटित शब्द – भांडखोर, दांडगाई, पहारेकरी, पंचनामा, विद्वत्त, गावकी, दगाबाज.
प्र. ७. स्वमत.
(अ) तुमच्या मते माणसाला ‘यंत्र’ हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकेल का? सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर : प्रथम हे मान्य करावे लागेल की काही बाबतींत यंत्रे माणसापेक्षा श्रेष्ठच आहेत. उदाहरणार्थ संगणकच बघा. तो अनेक कामे अचूक व अफाट वेगाने करतो. त्याचे गणिती कौशल्यही अचाट आहे. माहिती तंत्रज्ञान या क्षेत्राच्या विकासामुळे सर्व कामकाजात तर अचाट प्रगती झाली आहे. दैनंदिन व्यवहार खूपच सुरळीत व वेगवान झाले आहेत. आपण अनेक कामे घरबसल्या करू शकतो. आपला वेळ व कष्ट टळतात. अनेक लोक तर कार्यालयीन कामे घरूनच करतात. माणूस जाऊ शकत नाही अशा ठिकाणी रोबो काम करतात. उदा., खाणी, अंतराळयाने. यंत्रांच्या फायदयांची यादी करायची म्हटली तर खूप मोठी होईल.
ही यंत्रे माणसाला सर्वोत्तम पर्याय मात्र कधीच ठरू शकणार नाहीत. सांगितलेले काम यंत्रे उत्तम रितीने पार पाडतील, हे खरे. पण, सांगितलेले काम चांगले की वाईट, त्या कामामुळे मानवजातीचे काही नुकसान होईल का, केलेली कृती सौंदर्यपूर्ण आहे का, इत्यादी प्रश्नांची उत्तरे यंत्रे देऊ शकत नाहीत. ती माणूसच देऊ शकतो.
(आ) ‘मनुष्य करत असलेली सर्व कामे यंत्रे करू लागली तर ………….’ कल्पनाचित्र रेखाटा.
उत्तर : यंत्रांची कार्यक्षमता वाढू लागताच यंत्रमानवांची झपाटयाने निर्मिती होऊ लागली. यंत्रमानवांची मागणीही वाढली. प्रत्येक कामासाठी यंत्रमानव वापरण्याची लोकांना सवयच जडली. शेती, दुकाने, कार्यालये, रस्ते, मंदिरे, शाळा-कॉलेजे वगैरे सर्व ठिकाणी यंत्रमानवांची नेमणूक होऊ लागली. इतकेच काय, घरात सकाळी उठल्यापासून करायची सर्व कामेसुद्धा यंत्रमानवांकडे देण्यात येऊ लागली. यामुळे कामे भराभर व कार्यक्षमतेने होऊ लागली.
या स्थितीचा एक उलटाही परिणाम होऊ लागला. माणसांना कामे कमी राहिली. रिकाम्या वेळामुळे नको नको ते विचार मनात येऊ लागले. एकमेकांविरुद्ध कारस्थाने रचणे सुरू झाले. त्यासाठी यंत्रमानवांचाच वापर होऊ लागला. प्रतिस्पर्धीसुद्धा यंत्रमानवांचा वापर करू लागले. यामुळे भलतेच दृश्य ठिकठिकाणी दिसू लागले, माणसे ● राहिली बाजूला आणि यंत्रमानवांमधील लढाया सुरू झाल्या. लोक गर्दी करून यंत्रमानवांमधील भांडणे, मारामाऱ्या पाहू लागले. चलाख लोकांनी ही भांडणे सोडवण्यासाठी बुद्धिमान यंत्रमानवांची समिती स्थापन केली. या सगळ्यांतून एक हास्यास्पद चित्र उभे राहू लागले. करमणुकीचा एक वेगळाच मार्ग निर्माण झाला.