३. प्राकृतिक रचना व जलप्रणाली

३. प्राकृतिक रचना व जलप्रणाली

 

प्रश्न १. अचूक पर्याय निवडून वाक्ये लिहा.

३. प्राकृतिक रचना व जलप्रणाली

(अ) ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग ……
(i) उच्चभूमीचा आहे.
(ii) मैदानी आहे.
(iii) पर्वतीय आहे.
(iv) विखंडित टेकड्यांचा आहे.

उत्तर – (i) उच्चभूमीचा आहे.

(आ) भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा ……
(i) उंच पर्वत आहेत.
(ii) प्राचीन पठार आहे.
(iii) पश्चिमवाहिनी नद्या आहेत.
(iv) बर्फाच्छादित डोंगर आहेत.

उत्तर – (ii) प्राचीन पठार आहे.

(इ) ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः ……
(i) अवर्षणग्रस्त आहे.
(ii) दलदलीचे आहे.
(iii) मानवी वस्तीस प्रतिकूल आहे.
(iv) सुपीक आहे.

उत्तर – (iii) मानवी वस्तीस प्रतिकूल आहे.

(ई) ॲमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत……
(i) त्रिभुज प्रदेश आहे.
(ii) त्रिभुज प्रदेश नाही.
(iii) विस्तीर्ण खाड्या आहेत.
(iv) मासेमारी व्यवसाय केला जातो.

उत्तर – (ii) त्रिभुज प्रदेश नाही.

(उ) अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटेही……
(i) मुख्य भूभागापासून तुटलेल्या भूभागाची बनली
आहेत.
(ii) प्रवाळबेटे आहेत.
(iii) ज्वालामुखीय बेटे आहेत.
(iv) खंडीय बेटे आहेत.

उत्तर – (ii) प्रवाळबेटे आहेत.

(ऊ) अरवली पर्वताच्या पायथ्याशी …...
(i) बुंदेलखंड पठार आहे.
(ii) मेवाड पठार आहे.
(iii) माळवा पठार आहे.
(iv) दख्खनचे पठार आहे.

उत्तर – (ii) मेवाड पठार आहे.

३. प्राकृतिक रचना व जलप्रणाली

प्रश्न २. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

Table of Contents

(अ) भारत व ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेतील फरक सांगा.

उत्तर : (१) भारताच्या प्राकृतिक रचनेचे प्रामुख्याने हिमालय, उत्तर भारतीय मैदान, दूद्वीपकल्प, किनारपट्टीचा प्रदेश आणि द्वीपसमूह पाच विभाग केले जातात. याउलट, ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेचे उच्चभूमी, अजस कडा, किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश आणि द्वीपसमूह हे पाच प्राकृतिक विभाग केले जातात.
(२) भारतात विविध भागांत उंच पर्वत आढळतात. याउलट, ब्राझीलमध्ये उंच पर्वत आढळत नाहीत.
(३) भारताच्या उत्तर भागात हिमालयाचा पर्वतीय प्रदेश आहे. भारताच्या दक्षिणेकडील द्वीपकल्पीय भागात पश्चिम घाट व पूर्व घाट हे पर्वतीय प्रदेश आहेत.
(४) भारतातील पर्वतीय प्रदेशाच्या सर्वोच्च उंचीची कक्षा ७००० मीटर ते ८००० मीटर आहे. याउलट, ब्राझील देशातील उच्चभूमीच्या सर्वोच्च उंचीची कक्षा १००० मीटर ते २००० मीटर आहे.
(५) भारतात उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात थरचे वाळवंट आहे. याउलट ब्राझीलमध्ये अशा स्वरूपाचा उष्ण वाळवंटी प्रदेश नाही.
(६) भारताच्या उत्तर भागात विस्तीर्ण मैदाने आढळतात. याउलट ब्राझीलमध्ये अशा स्वरूपाची विस्तीर्ण मैदाने आढळत नाहीत.
(७) भारतात किनारपट्टीच्या भागात विविध पश्चजलाचे प्रदेश आढळतात. असे प्रदेश ब्राझील देशात आढळत नाहीत.
(८) ब्राझीलमध्ये अजस कडा आढळतो. ब्राझीलच्या उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू या कड्यामुळे अंकित होते. याउलट, भारतात पठारांची सीमा अंकित करणारे अशा स्वरूपाचे अजस कडे आढळत नाहीत.

