एकवचन अनेकवचन शब्द मराठी Ek vachan anek vachan in marathi with PDF – वचन बदला मराठी व्याकरण
वचन बदला मराठी व्याकरण – नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी वचन बदला शब्द मराठी, एकवचन अनेकवचन शब्द मराठी, Ek vachan anek vachan in marathi with PDF घेऊन आलो आहोत.
वचन बदला मराठी व्याकरण
वचन म्हणजे काय?
नामाच्या रूपावरून वस्तू एक आहे की अनेक, हा जो बोध होतो, त्यालाच व्याकरणात ‘वचन’ असे म्हणतात.
कोणत्याही नामावरून त्याने दाखवलेल्या वस्तूंची संख्या एक आहे की एकापेक्षा जास्त आहे हे समजते तेव्हा त्यालाच व्याकरणात त्या नामाचे ‘वचन’ असे म्हणतात.
वचनाचे एकूण दोन प्रकार पडतात.
१) एकवचन अणि
२) अनेकवचन
‘वचन’ या शब्दाचा अर्थ बोलणे असा असल्यामुळे एका नामाबद्दल बोलले असता ते नामांबद्दल बोलले असता ते एकवचन व अनेकवचन म्हणून संबोधले जाते.

१) एकवचन
ज्या नामावरून एकाच व्यक्ति अथवा वस्तूचा बोध होतो, तेव्हा ते त्या नामाचे एकवचन असते.
उदा. एकवचन – मुल, घर, दार, किल्ली, छडी, गाव, बाग, नगर
२) अनेकवचन
ज्या नामावरून अनेक व्यक्ति अथवा वस्तूचा बोध होतो, तेव्हा ते त्या नामाचे अनेकवचन असते.
उदा. अनेकवचन – मुले, घरे, दारे, किल्ल्या, छड्या, गावे, बागा, नगरे
अनेकवचनालाच बहुवचन असे म्हणतात.
नेहमी लक्षात ठेवा
फक्त सामान्यनामाचे अनेकवचन होते विशेष नाम व् भाववाचक नामाचे अनेकवचन होत नाही.
पुल्लिंगी नामाचे वचन बदला मराठी व्याकरण
‘आ’ कारान्त पुल्लिंगी नामाचे अनेकवचन ‘ए’ कारान्त होते. (शेवटी ए पत्यय)
एकवचन-अनेकवचन | एकवचन-अनेकवचन |
थवा – थवे कुत्रा – कुत्रे कोल्हा – कोल्हे आंबा – आंबे लांडगा – लांडगे | रस्ता – रस्ते भुंगा – भुंगे ओढा – ओढे डोळा – डोळे राजा – राजे |
पंखा – पंखे आरसा – आरसे घोडा – घोडे रस्ता – रस्ते किनारा – किनारे | नकाशा – नकाशे ससा – रस्ते गुन्हा – गुन्हे कारखाना – कारखाने धडा – धडे |
तुकडा – तुकडे अनारसा – अनारसे दांडा – दांडे झरा – झरे बोका – बोके | धबधबा – धबधबे दागिना – दागिने मळा – मळे भुंगा – भुंगे बिछाना – बिछाने |
‘आ’ कारान्त किंवा ‘आ’ प्रत्यय असलेल्या पुल्लिंगी नामाचे अनेकवचन ‘ए’ कारान्त किंवा ‘ए’ प्रत्यय असलेले होतात बाकी इतर वर्ण प्रत्यय असलेल्या नामाचे अनेकवचन होत नाही म्हणजेच ते दोन्ही वचनात सारखेच असते.
१) अशा दोन्ही वचनात सारख्या असणाऱ्या नामाचे एकवचन व अनेकवचन हे क्रियापदाच्या रूपावरून ठरवितात.
२) ज्या पुल्लिंगी नामाचे अनेकवचन करतांना त्यात काहीच बदल होत नाही.त्या नामाचे वचन वाक्याच्या क्रियापदावारून ठरवता येते.
‘आ’ कारान्तशिवाय किंवा आ प्रत्ययाशिवय इतर पुल्लिंगी नामाची रूपे दोन्ही वचनांत सारखीच असतात.त्यात काहीच बदल होत नाही.
