१०. आप्पांचे पत्र स्वाध्याय मराठी इयत्ता दहावी, Aappanche Patra Question and answers

१०. आप्पांचे पत्र

(१) कारणे लिहा.

१०. आप्पांचे पत्र स्वाध्याय मराठी इयत्ता दहावी, Aappanche Patra Question and answers

Table of Contents

(अ) आजची मुले सुदैवी आहेत, कारण ……………..

उत्तर:आजची मुले सुदैवी आहेत; कारण रोज नवीन नवीन गोष्टी

त्यांच्या कानांवर पडतात. (१०.आप्पांचे पत्र) 

 

(आ) पुस्तकाची पाने व झाडाची पाने दोन्ही महत्त्वाची असतात, कारण ……………..(March 2022)

उत्तर:पुस्तकाची पाने व झाडाची पाने दोन्ही महत्त्वाची असतात. कारण पुस्तकाच्या पानात डोक्याचे खादय असते आणि झाडाच्या पानात झाडाला जगवण्याचे बळ असते.

 

(२) आकृती पूर्ण करा.

(अ)

१०. आप्पांचे पत्र स्वाध्याय मराठी इयत्ता दहावी, Aappanche Patra Question and answers
पाठाच्या आधारे खालील व्यक्तींचे महत्त्व स्पष्ट करा.

 

(आ)

१०. आप्पांचे पत्र स्वाध्याय मराठी इयत्ता दहावी, Aappanche Patra Question and answers
वृक्षसंवर्धनाचे फायदे

 

(३) योग्य पर्याय निवडा.

(अ) आप्पांच्या मते चिंतेमुळे फक्त………..

(१) हृदयाची धडधड वाढते.

(२) कपाळावरच्या आठ्या वाढतात.

(३) विद्यार्थ्याचे गुण वाढतात.

(४) विचारप्रक्रियेतील आव्हान वाढते

उत्तर:आप्पांच्या मते, चिंतेमुळे फक्त कपाळावरच्या आठ्या वाढतात.

 

(आ) शिपाईसुद्धा कौतुकास पात्र ठरतो जेव्हा………

(१) तो रोज उपस्थित असतो.

(२) तो सर्वांची काळजी घेतो.

(३) तो चांगलं काम करतो.

(४) तो सर्वांशी चांगले बोलतो.

उत्तर: शिपाईसुद्धा कौतुकास पात्र ठरतो; जेव्हा तो चांगलं काम करतो. 

 

(४) आप्पांचे खालील गुण दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा.

(अ) आप्पांचे शिक्षणप्रेम – मीच कधी कधी तुमचे शिक्षक जे शिकवत असतात, ते खिडकीतून ऐकत असतो.

(आ) स्वच्छता – आपल्या ग्रंथालयात एकाही पुस्तकावर तुम्हांला धूळ दिसणार नाही, कारण मी तिथे काम करतो.

 

(५) चौकटी पूर्ण करा.

१०. आप्पांचे पत्र स्वाध्याय मराठी इयत्ता दहावी, Aappanche Patra Question and answers
आप्पांनी विद्यार्थ्यांकडून त्यांच्या भावी जीवनाबद्दल व्यक्त केलेल्या अपेक्षा

 

(६) खालील वाक्यांतील क्रियाविशेषणे ओळखा.

सदर प्रश्नप्रकार कृतिपत्रिकेच्या आराखड्यात समाविष्ट नाही.

(अ) ती लगबगीने घरी पोहोचली.

उत्तर: लगबगीने

 

(आ) जोसेफ अवघड गणितदेखील सहज सोडवतो.

उत्तर: सहज

 

(इ) आज खूप कडाक्याचे ऊन पडले होते.

उत्तर: आज

 

(७) खालील वाक्यांतील शब्दयोगी अव्यये शाेधा.

(अ) पक्ष्याने दाण्यांवर झडप घातली.

उत्तर:वर

 

(आ) तिचा चेहरा सारखा डोळ्यांसमोर येतोय.

उत्तर: समोर

 

(इ) छोटा बाळ मुलांबरोबर खाऊ खात होता.

उत्तर: बरोबर

 

(ई) परीक्षेत सुयश मिळाल्यामुळे विद्यार्थी सुखावले.

