११. मातीची सावली

११. मातीची सावली

मातीची सावली स्वाध्याय
मातीची सावली स्वाध्याय

 

१. खालील ओळींतील संकल्पना स्पष्ट करा. (मातीची सावली)

(अ) मडक्यातल्या पाण्यासारखा गारवा.

उत्तर – उन्हाळा जितका तीव्र, तितके मडक्यातले पाणी गार असते. अतिथंड पाण्याचा चटका बसतो. मडक्यातले गार पाणी चटका देणारे नसते. त्याचा गारवा प्रसन्न असतो. जुन्या घरातील वातावरण प्रसन्न गारवा देणारे होते.

(आ) आईच्या पदरासारखी चिंचेची सावली.

उत्तर – आईचा पदर म्हणजे आईची माया. कोणत्याही बाळाला आईचा स्पर्श, आईचा सहवास सुखद, प्रेमळ व हवाहवासा वाटणारा असतो. फरसूला चिंचेची सावली अशीच हवीहवीशी वाटणारी होती.

(इ) वरून भिरभिरत येणारी फुलपाखरी पाने.

उत्तर – चिंचेची बारीक बारीक पाने भुरभुरत, भिरभिरत खाली येतात. फुलपाखरे थव्याथव्याने भिरभिरतात तेव्हा ते दृश्य सुंदर, मनोहारी असते. चिंचेची पानगळ अशीच फुलपाखरांसारखी वाटते.

 

प्र. २. खालील तक्ता पूर्ण करा.

        घटना   परिणाम/प्रतिक्रिया
(१) फरसू खुर्चीवर पाय वर घेऊन बसतो. सून येऊन डाफरली.
(२) मनूला फरसूने शिकवले. मनु कुठल्याश्या इंग्रजी नावाच्या कंपनीत नोकरीला लागला आणि त्याला मातीत हात घालने नकोसे झाले
(३) वाडीत काम करताना कोसूच्या पायाला तार की खिळा लागला. आठवड्याभारतच कोसू मरण पावली.
(४) मनूने जमीन विकायला काढली.फरसूने बैला सारखी मान डोलावली.

प्र. ३. आकृती पूर्ण करा


(अ) फरसू वैज्ञानिक दृष्टिकोन स्पष्ट करणाऱ्या कृति
उत्तर –

 

(आ) पाठाच्या आधारे फरसूचे खालील मुद्‌द्यांच्या आधारे वर्णन करा.

 

छंद                                            दुःख

 फरसू

मेहनत                                          माणूसपण

 

उत्तर –  फरसू हा निरागस आयुष्य जगणारा सामान्य शेतकरी होता. साध्या साध्या गोष्टींतून तो सुख मिळवायचा. घराच्या पायरीवर बसायचे, फुलपाखरांसारखी भिरभिरत येणारी चिंचेची पाने पाहायची, झाडावर चढणाऱ्या खारींचे बागडणे न्याहाळायचे हा त्याचा आवडता छंद होता. चिंचेच्या मुळावर बसून चांदण्यात खूप उशिरापर्यंत आबूबरोबर गप्पा मारायला त्याला खूप आवडायचे,

मेहनतीत कधी मागे राहिला नाही. जमिनीवर पडणारे विचेचे फरसू पानन् पान गोळा करून तो ती पाने शेतात पसरवी भाताचे पीक झाले की, तेथेच वांगी, दुधी यांसारख्या भाज्यांचे पीक घेई. फरसू व त्याची बायको ही उभयता पाठीचा कणा दुखेपर्यंत मेहनत करायची, शेवटपर्यंत मातीचीच चाकरी करायची, झाडापानांना उघड्यावर टाकायचे नाही, हा त्याचा निर्धार होता.

