१५. खोद आणखी थोडेसे स्वाध्याय मराठी इयत्ता दहावी, Khod aankhi thodese question and answers

१५. खोद आणखी थोडेसे

१४. काळे केस स्वाध्याय मराठी इयत्ता दहावी, Kale kes question and answers

(१) योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा.

१५. खोद आणखी थोडेसे

(अ) ‘खोदणे’ या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे ……

(१) विहीर आणखी खोदणे.

(२) जिद्दीने आणखी प्रयत्न करणे.

(३) घरबांधणीसाठी खोदणे.

(४) वृक्षलागवडीसाठी खोदणे.

उत्तर:

‘खोदणे’ या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे जिद्दीने आणखी प्रयत्न करणे.

 

(आ) गाणे असते मनी म्हणजे ……

(१) मन आनंदी असते.

(२) गाणे गाण्याची इच्छा असते.

(३) मनात नवनिर्मिती क्षमता असते.

(४) गाणे लिहिण्याची इच्छा असते.

उत्तर:

गाणे असते मनी म्हणजे मनात नवनिर्मिती क्षमता असते.

 

(२) आकृती पूर्ण करा.

१५. खोद आणखी थोडेसे

"१४. काळे केस स्वाध्याय मराठी इयत्ता दहावी, Kale kes question and answers

 

(३) कवितेतील खालील संकल्पना आणि त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.

कवितेतील संकल्पना                  संकल्पनेचा अर्थ

(१) सारी खोटी नसतात नाणी  (अ) मनातील विचार व्यक्त करावेत.

(२) घट्ट मिटू नये ओठ           (आ) मनातील सामर्थ्य व्यापक                                                    बनवावे.

(३) मूठ मिटून कशाला          (इ) सगळे लोक फसवे नसतात.

म्हणायचे भरलेली

(४) उघडून ओंजळीत घ्यावी   (ई) भ्रामक खोट्या समजुती बाळगू        मनातली तळी                        नयेत.

उत्तरे:

कवितेतील संकल्पना                  संकल्पनेचा अर्थ

(१) सारी खोटी नसतात नाणी    सगळे लोक फसवे नसतात.

(२) घट्ट मिटू नये ओठ           ⇒  मनातील विचार व्यक्त करावेत.

(३) मूठ मिटून कशाला            भ्रामक खोट्या समजुती   म्हणायचे भरलेली                      बाळगू  नयेत.

(४) उघडून ओंजळीत घ्यावी    ⇒  मनातील सामर्थ्य व्यापक मनातली तळी                      बनवावे.

 

(४) कवितेच्या आधारे खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा.

(१) संयमाने वागा                 ⇒  योग्य

(२) सकारात्मक राहा             ⇒  योग्य

(३) उतावळे व्हा                       अयोग्य

(४) चांगुलपणावर विश्वास ठेवा   ⇒  योग्य

(५) नकारात्मक विचार करा-      ⇒   अयोग्य

(६) खूप हुरळून जा                  ⇒   अयोग्य

(७) संवेदनशीलता जपा             ⇒  योग्य

(८) जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास

कायम ठेवा                             ⇒  योग्य

(९) जुन्याच निर्मितीवर विश्वास ठेवा ⇒  अयोग्य

(१०) नवनिर्मितीवर विश्वास ठेवा     ⇒  योग्य

(११) धीर सोडू नका                    ⇒  योग्य

(१२) यशाचा विजयोत्सव करा       ⇒   अयोग्य

 

(५) काव्यसौंदर्य.

१५. खोद आणखी थोडेसे

(अ) खालील ओळींचे रसग्रहण करा. ‘झरा लागेलच तिथे, खोद आणखी जरासे’

उत्तर:आशयसौंदर्य : ‘खोद आणखी थोडेसे’ या कवितेमधून कवयित्रींनी संयम, जिद्द, आत्मविश्वास व चिकाटी या गुणांच्या मदतीने जीवनध्येय साध्य करण्याची उमेद माणसाला दिली आहे. माणसाने सकारात्मक आयुष्य कसे जगावे, हे समजावून सांगताना वरील ओळीमध्ये ‘प्रयत्नांती परमेश्वर’ या उक्तीचा प्रत्यय दिला आहे. अविरत प्रयत्न करून आदर्श जीवन जगण्याचा संदेश ही कविता देते.

काव्यसौंदर्य : कोणतेही कार्य करताना धीर सोडू नये. खोल खोल मातीखाली निर्मळ झरा असतो. तो प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्न करून आणखी थोडेसे खोदावे लागते. हतबल न होता, हिंमत न हारता प्रयत्नरत असावे. दुःखाच्या मातीच्या जाड थराखाली सुखाचा, आनंदाचा अक्षय झरा असतोच. म्हणून निराश न होता ओठ घट्ट मिटून खोदण्याचे म्हणजेच सुख धुंडाळण्याचे कार्य मध्येच थांबवू नये. अंतिमत: प्रयत्नपूर्वक दुःखावर मात करताच येते.

