१४. आदर्शवादी मुळगावकर स्वाध्याय | Adarshvadi Mulgavkar Swadhyay| 9th Marathi | आदर्शवादी मुळगावकर स्वाध्याय मराठी नववी| ९ वी स्वाध्याय
प्र. १. योग्य उदाहरण लिहा.
(१)
मुळगावकर यांचा आदर्शवाद |
टेल्कोचा कारखाना व त्याचे उत्पादक |
(२)
मुळगावकर यांची सामाजिक दृष्टी |
वृक्षपेढीसारखा कल्पक उपक्रम |
प्र. २. आकृती पूर्ण करा
(१)
मुळगावकर यांचे गुणविशेष |
आदर्श |
सचोटी |
सज्जनपणा |
कार्यक्षमता |
(२)
मुळगावकर यांची कर्तव्यदक्षता |
थोड्याच दिवसांत देशी बनावटीची मलमोटार तयार करण्याची सरकारची अट पूर्ण केली. |
उत्पादनाच्या दर्जाबाबतीत कमतरता खपवून घेतली नाही. |
तंत्रज्ञ घडवण्याचे कर्तव्य पार पडले. |
कारखाना अवाढव्य वाढवून तो हाताबाहेर जाऊ दिला नाही. |
प्र. ३. खाली काही उदाहरणेदिली आहेत. या उदाहरणांवरून मुळगावकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे तुम्हांला जाणवलेले पैलू लिहा.
(१)
मुळगावकरांनी केलेले सामाजिक कार्य. |
(१) सहानुभूती (२) अनुकंपा (३) मूलभूत सुधारणांवर भर देणारी दृष्टी |
(२)
आदर्श कारखान्यासाठी मुळगावकरांनी घेतलेले निर्णय. |
(१) दूरदृष्टी (२) आदर्शवाद (३) गुणवत्ता (४) सुधारण्यासाठी तळमळ |
प्र. ४. वैशिष्ट्ये लिहा.
(अ) लंडन येथील स्थापत्य विषयाची पदवी-
उत्तर – (१) लंडनच्या पदवी परीक्षेच्या अभ्यासक्रमात पुस्तकी शिक्षण होतेच; शिवाय, प्रत्यक्ष कारखान्यात काम करावे लागे.मगच पदवी मिळत असे.
(आ) टेल्कोचा पुण्यातील कारखाना-
उत्तर – उत्पादन व व्यवस्थापन या दोन्ही दृष्टींनी कारखाना पहिल्या दर्जाचा आहे, हा लौकिक मिळाला.
(इ) टेल्कोची परंपरा-
उत्तर – सर्व दर्जाचे व्यवस्थापक कारखान्यात रोज फेरी मारत असत, ही टेल्कोची परंपरा होती.
(ई) टेल्कोची मालमोटार
उत्तर – टेल्कोची मालमोटार पहिल्या दर्जाची बनली व त्यात सतत सुधारणा होत गेली.
प्र. ५. खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून, अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा.
(अ) मुळगावकर अबोल प्रवृत्तीचे होते.
उत्तर – मुळगावकर बोलक्या प्रवुत्तीचे नव्हते .
(आ) मुळगावकर पदवी घेऊन आले, तेव्हा भारतात मंदीची लाट होती.
उत्तर – मुळगावकर पदवी घेऊन आले, तेव्हा भारतात भरभराटीची लाट नव्हती.
(इ) मुळगावकरांचे जीवन असमाधानी नव्हते.
उत्तर – मुळगावकरांचे जीवन समाधानी होते.
प्र. ६. अधोरेखित केलेल्या अर्थाचा वाक्प्रचार पाठातून शोधून लिहा.
(अ) प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे यश वारंवार आजारी पडत होता.
उत्तर – यशने आहाराची हेळसांड केल्यामुळे तो वारंवार आजारी पडत होता.
(आ) शेतीत खूप कष्ट केल्यामुळे यावर्षी रामरावांच्या कष्टाला चांगले फळ मिळाले.
उत्तर – शेतीत खूप राबल्यामुळे या वर्षी रामरावांच्या कष्टाला चांगले फळ मिळाले.
(इ) आवाक्याबाहेरचे काम समीरने सन्मार्गाने पूर्ण केले.
उत्तर – आटोक्यात नसलेले काम समीरने सन्मार्गाने पूर्ण केले.
(ई) स्वत:च्या तत्त्वांशी समझोता करणे योग्य नव्हे.
उत्तर – स्वतःच्या तत्त्वाशी तडजोड करणे योग्य नव्हे.
प्र. ७. स्वमत.
(अ) पाठात उल्लेख असलेल्या चिनी म्हणीतील विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर : माणसे आपल्या भविष्याची तरतूद करून ठेवतात, ही तरतूद वेगवेगळ्या स्वरूपांत असते. पैशाच्या स्वरूपातील मदत फार उपयोगाला येत नाही. झाडे लावली, तर दरवर्षी फळाफुलांचे उत्पन्न मिळते. लाकूडही निर्माण होते. झाडांचा हा असा दरवर्षी नियमितपणे फायदा होतो. मात्र, कोणत्या झाडांचा कधी, कसा व किती फायदा घ्यायचा, हे माणूसच ठरवतो. म्हणून माणूस चांगला घडलेला असेल, तर त्याला स्वतःला या गोष्टीचा फायदा होतोच; शिवाय त्याच्या कुटुंबालाही होतो. अशी व्यक्ती खूप कर्तबगार निघाली, तर त्या व्यक्तीचा अखंड समाजालाही फायदा होतो. म्हणून पैसे साठवून ठेवण्यापेक्षा झाडेझुडपे लावली, तर त्यांचा माणसांना उपयोग होणारच. पण त्याहीपेक्षा माणसे घडवली, तर त्याचा खूप उपयोग होतो. म्हणजे माणसे तयार करणे, हा मानवी समाज घडवण्याचा मार्ग आहे. चिनी म्हणीमध्ये नेमके हेच सांगितले आहे.
(आ) टेल्कोच्या मालमोटारीच्या ड्रायव्हरशी संवाद साधण्यामागे मुळगावकरांचे कोणते हेतू असावेत, असे तुम्हांस वाटते?
उत्तर : मालमोटारीचा ड्रायव्हर देशभर विविध प्रदेशांत हिंडत असतो. तो कधी जंगलातून प्रवास करतो, तर कधी वाळवंटी प्रदेशातून. उंचसखल प्रदेश, सपाट प्रदेश, दलदलीचा प्रदेश, अतिथंडीचा प्रदेश, प्रचंड पाऊस कोसळणारा प्रदेश अशा विविध प्रकारच्या परिसरांतून आपली मालमोटार प्रवास करीत असते.
अशा वेगवेगळ्या प्रकारच्या परिसरांतील वातावरणात आपली मालमोटार कशी चालत असेल? काही अडचणी निर्माण होत असतील का? मोटारीच्या स्वरूपात उणिवा राहिल्या असतील का? अशा प्रश्नांची उत्तरे ड्रायव्हरांशी केलेल्या संवादातून मिळतात. गाडीत काही उणिवा असतील तर त्या दूर करता येतात. आपली मोटार अधिकाधिक निर्दोष करण्याची संधी मिळते.