४. भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय ( इयत्ता दहावी )

४. भारतीय कलांचा इतिहास

स्वाध्याय

१. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

४. भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय

(१) चित्रकला आणि शिल्पकला यांचा ……….. मध्ये समावेश होतो.

(अ) दृक्कला       (ब) ललित कला

(ब) लोककला    (क) अभिजात कला

उत्तर : (१) चित्रकला आणि शिल्पकला यांचा दृक्कला मध्ये समावेश होतो.

 

(२) मथुरा शिल्पशैली ………. काळात उदयाला आली.

(अ) कुशाण    (ब) गुप्त

(क) राष्ट्रकूट   (ड) मौर्य

उत्तर :  मथुरा शिल्पशैली कुशाण  काळात उदयाला आली.

 

(ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.

(१) कुतुबमिनार – मेहरौली

(२) गोलघुमट – विजापूर

(३) छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस – दिल्ली

(४) ताजमहाल – आग्रा

उत्तर : चुकीची जोडी : (३) छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस – दिल्ली

४. भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय

२. टीपा लिहा.

( १ ) कला

उत्तर : ( १ ) आपल्याला आलेले अनुभव आणि त्यातून मिळालेले ज्ञान दुसऱ्यांना सांगावेसे वाटते . आपल्या मनातील भावभावना व्यक्त कराव्यात ही माणसाची सहजप्रवृत्ती असते . या सहजप्रवृत्तीतून जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते , तेव्हा तिला ‘ कला ‘ असे म्हणतात .

( २ ) ‘ कला ‘ ही विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी असते .

( ३ ) ही मांडणी शिल्प , गायन , चित्र , नृत्य वा वादन अशा विविध रूपांत आविष्कृत होते .

( ४ ) कलानिर्मितीच्या मुळाशी कल्पकता , संवेदनशीलता , कौशल्य इत्यादी महत्त्वाचे घटक असतात .

 

( २ ) हेमाडपंती शैली .

उत्तर : प्रामुख्याने बाराव्या – तेराव्या शतकात यादवकाळात महाराष्ट्रात हेमाडपंती मंदिरांची बांधणी झाली .

( १ ) हेमाडपंती स्थापत्यशैलीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या पद्धतीत दोन दगडांमधील सांधे चुन्याने वा मातीने भरले जात नाहीत . दगडांमध्येच एकमेकांत घट्ट बसतील अशा कातलेल्या खोबणी आणि कुसू यांच्या आधाराने भिंती उभारल्या जातात . ( २ ) हेमाडपंती मंदिरांच्या बांधणीत प्रामुख्याने तारकाकृती बांधकाम आढळते .

( ३ ) तारकाकृती मंदिरांच्या बाह्य भिंती अनेक कोनांमध्ये विभागलेल्या असतात .

( ४ ) या दगडी भिंतींवरील देवतांची कोरीव शिल्पे पर्यटकांना आकर्षून घेतात . महाराष्ट्रभर अशी उभी असलेली हेमाडपंती शैलीतील मंदिरे तत्कालीन शिल्प व स्थापत्यकलेचा विकास दर्शवतात .

 

( ३ ) मराठा चित्रशैली .

उत्तर : इसवी सनाच्या सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठा चित्रशैली विकसित होण्यास सुरुवात झाली .

( १ ) सचित्र हस्तलिखित पोथ्या , पोथ्यांच्या खाली आणि वर ठेवण्यात येणाऱ्या लाकडी फळ्यांवरील चित्रे , काचचित्रे आणि भित्तिचित्रे या विविध स्वरूपांत मराठा चित्रशैलीचा आविष्कार आढळतो .

( २ ) या शैलीतील चित्रे रंगीत असून ती भित्तिचित्रे आणि हस्तलिखितांमधील लघुचित्रे यांच्या स्वरूपांतील आहेत .

( ३ ) वाड्यांचा दर्शनी भाग , दिवाणखाने , मंदिरांचे मंडप , शिखरे व छत यांवर मराठा चित्रशैलीतील भित्तिचित्रे पाहण्यास मिळतात .

( ४ ) या चित्रशैलीवर राजपूत आणि माळवा चित्रशैलीचा ; तसेच युरोपीय चित्रशैलीचा प्रभाव पडलेला दिसून येतो .

४. भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय

३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

(१) कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते.

उत्तर : ( १ ) कलावस्तूंच्या खरेदी – विक्रीचे एक स्वतंत्र क्षेत्र असते .

( २ ) या कलावस्तू नकली आहेत की खऱ्या आहेत , त्यांतील धातू , लाकडाचा प्रकार , त्यांचा दर्जा योग्य आहे का हे त्यातील जाणकारच सांगू शकतो .

( ३ ) कलावस्तूतील कलेचा दर्जा कसा आहे , हे कलाकारच ओळखू शकतात .