(आ) भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत?

उत्तर : भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी पुढील उपाययोजना केल्या जात आहेत

(१) विनाप्रक्रिया सांडपाण्याच्या विसर्गावर बंदी घालणे.
(२) कारखान्यांचे दूषित पाणी प्रक्रिया करून शुद्ध करून नदीत सोडणे.
(३) नदीकिनारी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांकडून नदयांचे प्रदूषण होऊ नये यासाठी मार्गदर्शक सूचना देणारे फलक उभारणे.
(४) नदीच्या पाण्यातील घाण व कचरा काढून नदयांचे पात्र स्वच्छ करणे इत्यादी.

(इ) भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती?

उत्तर: भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत : (१) भारतात उत्तर भागात विस्तीर्ण मैदानी प्रदेश आढळतो. हा प्रदेश उत्तर भारतीय मैदान म्हणून ओळखला जातो.

(२) हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या

उत्तर सीमेपर्यंत आणि पश्चिमेकडील राजस्थान पंजाबपासून पूर्वेकडे असमपर्यंत उत्तर भारतीय मैदान या प्राकृतिक विभागाचा विस्तार आढळतो. हा प्रदेश बहुतांशी सखल व सपाट आहे.

(३) उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे प्रामुख्याने तीन विभाग केले जातात.

(४) अरवली पर्वताच्या पूर्वेकडील गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश गंगेचे मैदान म्हणून ओळखला जातो. या मैदानी प्रदेशाचा उतार पूर्वेकडे आहे.

(५) भारताच्या पश्चिम बंगाल राज्याच्या बहुतांश भागात व बांग्लादेशात गंगा व ब्रह्मपुत्रा या नदयांच्या मुखांशी त्रिभुज प्रदेश आढळतो. या प्रदेशास ‘सुंदरबन’ म्हणतात. हा जगातील सर्वांत मोठा. त्रिभुज प्रदेश आहे.
(६) उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात वाळवंट आहे. हा मैदानी प्रदेश ‘थरचे वाळवंट’ किंवा ‘मरुस्थळी’ या नावाने ओळखला. जातो. राजस्थानचा बहुतांश भाग या वाळवंटाने व्यापला आहे. थरच्या वाळवंटाच्या उत्तरेकडील भाग पंजाबचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो.

(७) अरवली पर्वत व दिल्ली डोंगररांगा यांच्या पश्चिमेकडे पंजाबचा मैदानी प्रदेश पसरलेला आहे. या प्रदेशाची निर्मिती सतलज व तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून झाली आहे.
(८) पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडे आढळतो. या
मैदानी प्रदेशातील मृदा सुपीक असल्याने येथे शेती व्यवसायाचा मोठ्या
प्रमाणावर विकास झाल्याचे आढळून येते.

 

(ई) पॅंटानल या अतिविस्तृत खंडातर्गत प्रदेशात दलदल निर्माण होण्याची कारणे काय असावीत?

उत्तर : पँटनाल या अतिविस्तृत खंडांतर्गत प्रदेशात दलदल निर्माण होण्याची पुढील कारणे अ सावीत :
(१) पॅटनाल प्रदेशातून पॅराग्वे नदी व तिच्या उपनद्या वाहतात.
(२) या प्रदेशात ब्राझीलमधील उच्चभूमीच्या उतारांवरून वाहणारे पाणी जमा होते.
(३) पँटनाल प्रदेशात पॅराग्वे नदी व तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या पाण्याचे व गाळाचे मोठ्या प्रमाणावर संचयन होते.
(४) मोठ्या प्रमाणावरील साठलेले पाणी व गाळ यांचे थरावर थर जमा होत गेल्यामुळे या प्रदेशात दलदलीची निर्मिती होते.

(उ) भारतातील प्रमुख जलविभाजक कोणते ते उदाहरणासह स्पष्ट करा.

