वीरांगना (स्थूलवाचन 3)
(अ) लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक
(१) खालील आकृती पूर्ण करा.
वीरांगना (स्थूलवाचन 3)
(२) ‘कठोर परिश्रमांमुळेच स्वाती महाडिक यांना स्वत:चा निर्धार पूर्ण करता आला’, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
वीरांगना (स्थूलवाचन 3)
उत्तर:
पतिनिधनामुळे स्वाती आधीच दुःखाच्या खाईत लोटल्या न होत्या. जीवनाचा साथीदार सोबत असला तर माणसे वाट्टेल ती सहन करू शकतात. वाटेल त्या संकटांना सामोरे जाण्याची हिम्मत माणसांमध्ये असते. इथे तर स्वातींचा पती अर्ध्या वाटेवरूनच या जीवनातून निघून गेला होता. त्यातच दोन मुलांना वाढवण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच येऊन पडली होती.
दुसरी एक गोष्ट स्वातींच्या मार्गात आडवी येणारी होती. ऐन तारुण्यात माणसामध्ये प्रचंड ऊर्जा असते. कोणतेही धाडसी काम करण्यास तरुण मन मागेपुढे पाहत नाही. आणि आता स्वाती तर वयाच्या चाळिशीत पोहोचल्या होत्या. या वयात घडाकेबाज कृती करण्यास लागणारे शारीरिक मानसिक बळ कमी असण्याचा संभव असतो. तसेच, त्यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला होता. तेथील जीवन तर आत्यंतिक खडतर होते. तेथे कमालीची शारीरिक क्षमता आवश्यक असते. आणि शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक बळ अधिक गरजेचे असते.या अडचणी दूर करण्यासाठी अफाट कष्ट घ्यावे लागणार होते. परंतु कोणत्याही परिस्थितीत सैन्यात जायचेच, असा स्वाती यांचा पक्का निर्धार होता. त्यासाठी वाट्टेल ते कष्ट घेण्याची मानसिक तयारी त्यांनी केलेली होती. तसे कष्ट त्यांनी घेतलेसुद्धा. म्हणूनच त्यांना स्वतःचा निर्धार पूर्ण करता आला.
(३) ‘पती निधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचं’, स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो, ते तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
स्वाती महाडिक यांनी पतिनिधनाचे असीम दुःख झेलले. त्या दुःखात बुडून जाऊन त्या निष्क्रिय झाल्या नाहीत. आपल्या पतीचे देशाची सेवा करण्याचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण; करण्याचा त्यांनी निर्धार केला. एवढेच नव्हे तर तो निर्धार त्यांनी पुरा केला. या घटनेचा समाजावर प्रभाव पडलाच समाजाला त्यातून; एक महत्त्वाचा संदेश मिळाला.
आपल्या समाजात अजूनही पुरुषप्रधान संस्कृती आहे. पुरुषांनी सैन्यात भरती होण्याबाबत, समाज अनुकूल असतो. हाच समाज स्त्रियांना सैन्यात पाठवण्यास मात्र तयार नसतो. स्त्रियांकडे शारीरिक मानसिक बळ कमी असते. स्त्रिया सैनिकांचे काम करूच शकणार नाहीत, अशीच समाजाची धारणा असते. या पार्श्वभूमीवर स्त्रिया पुरुषांइतक्याच सक्षम असून सैनिकांचे कामही करू शकतात, असा संदेश समाजाला मिळतो.
वीरांगना (स्थूलवाचन 3)
(४) टिपा लिहा.
