५. प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय ( इयत्ता दहावी )

५. प्रसारमाध्यमे आणि इतिहास

स्वाध्याय

१. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

५. प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय

(१) भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र ……….. यांनी सुरू केले.

(अ) जेम्स ऑगस्टस हिकी

(ब) सर जॉन मार्शल

(क) ॲलन ह्यूम

(ड) बाळशास्‍त्री जांभेकर

उत्तर : भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र जेम्स ऑगस्टस हिकी यांनी सुरू केले.

 

(२) दूरदर्शन हे ………. माध्यम आहे.

(अ) दृक्                (ब) श्राव्य

(क) दृक्-श्राव्य      (ड) स्‍पर्शात्‍मक

उत्तर : दूरदर्शन हे  दृक्-श्राव्य  माध्यम आहे.

 

(ब) पुढीलपैकी चुकीची जोडी आेळखून लिहा.

(१) प्रभाकर – आचार्य प्र.के.अत्रे

(२) दर्पण – बाळशास्त्री जांभेकर

(३) दीनबंधु – कृष्णराव भालेकर

(४) केसरी – बाळ गंगाधर टिळक

उत्तर : चुकीची जोडी : (१) प्रभाकर – आचार्य प्र.के.अत्रे

५. प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय

२. टीपा लिहा.

(१) वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य.

उत्तर : भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात वर्तमानपत्रांनी पुढील कार्य केले –

( १ ) लोकजागृती व लोकशिक्षण केले . भारतीय संस्कृतीची व इतिहासाची थोरवी वर्णन केली .

( २ ) सामाजिक , धार्मिक व राजकीय चळवळींना पाठिंबा देऊन साम्राज्यवादी धोरणांना विरोध केला .

( ३ ) पाश्चात्त्य विद्या व शिक्षण जनतेपर्यंत पोहोचवून समाजप्रबोधनाचे काम केले .

( ४ ) तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली . त्याचबरोबर समाजसुधारक नेते व संघटना यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले .

 

(२) प्रसारमाध्यमांची आवश्यकता.

उत्तर : प्रसारमाध्यमांची पुढील कारणांसाठी आवश्यकता असते –

( १ ) प्रसारमाध्यमांमुळे जग अधिक जवळ आले आहे , कारण त्यामुळे माहिती क्षणार्धात जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचते . माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पोहोचवण्यासाठी प्रसारमाध्यमांचीच गरज असते .

( २ ) प्रसारमाध्यमांमुळे लोकांना घटना प्रत्यक्ष पाहायला मिळतात . माहितीची देवाणघेवाण होते , अद्ययावत ज्ञानाचा प्रसार होतो .

( ३ ) प्रसारमाध्यमांद्वारे मनोरंजन होते . तसेच शैक्षणिक , व्यावसायिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली माहिती ग्रामीण व दुर्गम भागापर्यंत पोहोचवली जाते .

( ४ ) प्रसारमाध्यमांमुळे लोकशाही अधिक सुदृढ होण्यास मदत होते . म्हणून प्रसारमाध्यमे फार महत्त्वपूर्ण आहेत .

 

(३) प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे

उत्तर : मुद्रित माध्यमे ; इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि नवमाध्यमे या माध्यमांशी संबंधित अनेक व्यावसायिक क्षेत्रे असतात .

( १ ) वृत्तपत्रांत अग्रलेख , विविध सदरे , लेख लिहिणारे लेखक , संपादक हवे असतात .

( २ ) बातम्या जमा करणारे वार्ताहर , तंत्रज्ञ या सर्वांची गरज असते .

( ३ ) इलेक्ट्रॉनिक माध्यमातही कार्यक्रम सादर करणारे कलाकार तंत्रज्ञ , निवेदक इत्यादींची गरज असते .

( ४ ) या सर्व माध्यमांतून सादर केले जाणारे लेख , कार्यक्रम , चर्चा या इतिहासाशी संबंधित असल्यास इतिहास तज्ज्ञांचीही गरज असते .

५. प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय

३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

(१) प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते.

उत्तर : ( १ ) प्रसारमाध्यमांद्वारे आपल्यासमोर येणारी माहिती वास्तवाला धरून असेलच असे नसते .

( २ ) ही माहिती देणाऱ्या प्रसारमाध्यमांचे हेतू , सरकारी धोरण , सामाजिक परिस्थिती अशा अनेक बाजू विचारात घेणे आवश्यक असते .

( ३ ) प्रसारमाध्यमांचे पूर्वग्रह , दृष्टिकोन हेही त्या माहितीत दडलेले असतात .

( ४ ) जर्मनीतील ‘ स्टर्न ‘ साप्ताहिकाने हिटलरने लिहिलेल्या रोजनिश्या प्रसिद्ध केल्या . पुढे ती हस्तलिखिते बनावट असल्याचे सिद्ध झाले . म्हणून प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते .

