२०. सर्व विश्वचि व्हावे सुखी
(१) खालील चौकटी पूर्ण करा.
२०. सर्व विश्वचि व्हावे सुखी स्वाध्याय मराठी इयत्ता दहावी, Sarv vishvachi vhave sukhi complete question and answers
२०. सर्व विश्वचि व्हावे सुखी
(अ) संत ज्ञानेश्वर यांनी मानवाच्या कल्याणासाठी केलेली विश्वप्रार्थना
उत्तर: पसायदान
(आ) मानवी सुखदु:खाशी सहृदयतेने समरस होणे-
उत्तर: मैत्री
(इ) ‘सर्वांभूती भगवद्भावो’ अशी प्रार्थना करणारे संत-
उत्तर: संत गाडगे महाराज
(ई) सामाजिक प्रबोधनावर भर देणारे संत-
उत्तर: संत एकनाथ
(उ) संत तुकारामांचे जीवनसूत्र-
उत्तर: परस्पर सहकार्य
२०. सर्व विश्वचि व्हावे सुखी
(२) आकृत्या पूर्ण करा.
(अ)

(आ)

(इ)

२०. सर्व विश्वचि व्हावे सुखी
(३) फरक सांगा.
उत्तर:
सामान्य माणसाचे मागणे | संतांचे मागणे |
(अ) वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हाव्यात. | (अ) सर्व मानवजातीचे कल्याण व्हावे. |
(आ) स्वतःपुरते मर्यादित | (आ) विश्वव्यापक |
(४) खालील काव्यपंक्तींचा अर्थ लिहा.
(अ) जे खळांची व्यंकटी सांडो
उत्तर:
माणसांच्या मनातील दुष्ट भाव नष्ट होऊ दे. |
(आ) दुरिताचें तिमिर जावो
उत्तर:
(दुरित म्हणजे दुष्कर्म.) सर्व दुष्कर्मांचा अंधार नष्ट होऊ दे. |
२०. सर्व विश्वचि व्हावे सुखी
(५) खालील तक्ता पूर्ण करा. त्यासाठी कंसातील शब्दांचा उपयोग करा.
(नम्रता, मैत्रभाव, विश्वकल्याण, स्वप्रयत्न, सहकार्य)
उत्तर:
अ.क्र. | काव्यांश | संतांचे नाव | काव्यांशातून व्यक्त झालेली संतांची इच्छा / भावना |
(१) | ‘सर्व विश्वचि व्हावे सुखी’ | संत तुकडोजी महाराज | विश्वकल्याण |
(२) | ‘अहंकाराचा वारा न लागो राजसां” | संत नामदेव | नम्रता |
(३) | ‘सर्वांभूती भगवद्भावो’ | संत एकनाथ | मैत्रभाव |
(४) | ‘एक एका साह्य करूं।अवघे धरू सुपंथ’ | संत तुकाराम | सहकार्य |
(५) | ‘स्वत:चा उद्धार करा प्रयत्नाने’ | संत गाडगे महाराज | स्वप्रयत्न |
(६) स्वमत.
(अ) सर्व संतांच्या प्रार्थनेमधील सामाईक सूत्र तुमच्या शब्दांत थोडक्यात लिहा.
उत्तर:
संत स्वतः पलीकडे जाऊन संपूर्ण जगाकडे पाहतात. त्यांना सर्व प्राणिमात्रांबद्दलच कळवळा वाटतो. त्यांच्या मनात आपपरभाव नसतो. त्यांना सर्व माणसे समान वाटतात; सारखीच प्रिय वाटतात. म्हणून संतमहात्मे सर्व मानवजातीचे कल्याण इच्छितात. म्हणूनच ‘जो जे वांछील तो ते लाहो’ असे ज्ञानदेव म्हणतात. नामदेवांना वाटते की, सर्वांच्या मनातला अहंकार नष्ट व्हावा. म्हणजे सगळेजण एकमेकाला स्वतःच्या हृदयात सामावून घेतील. संत एकनाथांना सर्वांच्याच ठिकाणी भगवद्भाव आढळतो. संत तुकाराम महाराज सर्वांनी एकमेकाला साहाय्य करीत परमेश्वर चरणांपर्यंत जाण्याचा मार्ग दाखवतात. सर्वच संत स्वतःसाठी काहीही मागत नाहीत. ते समस्त मानवजातीसाठी, समस्त प्राणिमात्रांसाठी परमेश्वराकडे हात जोडून प्रार्थना करतात.
(आ) ‘भूतां परस्परें पडो । मैत्र जीवाचें ।’ या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
उत्तर:
या ओळीतील ‘भूत, मैत्र आणि जीव’ हे तीन शब्द खूप महत्त्वाचे आहेत. देह धारण करणारा प्रत्येकजण ‘भूत’ होय. म्हणून जगातली सगळी माणसे भूत होत. पण फक्त माणसेच नव्हेत, तर सूक्ष्मजीवांपासून ते हत्ती-गेंडे यांसारखे सर्व प्राणिमात्र भूत होत. तसेच वृक्षवेली यासुद्धा सजीवच आहेत. त्यासुद्धा भूत होत. या सर्वांच्या मनात एकमेकांबद्दल निर्मळ, पवित्र अशी प्रेमभावना निर्माण झाली पाहिजे, ही इच्छा ज्ञानदेव देवाजवळ व्यक्त करतात. जात, धर्म, भाषा, प्रांत वगैरे गोष्टींवरून आपण अनेकांना शत्रू समजतो. या भावना बाह्य गुणांवर अवलंबून आहेत. ज्ञानदेव या गोष्टींच्या पलीकडे जायला सांगतात. प्रत्येक जण सुखीच असेल, नेमकी हीच मागणी ज्ञानदेव विश्वात्मक देवाकडे करीत आहेत.
(इ) या पाठातून तुम्ही काय शिकलात, ते तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
सर्व संतांनी व्यापक दृष्टिकोन बाळगून लोकांना उपदेश केला आहे. सर्व लोकांनी एकमेकांशी प्रेमाने वागावे. एकमेकांना, अडीअडचणीत असलेल्या सर्वांना मदत करावी. सर्वांमध्ये सहकार्याची भावना हवी. या तऱ्हेने सर्वजण वागू लागले, तर समाजात शांती नांदेल. माणसे सुखासमाधानाने जगू लागतील. या अशा वातावरणातच माणसे प्रगती करू शकतात. अशा वातावरणात चोऱ्यामाऱ्या होणार नाहीत. दंगेधोपे होणार नाहीत. कोणाची पिळवणूक होणार नाही. कोणाची फसवणूक होणार नाही. कोणावर अन्याय होणार नाही. एकंदरीत, सर्व व्यवस्था ही न्यायावर आधारलेली राहील. म्हणून सर्वांनी एकोप्याने राहावे, असे सर्व संत सांगतात. इतरेजनांशी सहृदयतेने समरस झाले पाहिजे. सर्वांनी शिक्षण घेतले पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला पाहिजे. हा पाठ वाचून मला हाच संदेश मिळाला.
२०. सर्व विश्वचि व्हावे सुखी स्वाध्याय मराठी इयत्ता दहावी, Sarv vishvachi vhave sukhi complete question and answers