उत्तर : (१) हिमालय पर्वत, अरवली पर्वत, विंध्य पर्वत, पश्चिम घाट, सातपुडा पर्वत इत्यादी भारतातील प्रमुख जलविभाजक आहेत.
(२) उदा., पश्चिम घाट हा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नदया या दोन जलप्रणालींना विभागतो.
(३) उदा., विंध्य पर्वत हा नर्मदा आणि गंगा या नदीखोऱ्यांचा जलविभाजक आहे.
(४) उदा., हिमालय पर्वत हा हिमालयातील नदया व हिमालयापलीकडील नदया यांना विभागतो.

३. प्राकृतिक रचना व जलप्रणाली

प्रश्न ३. टिपा लिहा.

(अ) अॅमेझॉन नदीचे खोरे

उत्तर : (१) अॅमेझॉन नदीचे खोरे हा ब्राझीलमधील सर्वांत मोठा सर्वसाधारण
मैदानी प्रदेश आहे. अॅमेझॉन नदीच्या खोऱ्याचा (मैदानाचा) उतार पूर्वेकडे आहे.
(२) अॅमेझॉन नदीचे खोरे ब्राझीलच्या पश्चिम भागात तुलनेने रुंद… म्हणजेच सुमारे १३०० किमी रुंद आहे. गियाना उच्चभूमी व ब्राझील उच्चभूमी या दोन उच्चभूमी जिथे जवळजवळ येतात तेथे अॅमेझॉन किमी नदीच्या खोऱ्याची रुंदी केवळ २४०किमी होते.
(३) जसजशी अॅमेझॉन नदी अटलांटिक महासागराकडे वाहत जाते, तसतशी अॅमेझॉन नदीच्या खोऱ्याची (मैदानाची) रुंदी वाढत जाते.
(४) अॅमेझॉन नदीच्या खोऱ्याचा (मैदानी) भाग पूर्णपणे वनाच्छादित आहे. अॅमेझॉनच्या खोऱ्यातील सदाहरित वने उष्णकटिबंधीय वर्षावने आहेत. वारंवार येणारे पूर व वनांच्या तळाकडील भागात जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पतींचे जाळे यांमुळे अॅमेझॉन नदीच्या खोऱ्याचा (मैदानी) प्रदेश दुर्गम बनला आहे.

(आ) हिमालय

उत्तर : (१) हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे. भारतातील हिमालय पर्वताची सुरुवात ही कझाकिस्तान देशातील पामीरच्या पठारापासून होते. हिमालय ही आशिया खंडातील प्रमुख पर्वतप्रणाली आहे. भारतात जम्मू-काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत उत्तर-ईशान्य दिशेत हिमालय पर्वत पसरला आहे.
(२) हिमालय ही एकच पर्वतरांग नसून, हिमालयात अनेक समांतर पर्वतरांगांचा समावेश होतो. शिवालिक ही हिमालय पर्वतश्रेणीतील सर्वांत दक्षिणेकडील पर्वतरांग आहे. ही सर्वांत नवीन (अर्वाचीन) पर्वतरांग आहे.
(३) दक्षिणेकडील शिवालिक पर्वतरांगेकडून उत्तरेकडे जाताना अनुक्रमे लघु हिमालय, बृहद् हिमालय (हिमाद्री) आणि हिमालयापलीकडील रांगा आढळतात. या रांगा अनुक्रमे अर्वाचीन ते प्राचीन अशा आहेत.
(४) हिमालयातील पर्वतरांगांचे पश्चिम हिमालय (काश्मीर हिमालय), मध्य हिमालय (कुमाऊँ हिमालय) आणि पूर्व हिमालय (असम हिमालय) असेही भाग केले जातात.

(इ) ब्राझीलची किनारपट्टी

उत्तर : (१) ब्राझीलला सुमारे ७४०० किमी लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. या किनारपट्टीचे उत्तर किनारपट्टी व पूर्व किनारपट्टी असे दोन विभाग केले जातात.

(२) उत्तरेकडील आमापापासून पूर्वेकडील रिओ ग्रांडो दो नॉर्ते पर्यंतचा किनारा ब्राझीलचा उत्तर अटलांटिकचा किनारा म्हणून ओळखला जातो. तेथून पुढे दक्षिण दिशेने पसरलेला किनारा ब्राझीलचा पूर्व किनारा म्हणून ओळखला जातो.

