१४. काळे केस
(१) आकृत्या पूर्ण करा.
१४ काळे केस स्वाध्याय मराठी इयत्ता दहावी। Kale Kes Swadhyay Iyatta Dahavi । Maharashtra Board Class 10 Marathi Kumarbharti Solutions
(अ)

१४ काळे केस स्वाध्याय मराठी इयत्ता दहावी। Kale Kes Swadhyay Iyatta Dahavi
(आ)

१४ काळे केस स्वाध्याय मराठी इयत्ता दहावी। Kale Kes Swadhyay Iyatta Dahavi
(२) कारणे शोधा.
(अ) लेखकाला स्वत:च्या केसांच्या काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे आश्चर्य वाटले नाही, कारण……….
उत्तर:लेखकाला स्वत:च्या केसांच्या काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे आश्चर्य वाटले नाही, कारण लेखकांचे केस काळे होते आणि प्रश्न विचारणाऱ्याचे केस पांढरे झाले होते, हे लेखकांच्या लक्षात आले.
(आ) लेखकाच्या खनपटीला बसलेला माणूस केसांच्या क्षुल्लक प्रश्नाचा तगादा लावत होता, कारण……….
उत्तर: लेखकांच्या खनपटीला बसलेला माणूस केसांच्या क्षुल्लक प्रश्नांचा तगादा लावत होता; कारण तो माणूस स्वतःच्या केसांचा पांढरेपणा लपवण्यात अयशस्वी ठरत होता आणि लेखकांकडून केसांचा पांढरेपणा लपवण्याची युक्ती मिळत असल्यास हवी होती.
(३) खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
(अ) केसभर विषयांतर ⇒ अगदी थोडेसुद्धा विषयांतर.
(आ) केसांत पांढरं पडण्याची लागण ⇒ केस पांढरे होणे.
(इ) प्रकाशानं ताजी झिलई दिलेले झाड ⇒ कलप लावल्यामुळे पिकलेल्या केसांचा पांढरेपणा दयनीय दिसतो.
(४) खालील शब्दसमूहांचे अर्थ लिहून तक्ता पूर्ण करा.

