११. गोष्ट अरुणिमाची
(१) आकृती पूर्ण करा.
११. गोष्ट अरुणिमाची स्वाध्याय मराठी इयत्ता दहावी, Gosht Arunimachi Question and answers

(२) खालील कृतींतून अभिव्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा.
(अ) भाईसाब यांनी दिलेला सल्ला शिरोधार्य मानला.
गुण: वडीलधाऱ्या व्यक्तीचा आदर .
(११. गोष्ट अरुणिमाची)
(आ) चोरांना लाथाबुक्क्यांचा प्रसाद दिला.
गुण: धाडसी वृत्ती .
(इ) उठता-बसता, खाता-पिता केवळ एव्हरेस्टचाच विचार ती करू लागली होती.
गुण: ध्येयवादी .
(ई) ब्रिटिश माणसाने ओझे होते म्हणून फेकून दिलेला ऑक्सिजन सिलेंडर अरुणिमाने वापरला.
गुण: व्यवहारी .
(३) कोण ते लिहा.
(अ) एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला- बचेंद्री पाल
(आ) सर्वांत मोठा मोटिव्हेटर- स्वतःच
(इ) अरुणिमाच्या कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय घेणारे-भाईसाब
(ई) फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियन- अरुणिमा
(४) अरुणिमाच्या कणखर/धाडसी मनाची साक्ष देणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा.
उत्तर:(i) ध्येयापासून विचलित करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण यांतून मी तावून-सुलाखून निघत होते.
(ii) उजव्या पायाची हाडे एकत्रित राहण्यासाठी त्यात स्टीलचा रॉड घातलेला होता, त्यावर थोडा जरी दाब दिला तरी तीव्र वेदनांचे झटके बसत.
(iii) मी अपंग, त्यात मुलगी, म्हणून कसल्याही प्रकारची सवलत
किंवा सहानुभूती नको होती मला.
(iv) आपलं मन जसं सांगतं, तसंच, अगदी तसंच आपलं शरीर वागतं.
(v) मी अशी नि तशी मरणारच होते; तर मग माझ्या यशाचे पुरावे असणे अत्यावश्यकच होते.
(५) अरुणिमाविषयी उठलेल्या खालील अफवांबाबत तुमची प्रतिक्रिया लिहा.
(अ) शरीराला जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतोय.
उत्तर: समाजातील बहुसंख्य लोक मनाने दुबळे असतात. त्यामुळे अरुणिमाच्या अपार धाडसावर विश्वास बसत नाही. शरीरावर झालेल्या आघातामुळे तिचा मानसिक तोल ढळून वेडाच्या भरात तिच्या हातून असे कृत्य घडले असावे, अशी शंकाही अनेकांच्या मनात आली असणार.
(आ) अरुणिमाकडे प्रवासाचे तिकीट नव्हते म्हणून तिने रेल्वेतून उडी मारली.
उत्तर: अरुणिमाने तिकीट काढले नसणार. त्यामुळे टी.सी.च्या नजरेतून सुटण्याच्या प्रयत्नात तिने गाडीतून उडी मारली असावी, अशी शंका काही जणांना येते. अलीकडे प्रामाणिकपणावरील, सज्जनपणावरील समाजाचा विश्वास डळमळीत झाला आहे. त्यामुळे कोणाच्याही चांगल्या कृतीतून वाईट अर्थ काढण्याची सवय समाजाला लागली आहे, हेच या प्रतिक्रियेवरून दिसून येते.
(६) पाठातून तुम्हांला जाणवलेली अरुणिमाची स्वभाववैशिष्ट्ये लिहा.
(i) अमाप सहनशक्ती असणारी
(ii) जबरदस्त आत्मविश्वास असलेली
(iii) अन्यायाविरुद्ध लढणारी
(iv) ध्येयवादी
(v) जिद्दी
(vi) पराकोटीचे धैर्य
(७) पाठात आलेल्या इंग्रजी शब्दांना प्रचलित मराठी शब्द लिहा.
(१) नॅशनल ⇒ राष्ट्रीय
(२) स्पॉन्सरशिप ⇒ प्रायोजकत्व
(३) डेस्टिनी ⇒ नियती
(४) कॅम्प ⇒ छावणी
(५) डिस्चार्ज ⇒ पाठवणी.
(६) हॉस्पिटल ⇒ रुग्णालय
(८) पाठात आलेल्या खालील वाक्यांचे मराठीत भाषांतर करा.
(१) Now or never!
उत्तर: आता नाही तर कधीच नाही !
(२) Fortune favours the braves
उत्तर: शूर माणसाला नशीब नेहमी साथ देते.
(९) ‘नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्रा’तील अरुणिमाचे खडतर अनुभव लिहा.
उत्तर:(अ) मृत्यू येईल असे वाटायला लावणाऱ्या कृती करणे.
(आ) धोकादायक पर्वत चढणे.
(इ) ध्येयापासून दूर लोटू पाहणारे प्रशिक्षणातील कष्ट.
(ई) अरुणिमाची अवस्था पाहून शेरपाचा निश्चय डळमळायचा.
(उ) पाय रोवायचा प्रयत्न केला की टाच व चवडा गोल फिरायचा,
म्हणून पाय घट्ट रोवणे कठीण व्हायचे.
(१०) खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून, अर्थ न बदलता वाक्ये पुन्हा लिहा.
(अ) प्रत्येक व्यक्तीत काही ना काही गुण असतोच.
