४. सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय इयत्ता दहावी

४. सामाजिक व राजकीय चळवळी

स्वाध्याय

१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

४. सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय

(१) शेतकरी चळवळीची …… ही प्रमुख मागणी आहे.

(अ) वनजमिनीवर लागवड करण्याचा अधिकार मिळावा.

(ब) शेतमालाला योग्य भाव मिळावा.

(क) ग्राहकांचे संरक्षण करणे.

(ड) धरणे बांधावीत.

उत्तर : शेतकरी चळवळीची शेतमालाला योग्य भाव मिळावा ही प्रमुख मागणी आहे.

 

(२) शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी …… करण्यात आली.

(अ) जलक्रांती               (ब) हरितक्रांती

(क) औद्योगिक क्रांती    (ड) धवलक्रांती

उत्तर : शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी हरितक्रांती करण्यात आली.

४. सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय

२. संकल्‍पना स्‍पष्‍ट करा

(१) आदिवासी चळवळ

उत्तर : ( १ ) आदिवासी हा प्रारंभापासूनच जंगलसंपत्तीवर उदरनिर्वाह करणारा समाज आहे .

( २ ) ब्रिटिशांनी आदिवासींच्या जंगलसंपत्तीच्या अधिकारावरच गदा आणल्याने कोलाम , गोंड , संथाळ , मुंडा यांसारख्या आदिवासींनी ब्रिटिशांविरुद्ध ठिकठिकाणी उठाव केले होते.

( ३ ) स्वतंत्र भारतातही आदिवासींचे उदरभरणाचे प्रश्न सुटलेले नाहीत .

( ४ ) वनजमिनींवरील त्यांचे हक्क , वनांतील उत्पादने गोळा करण्याचे व वनजमिनींवर लागवड करण्याचे त्यांचे हक्क मान्य केले जात नाहीत . या मागण्यांसाठी अनेक ठिकाणी आदिवासींची आंदोलने अद्यापही चालू आहेत .

( २ ) कामगार चळवळ .

उत्तर : ( १ ) १८५० नंतर भारतात कापड गिरण्या , रेल्वे कंपन्या असे उद्योग सुरू झाले . या औद्योगिकीकरणामुळे देशात कामगारांचा मोठा वर्ग निर्माण झाला .

( २ ) पुढे त्यांच्या समस्या वाढल्या . या समस्या सोडवण्यासाठी १९२० मध्ये ‘ ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस ‘ स्थापन होऊन कामगार चळवळी जोम धरू लागल्या .

( ३ ) स्वातंत्र्योत्तर काळातही कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक युनियन्सची स्थापना झाली . १९६० ते १९८० पर्यंत कामगार चळवळींचा प्रभाव होता . १९८० नंतर मात्र मुंबईतील कापड गिरणी कामगारांचा संप अयशस्वी झाल्यानंतर हळूहळू ही चळवळ विखुरली व कमकुवत झाली .

( ४ ) जागतिकीकरण आणि कंत्राटी कामगार पद्धतीने कामगार चळवळीवर मोठा आघात झाला आहे .

४. सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय

३. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

(१) पर्यावरण चळवळीचे कार्य स्पष्ट करा.

उत्तर : ( १ ) पर्यावरणाचा -हास ही केवळ भारताचीच नव्हे तर जागतिक समस्या बनली आहे .

( २ ) पर्यावरणाचा न्हास थांबवावा आणि शाश्वत विकासाकडे जगाची वाटचाल व्हावी यासाठी पॅरिस , रिओ अशा ठिकाणी जागतिक पर्यावरण परिषदा घेतल्या गेल्या .

( ३ ) भारतातही पर्यावरणातील विविध घटकांच्या सुधारणेसाठी अनेक चळवळी सक्रीय आहेत .

( ४ ) ‘ चिपको ‘ सारखे वृक्षसंवर्धन व संरक्षणासाठीचे आंदोलन ‘ नमामि गंगे ‘ सारखे गंगा नदी शुद्धीकरण आंदोलन , हरितक्रांती , जैवविविधतेचे संरक्षण यांसारख्या अनेक आंदोलनांनी व चळवळींनी पर्यावरण रक्षणाचे फार मोठे कार्य केले आहे .

 

( २ ) भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा .

उत्तर : ( १ ) स्वातंत्र्यपूर्व काळातच शेतीविरोधी धोरणांमुळे भारतीय शेतकरी संघटित होऊन चळवळी करू लागला होता .

( २ ) महात्मा फुले , न्यायमूर्ती रानडे , महात्मा गांधी यांसारख्या नेत्यांच्या प्रेरणेतून बार्डोली , चंपारण्य या ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे सत्याग्रह झाले . किसान सभेसारख्या संघटना स्थापन झाल्या .