भाषिक वैशिष्ट्ये : साध्या, सोप्या अष्टाक्षरी छंदात कवितेची रचना केल्यामुळे व यमकप्रधानतेमुळे कवितेला गेय लय प्राप्त झाली आहे. नादानुकूल शब्दकळा व ओघवती भाषा यामुळे कवितेला सौंदर्य प्राप्त झाले आहे. “झरा’ या संकल्पनेमधून प्रयत्नवाद रसिकांच्या मनावर पूर्णत: ठसवला आहे.

 

(आ) ‘आर्त जन्मांचे असते, रित्या गळणाऱ्या पानी’, या ओळींमधील अर्थ तुमच्या भाषेत स्पष्ट करा.

उत्तर: कवयित्री आसावरी काकडे यांनी ‘खोद आणखी थोडेसे या कवितेमध्ये माणसाने प्रयत्नवादी होऊन जगण्याची उमेद धरावी, असा उपदेश केला आहे.

कवयित्री म्हणतात – घट्ट ओठ मिटून दुःख सोसत बसू नये. आपल्या मनात खोलवर एक गाणे लपलेले असते, ते शोधून काढायला हवे. हे समजावताना त्यांनी ‘गळणाऱ्या पानाचे’ प्रतीक वापरले आहे. शिशिर ऋतूमध्ये पानगळ होते. झाड निष्पर्ण होते. परंतु जे पान सुकून, रिते होऊन झाडापासून विलग होते, त्या पानात झाडावर असताना सोसलेल्या वेदना असतात. हे जन्माचे आर्त, आयुष्यात सोसलेल्या   वेदना, त्या सुरकुतलेल्या गळणाऱ्या पानात सामावलेल्या असतात सो म्हणून पुन्हा वसंतात पालवी फुटण्याची उमेद ते बाळगून असते. गळणाऱ्या पानामधून जीवन जगण्याची उमेद पुन्हा जागृत होते, हा आशावाद या ओळींतून व्यक्त झाला आहे.

 

(इ) ‘गाणे असते गं मनी’, या ओळीतील तुम्हांला समजलेला नवनिर्मिती क्षमतेचा संदेश स्पष्ट करा.

उत्तर: आसावरी काकडे यांनी ‘खोद आणखी थोडेसे’ या सही कवितेमधून सकारात्मक जीवन जगण्याची शिकवण देताना प्रत्येकाच्या मनात असलेल्या निर्मितिक्षमतेला आवाहन केले आहे.

कवयित्रींच्या मते – मातीखाली लपलेला झरा शोधेपर्यंत माणसाने  अथक प्रयत्न करायला हवेत. धीर एकवटून आयुष्याचा सकारात्मक बोट शोध घ्यायला हवा. घट्ट ओठ मिटून दुःख सोसत राहू नये. प्रत्येकाचे मन हे निर्मितिक्षम असते. त्या अंतर्मनातील गाभ्याशी ज्याचे त्याचे गाणे हो दडलेले असते. मनाच्या तळाशी असलेले हे गाणे मर्मबंधाची ठेव असते. आपल्यात मग्न होऊन ते गाणे अनुभवणे हे जीवनाचे सार्थक ठरते. आपल्यातल्या निर्मितिक्षमतेचा शोध आपणच घ्यायला हवा. मनात असलेली निर्मितिक्षमता जागी करायला हवी म्हणजे मग ‘आनंदाचे डोही। आनंद तरंग।’ ही अवस्था अनुभवता येईल.अशा प्रकारे कवयित्रींनी ‘गाणे असते गं मनी’ या ओळीतून माणसाला नवनिर्मिती क्षमतेचा संदेश दिला आहे.

 

(ई) ‘परिश्रमाशिवाय फळ मिळत नाही’, याबाबतीत तुम्ही घेतलेला अनुभव लिहा.

 

उत्तर:  जीवनात परिश्रम ही खूप आवश्यक गोष्ट आहे कारण ; आयुष्यात जी व्यक्ति परिश्रम करत नाही ती कधीच यश संपादन करू शकत नाही. परिश्रमशिवाय फळाची अपेक्षा करने म्हणजे साखरेशिवाय चहा करने होय. मलाही या गोष्टीचा एकदा प्रत्यय आला आहे तो असा की; मी आठवीला असतना शिष्यवृत्ती परिक्षेत सहभाग घेतला होता पण मी त्या परिक्षेकडे खुप दुर्लक्ष केले व अभ्यास केला नाही परिणामी मी ती परीक्षा उत्तीर्ण झालो पण शिष्यवृत्ती मिळवू शकलो नाही व माझ्याकडून शिष्यवृत्तीची अपेक्षा करणारे माझे शिक्षक व पालक यांची अपेक्षाभंग केल्यासारखे मला वाटले. मग मला प्रत्यय आला की; तेव्हा अभ्यास केला असता तर; आज हा दिवस पहिला नसता पण तेव्हा मला समजले की‘परिश्रमाशिवाय फळ मिळत नाही.’

NEXT CHAPTER

PREVIOUS CHAPTER

१४. काळे केस स्वाध्याय मराठी इयत्ता दहावी, Kale kes question and answers

Print Friendly, PDF & Email
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.