१७. सोनाली स्वाध्याय मराठी इयत्ता दहावी, Sonali Question and answers

१७. सोनाली

(१) आकृत्या पूर्ण करा.

१७. सोनाली

१७. सोनाली स्वाध्याय मराठी इयत्ता दहावी, Sonali Question and answers

(अ)

उत्तर:

"१७. सोनाली

 

(आ)

१७. सोनाली स्वाध्याय मराठी इयत्ता दहावी, Sonali Question and answers
सोनाली आणि रूपाली यांची झोपण्यापूर्वीची दंगामस्ती

 

 

(२) तुलना करा.

सोनालीरूपाली
(१) रूपाली गुरगुरली की सोनाली बापडी होऊन कोपऱ्यात बसे.(१) सोनालीवर ताईगिरी करायची. सोनालीवर गुरगुरायची. तिला दमात घ्यायची. 
(२) वय वाढल्यावर रूपालीच्या दुप्पट-चौपट वाढली.(२) वय वाढल्यावर लहानखुरीच राहिली. 
(३) रूपालीला सहज तोंडात उचलून धरी. पण रूपालीला तिचे दात लागत नसत.(३)रूपालीने तरीही आपला गुरगुरून
ताईपणा सोडला नाही.
सोनालीला दटावीत असे.
(४) रूपालीपेक्षा ७ दिवसांनी लहान. दिसायला लहानखुरी.(४) वयाने सोनालीपेक्षा मोठी. सुरुवातीला अंगापिंडाने सुद्धा मोठी.

१७. सोनाली

 

 

(३) खालील वाक्यांतून दिसणारे सोनालीच्या स्वभावाचे पैलू लिहा.

(अ) सोनालीचे दात कधी रूपालीला लागले नाहीत-

उत्तर:

सोनाली प्रेमळ होती.

 

(आ) रूपाली सोबत नसली तर सोनाली जाळीच्या दारावर पंजे मारी-

उत्तर:

सोनाली रुपालीवर जिवलग मैत्रिणीसारखे प्रेम करीत होती.

 

(इ) सोनालीने एक मोठ्‌ठी डरकाळी फोडली-

उत्तर:

जेवणाच्या वेळी फसवले तर सोनालीला खूप राग येत असे.

 

(ई) सोनाली शांत होऊन लेखकाचे पाय चाटू लागली-

उत्तर:

झालेल्या चुकीबद्दल माफी मागण्याची सोनालीची वृत्ती होती.

 

(उ) मोठ्ठ्याने फिस्कारून सोनाली गृहस्थाच्या अंगावर आली-

उत्तर:

आपल्या माणसाच्या संरक्षणासाठी धावते. 

 

(ऊ) सोनाली आळीपाळीने आमच्याकडे पाहत होती-

उत्तर:

आपल्या माणसांपासून आपण दूर जात आहोत, याचे सोनालीला दुःख होते.

 

(४) पुढील घटना केव्हा घडल्या ते लिहा.

उत्तर:

घटनाघटना केव्हा घडली
(अ) सोनाली अण्णांवर रागावली.जेवणाचा डबा न घेताच अण्णा गच्चीत सोनालीकडे गेले, तेव्हा.
(आ) सोनालीने पातेल्याची चाळणी केली.सोनालीला दूध प्यायला दिलेले पातेले लेखक परत आणायला विसरले, तेव्हा.
(इ) सोनाली गृहस्थाच्या अंगावर धावली.त्या गृहस्थांनी दीपालीला उचलून घेतले, तेव्हा.
(ई) सोनाली बिथरली, गरागरा फिरू लागली.सोनालीची डरकाळी बंगल्याच्या आवारात घुमली, तेव्हा.

(५) सोनाली आणि रूपाली यांच्यातील मैत्री दर्शवणाऱ्या त्यांच्या दोन सवयी लिहा.

उत्तर:

(१) सोनाली व रूपाली एकत्र फिरत, एकत्र झोपत.

(२) एकत्र जेवण घेत.

 

(६) खालील वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा.

(अ) डोळे विस्फारून बघणे-

उत्तर:

अर्थ ⇒ डोळे मोठे करून आश्चर्याने बघणे.