उत्तर: प्रत्येक व्यक्तीत काही ना काही अवगुण असतोच, असे नाही.
(आ) सूर्योदयाचे वेळी सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात.
उत्तर: सूर्यास्ताच्या वेळीही सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात.
(इ) खालील प्रश्नांची उत्तरे संक्षिप्त असावीत.
उत्तर: खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहू नका.
(ई) प्रयत्नाने बिकट वाट पार करता येते.
उत्तर: प्रयत्नाने सोपी वाटही पार करता येते.
(११) खालील वाक्यांतील क्रियापदे ओळखा.
(अ) सायरा आज खूप खूश होती.
उत्तर:होती.
(आ) अनुजाने सुटकेचा नि:श्वास टाकला.
उत्तर: टाकला
(इ) मित्राने दिलेले गोष्टींचे पुस्तक अब्दुलला खूप आवडले.
उत्तर: आवडले
(ई) जॉनला नवीन कल्पना सुचली.
उत्तर: सुचली
(१२) खालील तक्ता पूर्ण करा.

(१३) स्वमत.
(अ) ‘आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं’, या वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
उत्तर: आपले ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसते, हा अरुणिमाचा संदेश आहे. याचा अर्थ समजावून सांगण्यासाठी एडिसनचे उदाहरण उत्तम ठरेल. या एडिसनने विजेच्या दिव्याचा शोध लावला. त्याला आपण बल्ब म्हणतो. या बल्बचा शोध लावण्यासाठी त्याने हजारापेक्षा जास्त प्रयोग केले. शेवटी तो यशस्वी झाला. म्हणजे यशस्वी प्रयोगाच्या आधीचे त्याचे हजारापेक्षाही जास्त प्रयोग फसले, वाया गेले, असे म्हटले पाहिजे. पण हे असे म्हणणे चूक आहे. कारण आपण निष्फळ समजतो, त्या प्रयोगांमधून एडिसनला एक भक्कम ज्ञान मिळाले होते.
त्या निष्फळ प्रयत्नांच्या पद्धतींनी बल्ब निश्चितपणे तयार करता येत नाही, हे ते ज्ञान होते. हे नीट समजून घेतले, तर भविष्यात योग्य दिशेने वाटचाल करता येते आणि यश निश्चितपणे मिळवता येते. म्हणून अपयशाने खचून जाता कामा नये. अपयशाचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. अपयश हे भावी यशाचा पाया असते.दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये अपयश मिळाले की अनेकजण खचून जातात. हे योग्य नाही. निकालानंतर शांत चित्ताने बसून आपल्या परीक्षेतील अपयशाचे विश्लेषण केले पाहिजे. आपल्या कोणत्या चुका झाल्या, अभ्यासातला कोणता भाग आपल्याला कळला नाही, तो आपण नीट समजावून घेतला होता का, समजावून घेताना कोणत्या अडचणी आल्या या व अशा प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजे. हे आपण प्रामाणिकपणे केले, तर भविष्यात आपण कधीही नापास होणार नाही.
(आ) ‘प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.
उत्तर: कोणतीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी नसते. एखादयाला नृत्य आवडते. एखाद्याला गायला आवडते. एखाद्याला दुसऱ्याला मदत करायला आवडते. तर कोणाला समाजातील घडामोडींशी दोस्ती करणे आवडते. आपल्यातला असा गुण कोणता आहे, हे आपण शोधले पाहिजे. या गुणाची जोपासना केली पाहिजे. मग आपल्या हातून आपोआपच लोकोत्तर कामगिरी पार पडेल. अरुणिमाने नेमके हेच केले. खरे तर अपंग अरुणिमा आयुष्यात काहीच करू शकली नसती. पण तिने जिद्दीने स्वतःमधला वेगळा गुण ओळखला. स्वत:चे सामर्थ्य शोधले आणि अशक्य वाटणारी कामगिरी पार पाडली. प्रत्येक व्यक्तीमध्ये अशी अरुणिमा असतेच. फक्त त्या अरुणिमाचा आपण शोध घेतला पाहिजे. जीवनाचा हाच महामंत्र आहे.
(इ) तुमच्या मनातील एव्हरेस्ट शोधा आणि शब्दबद्ध करा.
उत्तर:आपण दिवसभर कोणती ना कोणती कृती करीत असतो. त्या वेळी आपल्या मनात कोणता तरी हेतू असतो. हेतूशिवाय कोणतीही कृती अशक्य असते. आपला हेतू म्हणजेच आपले ध्येय होय. खूप पैसे मिळवणे हे ज्याचे आयुष्यातले सर्वोच्च ध्येय असते, तो माणूस सतत पैसे मिळवण्याचाच विचार करीत राहील. कळत नकळत सतत पैसे मिळवून देण्याच्या कृतीकडेच ओढला जाईल. म्हणजे आपले आपल्या मनातले ध्येयच खूप महत्त्वाचे असते. तेच आपल्या जीवनाची दिशा ठरवीत असते. म्हणून आपण आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. ते नीट समजून घेतले पाहिजे. पर्वतांमध्ये एव्हरेस्ट जसा सर्वांत जास्त उंच आहे, तसेच आपले ध्येय आयुष्यातील सर्वांत जास्त उंच, सर्वांत जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. ती गोष्ट आपल्या मनातील एव्हरेस्टच होय. या एव्हरेस्टचा आपण शोध घेतला पाहिजे. तो सर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
११. गोष्ट अरुणिमाची स्वाध्याय मराठी इयत्ता दहावी, Gosht Arunimachi Question and answers