त्याचे दुःख मात्र मोठे होतो. बिल्डरच्या नादाला लागून मुलाने जमीन, घर, झाडे इत्यादी सर्व विकून टाकले. फरसूचा तो तर जगण्याचा आधार होता. मात्र, त्याच्या भावनेची मुलाला सुनेला कदर नव्हती. सून तर त्याच्यावर डाफरायची. त्यामुळे फरसूला घर म्हणजे खानावळ वाटत होती.
फरसूने माणूस म्हणून आपली कर्तव्ये पार पाडली होती. दोन्ही मुलींचे लग्ने करून त्यांची सुखाने सासरी पाठवणी केली. मुलाला खूप शिकवले. पण शहरीकरणाची वावटळ त्याचा दुखी संसार उद्ध्वस्त करीत होता. एकंदरीत फरसूची कहाणी मनाला व्याकूळ करून टाकते.

प्र. ४. ओघतक्ता तयार करा.

           मनूची आई प्रार्थना करायची.
        एकसुरात प्रार्थना झाल्यावर जेवन व्हायचे.
      जेवता जेवता मनु बहिणीशी मस्ती करायचा.
        घासागणिक पोटात माया उतरायची.

 

प्र. ५. खालील वाक्ये प्रमाणभाषेत लिहा.
(अ) ‘‘आमचा जलम या मातीत गेला म्हणून थोडं वायीट वाटते.’’
उत्तर – आमचा जन्म या मातीत गेला म्हणून थोडे वाईट वाटते. ”

(आ) ‘‘त्यांचीच पुण्यायी यी बावडी नय् नदी हय् नदी.’’
उत्तर – ‘‘त्यांचीच पुण्याई ही विहीर नाही नदी आहे नदी.

प्र. ६. खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ शोधा व लिहा.
(अ) टकळी चालवणे-
(१) सूत कातणे. (२) सतत बोलणे. (३) वस्त्र विणणे.
उत्तर – (२) सतत बोलणे.

(आ) नाळ तुटणे-
(१) मैत्री जमणे. (२) संबंध न राहणे. (३) संबंध जुळणे.
उत्तर – (२) संबंध न राहणे.

प्र. ७. खालील अर्थांची वाक्ये पाठातून शोधून लिहा.
(अ) फरसूने आपल्या वडिलांचे ऋण व्यक्त केले – बापजादयांची कमायी रे पोरांनो!

(आ) फरसूचा संसार होत्याचा नव्हता झाला –
उत्तर – तरारून वाढलेल्या गुबगुबीत केळीचं अख्खं बन एका पाऊसवाऱ्यात जमिनीवर झोपावं, तसा आपला संसार होत्याचा नव्हता झाला.

(इ) फरसूचे झाडांबाबतचे प्रेम –
उत्तर – पोटच्या पोरांइतक्याच प्रेमाने वाढवलेल्या झाडापानांना जीव जाईस्तोवर उघड्यावर टाकायचं नाही, हा त्याचा निश्चय होता.

प्र. ८. स्वमत.
(अ) ‘मातीशी नाळ तुटली, की माणूसपण तरी कसं राहणार?’ या फरसूच्या विधानाशी तुम्ही सहमत असल्यास त्याची कारणे सोदाहरण लिहा.
उत्तर : मातीशी नाळ तुटली, की माणूसपण तरी कसं राहणार ?’ हे विधान मला पूर्णपणे मान्य आहे.

माणूस स्वतःच्या इच्छाआकांक्षांसाठी जगतो. तसेच, इतर माणसांबद्दलही त्याला सहानुभूती, प्रेम वाटते. हा बंधुभाव होय. बंधुभाव हे माणसाचे वैशिष्ट्य आहे. बंधुभाव नष्ट झाला, तर माणूसपण नष्ट होते.

शहरीकरणामुळे आपण निसर्गापासून दूर जात आहोत. नैसर्गिक गोष्टींपेक्षा कृत्रिम गोष्टी जास्त आकर्षक वाटू लागल्या आहेत. शहरात आपल्या अंगाला माती लागत नाहीच, पण दिसतही नाही. सिमेंट काँक्रीट, डांबर, दगड, विटा यांनी आपण माती झाकून टाकली आहे. झाडेपाने दिसेनाशी झाली आहेत. नदीनाले, झाडेवेली पाहण्यासाठी, चांदणे अनुभवण्यासाठी सहली काढाव्या लागतात. आपले जगणे अधिकाधिक कृत्रिमतेकडे सरकत आहे. याचा कळतनकळत परिणाम होत आहे. आपण एकमेकांपासून दूर जात आहोत. बंधुभाव नष्ट होत आहे. साहजिकच आपण माणूसपण गमावत आहोत. हा मातीशी नाळ तुटण्याचा परिणाम आहे.