एकवचन | अनेकवचन |
वाघ | वाघ |
सिंह | सिंह |
गहू | गहू |
साप | साप |
पक्षी | पक्षी |
उंदीर | उंदीर |
राक्षस | राक्षस |
गरुड | गरुड |
हत्ती | हत्ती |
बैल | बैल |
वचन बदला शब्द मराठी
कवी | कवी |
रोगी | रोगी |
चोर | चोर |
फोटो | फोटो |
कोळी | कोळी |
दगड | दगड |
शत्रू | शत्रू |
चेंडू | चेंडू |
पुत्र | पुत्र |
पर्वत | पर्वत |
वार | वार |
रोगी | रोगी |
दिवस | दिवस |
तेली | तेली |
खडू | खडू |
फोटो | फोटो |
शेतकरी | शेतकरी |
धोबी | धोबी |
‘काही ‘आ-कारान्त’ पुल्लिंगी आदरार्थी वापरल्या जाणाऱ्या नामाचे ‘एकवचन व अनेकवचन’ सारखे असते.
एकवचन | अनेकवचन |
दादा मामा काका बाबा सभा भाषा | दादा मामा काका बाबा सभा भाषा |
स्त्रीलिंगी नामाचे वचन बदला मराठी व्याकरण
‘अ’ कारान्त स्त्रीलिंगी नामांचे अनेकवचन ‘आ’ कारान्त होते, तर काहींचे ‘ई’ कारान्त होते.
एकवचन | अनेकवचन |
गोष्ट | गोष्टी |
तारीख | तारखा |
भिंत | भिंती |
मैत्रीण | मैत्रीणी |
ओळ | ओळी |
विहीर | विहिरी |
सहल | सहली |
वेल | वेली |
म्हैस | म्हशी |
तलवार | तलवारी |
चूक | चुका |
खून | खुणा |
सून | सूना |
खारीक | खारका |
सायकल | सायकली |
पेन्सिल | पेन्सिली |
रात्र | रात्री |
केळ | केळी |
शेजारीण | शेजारणी |
वीट | वीटा |
बाग | बागा |
वाट | वाटा |
गंमत | गंमती |
धार | धारा |
काच | काचा |
जमीन | जमिनी |
तार | तारा |
आठवण | आठवणी |
वेळ | वेळा |
बहीण | बहिणी |
सामान्यतः आ-कारान्त किंवा आ प्रत्यय असलेल्या स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन हे एकवचनासारखेच असते.
एकवचन | अनेकवचन |
भाषा विदया दिशा शाळा कला पूजा प्रार्थना कन्या लेखिका आज्ञा प्रतीक्षा शिक्षिका सभा शंका मैना गायिका घंटा बालिका नायिका | भाषा विदया दिशा शाळा कला पूजा प्रार्थना कन्या लेखिका आज्ञा प्रतीक्षा शिक्षिका सभा शंका मैना गायिका घंटा बालिका नायिका |
‘ई’ कारान्त किंवा ‘ई’ प्रत्यय स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन ‘या’ कारान्त होते.
एकवचन-अनेकवचन | एकवचन-अनेकवचन |
स्री – स्त्रिया नदी – नदया टाचणी – टाचण्या चांदणी – चांदण्या पोळी – पोळ्या | वही – वह्या मुंगी – मुंग्या कळी – कळ्या गाडी – गाड्या नोकरी – नोकऱ्या |
भुवई – भुवया दांडी – दांड्या कैरी – कैऱ्या बी – बिया नळी – नळ्या | उडी – उड्या समई – समया काठी – काठ्या लेखणी – लेखण्या चटई – चटाया |
मिशी – मिश्या बकरी – बकऱ्या भाकरी – भाकऱ्या पणती – पणत्या खिडकी – खिडक्या | ओवी – ओव्या झोपडी – झोपड्या लढाई – लढाया होडी – होड्या जाळी – जाळ्या |
दासी – दासी, दृष्टी – दृष्टी, युवती – युवती असे काही शब्द एकवचनात व अनेकवचनात सारखेच राहतात.
‘ऊ’ कारान्त किंवा ‘ऊ’ प्रत्यय असलेल्या स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन ‘वा’ कारान्त होते.
एकवचन-अनेकवचन | एकवचन-अनेकवचन |
जळू – जळवा सासू – सासवा जळू – जळवा | ऊ – ऊवा जाऊ – जावा पिसू – पिसवा |
बाजू, वस्तू, अश्रू असे काही शब्द एकवचनात व अनेकवचनात सारखेच राहतात. कारण वस्तू चे अनेकवचन वस्तूवा होत नाही.
नपुंसकलिंगी नामाचे वचन बदला मराठी व्याकरण
‘अ’ कारान्त नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन ‘ए’ कारान्त होते.
