१८. हसरे दु:ख स्वाध्याय इयत्ता नववी | hasre dukh swadhyay iyatta navvi | 9th Marathi Swadhyay

प्र. १. आकृतीत दिलेल्या प्रसंगाबाबत माहिती लिहून आकृतिबंध पूर्ण करा.
(१)
लिली हार्लेच्या गायनाचा प्रेक्षागृहावर होणारा परिणाम |
साऱ्या प्रेक्षागृहाची नजर तिच्यावर खिळून राहिली |
साऱ्या श्रोत्यांचे भान हरपून आले |
सारे श्रोते जीवाचा कान करून ऐकू लागले |
(२)
प्रेक्षागृहातील विपरीत घटना |
लीलीचा आवाज एकदम चिरकला आणि तो काही केल्या कंठातून फुटेना . |
स्वर आतल्या आत विरून जाऊ लागले . |
स्वरांनी वाद्यवृंदाची साथ सोडून दिली . |
बसके स्वर कंठातून बाहेर येईनात. |
प्र. २. खाली दिलेल्या घटनांचा परिणाम लिहा.
घटना | परिणाम |
(१) चार्लीने जॅक जोन्स म्हणायला सुरुवात केली. | वाद्यवृंदही त्याला साथ देऊ लागले |
(२) प्रेक्षागृहात वाद्यवृंदाचे स्वर घुमू लागल | सारे थिएटर त्या स्वरांनी भरून गेले. |
(३) प्रेक्षागृहातील आरोळ्या स्टेज मॅनेजरने ऐकल्या. | स्टेज मनेगॅर धावत पळत आला आणि विंगेत चार्लीच्या शेजारी उभा राहिला . गोधळून जाऊन लीलिकडे बघत राहिला. |
प्र. ३. (अ) कंसातील वाक्प्रचारांचा खाली दिलेल्या वाक्यांत योग्य उपयोग करा.
(अवेहलना करणे, चेहरा पांढरा फटफटीत पडणे, पदार्पण करणे, स्तिमित होणे)
(१) आंब्याच्या झाडाचे मालक समोरून येताना दिसताच कैऱ्या पाडणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर भीती पसरली.
उत्तर – आंब्याच्या झाडाचे मालक समोरून येताना दिसताच कैऱ्या पाडणाऱ्या मुलांचे चेहरे पांढरे फटफटीत पडले. शालेय स्नेहसंमेलनात प्राचीने स्टेजवर पदार्पण केले.
(२) शालेय स्नेहसंमेलनात प्राचीने स्टेजवर पहिले पाऊल टाकले.
उत्तर – शालेय स्नेहसंमेलनात प्राचीने स्टेजवर पदार्पण केले.
(३) दिव्यांग मुलांची प्रदर्शनातील चित्रे पाहून प्रमुख पाहुणे थक्क झाले.
उत्तर – दिव्यांग मुलांची प्रदर्शनातील चित्रे पाहून प्रमुख पाहुणे स्तिमित झाले.
(४) गुणवान माणसांचा अनादर करू नये.
उत्तर – गुणवान माणसांची अवहेलना करू नये.
(ब) खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे लिंग बदलून वाक्ये पुन्हा लिहा.
(१) तिच्यावर आलेला वाईट प्रसंग या चिमुकल्याने सावरला.
उत्तर – तिच्यावर आलेला वाईट प्रसंग या चिमुकलिने सावरला.
(२) तिच्या गोड गळ्याने कधीही दगा दिला नाही.
उत्तर – त्याच्या गोड गळ्याने कधीही दगा दिला नाही.
(३) नर्तकीचे नृत्य प्रेक्षणीय होते.
उत्तर – नर्तकाचे नृत्य प्रेक्षणीय होते.
(४) सवाई गंधर्व महोत्सव प्रसिद्ध गायकाच्या गायनाने रंगला.
उत्तर – सवाई गंधर्व महोत्सव प्रसिद्ध गायीकेच्या गायनाने रंगला.
प्र. ४. स्वमत.
(१) चार्लीच्या तुम्हांला जाणवलेल्या गुणांचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.