उत्तर:मुळे

 

(८) स्वमत.

(अ) ‘पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दु:खी माणसाच्या डोळ्यांतलं पाणी पुसण्याएवढंच महत्त्वाचं काम आहे’, आप्पांच्या या विधानामागील अर्थ स्वत:च्या शब्दांत लिहा.

उत्तर: दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. ग्रामीण भागाची पाण्याअभावी देना उडाली होती. सर्वत्र हाहाकार माजला होता. कळशीभर पाण्यासाठी लोक रात्रंदिवस मैलोन्मैल भटकत राहायचे. हजारो माणसे गावे सोडून शहरांकडे स्थलांतरित झाली होती. त्या दुष्काळात शेकडो लोक मरण पावले. कित्येकांनी आत्महत्या केल्या. उद्योगधंदे बंद पडले. माणसे बेकार झाली. शेती ओस पडली. उपासमारीची दृश्ये दिसू लागली. त्या दुष्काळाने महाराष्ट्राच्या डोळ्यांत पाणी आले होते.

आपण पाणी जपून वापरले तर वाचलेले पाणी तहानलेल्यांना प्यायला मिळेल. जनावरे जगतील. शेती वाचेल. कारखान्यांना पाणी मिळेल. म्हणजे लोकांची दुःखे दूर होतील. समाधानाने जगण्याचा मार्ग मोकळा होईल. वेगळ्या शब्दांत, ‘लोकांच्या डोळ्यांतील अश्रू पुसले जातील.’ वाया जाणारे पाणी वाचवणे म्हणजे नवीन पाणी निर्माण करणे होय, हे आपण आता तरी लक्षात घेतले पाहिजे.

 

(आ) ‘जग विचारेल तुम्हांला, शाळेत तुम्हांला किती गुण मिळाले? पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात.’ या वाक्यांतील अभिप्रेत अर्थ लिहा.

उत्तर: मुले मैदानावर खेळताना-बागडताना मनसोक्त गोंधळ घालत आहेत, असे वरवर पाहता वाटते. हा गोंधळ म्हणजे मुलांचे दिशाहीन भरकटणे नव्हे. हा गोंधळ कोणत्याही अर्थाने वाईट किंवा मूल्यहीन नसतो. त्यांचे मन मुक्तपणे खेळण्यातून स्वतःच्या प्रगतीची दिशा शोधत असते. आप्पांच्या मते, मुलांची ऊर्मी, त्यातला अनावर बेधडकपणा, अलोट उत्साह हे गुण ज्यांच्याकडे असतात, ती माणसे जीवनात कोणतेही अवघड कार्य पार पाडू शकतात. म्हणून आप्पांना मुक्तपणे खेळणारी मुले गुणी वाटतात. त्यांच्याविषयी त्यांना भरपूर विश्वास वाटतो. तोच विश्वास ते बोलून दाखवत आहेत.

 

(इ) आप्पांनी तुमच्याविषयीच्या व्यक्त केलेल्या अपेक्षा तुमच्या शब्दांत लिहा. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा.

उत्तर: सरधोपटपणे जीवनाचे ध्येय ठरवू नये, हे आप्पांचे म्हणणे मला खूपच पटते. कोणतेही काम निवडायला हरकत नाही. पण ते आवडीने पार पाडायचे, हे मी ठरवूनच टाकले आहे. मी एक वेगळेच ध्येय स्वतःसाठी ठरवून टाकले आहे. मी खूप अभ्यास करणार आहे. खूप विचार करून शोधून काढणार आहे. वर्गात कोणताही विषय उत्तम रितीने कसा शिकवायचा, याचा शोध घेणार आहे. त्याचा शाळेशाळेत जाऊन प्रसार करणार आहे. आधी मला हा विचार सुचला, तेव्हा खूप भीती वाटली होती की माझे कोण ऐकेल? कोण समजून घेईल? पण आप्पांनी सांगितले तसे मी करणार आहे. मनापासून, जीव ओतून मी ठरवलेले काम करणार आहे. मला खात्री आहे की मी यशस्वी होईनच.

 

NEXT CHAPTER

PREVIOUS CHAPTER

 

Print Friendly, PDF & Email
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.