१९. प्रीतम स्वाधाय इयत्ता नववी | Pritam Swadhyay iyatta Navvi | Navvi Marathi Swadhyay|9th marathi swadhyay

प्र. १. तुलना करा.
शाळेतील प्रीतम | सेकंड लेफ्टनंट प्रीतम |
(१) किरकोळ,किडकिडीत अंगकाठी असलेला, खांदे पाडून उभा असलेला. रया गेलेला युनिफॉर्म घातलेला प्रीतम. | (१) खुद देखणा, भरदार,स्वतः बाई त्याच्या खांद्याचा खाली येत होत्या . |
(२) एकलकोंडा घुमा, कुणाशीही न मिसळणारा , कोणत्याही उपक्रमात भाग न घेणारा प्रीतम. | (२) आत्मविश्वासाने वावरणारा; स्वतः ला काय वाटते,याचे स्पष्ट भान असणारा ; एनडिएसारख्या परीक्षेत यशस्वी ठरलेला प्रीतम. |
प्र. २. कारणे लिहा.
(अ) प्रीतमला मराठी नीट येत नसे, कारण….
उत्तर – जन्मल्यापासून प्रीतम महाराष्ट्राबाहेर होता. त्या वर्षी तो प्रथमच महाराष्ट्रात आला होता.
(आ) पोरकेपणाचे समान धागे लेखिकेला प्रीतमकडे खेचत होते कारण….
उत्तर – प्रीतमची आई त्याच्या लहानपणीच वारली होती आणि लेखिकांचे वडीलही वारले होते. त्यामुळे प्रीतमचा पोरकेपणा त्यांना समजत होता.
प्र. ३. प्रतिक्रिया लिहा.
(अ) प्रीतमच्या निबंधातील चुका बघून त्याच्या वर्गशिक्षिकेची प्रतिक्रिया-
उत्तर – सर्व मराठी मुलांमध्ये प्रीतम लुथरा हे अमराठी नाव असल्याने बाईंना ते वेगळे वाटले.
(आ) अबोल प्रीतम भडभडा बोलल्यानंतर वर्गशिक्षिकेची प्रतिक्रिया-
उत्तर – बाईंनी प्रीतमला जवळ घेतले. त्याच्या चेहेऱ्यावरून हात फिरवला.
प्र. ४. लेखिकेच्या कृती व तिच्या कृतीतून अभिव्यक्त होणारे गुण यांची जुळणी करा.
उदाहरण गुण
विधाने. गुण
(अ) बाईंनी प्रीतमला जवळ घेतले. (१) कार्यनिष्ठा
(आ) दुपारच्या सुट्टीत बाईंनी प्रीतमला मराठी
शिकवले. (२) संवेदनशीलता
(इ) प्रीतमने दिलेल्या बांगड्या बाईंनी
हातात चढवल्या. (३) निरीक्षण
(ई) एका दृष्टिक्षेपात बाईंनी अंदाज केला. (४) ममत्व
उत्तरे –
(अ) बाईंनी प्रीतमला जवळ घेतले – ममत्व
(आ) दुपारच्या सुट्टीत बाईंनी प्रीतमला मराठी शिकवले- कार्यनिष्ठा
इ) प्रीतमने दिलेल्या बांगड्या बाईंनी हातात चढवल्या –संवेदनशीलता
(ई) एका दृष्टिक्षेपात बाईंनी अंदाज केला- निरीक्षण
प्र. ५. प्रीतमला स्वत:बद्दल जाणीव असलेली पाठातील वाक्ये शोधा व लिहा.
उत्तर : पाठातील वाक्ये अशी : (१) प्रीतम मान खाली घालून हळूच माझ्याकडे बघत होता.
(२) मला मराठी नीट येत नसल्याने बाकी विषयही कळत नाहीत.
(३) माझ्याबद्दल तक्रार गेली तर मामी खूप टाकून बोलते. मग मामा मला मारतात. मी नापास झालो, तर बाबांना सांगून ते मला बोर्डिंगात ठेवणार. तिकडे मुलांना खूप त्रास देतात. बाबांनी वारंवार विनंती केल्यामुळे मामांनी मला ठेवून घेतले आहे.
(४) तो हळूच जवळ येऊन म्हणाला, “बाई, माझ्याकडे पैसे नव्हते, म्हणून माझ्या आईच्या वापरलेल्या बांगड्या अन् अत्तर मी तुम्हांला दिले. तिची तेवढीच आठवण माझ्यापाशी आहे. खास माझ्या स्वतःच्या वस्तू आहेत त्या.’
(५) “या बाई म्हणजे माझ्या एकुलत्या एक कुटुंबीय आहेत. त्या भेटल्या नसत्या तर कॅप्टन लुथरा नावाचा आज कुणी अस्तित्वात नसता.’
प्र. ६. खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ लिहा.
(अ) रया जाणे.
(१) शोभा जाणे. (२) शोभा करणे. (३) शोभा येणे.