एकवचन-अनेकवचन | एकवचन-अनेकवचन |
फूल – फूले चित्र – चित्रे घर – घरे काम – कामे पुस्तक – पुस्तके | दार – दारे मैदान – मैदाने पान – पाने अक्षर – अक्षरे लाकूड – लाकडे |
शहर – शहरे पीक – पिके दुकान – दुकाने झाड – झाडे फळ – फळे | भजन – भजने विमान – विमाने अपत्य – अपत्ये तिकीट – तिकिटे माणूस – माणसे |
तत्व – तत्वे स्वप्न – स्वप्ने गाव – गावे अंग – अंगे शिंग – शिंगे | झुडूप – झुडूपे व्यंजन – व्यंजने मासिक – मासिके अक्षर – अक्षरे वाक्य- वाक्ये |
‘उ’ किंवा ‘ऊ’ कारान्त नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन ‘ए’ कारान्त होते.
एकवचन-अनेकवचन | एकवचन-अनेकवचन |
फुलपाखरू – फुलपाखरे पाखरू – पाखरे पिल्लू – पिल्ले वासरू – वासरे कोकरू – कोकरे | शिंगरू – शिंगरे लेकरू – लेकरे लिंबू – लिंबे लेकरू – लेकरे तट्टू – तट्टे |
‘ए’ कारान्त किंवा ए प्रत्यय असलेल्या नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन ‘ई’ कारान्त होते.
एकवचन | अनेकवचन |
गाणे | गाणी |
खेळणे | खेळणी |
कुत्रे | कुत्री |
घरटे | घरटी |
तळे | तळी |
घोसाळे | घोसाळी |
रोपटे | रोपटी |
गाडगे | गाडगी |
खेडे | खेडी |
केळे | केळी |
मडके | मडकी |
डोके | डोकी |
भांडे | भांडी |
लाटणे | लाटणी |
पदार्थवाचक नामाचे सामान्यतः अनेकवचन होत नाही.
एकवचन | अनेकवचन |
सोने शिसे तांबे पाणी लोणी रूपे गहू तेल चांदी साखर | सोने शिसे तांबे पाणी लोणी रूपे गहू तेल चांदी साखर |
नामाचे वचन बदलताना नेहमी लक्षात ठेवा
*’अ’ कारान्त स्त्रीलिंगी नामांचे अनेकवचन ‘आ’ कारान्त होते, तर काहींचे ‘ई’ कारान्त होते.
उदा. गोष्ट – गोष्टी, तारीख – तारखा, भिंत – भिंती
*’आ’ कारान्त किंवा ‘आ’ प्रत्यय असलेल्या पुल्लिंगी नामाचे अनेकवचन ‘ए’ कारान्त किंवा ‘ए’ प्रत्यय असलेले होतात बाकी इतर वर्ण प्रत्यय असलेल्या नामाचे अनेकवचन होत नाही म्हणजेच ते दोन्ही वचनात सारखेच असते.
*’आ’ कारान्त पुल्लिंगी नामाचे अनेकवचन ‘ए’ कारान्त होते. (शेवटी ए पत्यय)
उदा. थवा – थवे, कुत्रा – कुत्रे
*’आ’ कारान्तशिवाय किंवा आ प्रत्ययाशिवय इतर पुल्लिंगी नामाची रूपे दोन्ही वचनांत सारखीच असतात.त्यात काहीच बदल होत नाही.
*’काही ‘आ-कारान्त’ पुल्लिंगी आदरार्थी वापरल्या जाणाऱ्या नामाचे ‘एकवचन व अनेकवचन’ सारखे असते.
*सामान्यतः आ-कारान्त किंवा आ प्रत्यय असलेल्या स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन हे एकवचनासारखेच असते.
*’ऊ’ कारान्त किंवा ‘ऊ’ प्रत्यय असलेल्या स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन ‘वा’ कारान्त होते.
*’अ’ आणि ‘उ,ऊ’ कारान्त नपुसकलिंगी नामाचे अनेकवचन ‘ए’ कारान्त होते.
*’आ’ कारान्त किंवा ‘आ’ प्रत्यय असलेल्या पुल्लिंगी नामाचे अनेकवचन ‘ए’ कारान्त किंवा ‘ए’ प्रत्यय असलेले होतात बाकी इतर वर्ण प्रत्यय असलेल्या नामाचे अनेकवचन होत नाही म्हणजेच ते दोन्ही वचनात सारखेच असते.
*’आ’ कारान्तशिवाय किंवा आ प्रत्ययाशिवय इतर पुल्लिंगी नामाची रूपे दोन्ही वचनांत सारखीच असतात.त्यात काहीच बदल होत नाही.
*’ए’ कारान्त असलेल्या नपुसकलिंगी नामाचे अनेकवचन ‘ई’ कारान्त होते.
‘ई’ कारान्त किंवा ‘ई’ प्रत्यय स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन ‘या’ कारान्त होते.