(अ) देशप्रेमी कर्नल संतोष महाडिक
उत्तर:
कर्नल संतोष महाडिक यांची देशावर अपार निष्ठा होती. त्यासाठीच त्यांनी सैन्यदलात प्रवेश केला. त्यांची कामगिरी व त्यांचे व्यक्तिमत्त्व यांचा त्यांच्या भोवतालच्या लोकांवर प्रभाव पडला होता. अचानक १७ नोव्हेंबर २०१५ रोजी काश्मीरमधल्या कुपवाड्यामध्ये
वीरांगना (स्थूलवाचन 3)
(५) ‘प्राप्त परिस्थितीतून आत्मविश्वासाने आणि परिश्रमाने कार्य करणे म्हणजेच यश’, पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
उत्तर:
स्वातींनी काय केले? त्यांनी प्रथम स्वतः समोर ठाकलेली परिस्थिती नीट समजून घेतली. आपण काय काय करू शकतो, याचा त्यांनी अंदाज घेतला. त्यानुसार निर्णय घेतले. एकदा निर्णय घेतल्यावर मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही. आपल्याला अमुक अमुक गोष्टी नक्की करता येतील, असा त्यांनी विश्वास बाळगला. कठोर परिश्रम घेतले. परिश्रमाबाबत कोणतीही तडजोड केली नाही. योजलेल्या मार्गावर त्या ठामपणे पावले टाकत राहिल्या. त्यामुळे त्या यशापर्यंत पोहोचल्या. यश म्हणजे वेगळे काय असते? फक्त परिस्थितीचा विचार करून निवडलेल्या दिशेने न घाबरता, कच न खाता ठामपणे पावले टाकली आणि त्यासाठी आवश्यक; ते सर्व कष्ट घेणे म्हणजेच यश. स्वाती यांच्या कार्यात हे लक्षात येते.
वीरांगना (स्थूलवाचन 3)
(६) ‘मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवावा’, या विधानाविषयीचे तुमचे विचार स्पष्ट करा.
उत्तर:
होते काय की, आपल्याला काय करायचे आहे, आपले ध्येय कोणते आहे, हे आपण नक्की करतो आणि पावले; टाकायला सुरुवात करतो. अर्ध्यावर गेल्यावर ध्येयाच्या दिशेने ;आपण चाललेलो नाही हे लक्षात येते. मग आपण मार्ग बदलतो. असे पुन्हा पुन्हा घडते आणि काळ संपतो. पण आपण मुक्कामाला पोहोचतच नाही. त्याचे कारण साधे आहे. आपण फक्त मुक्कामाचा विचार करतो. सुरुवातीपासून मुक्कामापर्यंतचा, शेवटापर्यंतचा जो मार्ग आहे, त्याचा आपण विचारच करीत नाही. खरे तर, या मार्गाचा तपशीलवार व सूक्ष्मपणे विचार केला पाहिजे. प्रत्येक पावलावर पार पाडाव्या; लागणाऱ्या सर्व कृतींची नोंद केली पाहिजे. काही कृतींचा मिळून एक टप्पा, याप्रमाणे संपूर्ण मार्गाचे टप्पे ठरवले पाहिजेत. प्रत्येक टप्प्याला किती वेळ लागेल, कोणती साधने वापरावी लागतील, हेसुद्धा निश्चित केले पाहिजे. याप्रमाणे तयारी केली की यश नक्कीच मिळते. म्हणजेच नियोजन होय. म्हणून अंतिम मुक्कामापेक्षा तयारी नियोजनबद्ध प्रवासावर विश्वास ठेवला पाहिजे, हेच खरे.
(७) हा पाठ वाचल्यावर तुमच्या मनात येणारे भाव शब्दबद्ध करा.
उत्तर:
स्वाती यांनी धडाकेबाज निर्णय घेतले आणि ते आणलेसुद्धा. पतीचे अपुरे राहिलेले स्वप्न त्यांनी; पूर्ण करायला घेतले. या तऱ्हेने त्यांनी पतीच्या आठवणी मनात जपून; ठेवायचा मार्ग निवडला. प्रत्यक्षात एखादी व्यक्ती मरण पावते; तेव्हा त्या व्यक्तीची कर्तबगारी, विचार, तत्त्वे यांचाही एक प्रकारे; अंत होत असतो. मरण पावलेल्या व्यक्तीला आपण पुन्हा जिवंत करू शकत नाही. किंबहुना कोणत्याही माणसाला अमर करू शकत नाही. तर मग आपली प्रिय व्यक्ती, आदरणीय व्यक्ती यांना अमर कसे करणार? तर त्यांच्या आठवणी जाग्या ठेवून. त्या व्यक्तींचे कर्तृत्व, त्यांचे विचार, त्यांनी उराशी बाळगलेली तत्त्वे जिवंत ठेवून आपण त्या व्यक्तीच्या आठवणी जाग्या ठेवू शकतो. किंबहुना तोच सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. मला या विचाराची देणगी पाठाने दिली आहे.
