20+ सूर्य समानार्थी शब्द मराठी | Surya samanarthi shabd in Marathi | Surya Paryayvachi Shabd in Hindi [With PDF]

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी सूर्य समानार्थी शब्द मराठी 20+ | Surya samanarthi shabd in Marathi | Surya Paryayvachi Shabd in Hindi बघणार आहोत.

मराठी व हिंदी या भाषेमधील खूप सारे शब्द हे समान अर्थाने वापरले जातात याच कारणाने आपण या लेखांमध्ये Surya samanarthi Shabd in Marathi व Surya Paryayvachi Shabd in Hindi यांचे इतर शब्द शोधण्याचा प्रयत्न करूया..

सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या लेखात मिळेल. त्याचबरोबर सूर्याशी संबंधित काही महत्त्वाचे माहिती तुम्हाला या लेखात मिळेल 

सदर पोस्टमध्ये आपन काय बघणार आहोत.

1.सूर्य समानार्थी शब्द मराठी
2.Surya Samanarthi Shabd in Marathi
3.सूर्य पर्यायवाची शब्द Surya Paryayvachi Shabd in Hindi
4.सूर्य समानार्थी शब्द संस्कृत
5.सूर्याविषयी माहिती Sun Information In Marathi
6.सूर्याचे महत्त्व काय?
7.Faq’s
सूर्य शब्दा सम्बंधित विचारले जाणारे काही प्रश्न.

चला तर पाहूया सूर्य समानार्थी शब्द.

सूर्य समानार्थी शब्द मराठी

सूर्य समानार्थी शब्द मराठीरवि, भास्कर, मित्र, भानू, दिनकर, आदित्य, अर्क, दिनमणी, दिनेश

 

Surya Samanarthi Shabd in Marathi

Surya – Ravi, Sooraj, Dinakar, Prabhaakar, Aadity, Mareechee, Dinesh, Bhaaskar, Dinakar, Divaakar, Bhaanu, Ark, Tarani, Patang, Aadity, Savita, Hans, Anshumaalee, Maartand.

 

सूर्य पर्यायवाची शब्द Surya Paryayvachi Shabd in Hindi

सूर्य सूर्य के पर्यायवाची शब्द भानु, सूरज, दिनकर, रवि, अर्क, दिनमणि, दिवाकर, अर्क, दिनेश, हंस, आदित्य, मार्तण्ड, भास्कर, प्रभाकर आदि हैं.
suryaMartand, Suraj, Patang, Ravi, Anshumali, Bhaskar, Dinkar, Aditya, Marichi, Tarani, Dinkar, Bhanu, Savita, Diwakar, Prabhakar, Aditya, Hans, Ark, Dinesh.

 

सूर्य समानार्थी शब्द संस्कृत

सूर्यः, आदित्य:, सविता, सहस्त्रकिरण: प्रद्योतन:, भास्कर:, तिग्मांशु:, तरणि:, दिनमणि:, भास्वान्, विवस्तान्, हरि:, मार्तण्ड:

sunriseउदिति, मित्रोदय
sunsetसूर्यास्तः
sunlightआतपः
Sunshineआतपः
sunbeamसूर्यकिरणः

 

हे देखील वाचा:चंद्र समानार्थी शब्द मराठी | Moon Synonyms | Chandra Samanarthi Shabd In Marathi

सूर्याविषयी माहिती Sun Information In Marathi

मित्रांनो, संपूर्ण विश्वातील अब्जावधी आकाशगंगांपैकी एक म्हणजे आपली आकाशगंगा मिल्की वे. आकाशगंगेमध्ये करोडो सूर्यमाला आहेत आणि यापैकी एक आपली स्वतःची सौरमाला आहे.सूर्य हा तारा आपल्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे. सूर्याचा उगम सुमारे ४.६ अब्ज वर्षांपूर्वी झाला.पृथ्वी व सूर्यमालेतील इतर पदार्थ हे सर्व सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. सूर्य सौर मंडळाच्या 99.8 टक्के इतके आहे आणि त्याचा व्यास पृथ्वीपेक्षा 109 पट जास्त आहे. सुमारे दहा लाख पृथ्वी सूर्याच्या आत येऊ शकतात.सूर्यमालेतील एकूण वस्तुमानापैकी ९९% पेक्षा जास्त वस्तुमान एकट्या सूर्यामध्ये आहे.