( ३ ) स्वातंत्र्योत्तर काळात कूळ कायदयासारख्या कायदयांनी शेतकरी चळवळी मंदावल्या हरितक्रांतीने गरीब शेतकऱ्यांची स्थिती सुधारली नाही .

( ४ ) शेती मालाला योग्य भाव मिळावा , कर्जमुक्ती आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकाराव्यात म्हणून शेतकरी चळवळी पुन्हा जोर धरू लागल्या आहेत .

 

( ३ ) स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री – चळवळी कोणत्या सुधारणांसाठी लढत होत्या ?

उत्तर : स्वातंत्र्यपूर्व काळात पुढील सुधारणांसाठी स्त्री – चळवळी लढत होत्या –

( १ ) स्त्रियांवरील होणारा अन्याय दूर व्हावा .

( २ ) स्त्रियांचे शोषण थांबून त्यांना सन्मानाने जगता यावे .

( ३ ) सार्वजनिक जीवनात स्त्रियांना सन्मानाने जगता यावे .

( ४ ) सतीप्रथा, विधवांची उपेक्षा , बहुपत्नी विवाहपद्धती , बालविवाह प्रथा इत्यादी सामाजिक प्रथा नष्ट व्हाव्यात.

( ५ ) स्त्रीशिक्षण , स्त्रियांना मतदानाचा अधिकार , विधवा पुनर्विवाह अशा अनेक सुधारणा व्हाव्यात.

४. सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय

४. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

(१) लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते.

उत्तर : हे विधान बरोबर आहे ;

कारण – ( १ ) सार्वजनिक प्रश्नांच्या निराकरणासाठी एक वा अनेक संघटित होऊन सामूहिक आंदोलन उभे करतात.

( २ ) सामाजिक प्रश्नांसंदर्भातील सर्व माहिती आंदोलनातील कार्यकर्ते शासनाला देत असतात .

( ३ ) चळवळीच्या वाढत्या प्रभावामुळे शासनाला त्याची दखल घ्यावीच लागते .

( ४ ) शासनाच्या निर्णयांना , धोरणांना विरोध करण्यासाठी चळवळी उभ्या राहतात . लोकशाही पद्धतीतच जनतेला प्रतिकार करण्याचा हक्क असतो . म्हणून लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते .

 

( २ ) चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते .

उत्तर: हे विधान चूक आहे ;

कारण – : ( १ ) कोणतीही चळवळ नेतृत्वामुळेच क्रियाशील राहते आणि व्यापक बनते . चळवळीचे यशापयशही खंबीर नेतृत्वावरच अवलंबून असते .

( २ ) चळवळीचा कार्यक्रम , आंदोलनाची दिशा आणि तीव्रता केव्हा कमी – अधिक करायची यांबाबत खंबीर नेतृत्वच योग्य निर्णय घेऊ शकते .

( ३ ) खंबीर नेतृत्वच लोकांपर्यंत पोहोचून जनाधार मिळवू शकते व चळवळीची परिणामकारकता वाढवू शकते ; म्हणून चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते .

 

( ३ ) ग्राहक चळवळ ‘ अस्तित्वात आली .

उत्तर : हे विधान बरोबर आहे ;

कारण – : ( १ ) अर्थव्यवस्थेतील बदलांचा आणि बदललेल्या समाजव्यवस्थेचा ग्राहकांवर परिणाम होत असतो .

( २ ) भेसळ , वस्तूंच्या वाढवलेल्या किमती , वजन – मापातील फसवणूक , वस्तूंचा कमी दर्जा पण अधिक किमती इत्यादींसारख्या अनेक समस्यांना ग्राहकांना तोंड द्यावे लागते .

( ३ ) अशा फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी १९८६ साली ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला . त्यानंतर ग्राहकांना आपल्या हक्कांची जाणीव व्हावी व त्यांचे संरक्षण व्हावे , यासाठी ‘ ग्राहक चळवळ ‘ अस्तित्वात आली .

 

उपक्रम

(१) विविध सामाजिक चळवळींच्या आंदोलनाविषयी वर्तमानपत्रातील बातम्यांचे संकलन करा.

(२) आपल्या परिसरातील सार्वजनिक समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या चळवळींच्या कार्याचा अहवाल लिहा.

(३) भाजी अथवा धान्य विकत घेताना तुमची वजनात फसवणूक झाली तर ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत तुम्ही कशी तक्रार कराल, याचा नमुना तयार करा.

 

 

Print Friendly, PDF & Email
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.