१३. कर्ते सुधारक कर्वे
(१) खालील आकृत्या पूर्ण करा.
१३. कर्ते सुधारक कर्वे स्वाध्याय मराठी इयत्ता दहावी, Karte Sudharak karve Complete Question and answers
(अ)

(आ)

(इ)

(ई)

(२) महर्षी कर्वे यांच्या कार्यकुशलतेचा ओघतक्ता तयार करा.

विचार पक्का झाला की…
(३) हे केव्हा घडेल ते लिहा.
(अ) कर्त्या सुधारकाने सुरू केलेले कार्य पूर्णत्वास जाईल………..
१३. कर्ते सुधारक कर्वे
उत्तर:कर्त्या सुधारकाने सुरू केलेले कार्य पूर्णत्वास जाईल,जेव्हा पुरुषांचेही ‘शिक्षण’ होईल.
(आ) स्त्री पुरुषांशी स्पर्धा करू शकेल………..
उत्तर:स्त्री पुरुषांशी स्पर्धा करू शकेल, जेव्हा ती उच्चविद्याविभूषित होईल.
(४) चौकटी पूर्ण करा.
(अ) लेखकांच्या मते दुसऱ्याच्या दु:खात दु:खी व सुखात सुखी होणारा- स्थितप्रज्ञ
(आ) कर्वे यांना लोकमानसाने दिलेली पदवी- महर्षी
(५) पाठाच्या आधारे वाक्यांचा उर्वरित भाग लिहून वाक्ये पूर्ण करा.
(अ) स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे-
उत्तर: स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे खडकावर डोके आपटण्यासारखे आहे.
(आ) समाजाविरूद्ध विद्रोह केला तर-
उत्तर:समाजाविरुद्ध विद्रोह केला तर विद्रोह करणाऱ्याला समाज गिळून टाकायला येईल.
(इ) लोकांनी कर्वे यांची ससेहोलपट चालवली तरी-
उत्तर: लोकांनी कर्वे यांची ससेहोलपट चालवली तरी कर्व्यांनी त्यांना शिव्याशाप दिले नाहीत किंवा आपल्या कार्यापासून कर्वे विचलित झाले नाहीत.
(६) ‘कार्य’ या शब्दासाठी पाठात आलेली विशेषणे शोधा.
उत्तर: जटिल, अटीतटीचे, महाकठीण,मोठे, अतोनात, कठीण,अलौकिक,महान,ऐतिहासिक, इत्यादी.
(७) खालील वाक्यांतील वाक्प्रचार शोधा.
(अ) शिक्षकांनी सांगितलेली हृद्य आठवण आमच्या मनात घर करून राहिली.
उत्तर: मनात घर करून राहणे
अर्थ- कायम ठसा राहणे.
(आ) वक्त्याचे विचार अनेकांच्या पचनी पडले नाहीत.
उत्तर: पचनी न पडणे
अर्थ – न पटणे.
(८) खालील वाक्यांतील उभयान्वयी अव्यये शोधून लिहा.
(अ) त्याने लाडू व करंज्या खाल्ल्या.
उत्तर: व
(आ) पाऊस आला आणि गारा पडल्या.
उत्तर: आणि
(इ) तो येणार, कारण त्याला पैशांची गरज आहे.
उत्तर: कारण
(ई) आजी म्हणाली, की मी उद्या गावाला जाणार आहे.
उत्तर: की
(९) केवलप्रयोगी अव्ययांचा वापर करून वाक्ये पुन्हा लिहा.
(अ) …………..! काय सुंदर देखावा आहे हा!
उत्तर: ओहो! काय सुंदर देखावा आहे हा!
(आ) …………..! असा प्रसंग वैऱ्यावर देखील येऊ नये.
उत्तर: अरेरे! असा प्रसंग वैऱ्यावर देखील येऊ नये.
(इ) …………! तुझी कल्पनाच मुळी मला पसंत नाही.
उत्तर: छे! तुझी कल्पनाच मुळी मला पसंत नाही.
(ई) …………..! आज तू खूप चांगला खेळलास.
उत्तर: वाहव्वा! आज तू फार चांगला खेळलास.
(१०) स्वमत.
(अ) ‘स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे’, या विधानामागील अण्णांचा दृष्टिकोन स्पष्ट करा.