वीरांगना (स्थूलवाचन 3)
(आ) सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा
(१) खालील कृती करा.
मुद्द्यांवरून एक परिच्छेद तयार करा.
उत्तर:
सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे झाला. त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून इंग्रजी विषयात एम.ए. ही पदवी मिळवली. पुढे त्यांनी बी.एड. ही पदवीसुद्धा घेतली. रेल्वे पोलीस बोर्डाची प्रवेश परीक्षा देऊन सबइन्स्पेक्टर या पदावर दाखल झाल्या.श्रीमती रेखा यांनी आपल्या नोकरीकडे केवळ नोकरी म्हणून पाहिले नाही. त्यांनी नोकरीकडे समाजकार्य म्हणून पाहिले आणि त्यांच्या कामाचे स्वरूप आमूलाग्र बदलले. विविध कारणांनी घराला दुरावलेल्या, भरकटलेल्या, चुकीच्या मार्गाला लागलेल्या, अवैध कामांना जुंपलेल्या मुलांची सोडवणूक करण्याकडे लक्ष केंद्रित केले. अवघ्या दीड वर्षांत त्यांनी ४३४ मुलांची सोडवणूक केली. हे फार मोठे सामाजिक कार्य त्यांनी पार पाडले.
(२) पाठाच्या आधारे टिपा लिहा.
(अ)
उत्तर:
काही मुले वेगवेगळ्या कारणांनी आईवडिलांशी भांडतात आणि रागाच्या भरात घर सोडून निघून जातात. मुंबईसारखे शहर व सिनेमा यांच्यातील झगमगत्या दुनियेला भुलून काही मुले घरातून पळ काढतात. गरिबीला कंटाळून चार पैसे मिळवण्यासाठी शहराकडे धाव घेणारी मुलेही असतात. कधी कधी काही समाजकंटक मुलांना पळवून नेतात आणि त्यांना अवैध कामांना जुंपतात. अशा अनेक कारणांनी मुले स्वतःच्या घराला मुकतात.
(आ)
उत्तर:
श्रीमती रेखा यांनी आपल्या नोकरीकडे एक; सामाजिक कार्य या दृष्टीने पाहिले. या उदात्त दृष्टिकोनामुळे भरकटलेल्या मुलांकडे लक्ष गेले. वेगवेगळ्या कारणांनी मुले घराला दुरावतात. मुलांना वस्तुस्थिती कळत नाही. स्वतःला काय हवे एवढेच त्यांना कळते. यातून गैरसमज, ताणतणाव निर्माण होतात. भांडणे होतात. मुले रागावून घर सोडून निघून जातात. ही गोष्ट सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी आहे. श्रीमती रेखा मिश्रा यांनी भरकटलेल्या ४३४ मुलांची सुटका केली. पुन्हा त्यांना स्वतःच्या आनंदी व सुखरूप वातावरणात आणून सोडले. श्रीमती रेखा यांच्या प्रयत्नांमुळे अनेक कुटुंबे सावरली आहेत. अनेकांचे जीवन उध्वस्त होण्यापासून वाचले आहे. ज्यांचे बालपण कोळपले आहे, अशी मुले आनंदाने नाचूबागडू लागली आहेत. श्रीमती रेखा यांच्या कार्यामुळे असे फार मोठे सामाजिक कार्य घडून आले आहे.