( ४ ) एकूण , कलावस्तूंचे मूल्य ठरवताना वरील सर्व गोष्टींची पारख होणे आवश्यक असते ; त्यासाठी कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते .

 

( २ ) चित्रकथीसारख्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे .

उत्तर : ( १ ) कठपुतळ्या किंवा चित्रांच्या साहाय्याने रामायण महाभारतातील कथा सांगण्याची परंपरा म्हणजे ‘ चित्रकथी परंपरा ‘ होय .

( २ ) या परंपरा आपल्या संस्कृतीच्या घटक असून , तो आपला वैभवशाली वारसा आहे .

( ३ ) ठाकर , आदिवासी , वारली अशा जमातींनी चित्रकथी परंपरा पिढ्यान्पिढ्या टिकवून ठेवली आहे .

( ४ ) चित्रकधी कुटुंबांमध्ये जतन करून ठेवलेल्या पोथ्या आता जीर्ण झाल्या आहेत .

म्हणून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या चित्रकथीसारख्या या परंपरांचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे .

४. भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय

४. पुढील तक्ता पूर्ण करा.

४. भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय ( इयत्ता दहावी )

उत्तर:

क्र.मंदिर स्थापत्यशैलीनागरद्राविडहेमाडपंती
१.वैशिष्ट्ये(१) पायापासून क्रमश: लहान होत
जाणाऱ्या शिखरांच्या प्रतिकृती वरपर्यंत रचलेल्या असतात.
(२)शिखराची रचना पायापासून
वरच्या टोकापर्यंत सलग असते. (३) शिखरे निमुळती होत जातात.
(४) शिखर कलशाकृती असते.
(१) मंदिरांची शिखरे पिरॅमिडच्या आकाराची असतात.
(२)शिखरांपेक्षा गोपुरे
(मुख्य प्रवेशद्वार) मोठी व भव्य असून त्यावर पौराणिक कथाचित्रे कोरलेली असतात.
(१) या शैलीतील मंदिरांची बांधणी चौरस व तारकाकृती असते.
(२)मंदिरांच्या बांधणीत चुना वा मातीचा वापर केलेला नसतो.
२.उदाहरणे(१) खजुराहोचे कंडारिया महादेव मंदिर

२) भुवनेश्वरचे लिंगराज मंदिर

(३) कोणार्कचे सूर्यमंदिर

(४)राजस्थानमधील अबू पहाडा वरील दिलवाडा मंदिर.

(१) मदुराईचे मीनाक्षी मंदिर (२)महाबलीपुरम्ची रथमंदिरे

(३) तंजावरचे बृहदीश्वर मंदिर

(४) तिरुपती मंदिर.

(१) सिन्नरचे
गोंदेश्वर
मंदिर
(२) अंबरनाथ येथील शिवमंदिर (अंब्रेश्वर)
(३) खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर
(४) हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मंदिर.

४. भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय

५. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

(१) लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती लिहा.

उत्तर : ( १ ) अश्मयुगीन काळापासून गुहाचित्रांची परंपरा चालू आहे . या गुहाचित्रांतून लोकचित्रशैलीचे जतन केले गेले .

( २ ) गुहाचित्रांमध्ये प्राणी , मनुष्याकृती , झाडे , शिकारीचे प्रसंग अशी चित्रे गुहांच्या भिंतींवर कोरलेली आढळतात .

( ३ ) अश्मयुगीन मानवाच्या प्रगतीच्या वाटचालीत चित्रांचे विषय बदलत गेले . नवीन प्राणी , शेतीजीवन , वनस्पती इत्यादी नवीन विषय येत गेले .

( ४ ) मनुष्याकृतींच्या रेखाटनांच्या पद्धतीत व चित्रांमध्ये वापरल्या गेलेल्या रंगांमध्ये फरक होत गेला .

( ५ ) नैसर्गिक द्रव्यांपासून , वनस्पतींच्या पानांपासून तयार केलेले विविध रंग वापरले गेलेले दिसतात . सभोवतालचा परिसर आणि अवगत झालेले नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान यांचा वापर करून मानव चित्रे कोरू लागला .

( ६ ) नवाश्मयुगात विकसित झालेला मानव देव – देवतांची चित्रे काढू लागला . सणसमारंभप्रसंगी घरांच्या भिंतींवर चित्रे काढणे , अंगणात रांगोळी काढणे अशा स्थानिक परंपरांतून लोकचित्रशैली विकसित झाली .

वारली चित्र परंपरा , चित्रकथी परंपरा , लघुचित्र परंपरा अशा अनेक लोकचित्रकला शैली आढळतात .

 

(२) भारतातील मुस्लीम स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा.

