१६. वनवासी स्वाध्याय नववी मराठी | Vanvasi Swadhyay navvi marathi| 9th marathi swadhyay| वनवासी स्वाध्याय

प्र. १. खालील शब्दसमूहांतील अर्थ स्पष्ट करा.
(१) पांघरू आभाळ-
उत्तर – उघड्यावर संसार आहे
(२) वांदार नळीचे-
उत्तर – डोंगराच्या घळीत वानरे असतात, तिथे वास्तव्य
(३) आभाळ पेलीत-
उत्तर – उन , वारा, पाऊस यांचा सामना करीत
प्र. २. शोध घ्या.
(अ) ‘हात लाऊन गंगना येऊ चांदण्या घेऊन’ या काव्यपंक्तीत व्यक्त होणारा आदिवासींचा गुण-
उत्तर – अतुलनीय धैर्य व उत्तुंग इच्छाशक्ती
(आ) कवितेच्या यमकरचनेतील वेगळेपण-
उत्तर – प्रत्येक कडव्यातील चार पंक्तींमधील पहिल्या, दुसऱ्या व चौथ्या पंक्तींचे यमक जुळते.
प्र. ३. काव्यसौंदर्य.
(१) ‘बसू सूर्याचं रुसून पहू चंद्राकं हसून’, या काव्यपंक्तीतील भावसौंदर्यस्पष्ट करा.
उत्तर : दुपारी सूर्य तापतो. माळरानावर हुंदडणाऱ्या आदिवासी मुलांना कडक उन्हात खेळावे लागते. उघड्याबोडक्या असलेल्या मुलांना या उन्हाचा त्रास होतो; म्हणून ते सूर्यावर रुसून बसतात. रात्री चंद्र उगवतो. त्या शीतल चंद्रप्रकाशात आदिवासी मुलांच्या बागडण्याला उधाण येते; म्हणून चंद्राकडे बघून ते आनंदाने हसतात. सूर्यचंद्राचे त्यांच्याशी असलेले अनोखे नाते या ओळीतून प्रकट झाले आहे.
(२) ‘डोई आभाळ पेलीत चालू शिंव्हाच्या चालीत’, या पंक्तीतील कवीला अभिप्रेत असलेला अर्थ सांगा.
उत्तर : आदिवासी मुले उघड्याबोडक्या अंगाने उंबराच्या माळावर भटकतात, बागडतात. झाड्याकड्यांवर त्यांचा वावर असतो, त्यांचे जीवन खडतर असते. परंतु त्यांना या कष्टमय जीवनाची फिकीर नसते. ऊन, वारा, पाऊस झेलत ते मजेत राहतात. जणू ते आपल्या माथ्यावर सर्व आभाळ पेलतात, सिंह जंगलाचा राजा असतो. त्याचा दरारा सगळ्या रानावर असतो; म्हणून आदिवासी मुले सिंहाच्या दमदार चालीने चालत सारी संकटे झेलतात. आदिवासी मुलांच्या चिवट वृत्तीचे व धाडसाचे वर्णन कवीने केले आहे.
प्र. ४. अभिव्यक्ती.
‘आदिवासी समाज आणि जंगल यांचे अतूट नाते असते’, याविषयी तुमचे विचार लिहा.
उत्तर : आदिवासी समाज हा दाट जंगलात व कडेकपारीत राहतो. झाडांच्या वाळलेल्या फांदया, काटक्या घेऊन त्यांची खोपटी (झोपडी) तयार होते. रानातली फळे, कंदमुळे खाऊन ते गुजराण करतात. ओढ्यानाल्याचे पाणी पितात. निसर्गात ते उघड्यावर जगतात. ते धरतीवर जणू आभाळ पांघरून जगतात. जंगलातील पशुपक्षी त्यांचा मित्रपरिवार असतो. दुखण्याखुपण्याला ते झाडपाल्यांचेच औषध वापरतात. आदिवासी समाजाचे सारे जीवन जंगलावर अवलंबून असते; म्हणून आदिवासी समाज व जंगल यांचे नाते अतूट असते.