(आ) पाठात व्यक्त झालेल्या फरसूच्या विचारांबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर : फरसू हा कष्टाळू गरीब शेतकरी होता. मातीत कष्ट करणे हे त्याच्या दृष्टीने खरे जीवन होते; त्यातच खरे सुख होते. पाठीचा कणा दुखेपर्यंत तो व त्याची पत्नी शेतात राबत. मातीशी नाते असण्यातच माणूसपण असते, अशी त्याची श्रद्धा होती. जमिनीवर, झाडाझुडपांवर त्याचे जिवापाड प्रेम होते. शेवटच्या श्वासापर्यंत जमिनीची सेवा करायची, झाडाझुडपांना उघड्यावर टाकायचे नाही, हा त्याचा निश्चय होता. हा कोणत्याही शेतकऱ्याचा पारंपरिक विचार आहे. मला हा विचार खूप महत्त्वाचा वाटतो.

अलीकडे शिक्षणाचा प्रसार झाल्यापासून लोक पांढरपेशे बनत चालले आहेत. बरेच जण कष्ट करायला राजी नसतात. शेतीला कमी लेखतात. यामुळे जीवनात विकृत्या शिरल्या आहेत. कोणत्याही कारणासाठी झाडे सहज तोडली जातात. प्रदूषणामुळे नद्यांची गटारे झाली आहेत. समुद्रसुद्धा मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहे. जमिनीपासून, शेतीपासून माणसे दूर गेल्यामुळे ती निसर्गापासूनसुद्धा तुटली आहेत. ती निसर्गाची नासधूस करीत आहेत. यामुळे माणूस स्वत:चेच जीवन धोक्यात आणीत आहे. यातून बाहेर पडायचे असेल, तर फरसूचा दृष्टिकोन अंगीकारला पाहिजे.

(इ) ‘मातीची सावली’ या पाठाच्या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर: कुठल्याही जमिनीच्या तुकड्याचा पर्यावरणाशी थेट संबंध असतो. जमिनीचे स्वरूप बदलले, तर पर्यावरणावर लागलीच परिणाम होतो. तसेच, जमिनीचा त्या जमिनीवर राहणाऱ्या लोकांच्या जीवनाशी, त्यांच्या परंपरेशी व संस्कृती ही संबंध असतो. जमीन बदलली की है। सर्वच उद्ध्वस्त होते.
शहरीकरणामुळे शहराकडे लोकांचे लोंढे वाहत आहेत. घरांची मागणी वाढत आहे. हे पाहून बिल्डरांची हाव वाढली आहे. ते जमिनी गिळंकृत करीत आहेत. नव्या पिढीच्या हे लक्षात येत नाही. नव्या पिढीला फक्त पैसाच दिसतो. पैशाने सर्व काही विकत घेता येईल, असे त्यांना वाटते. पैशांसाठी जमीन विकली, तर आपल्या आयुष्याची सर्व पाळेमुळे उद्ध्वस्त होतात; माणूस मनाने उद्ध्वस्त होतो; हे त्यांच्या लक्षात येत नाही.

दीड एकर जमिनीवर उभी राहणारी उंच इमारत म्हणजे एखादा अक्राळविक्राळ राक्षसच आहे, असे फरसूला भासते. त्या इमारतीची सावली त्याच्या संपूर्ण जमिनीवर पसरली आहे. जणू काही त्या सावलीने त्याची जमीन, त्याचे संपूर्ण जीवनच गिळंकृत केले आहे, असे त्याला वाटत राहते. फरसू या दर्शनाने व्याकळू होतो; विकल होतो. हा सर्व भाव ‘मातीची सावली’ या दोन शब्दांतून व्यक्त होतो

Print Friendly, PDF & Email
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.