उत्तर – शोभा जाणे.
(आ) संजीवनी मिळणे.
(१) जीव घेणे. (२) जीवदान मिळणे. (३) जीव देणे.
उत्तर – जीवदान मिळणे.
प्र. ७. कंसांत दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्यांचे रूपांतर करा.
(१) मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी. (आज्ञार्थी करा.)
उत्तर – मुलांनो, आईवडिलांची आज्ञा पाळा
(२) बापरे! रस्त्यावर केवढी ही गर्दी! (विधानार्थी करा.)
उत्तर – रस्त्यावर खूपच गर्दी आहे.
(४) नेहमी खरे बोलावे. (प्रश्नार्थी करा.)
उत्तर – नेहमी खरे बोलावे का ?
प्र. ८. स्वमत.
(अ) प्रीतम आणि त्याच्या बाई यांच्यातील भावनिक नातेसंबंधांविषयी तुमचे मत सविस्तर लिहा.
उत्तर: ‘प्रीतम’ ही एक अत्यंत भावपूर्ण अशी कथा आहे. प्रीतम व त्याच्या बाई यांच्यातील नात्यांचे हृदयस्पर्शी दर्शन या कथेत घडते, प्रीतम हा सात वर्षांचा इयत्ता दुसरीत शिकणारा मुलगा. त्याची आई चार वर्षांपूर्वीच वारली. वडील सैन्यात असल्याने सतत सीमेवर असतात, तो मामा-मामकडे राहायला आलेला आहे. मामा-मामी त्याला निर्दयतेने वागवतात. वडील असूनही त्याला अनाथ, पोरके झाल्यासारखे वाटत राहते. तो कोणात मिसळत नाही. एकलकोंडा, घुमा बनला आहे.
प्रीतमच्या बाईना प्रीतमची नकारात्मक बाजूच प्रथम जाणवते. त्यामुळे त्यांच्या मनात त्याची नकारात्मक प्रतिमा निर्माण होते, परंतु त्याची खरी पाश्र्वभूमी कळल्यावर त्यांच्या मनात कणव निर्माण होते. त्या त्याच्याशी सहृदयतेने वागू लागतात त्याला भावनिक आधार देतात. सगळ्या मुलांनी वर्गणी काढून बाईंना भेटवस्तू दिली. प्रीतम त्याच्याजवळच्या आईच्या जुन्या बांगड्या बाईंना भेट देतो. आईविषयीच्या सर्व भावना त्या बांगड्यांमध्ये त्याने साठवलेल्या होत्या. त्याच्या दृष्टीने ती अमूल्य वस्तू होती. ती तो बाईंना भेट म्हणून देतो. त्याच्या मनातला हा उच्च, उदात्त भाव बाईच्या अंतःकरणाचा ठाव घेतो. त्या त्याच्या भावनेचा गौरव करतात. अशा प्रकारे बाई त्याला प्रसंगाप्रसंगांतून आत्मविश्वास देतात. बाईंकडून भावनिक पाठबळ मिळते. त्याच्या जोरावर तो सेकंड लेफ्टनंट बनतो. आदराचे व प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त करतो. या कारणाने त्याला बाई म्हणजे आपली आईच, असे मनोमन वाटते. बाईंना त्याच्यातील सद्गुणी, होतकरू मुलगा दिसतो. त्या त्याला तसे घडवत नेतात. बाई आणि प्रीतम दोघेही एकमेकांना तृप्तीचा, परिपूर्तीचा आनंद देतात.
(आ) तुमच्या जीवनातील शिक्षकाचे स्थान स्पष्ट करा.
उत्तर : आतापर्यंतच्या शिक्षकांपैकी दोन शिक्षक माझ्या लक्षात राहिले आहेत. त्या दोनपैकी एक होते माझे मराठीचे शिक्षक शार्दुल सर. ते नेहमी सांगत – वाक्यातले सर्व शब्द एकमेकांचे नातेवाईक असतात. काही दूरचे, काही जवळचे. त्यांच्या नात्याप्रमाणे त्यांचा अर्थ ठरतो. ही नाती लक्षात घेत घेत वाचन करायचे असते, हेही त्यांनी सोदाहरण समजावून सांगितले. आता वाचन करताना मला कधीही अडखळायला होत नाही.पाचवीत भेटले इंग्रजीचे श्रीरंग सर. त्यांनी शब्दांचे स्पेलिंग लक्षात ठेवण्याचे गुपितच सांगितले. त्यानुसार उच्चार कसे होतात, हे ही समजावून सांगितले. इंग्रजी शब्द, इंग्रजी वाक्य उच्चारण्याची गोडी इतकी वाढू लागली की मला हळू हळू इंग्रजी बोलता येऊ लागले आहे.
या शिक्षकांमुळे माझा अभ्यास चांगला होऊ लागला. माझा आत्मविश्वास वाढला. माझे आईबाबाही खूश आहेत. हे सर्व माझ्या या शिक्षकांमुळे घडले आहे.