(५) खालील शब्दांचा वापर करून वाक्ये तयार करा.
(१)निष्णात, (२)झिलई, (३)नित्यनेम, (४)लहरी, (५)तगादा
उत्तरे:
(१) शीतल स्वयंपाक करण्यात निष्णात आहे.
(२) झिलई दिली की जुनी भांडी चकाकतात.
(३) रवि नित्यनेमाने अभ्यास करतो.
(४) आपण कधी लहरी वागू नये.
(५) ‘मी शाळेत जाणार नाही’ असा मोहनने बाबांकडे तगादा लावला.
(६) खालील वाक्यांतील अलंकार ओळखा.
(अ) नव्या कल्पना कारंजाच्या तुषारांप्रमाणे उडू लागतात.
उत्तर: उपमा अलंकार
(आ) तो देखावा मुक्या शब्दांनी बोलतो.
उत्तर: चेतनगुणोक्ति अलंकार
(इ) कल्पना ही देखील लक्ष्मीसारखी असते.
उत्तर: उपमा अलंकार
(७) खालील वाक्यांतील परस्परविरोधी शब्दांचे शब्दसौंदर्य अनुभवा आणि त्याचा आस्वाद घ्या. अशा वाक्यरचना करण्याचा प्रयत्न करा.
(अ) मातीच्या ढिगात सुख-दु:खांचे माणिकमोती आढळतात.
उत्तर: सुख-दु:ख
(आ) त्या प्रश्नातली गर्भित प्रशंसा उघड असते.
उत्तर: गर्भित-उघड
(इ) स्तुती-निंदेची पर्वा न करणारा मी.
उत्तर: स्तुती-निंदा
(ई) प्रश्न विचारणाऱ्या माणसाला उत्तर हवंच असतं.
उत्तर: प्रश्न- उत्तर
(८) विरुद्धार्थी शब्द लिहा.
(अ) अवरोह × आरोह
(आ) अल्पायुषी × दीर्घायुषी
(इ) सजातीय × विजातीय
(ई) दुमत × एकमत
(उ) नापीक × सुपीक
(९) स्वमत.
(अ) लेखकाने खनपटीला बसलेल्या माणसाशी कलप लावण्याबाबत केलेल्या विनोदी चर्चेबाबत तुमचे मत लिहा.
उत्तर: खनपटीला बसलेल्या गृहस्थाशी लेखकांनी त्याची थट्टा करीत केसांच्या रंगाबद्दल चर्चा केली. या चर्चेमुळे माझे एक ठाम मत झाले आहे. लोक आपले वय लपवण्यासाठी, आपण म्हातारे झालेलो नाही, आपण अजूनही तरुणच आहोत, हे दाखवण्यासाठी केसांना कलप लावतात.
वास्तविक, दिवसागणिक आपले वय वाढत जाणारच. वाढत्या वयाचा आपल्या शरीरावर परिणाम होणारच. हे सर्व माणसे कधीही टाळू शकत नाहीत. माणूस निसर्गाच्या विरुद्ध जाऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन माणसाने एखादया क्षेत्रात आपले नाव प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याची सुरुवात शालेय जीवनापासूनच केली पाहिजे. आपली आवडनिवड बारकाईने तपासून पाहिली पाहिजे. आपली कुवत काय आहे, आपल्याला कोणती गोष्ट झेपू शकते, आपण कशात प्रगती करू शकतो, याचा शोध घ्यायला सुरुवात केली पाहिजे. त्यानुसार आपले ध्येय ठरवले पाहिजे. तरच त्या क्षेत्रात आपल्याला आपले नाव कमावणे शक्य होईल. मग वय वाढण्याचे दुःख होणार नाही. उलट, आपल्या कर्तबगारीमुळे लोक आपल्याला तरुण समजत राहतील.
(आ) परगावी गेल्यानंतर लेखकाला आलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर: लेखक व्याख्यानांच्या निमित्ताने नेहमी परगावी जायचे. तिथे गेल्यावर जुन्या परिचयाचे, लहानपणी वर्गात असलेले, त्यांच्याशी खेळले- बागडलेले लोक भेटायचे.जुनी माणसे भेटली की विचारपूस केली जायची. कोण कोण काय काय करतो ही माहिती दिली घेतली जायची. लेखकांकडे आकर्षक बाब होती.
त्यांचे केस अजूनही काळे होते. समोरची माणसे केसांच्या या काळेपणावरून त्यांना प्रश्न विचारत. त्यात वय जाणून घेण्यापेक्षा एक वेगळाच हेतू असायचा. बरेच जण केस काळे करण्यासाठी कलप लावतात. पण हा प्रयत्न नेहमीच अपयशी ठरतो.
कलपामुळे रूप अगदी केविलवाणे बनते. लेखकांच्या एका स्नेह्याची अशी स्थिती झाली होती. त्यामुळे, लेखकांनी केस काळे राखण्यासाठी कोणती युक्ती केली असावी, याचे त्या गृहस्थाला अमाप कुतूहल होते. ते कुतूहल शमवण्यासाठी तो लेखकांच्या खनपटीला बसला. लेखकांनी थट्टा करीत करीत त्याची बोळवण केली.
(इ) प्रत्येकाची विचार करण्याची सवय आणि वेळ स्वतंत्र असते, याबाबत तुमचा विचार स्पष्ट करा.
उत्तर: प्रत्येकाची विचार करण्याची सवय वगैरे वेगवेगळी असते हे मला आता पटू लागले आहे. आम्ही विदयार्थी म्हणजे मोठे लेखक नव्हेत. लेखकांना विविध प्रकारे विचार करावा लागतो. आम्हांलाही तसा विचार करावा लागतो.
मी माझे नीट निरीक्षण केले आहे. होय, विचार करावा लागतो. लेखकांनी हे असे इथे का म्हटले आहे ? आपण असे कधी म्हणतो का? यावर कोणता प्रश्न येऊ शकेल ? त्याचे उत्तर कसे तयार करायचे? असे अनेक प्रश्न मला पडतात.
त्यांची उत्तरे शोधावी लागतात. हे सर्व म्हणजे आमचा अभ्यास हा विचार करण्याचाच भाग आहे. मला माझा अभ्यास रात्री करायला खूप आवडते. सर्व जग निवांत झालेले असते.
कुठेही खट्टखुट्ट होत नाही. आपण आणि फक्त आपला अभ्यास. मग कितीही जागरणं करावी लागली, तरी मला त्याचा थोडासुद्धा त्रास होत नाही. माझी एक मैत्रीण आहे. तिला सकाळी लवकर उठून, आंघोळ वगैरे करून अभ्यासाला बसायला आवडते. सकाळी चार वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत ती सलग शांतपणे अभ्यास करू शकते. आमच्या एका मित्राला संध्याकाळी दणकून खेळून आल्यानंतर आंघोळ करून अभ्यासाला बसायला आवडते. आमच्यापैकी काही जणांना दुपारी शाळेतून आल्यावर अभ्यासाला बसणे आवडते. कारण काय, तर सकाळी वर्गात शिकवलेले मनात ताजे असते! विशेष म्हणजे त्या त्या वेळी ज्याचा त्याचा अभ्यास चांगला होतो. म्हणून प्रत्येकाची विचार करण्याची सवय आणि वेळ वेगवेगळी असते, हेच खरे.