या झोपडीत माझ्या स्वाध्याय | ya zopdit mazya swadhyay | 9th marathi swadhyay | या झोपडीत माझ्या मराठी स्वाध्याय इयत्ता नववी
प्र. १. कवितेत आलेल्या आशयानुसार पुढील मुदद्यांतील फरक सांगा.
झोपडीतील मूले महालातील मुले
उत्तर –
झोपडीतील मूले | महालातील मुले |
(१) ताऱ्यांकडे पाहत जमिनीकडे निजावे. | (१) झोपण्यासाठी मऊ बिछाने. |
(२) देवाचे नाव नित्य गावे. | (२) कंदील व शामदाने यांची रोशनी |
प्र. २. आकृती पूर्ण करा.
झोपडीत येणाऱ्यांसाठी कवीने व्यक्त केलेल्या भावना
(१)झोपडीत यायची भीती नाही. |
(२) सुखाने यावे. |
(३) सुखाने जावे. |
(४) कुणावरही कुठलेही दडपण नाही. |
प्र. ३. ‘झोपडीत निसर्गाचे सान्निध्य आहे’, हे पटवून देणारी उदाहरणे लिहा.
उत्तर – (१) निजवयास जमीन
(२) रात्री गगणातले तर
प्र. ४. ‘तिजोरी’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
धनदौलत संग्रहित ( साठवण्याचे ) साधन कोणते ?
प्र. ५. काव्यसौंदर्य.
(अ) ‘पाहूनि सौख्य माते, देवेंद्र तोहि लाजे शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर: देवांचा राजा इंद्र हा स्वर्गात राहतो. स्वर्गात सर्व सुखे असतात सुखसमाधान व शांतीचा वास स्वर्गात आहे, अशी कल्पना आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आनंदमय झोपडीचे वर्णन केले आहे. ते म्हणतात – माझ्या झोपडीत सुखसमाधान आणि शांतीचे साम्राज्य आहे. झोपडीत एवढे पराकोटीचे सौख्य मला लाभते की इंद्रालासुद्धा माझ्या सुखाचा हेवा वाटतो. माझे सुख पाहून इंद्राला माझा हेवा वाटतो. झोपडीतील सुखाची महती सांगणारा विचार या ओळीतून व्यक्त होतो.
(आ) ‘दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या’ या काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर : महालातील धनदौलत ही बंदिस्त असते. तिजोरीला भक्कम कडीकुलूप लावलेले असते. चोरी होऊ नये; म्हणून धनावर सक्त पहारे ठेवले जातात. संपूर्ण महाल कडेकोट बंदोबस्तात असतो. कवी म्हणतात – माझी झोपडी सदैव खुली असते. धनदौलत नसल्यामुळे माझ्या झोपडीचे दार दोऱ्यांनी, कड्याकुलपाने बंद करावे लागत नाही. झोपडीला चोराचे भय नाही. येथे आनंदाने सर्वांचे स्वागत करण्यासाठी माझी झोपडी सताड उघडी असते. या ओळीतून कवीच्या मनाचा मोठेपणा व्यक्त झाला आहे.