सूर्य पृथ्वीसारखा नाही, तो पूर्णपणे वायूंनी बनलेला आहे. इतर तार्‍यांप्रमाणे सूर्यामध्येही हायड्रोजन आणि हेलियम वायू मोठ्या प्रमाणात असतात. याशिवाय ऑक्सिजन, कार्बन, निऑन, नायट्रोजन, सिलिकॉन, मॅग्नेशियम असतात.सूर्यापासून उत्पन्न होणारी उर्जा सूर्यकिरणांच्या स्वरुपात बाहेर पडते व प्रकाश संश्लेषणाच्याद्वारे पृथ्वीवरील संपूर्ण जीवसृष्टीला आधार देते आणि पृथ्वीच्या वातावरणामध्ये व हवामानामध्ये बदल घडवते.सूर्याच्या दृश्यमान भागाचे तापमान 5500 °C आहे आणि अणुप्रक्रियेमुळे, त्याच्या गाभ्याचे तापमान 15 दशलक्ष °C पर्यंत पोहोचते.शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की सूर्याइतकी ऊर्जा निर्माण करण्यासाठी प्रत्येक सेकंदाला १०० अब्ज टन डायनामाइटचा स्फोट करावा लागेल.

आकाशगंगेतील 100 अब्ज ताऱ्यांपैकी सूर्य एक आहे. सूर्य आकाशगंगेच्या मध्यवर्ती भागापासून 25,000 प्रकाश-वर्षे दूर प्रदक्षिणा घालते ज्याला गॅलेक्टिक कोर म्हणतात आणि एक कक्षा पूर्ण करण्यासाठी सुमारे 250 दशलक्ष वर्षे लागतात.सूर्य हा एक तारा आहे आणि यामध्ये वायू आढळतात ज्यांचे वजन हेलियमपेक्षा जास्त असते.आता सूर्यामध्ये इतके अणुइंधन आहे की ते सध्याच्या स्वरूपात आणखी 5 अब्ज वर्षे टिकू शकेल. यानंतर ते फुगून लाल राक्षसाचे रूप धारण करेल.

सूर्याचे महत्त्व काय?

संपूर्ण विश्वात पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे ज्यावर जीवन शक्य आहे, ज्यामध्ये सूर्याचा सर्वात महत्वाचा वाटा आहे.सूर्य हा जगात प्रकाशाचा स्रोत आहे, जर सूर्य नसता तर पृथ्वी सर्व ग्रहांसारखी निर्जीव झाली असती. पृथ्वीवर येणारे सर्व सजीव निसर्गावर अवलंबून आहेत पण निसर्गाचे अस्तित्व सूर्यावर अवलंबून आहे.जर सूर्याची किरणे पृथ्वीवर पोहोचली नाहीत तर पृथ्वी नष्ट होईल, सर्वत्र अंधार होईल, पृथ्वीवर असलेले मोठे महासागर बाष्पीभवन होतील. पृथ्वीवरून जीवनाचे नाव पुसले जाईल.

Faq’s

सूर्य शब्दा सम्बंधित विचारले जाणारे काही प्रश्न.

Q. सूर्य समानार्थी शब्द काय आहे?.

उत्तर- सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द रवी, भास्कर, भानू, आदित्य, दिनकर, दिनमनी, सविता, वासरमनी, मार्तंड, मित्र आहे.

