शाळेची घंटा वाजली नाही तर मराठी निबंध । Shalechi ghanta vajli nahi tar nibandh

शाळेची घंटा वाजली नाही तर मराठी निबंध । Shalechi ghanta vajli nahi tar nibandh

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी शाळेची घंटा वाजली नाही तर मराठी निबंध । Shalechi ghanta vajli nahi tar या विषयावर निबंध घेऊन आलो आहे.

शाळेची घंटा वाजली नाही तर मराठी निबंध । Shalechi ghanta vajli nahi tar nibandh

प्रत्येक शाळेमध्ये एक नियोजनबद्ध वेळापत्रक तयार करून ठेवलेले असते त्यानुसार शाळेची घंटा ही वाजवली जाते, परंतु शाळेची घंटा वाजलिच नाहीं तर…तर काय होईल?

 दररोज नेहमी प्रमाणे टण… टण… टण ….असा आवाज कानावर पडताच वेळेवर मुलांना पळापळ करून शाळेत बोलवनारी शाळेची घंटा वाजलीच नाहीं तर मुले नियमीत वेळेत शाळेत कसे येतील.घंटा वाजताच मुल आणि मुलीं परिपाठासाठी व्हरांड्यामध्ये जमा होतात आणि शाळेचा दिनक्रम सुरू होतो पण शाळेची घंटा वाजलीच नाही तर हा दिनक्रम पूर्ण बिघडून जाईल.

शाळेच्या  घंटेच्या आवाजानेच शाळेतील प्रत्येक तास सुरू होतो आणि संपतो. जर शाळेची घंटा वाजलीचं नाही तर जाधव सरांचा गणिताचा तास कधी संपलं आणि आम्ही कधी मैदानावर खेळायला जाणार.पण जर एखादा शारीरिक शिक्षणाचा म्हणजेच खेळाचा तास सुरू असला,वर्गात अंताक्षरीचा खेळ रंगात आला की हा तास संपूच नये असं वाटतं तेव्हा घंटा वाजलीच नाही तर खूप मजाही येईल.

 दुपारच्या वेळी पोटात कावळे ओरडत असतात, शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचे शाळेच्या घंटेकड लक्ष असते आणि त्यातच शाळेची घंटा वाजलीच नाही तर सर वर्गातून बाहेर कधी जाणार आणि कधी आम्ही आमचा डबा खाणार.

 शाळेची घंटा वाजलीच नाही तर शाळा भरणार कधी, मधली सुट्टी होणार कधी, आम्ही जेवणार कधी आणि शाळा सुटणार कधी अश्या खुप समस्यांना सामोरे जावं लागेल.शाळेची घंटा वाजलीच नाही तर सगळे वेळापत्रक कोलमडून जाईल, शाळेचे नियोजन व्यवस्थित चालत असते ते शाळेच्या घंटेमुळे त्यामुळे शाळेला शिस्त येते ती शिस्त शाळेला लागणार नाही.

 

शाळेची घंटा वाजली नाही तर मराठी निबंध । Shalechi ghanta vajli nahi tar nibandh

विद्यार्थिदशेत शाळा आणि शाळेची घंटा यांना अनन्यसाधारण स्थान असते. कारण घंटा वाजते आणि शाळा सुरू होते, तर कधी घंटा वाजते आणि शाळा सुटल्याची आनंदवार्ता कळते. कधी घंटा वाजते आणि संपूच नये असे वाटणारा आवडीचा तास संपतो, तर कधी घंटेच्या आवाजाने कंटाळवाणा, न आवडणारा तास सुरू होतो. मधली सुट्टी सुरू झाल्याची गोड बातमी ही घंटाच देते आणि रंगात आलेला खेळ आवरण्याची विरस करणारी सूचनाही घंटाच देते. अशी ही शाळेची घंटा वाजलीच नाही तर –

अहो, तशीच गंमत झाली. एकदा एका काळोख्या रात्री आमच्या शाळेत चोर आले आणि त्यांनी ती भलीभक्कम पितळी घंटाच चोरून नेली. दुसऱ्या दिवशी सगळी मुले शाळेत आली. शाळा भरण्याची वेळ होऊन गेली तरी घंटा होईचना! आम्हांला त्याचा पत्ताच नव्हता. कारण आमचा क्रिकेटचा सामना मैदानात रंगला होता ना ! सारे मैदान मुलांनी फुलून गेले होते. पण वर्गातील स्कॉलरमंडळी बेचैन झाली. ‘ अरे आज घंटा का होत नाही? अभ्यासाचा वेळ फुकट जातो आहे ना!’ ते बेचैन झाले. मुख्याध्यापकांच्या कचेरीकडे ते धावले. मग सर्वत्र बातमी पसरली की शाळेची घंटा चोरीला गेली आहे; म्हणून घंटा वाजली नाही.

त्याचवेळी एक अशुभ विचार मनात आला. समजा शाळा चालू असताना घंटा चोरीला गेली असती तर शाळा सुटलीच नसती आणि मग ‘ शाळा सुटली पाटी फुटली’ असे म्हणत आनंदभराने घराकडे कसे बरे धावता आले असते ?

मी पाहिलेला अपघात मराठी निबंध | Mi pahilela Apghat Marathi Nibandh

Print Friendly, PDF & Email
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.