वाक्य : भर दिवसा काळे ढग आले, तेव्हा सुरेश त्या दृश्याकडे डोळे विस्फारून बघू लागला.

 

(आ) लळा लागणे-

उत्तर:

अर्थ प्रेम वाटणे, माया लावणे.

वाक्य: आई लेकराना लळा लावते.

 

(इ) तुटून पडणे-

उत्तर:

अर्थ ⇒ त्वेषाने हल्ला करणे.

वाक्य: रविने टाकलेल्या भाकरीवर गल्लीतील कुत्री तुटून पडली.

 

(ई) तावडीत सापडणे-

उत्तर:

अर्थ ⇒ कचाट्यात पडणे.

वाक्य: अखेर दहशतवादी भारतीय सैन्यांच्या तावडीत सापडले. 

 

(७) स्वमत.

(अ) सोनाली व दीपाली यांच्यातील जिव्हाळा व्यक्त करणारा प्रसंग तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर:

एकदा दीपाली सोनालीबरोबर खेळत बसली होती. तेवढ्यात एक पेशन्ट तिथे आला. त्याला ते दृश्य पाहून धक्काच बसला. दीपाली चुकून सिंहिणीकडे गेली असावी, या कल्पनेने तो धावला आणि त्याने दीपालीला चटकन उचलून घेतले. एक परका माणूस प्रिय व्यक्तीला उचलून घेतो याचा सोनालीला संताप आला. ती त्याच्यावर फिसकारली आणि चवताळून त्याच्यावर धावली. तिचा तो अवतार पाहून त्याने दीपालीला तशीच टाकली. तेवढ्यात अण्णा बाहेर आले. त्यांना घडलेली हकिकत समजली. तो प्रसंग प्रत्यक्ष पाहण्यासाठी अण्णांनी त्या गृहस्थाला दीपालीला उचलायला सांगितले. त्या गृहस्थाने दीपालीला हात लावला, मात्र सोनाली चवताळून त्याच्या अंगावर धावली. लेखकांचे घर हे आता तिला स्वतःचे घर वाटत होते. घरातली माणसे ही आता तिची माणसे झाली होती. परक्या माणसांनी घरातल्या माणसांना हातसुद्धा लावणे तिला मंजूर नव्हते. सोनालीच्या मनातली प्रेमाची ही उत्कट भावना या प्रसंगातून व्यक्त होते.

 

(आ) ‘पशूंना कोणी फसवलं, तर त्यांना राग येतो’, यासंबंधी तुम्ही अनुभवलेली एखादी घटना तुमच्या शब्दांत सांगा.

उत्तर:

आम्ही एकदा पारंब्यांना लोंबकळत खेळत होतो. निरंजनने बिस्किटे आणली होती. ती आम्ही वरच्या वर एकमेकांकडे फेकत आणि झेलत होतो. झोके घेता घेता झेल घेणे खूप कौशल्याचे होते. आम्ही बिस्किटे खात होतो. एखादे खाली पडत होते. आमच्या सोबतचा कुत्रा ते पडलेले बिस्कीट खाई. ते पाहून निरंजनला लहर आली. तो खाली उतरला. त्याने एक बिस्कीट दूर फेकले. दूरवर जाऊन त्या कुत्र्याने ते खाल्ले. नंतर नंतर निरंजन बिस्किटे फेकण्याची बतावणी करू लागला. बिचारा कुत्रा धावत जाई पण त्याला काही मिळत नसे. तो रागाने गुरगुर करीत होता. निरंजनने पातळसा दगड घेऊन बिस्कीट म्हणून फेकला. कुत्रा मोठ्या आशेने तिकडे धावला. पण बिस्कीट नाही, हे कळताच तो चवताळला. संतापाने निरंजनकडे धावला. निरंजन घाबरून पारंबीवर चढला. सरसर वर चढू लागला. चवताळलेला कुत्रा तिथे आलाच. त्याने झेप घेतली आणि निरंजनला पकडले. पण निरंजनची पॅन्ट फक्त त्याच्या तोंडात आली. पॅन्ट टर्रर्र करून फाटली. आम्ही सगळे स्तब्ध होऊन बघतच राहिलो.

१७. सोनाली स्वाध्याय मराठी इयत्ता दहावी, Sonali Question and answers

Print Friendly, PDF & Email
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.