(३) ब्राझीलच्या उत्तर किनाऱ्यावर अॅमेझॉन व तिच्या अनेक उपनदया येऊन मिळतात. त्यामुळे हा किनारा सखल बनला आहे. या किनाऱ्यावर माराजॉ बेट, माराजॉ व सावो मारकोस उपसागर आहेत. माराजा हे किनारी बेट अॅमेझॉन व टोकॅटिस या नदयांच्यादरम्यान तयार झाले आहे.

(४) ब्राझीलच्या पूर्वेकडील किनाऱ्यावर मुख्यतः अनेक लहान व काही मोठ्या नदया येऊन मिळतात. या भागात सावो फ्रान्सिस्को ही एक मोठी नदी अटलांटिक महासागरास मिळते. या किनाऱ्यावर ठिकठिकाणी लांबवर पसरलेल्या पुळणी व तटीय वालुकागिरी आहेत. या किनाऱ्याचे काही ठिकाणी प्रवाळकट्टे आणि प्रवाळबेटे यांमुळे रक्षण होते.

(ई) भारताचा द्वीपकल्पीय विभाग

उत्तर : (१) उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे भारतीय द्वीपकल्प हा प्राकृतिक विभाग पसरलेला आहे. हा प्राकृतिक विभाग हिंदी महासागराकडे निमुळता होत जातो.
(२) भारतीय द्वीपकल्पीय विभागात अनेक लहान-मोठे पर्वत व पठारे आहेत. भारताच्या द्वीपकल्पीय विभागात उत्तरेकडील भागात अरवली पर्वत आहे. हा सर्वांत प्राचीन वली पर्वत आहे.
(३) भारताच्या द्वीपकल्पीय विभागात सपाट मैदाने सीमांकित करणारी पठारांची शृंखला आहे. पठारांच्या शृंखलेमध्ये महाराष्ट्र पठार, कर्नाटक- तेलगंणा पठार, छोटा नागपूर पठार, पूर्वेचे पठार इत्यादी महत्वाची पठारे आहेत. या विभागाच्या मध्य भागात विध्य सातपुडा पर्वत आहेत.
(४) भारताच्या दूद्वीपकल्पीय विभागाच्या पश्चिम भागात पश्चिम घाट व पूर्व भागात पूर्व घाट असे पर्वतीय प्रदेश आहेत.

(उ) अजस्र कडा

उत्तर : (१) क्षेत्रविस्ताराच्या दृष्टीने अजस्र कडा हा ब्राझीलमधील सर्वांत लहान प्राकृतिक विभाग आहे.
(२) सावो पावलो ते पोर्तो अॅलेग्रेच्या भागात ब्राझील उच्चभूमीची उंची सरळ एका उतारात संपते. त्यामुळे कड्यासारखा प्राकृतिक भाग तयार होतो. ब्राझील उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू या अजस कड्यामुळे अंकित होते. अजस्र कड्याच्या भागात ब्राझील उच्चभूमीची उंची ७९० मीटर इतकी आहे. काही भागांत ही उंची टप्प्याटप्प्याने कमी होत जाते.
(३) अजस्र कड्याचा ब्राझीलमधील हवामानावर परिणाम होतो. अजस कड्यामुळे आग्नेय व्यापारी वारे अडवले जातात. त्यामुळे ब्राझीलच्या आग्नेय किनारपट्टीच्या प्रदेशात तुलनेने अधिक पाऊस पडतो.
(४) अजस्र कड्याच्या पलीकडे ब्राझीलमधील ईशान्य भागात वातविन्मुख प्रदेश (पर्जन्यछायेचा प्रदेश) आढळतो. हा भाग अवर्षण चतुष्कोन’ म्हणून ओळखला जातो.

३. प्राकृतिक रचना व जलप्रणाली

प्रश्न ४. भौगोलिक कारणे लिहा.

(अ) ब्राझीलमध्ये पश्चिमवाहिनी नद्या आढळत नाहीत.