*ई-कारान्त असलेल्या नपुसकलिंगी नामाचे अनेकवचन ए-कारान्त होते.
उदा. मोती – मोत्ये, मिरी – मिऱ्ये
*आ-कारान्त, ओ-कारान्त आणि ऐ-कारान्त नपुसकलिंगी नामाचे अनेकवचन होत नाही.
*पदार्थवाचक नामाचे सामान्यतः अनेकवचन होत नाही.
उदा. सोने, शिसे, तांबे, पाणी
*काही नामे नेहमी अनेकवचनी असतात.
उदा. शहारे, रोमांच, डोहाळे
वचन बदला शब्द मराठी | एकवचन अनेकवचन शब्द मराठी | Ek vachan anek vachan in marathi
घर | घरे |
पाखरू | पाखरे |
झाड | झाडे |
ससा | ससे |
नाव | नावे |
घोडा | घोडे |
फूल | फुले |
घागर | घागरी |
घड्याळ | घड्याळ |
वासरू | वासरे |
स्त्री | स्त्रीया |
मूल | मुले |
लिंबू | लिंबे |
लढाई | लढाया |
मैत्रीण | मैत्रिणी |
तळ | तळी |
गाय | गाई |
पिल्लू | पिल्ले |
पाखरू | पाखरे |
लाकूड | लाकडे |
नदी | नद्या |
गंमत | गंमती |
वाहन | वाहने |
घर | घरे |
पंखा | पंखे |
चित्र | चित्रे |
स्वप्न | स्वप्ने |
समोसा | समोसे |
पुस्तक | पुस्तके |
चप्पल | चपला |
पंगत | पंगती |
पोळी | पोळ्या |
गाड़ी | गाड्या |
खिड़की | खिडक्या |
सुई | सुया |
लाकूड | लाकडे |
फर्शी | फर्शा |
दरवाजा | दरवाजे |
माशी | माश्या |
बाटली | बाटल्या |
कांदा | कांदे |
गोष्ट | गोष्टी |
तारीख | तारखा |
भिंत | भिंती |
मैत्रीण | मैत्रीणी |
ओळ | ओळी |
विहीर | विहिरी |
सहल | सहली |
वेल | वेली |
म्हैस | म्हशी |
तलवार | तलवारी |
चूक | चुका |
खून | खुणा |
सून | सूना |
खारीक | खारका |
सायकल | सायकली |
पेन्सिल | पेन्सिली |
रात्र | रात्री |
केळ | केळी |
शेजारीण | शेजारणी |
वीट | वीटा |
बाग | बागा |
वाट | वाटा |
गंमत | गंमती |
धार | धारा |
काच | काचा |
जमीन | जमिनी |
तार | तारा |
आठवण | आठवणी |
वेळ | वेळा |
बहीण | बहिणी |
ससा | ससे |
गाणे | गाणी |
खेळणे | खेळणी |
कुत्रे | कुत्री |
घरटे | घरटी |
तळे | तळी |
घोसाळे | घोसाळी |
रोपटे | रोपटी |
गाडगे | गाडगी |
खेडे | खेडी |
केळे | केळी |
मडके | मडकी |
डोके | डोकी |
भांडे | भांडी |
लाटणे | लाटणी |
वचन बदला : १)नदी २)डोंगर ३)गाय
१)नदी – नदया
२)डोंगर – डोंगर
३)गाय – गाई
उंदीर या शब्दाचे अनेकवचन काय आहे?
उंदीर
निष्कर्ष
वचन बदला मराठी व्याकरण | एकवचन अनेकवचन शब्द मराठी | Ek vachan anek vachan in marathi with PDF चा आपण योग्य पद्धतीने सराव करावा अशी आमची इच्छा आहे. खास करून आपण सर्वांकरीता या लेखात उत्तम माहिती चा समावेश करण्यात आलेले आहेत. आशा आहे आपणास हा लेख आवडला असतील. आपले विचार कमेन्ट करून नक्की कळवा.
धन्यवाद…
Ek vachan anek vachan in marathi with PDF
विद्यार्थी मित्रांनो खाली दिलेले PDF button वर क्लीक करून तुम्ही pdf download करू शकता, PRINT काढू शकता आणि Email द्वारे मित्रांना share करू शकता.
हे देखील वाचा: नाम म्हणजे काय, नामाचे प्रकार, मराठी व्याकरण, marathi grammar pdf
10+ माझी आई निबंध मराठी | Mazi Aai Marathi Nibandh | My Mother Essay in Marathi
5+ माझे गाव निबंध मराठी 2022 | Maze Gav Marathi Nibandh | My village essay in marathi