उत्तर : मध्ययुगीन भारतात मुस्लीम सत्तांच्या काळात विकसित झालेल्या या मुस्लीम स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये व उदाहरणे पुढीलप्रमाणे –

( १ ) पर्शियन , मध्य आशियाई , अरबी आणि इस्लामपूर्व भारतीय स्थापत्य अशा अनेक स्थापत्यशैलींतून विकसित झालेल्या स्थापत्यशैलीस ‘ मुस्लीम स्थापत्यशैली ‘ असे म्हणतात .

( २ ) या स्थापत्यशैलीत बांधलेला कुतुबमिनार जगातील सर्वाधिक उंच ( २४० फूट ) आहे .

( ३ ) मुघल सम्राट शाहजहानने बांधलेला ताजमहाल ही वास्तू जगातील आठवे आश्चर्य मानले जाते .

( ४ ) इसवी सनाच्या सतराव्या शतकात बांधलेला विजापूरचा गोलघुमट ही वास्तू प्रतिध्वनीसाठी प्रसिद्ध आहे .

( ५ ) फतेहपूर येथे सम्राट अकबराने बांधलेला राजवाडा आणि बुलंद दरवाजा त्याच्या उंचीसाठी आणि भव्यतेसाठी प्रसिद्ध आहे .

( ६ ) दिल्ली आणि आग्रा येथे मुघल सम्राटांनी बांधलेले लाल किल्ले विस्तीर्ण आणि देखणे आहेत .

वरील सर्व वास्तू मुस्लीम स्थापत्यशैलीचे उत्तम नमुने आहेत .

 

(३) कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट करा.

उत्तर : विविध कलाक्षेत्रांत व्यवसायाच्या पुढील संधी उपलब्ध असतात –

( १ ) कलेच्या अभ्यासकांना संग्रहालये , अभिलेखागारे , ग्रंथालये , पुरातत्त्वीय संशोधन , पत्रकारिता आणि भारतीय विद्या या ठिकाणी व्यवसाय मिळू शकतात .

( २ ) औदयोगिक आणि जाहिरात क्षेत्रात तसेच कलावस्तूंच्या खरेदी – विक्री व्यवसायात कलांच्या जाणकारांची आवश्यकता असते.

( ३ ) चित्रपट आणि नाटक निर्मितीसाठी नेपथ्य , कलाकार , दिग्दर्शक , छायाचित्रकार , प्रकाशयोजना इत्यादी कलाकारांची आवश्यकता असते .

( ४ ) मुद्रणक्षेत्रात तसेच घरसजावटीच्या साहित्यनिर्मितीत कला क्षेत्रातील जाणकारांची गरज असते .

( ५ ) दागदागिने , धातूंच्या वा लाकडी शोभेच्या वस्तू बनवणे या क्षेत्रात अनेक व्यावसायिक संधी आहेत .

( ६ ) बांबू , काच , कापड , माती वा दगडी कलापूर्ण वस्तू , शिल्पे बनवणे या क्षेत्रांतही व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध असतात .

 

(४) पृष्ठ क्र. २३ वरील चित्राचे निरीक्षण करून खालील मुद्‌द्यांच्या आधारे वारली चित्रकलेविषयी माहिती लिहा.

(अ) निसर्गाचे चित्रण   (ब) मानवाकृतींचे रेखाटन

(क) व्यवसाय             (ड) घरे

उत्तर : हे वारली चित्रपरंपरेतील चित्र आहे . वारली चित्रकला शैलीचा उदय ठाणे जिल्ह्यातील वारली आदिवासी जमातीत झाला , या चित्राविषयी माहिती –

( अ ) निसर्गाचे चित्रण : या चित्रात काही वनस्पतींच्या फांदया , फुलझाडे , उगवता सूर्य , पक्षी यांची चित्रे रेखाटलेली दिसतात .

( ब ) मानवाकृतींचे रेखाटन : चित्रात स्त्री – पुरुष , खेळणारी मुले यांची चित्रे रेखाटलेली दिसतात . वारली चित्रात माणसांची हुबेहूब चित्रे नसतात . ती फक्त रेखाचित्रे असतात . त्रिकोण , चौकोन व वर्तुळ यांच्या साहाय्याने मानवाकृती रेखाटल्या जातात .

( क ) व्यवसाय : या चित्रात शेती करणारे स्त्री – पुरुष दिसत आहेत पशुपालन हाही या लोकांचा व्यवसाय असावा

( ड ) घरे : उतरत्या P छपरांच्या झोपड्या चित्रात दिसतात झोपड्यांच्या भिंती कुडांच्या किंवा मातीच्या असाव्यात . त्यावर चित्रे काढलेली आहेत .

या चित्रातून वारली समाजजीवन व्यक्त होते . हे लोक गरीब आहेत , हे जाणवते . हे लोक जसे जगतात , त्याच परिसरातील व अनुभवातील मानवी व निसर्ग घटकांचे आकार ते रेखाटताना दिसतात

 

Print Friendly, PDF & Email
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.