उत्तर : चार्ली हा मुळातच गुणी कलावंत होता. आपली ही ओळख त्याने पदार्पणातच करून दिली. त्या दिवशी आई गात असताना तो एकाग्रतेने गाणे ऐकत होता. मला तर वाटते की, तो आईबरोबर मनातल्या मनात गाणे गातच असावा. यासाठी एकाग्रता राखण्याची व आपल्या आवडत्या विषयाशी एकरूप होण्याची क्षमता लागते. ती चार्लीकडे होती. रंगमंचावरून प्रत्यक्ष गाण्याची वेळ आली, तेव्हा चार्लीने ते यशस्वी रितीने गायले. याचे कारण त्याला कार्यक्रम सादर करायचा नव्हता. त्याला गायचे होते. त्याच्यात गायनाची ऊर्मी होती. तो त्या गाण्याशी एकरूप झाला होता. म्हणून तो गाऊ शकला.
पैशांचा पाऊस पडला, तेव्हा त्याने पैसे गोळा करायला सुरुवात केली. प्रेक्षकांनाही तसे सांगितले. हा त्याच्या मनाचा निरागसपणा, निष्पापपणा होता. तो कलावंतच होता. कलेची ऊर्मी त्याच्यात होती. म्हणून त्याने नाचून दाखवले. नकला करून दाखवल्या. हे सर्व त्याने निरीक्षणातून मिळवले होते. त्याची निरीक्षणक्षमता अफाट होती. एकंदरीत पदार्पणातच त्याने आपले कलावंतपण सिद्ध केले.
(२) स्टेज मॅनेजरच्या जागी तुम्ही आहात अशी कल्पना करून त्या प्रसंगात तुम्ही कसे वागाल ते सविस्तर लिहा.
उत्तर : स्टेज मॅनेजरने चार्लीला गाणे सादर करायला सांगितले, हे योग्यच होते. तो निर्णय योग्यच होता, हे चार्लीने आपल्या कामगिरीने सिद्ध केलेच. मात्र, मॅनेजरची एक गोष्ट मला पटली नाही आणि आवडलीही नाही. लिलीवर अनवस्था प्रसंग ओढवला, तेव्हा मॅनेजर गोंधळून गेला. त्याने प्रेक्षकांना शांत करण्यासाठी काहीही केले नाही. मी त्याच्या जागी असतो, तर पुढे झालो असतो. प्रेक्षकांची क्षमा मागितली असती. घडलेल्या प्रसंगात लिलीची कोणतीही चूक नव्हती, तिच्यावर कोसळलेली ती नैसर्गिक आपत्ती होती, हे सर्व त्यांना समजावून सांगितले असते. पंधरा मिनिटांची विश्रांती जाहीर केली असती. या अवधीत विचारविनिमय केला असता. लिलीला धीर दिला असता. मला वाटते, असेच व्हायला हवे होते.
(३) ‘हसरे दुःख’ या शीर्षकाचा तुम्हांला समजलेला अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर : लिली हार्ले ही एक मोठी कलावंत होती. गायन, पियानो वादन, नर्तन यांत ती निष्णात होती. कलावंत म्हणून जे मोठेपण असते, तिने मिळवले होते. या सामर्थ्याच्या बळावर तिने पैसा, कीर्ती मिळवली होती, हे सर्व एके दिवशी अचानक लुप्त झाले. तिचा
आवाज हरवला आणि तिचे सर्वस्वच गेले. ती रात्र तिच्या दृष्टीने काळरात्र होती. दुःखाचा कडेलोट होता.
त्याच रात्री लिलीचा पाच वर्षांचा हरहुन्नरी मुलगा या संकटात तिच्या मदतीला धावून आला. कोसळलेला कार्यक्रम त्याने पुन्हा उभारला. त्याने गायन, अभिनय व नर्तन या कौशल्यांचे डोळे दिपवणारे दर्शन घडवले. कोणत्याही आईला आभाळ ठेंगणे वाटावे, असे दृश्य होते ते. नवा कलावंत उदयाला आला. आपल्या मुलाचा हा उदयकाळ म्हणजे सुखाचा सर्वोच्च बिंदू होता. एका बाजूला सुख होते. त्याच क्षणी दुसऱ्या बाजूला दु:ख होते. म्हणून या पाठाचे शीर्षक आहे – ‘हसरे दु:ख’.