Q. सूर्य शब्द का पर्यायवाची शब्द क्या है?.

उत्तर- सूर्य इस शब्द का पर्यायवाची शब्द भानु, सूरज, दिनकर, रवि, अर्क, दिनमणि, दिवाकर, अर्क, दिनेश, हंस, आदित्य यह है.

Q. What is the synonym of Surya in marathi?

रवी, भास्कर, भानू, आदित्य, दिनकर, दिनमनी, सविता, वासरमनी, मार्तंड

Q. सूर्य कशापासून बनलेला आहे?

संपूर्ण सूर्य हा ज्वलनशील वायूंनी बनलेला एक धगधगता आगीचा गोळा आहे. सूर्य 72 टक्के हायड्रोजन आणि 26 टक्के हेलियम आणि 2 टक्के कार्बन आणि इतर ज्वलनशील वायूंनी बनलेला आहे.

Q. सूर्याचे वय किती आहे?

4.603 अब्ज वर्षे

Q. सूर्य के कितने नाम होते हैं?

सूर्य के नाम भानु, सूरज, दिनकर, रवि, अर्क, दिनमणि, दिवाकर, अर्क, दिनेश, हंस, आदित्य, मार्तण्ड, भास्कर, प्रभाकर आदि हैं.

Q. सूर्य हा सर्व वायूंनि बनलेला आहे का?

सूर्य हा प्रज्वलित वायूंच्या संयोगाने बनलेला आहे. हे वायू प्रत्यक्षात प्लाझ्माच्या स्वरूपात असतात. प्लाझ्मा ही वायूसारखीच पदार्थाची अवस्था आहे, परंतु बहुतेक कण आयनीकृत असतात.

Q. सूर्य आपल्याला कोणते जीवनसत्व देतो?

व्हिटॅमिन डी हे सूर्यप्रकाशातील जीवनसत्व आहे. सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना, त्वचेमध्ये असलेले 7-डिहायड्रोकोलेस्टेरॉल हे अतिनील बी किरणे शोषून घेते आणि प्रीव्हिटामिन डी3 मध्ये रूपांतरित होते जे व्हिटॅमिन डी3 मध्ये आयसोमराइज करते.

निष्कर्ष

तर मित्रांनो सूर्य समानार्थी शब्द मराठी या शब्दांचा आपण योग्य पद्धतीने सराव करावा अशी आमची इच्छा आहे. खास करून आपण सर्वांकरीता या लेखात उत्तम समानार्थी शब्दांचा समावेश करण्यात आलेला आहे. आशा आहे आपणास हे शब्द आवडले असतील. आपले विचार कमेन्ट करून नक्की कळवा.

धन्यवाद…

चंद्र समानार्थी शब्द मराठी 20+ | Moon Synonyms | Chandra Samanarthi Shabd In Marathi

हे देखील वाचा: समानार्थी शब्द मराठी 1000 | Samanarthi Shabd In Marathi | Synonyms In Marathi

हे देखील वाचा: विरुद्धार्थी शब्द मराठी 1000 | Virudharthi Shabd In Marathi | Antonyms Marathi | Opposite words In Marathi

हे देखील वाचा: मराठी निबंध लेखनअणि भाषण

10+ माझी आई निबंध मराठी | Mazi Aai Marathi Nibandh | My Mother Essay in Marathi

हे देखील वाचा: 5+ मी पाहिलेला अपघात मराठी निबंध | Mi pahilela Apghat Marathi Nibandh | Mi Pahilela Apghat Marathi Essay

5+ माझे गाव निबंध मराठी 2022 | Maze Gav Marathi Nibandh | My village essay in marathi

सूर्य समानार्थी शब्द मराठी With PDF

विद्यार्थी मित्रांनो खाली दिलेले PDF button वर क्लीक करून तुम्ही सूर्य समानार्थी शब्दाची pdf download करू शकता, त्याची PRINT काढू शकता आणि Email द्वारे मित्रांना share ही करू शकता.

Print Friendly, PDF & Email
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.