उत्तर : (१) ब्राझीलमधील अनेक नदया ब्राझील उच्चभूमीत उगम पावतात.
(२) ब्राझील उच्चभूमीची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे व पश्चिमेकडून पूर्वेकडे टप्प्याटप्प्याने कमी होत जाते. त्यामुळे ब्राझीलमधील अनेक नदया या उत्तर आणि पूर्व दिशेने वाहत जातात.
(३) या नदया अटलांटिक महासागरास जाऊन मिळतात. त्यामुळे ब्राझीलमध्ये पश्चिमवाहिनी नदया आढळत नाहीत.

(आ) भारताच्या पश्चिम व पूर्वकिनारपट्‌ट्यांमध्ये विषमता आढळते.

उत्तर : (१) पश्चिम घाटातून अनेक डोंगररांगा पश्चिम किनाऱ्यापर्यंत पसरलेल्या असल्यामुळे भारताची पश्चिम किनारपट्टी तुलनेने खडकाळ आहे व तिची रुंदीही तुलनेने कमी आहे.
(२) भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात अनेक ठिकाणी खाड्या आढळतात.
(३) भारताची पूर्व किनारपट्टी नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून तयार झाली आहे. भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात अनेक ठिकाणी त्रिभुज प्रदेश तयार झाले आहेत. अशा प्रकारे, भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्ट्यांमध्ये विषमता आढळते.

 

(इ) भारताच्या पूर्वकिनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत.

उत्तर : (१) भारताचा पूर्व किनारा नदयांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून तयार झाला आहे. पूर्व किनाऱ्यावर अनेक ठिकाणी गाळाचे त्रिभूज प्रदेश आढळतात.
(२) भारताच्या पूर्व किनारपट्टीजवळ पाण्याची पातळी खूप खोल आढळत नाही. भारताच्या पश्चिम किनारपट्टीजवळ पाण्याची पातळी तुलनेने जास्त खोल आहे.
(३) गाळ व पाण्याची कमी खोल पातळी नैसर्गिक बंदरांच्या विकासास पोषक ठरत नाही. त्यामुळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत.

(ई) ॲमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो.

उत्तर : (१) अॅमेझॉन नदीच्या प्रदेशात लोकवस्तीचे प्रमाण तुलनेने कमी आहे.
(२) या भागात उद्योगांचे प्रमाणही तुलनेने कमी आहे. परिणामी अॅमेझॉन नदीच्या प्रदेशात तुलनेने कमी प्रमाणात जलप्रदूषण होते.
(३) गंगा नदीच्या प्रदेशात लोकवस्तीचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. या भागात उद्योगांचे प्रमाणही तुलनेने अधिक आहे. परिणामी गंगा नदीच्या प्रदेशात तुलनेने अधिक प्रमाणात जलप्रदूषण होते. त्यामुळे अमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो.

३. प्राकृतिक रचना व जलप्रणाली

प्रश्न ५. अचूक गट ओळखा.

(अ) ब्राझीलच्या वायव्येकडून अाग्नेयेकडे जाताना आढळणाऱ्या प्राकृतिक रचनेचा क्रम.

(i) पॅराना नदी खोरे- गियाना उच्चभूमी -ब्राझील उच्चभूमी
(ii) गियाना उच्चभूमी-ॲमेझॉन खाेरे-ब्राझील
उच्चभूमी
(iii) किनारपट्टीचा प्रदेश-ॲमेझॉन खोरे – ब्राझील उच्चभूमी

उत्तर – (ii) गियाना उच्चभूमी-ॲमेझॉन खाेरे- ब्राझील उच्चभूमी

(आ) ब्राझीलच्या या नद्या उत्तरवाहिनी आहेत.

(i) जुरुका-झिंगू-अरागुआ
(ii) निग्रो-ब्रांका-पारु
(iii) जापुरा-जारुआ-पुरुस

उत्तर – (i) जुरुका-झिंगू-अरागुआ

(इ) भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना खालील पठारे क्रमवार आढळतात.

(i) कर्नाटक-महाराष्ट्र-बुंदेलखंड
(ii) छोटा नागपूर-माळवा-मारवाड
(iii) तेलंगणा-महाराष्ट्र-मारवाड

उत्तर – (i) कर्नाटक-महाराष्ट्र-बुंदेलखंड

     

 

 

 

 

Print Friendly, PDF & Email
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.