उत्तर: समाजात स्त्रियांची संख्या पुरुषांइतकीच असते. थोडी कमी-जास्त भरेल. पण साधारणपणे स्त्रिया म्हणजे समाजाचा अर्धा भाग होय. दुर्दैवाने आपल्या समाजाने स्त्रियांना मागासलेले ठेवले. त्यामुळे अर्धा समाज मागासलेला राहिला. त्याचे अनंत तोटे समाजाला आजसुद्धा भोगावे लागत आहेत. बहुतेक वेळा हे नुकसान मोजता येत नाही. मोजता न आल्यामुळे आपले किती नुकसान झालेले आहे, हे कळतही नाही. स्त्रियांना मागासलेले ठेवल्यामुळे समाजाची अर्धी बुद्धिमत्ता निरुपयोगी राहते. त्या बुद्धीचा समाजाला उपयोग झाला असता, पण ती वाया जाते. पुरुष बहुतांश वेळा स्वार्थी व आत्मकेंद्री असतो. स्त्री अधिक सामाजिक असते. यामुळे कुटुंबातला पुरुष शिकला तर कुटुंबातील एका व्यक्तीचा विकास होतो. मात्र स्त्री शिकली तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. अखंड कुटुंब शिक्षित होते. आपण हे ओळखले पाहिजे. स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीचे स्थान दिले पाहिजे.
(आ) ‘जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण’ हे वचन महर्षी कर्वे यांच्या जीवनाला कसे लागू पडते, ते स्पष्ट करा.
उत्तर: अण्णासाहेबांनी फार मोठे स्वप्न पाहिले होते. ते फार मोठी झेप घेऊ पाहत होते. त्यांच्या स्वप्नाला संपूर्ण समाजाची साथ मिळाली नाही. समाजाने अण्णासाहेबांना ओळखलेच नाही. समाजाने साथ दिली नाहीच; उलट पराकोटीचा विरोध केला. त्यांचा सतत अपमान केला. त्यांना धक्काबुक्की केली. त्यांचे कपडे फाडले. हे रोज घडत होते. त्यामुळे स्वतःचे कपडे रोज रोज शिवण्याची पाळी त्यांच्यावर येई. स्त्री-शिक्षणासाठी देणग्या गोळा केल्या तर भ्रष्टाचाराचा सतत धाक दाखवला जाई. त्यांच्या चळवळीमुळे कुटुंबीयांनाही त्रास सहन करावा लागे. त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यातही आला होता. हे सर्व यातनामय होते. लोककल्याणासाठी अण्णासाहेबांनी या यातना सहन केल्या. आज आपण अण्णासाहेबांची स्मारके उभारतो. परंतु प्रत्यक्ष जीवनात त्यांना दुःख, कष्ट आणि यातनाच सहन कराव्या लागल्या. ‘जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण’ हे तुकाराम महाराजांचे वचन अण्णासाहेबांना तंतोतंत लागू पडते.
(इ) ‘कर्ते सुधारक कर्वे’ या पाठातून महर्षी अण्णा कर्वे यांचे तुम्हांला जाणवलेले वेगळेपण, तुमच्या शब्दांत सांगा.
उत्तर: अण्णासाहेब कर्वे यांचे फार मोठे वेगळेपण या पाठातून गर्वामुळे वाचकांसमोर येते. बऱ्याच वेळा सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांना स्वतःच्या सामाजिक कार्याचा गर्व असतो. ती माणसे या आक्रमक बनतात. अण्णासाहेबांची प्रकृती याबाबतीत नेमकी उलटी होती. त्यांना प्रचंड आत्मविश्वास होता. पण गर्व नव्हता. ते कधीच आक्रमक बनले नाहीत. उलट ते शांतपणे, कोणावरही न रागावता, आक्रस्ताळेपणा न करता आपले काम करीत. त्यांचे अपमान झाले. अडवणूक झाली. त्यांच्यावर हल्ले झाले. जाता-येता त्यांचे कपडे फाडले गेले. पण ते विचलित झाले नाहीत. घाबरले नाहीत किंवा दुःखी-कष्टीही झाले नाहीत. ते स्थितप्रज्ञाप्रमाणे शांत राहिले. नव्हे ते स्थितप्रज्ञच होते. हा त्यांचा गुण, त्यांचा वेगळेपणा मला खूप भावला आहे. खूप आवडला आहे.
१३. कर्ते सुधारक कर्वे स्वाध्याय मराठी इयत्ता दहावी, Karte Sudharak karve Complete Question and answers