(३) ‘प्रेम आणि आपुलकी’ या गोष्टींमुळे भरकटलेली मुले पुन्हा स्वगृही जाण्यास तयार होतात, हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
उत्तर:
चुका करणाऱ्या माणसांकडे व मुलांकडे समाज, पोलीस नकारात्मक दृष्टीने पाहतात. पोलीससुद्धा अशी मुले समोर आली की, त्यांच्याकडून माहिती मिळवण्यासाठी पहिल्यांदा त्यांना मारपीट करतात. ही मुले लबाडच असतात, गुन्हेगारी स्वरूपाचीच असतात असा पोलिसांनी पूर्वग्रह करून घेतलेला असतो. साहजिकच, एक तर मुले पोलिसांना घाबरतात किंवा कोडगी बनतात. या मुलांचा सुधारण्याचा मार्गच बंद होतो. श्रीमती रेखा यांनी मात्र आईच्या मायेने अशा मुलांकडे पाहिले. त्यांना जवळ घेतले. आपलेसे केले. त्यामुळे ही मुले पुन्हा घरी जाण्यास राजी झाली. चांगले आयुष्य सुरू करण्याची त्यांना संधी मिळाली. पहिल्याच केसमध्ये त्यांना सापडलेल्या १४ वर्षाच्या मुलाचे त्यांनी ममतेने मन परिवर्तन केले. पोलिसी बा तर की दाखवण्यापेक्षा त्यांनी त्यांच्याशी मैत्री केली. यामुळे ही मुले रेखाजींच्या जवळ आली. याचा अर्थच असा की मुलांशी प्रेमाने वागले स्वगृही जाण्यास तयार होतात.
(४) ‘भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत’, हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
उत्तर:
रेखाजींचे कार्य हे राष्ट्र घडवण्याचेच कार्य आहे. अलीकडे समाजमाध्यमांचा प्रभाव खूप वाढला आहे. त्याचे विपरीत परिणाम दिसून येतात. फेसबुकवरील गप्पांमधून अनेक समाजकंटक व्यक्ती अजाण मुलांना / मुलींना फसवतात. अशा प्रकरणांमध्ये मुलांना समजावून सांगणे खूप कठीण असते. कारण या वयात मुलांच्या भावना सैरभैर झालेल्या असतात. अशा वेळी रेखाजी त्यांना प्रेमाने समजावून सांगतात, कायदयाची भीती घालतात, पुढील आयुष्यातील भीषण परिस्थितीची जाणीव करून देतात आणि मुलांना चुकीच्या मार्गापासून दूर करण्याचा प्रयत्न करतात. रेखाजींच्या कुशल प्रयत्नांमुळे अनेक मुले गैरप्रवृत्तीला बळी न पडता पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात सामील व्हायला तयार होतात. हे खरे तर आपल्या समाजाचे आपल्या राष्ट्राचे फार मोठे भाग्य आहे. एक प्रकारे देशाचे भवितव्य घडवण्याचे हे कार्य आहे. आपला समाज रेखाजींच्या या कार्यामुळे नेहमीच त्यांचा कृतज्ञ राहील.
(५) सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्याची माहिती वाचून तुमच्या मनात येणारे विचार स्पष्ट करा.
उत्तर:
मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शहरात आता या घडीला हलाखीचे जीवन जगणारी, घराला दुरावलेली किंवा अनाथ अशी हजारो बालके आहेत. त्यांना समाजकंटक भीक मागायला लावतात किंवा अमली पदार्थांच्या तस्करीसाठी त्यांचा उपयोग करून घेतात. अन्य अवैध कामांसाठीसुद्धा बालकांचा निष्ठुरपणे उपयोग केला जातो. जरीकाम हे अत्यंत त्रासदायक व किचकट काम अशा कामासाठी लहान मुलांना अल्प मोबदल्यात बेकायदेशीर रितीने जुंपले जाते. अत्यंत कष्टाच्या कामांसाठीसुद्धा मुले वापरली जातात. चोऱ्या करण्यासाठी तर मुलांचा वापर करणाऱ्या टोळ्याच अस्तित्वात आहेत. अशा कर्दमातून मुलांची सुटका करणारा एक तरी सहृदय माणूस असायला हवा होता. सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या रूपाने एक आशेचा किरण निर्माण झाला आहे.