 

(२) वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते.

उत्तर : ( १ ) एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना वर्तमानपत्रांना तिचा भूतकाळ शोधावाच लागतो .

( २ ) दिनविशेषासारखी सदरे देतानाही पूर्वीच्या घटना माहीत करून घ्याव्या लागतात .

( ३ ) वर्तमानपत्रात काही सदरे अशी असतात की ती इतिहासावरच आधारलेली असतात . अशा सदरातून भूतकाळातील आर्थिक , सामाजिक , राजकीय घटना समजतात .

( ४ ) वृत्तपत्रे भूतकाळातील घटना , युद्धे , नेते आदींची शताब्दी वा ५०-७५ वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने लेख वा विशेष पुरवण्या काढतात . अशा वेळी संबंधित घटनेचा भूतकाळ अभ्यासावा लागतो .

म्हणून वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज असते .

 

(३) सर्व प्रसारमाध्यमांत दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे.

उत्तर : ( १ ) दूरदर्शन हे दृक् – श्राव्य माध्यम असल्याने ऐकत असलेल्या माहितीबरोबरच त्यासंबंधीची चलत्चित्रे प्रेक्षकांना प्रत्यक्ष पाहायला मिळतात . दूरदर्शन म्हणजे मनोरंजनाचा खजिनाच होय .

( २ ) सामाजिक समस्या , शैक्षणिक , आर्थिक चर्चा , राजकीय घडामोडी , चित्रपट , खेळ अशा जगातील सर्व घडामोडी दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर घरच्या घरी बसून पाहायला मिळतात .

( ३ ) खेळाडू , नेते , किल्ले , युद्ध इत्यादी गोष्टींवरील माहितीपट दूरदर्शनवर पाहायला मिळतात .

( ४ ) रंगीत संच , रिमोटचा वापर , घटनांचे सजीव दृश्यरूप व प्रत्यक्ष प्रसारण , बातम्या यांमुळे दूरदर्शनच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे . म्हणून सर्व प्रसारमाध्यमांत दूरदर्शन हे अतिशय लोकप्रिय माध्यम आहे .

५. प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय

४. पुढील उताऱ्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

आकाशवाणी : स्वातंत्र्यपूर्व कालखंडात १९२४ मध्ये ‘इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी’ (आयबीसी) या नावाने दर दिवशी कार्यक्रमांचे प्रसारण करणारे एक खासगी रेडिओ केंद्र सुरू झाले. नंतर ब्रिटिश सरकारने याच कंपनीचे ‘इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस’ (आयएसबीएस) असे नामकरण केले. ८ जून १९३६ रोजी या कंपनीचे नामकरण ‘ऑल इंडिया रेडिओ’ (एआयआर) असे झाले.भारत स्वतंत्र झाल्यावर AIR भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचा एक भाग झाले. शासकीय कार्यक्रम व उपक्रमांची माहिती देणारेअधिकृत केंद्र असे याचे सुरुवातीला स्वरूप होते. ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार ‘आकाशवाणी’ हे नाव दिले गेले.आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनपर, प्रबोधनपर व साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जातात. त्याचप्रमाणे शेतकरी, कामगार, युवक आणि स्त्रिया यांच्यासाठी विशेष कार्यक्रम प्रसारित केले जातात.‘विविधभारती’ या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे २४ भाषा आणि १४६ बोलीभाषांमध् का ये र्यक्रम सुरू झाले. अलीकडच्या काळात खासगी रेडिओ सेवा सुरू झाल्या आहेत.

उदा., रेडिओ मिर्ची.

(१) आकाशवाणी कोणत्या खात्यांतर्गत येते?

उत्तर:स्वतंत्र भारतात AIR (आकाशवाणी) भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या अंतर्गत आले.

 

(२) IBC चे नामकरण काय झाले?

उत्तर: IBC म्हणजे इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी या खाजगी रेडिओ केंद्राचे ब्रिटिश सरकारने प्रथम ‘इंडियन स्टेट ब्रॉड कास्टिंग सर्व्हिसेस कंपनी’ (ISBS) असे केले व नंतर ‘ऑल इंडिया रेडिओ (ए.आय. आर.) ‘ असे नामकरण केले.

 

(३) विविधभारतीवरून किती भाषा व बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सादर हाेतात ?

उत्तर: ‘विविधभारती’ या सेवेद्वारे २४ भाषा व १४६ बोलीभाषांमध्ये कार्यक्रम प्रक्षेपित केले जातात.

 

(४) आकाशवाणी हे नाव कसे पडले?

उत्तर: ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेवरून ऑल इंडिया रेडिओला ‘आकाशवाणी ‘असे नाव दिले गेले.

५. प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय

५. संकल्पनाचित्र तयार करा.

५. प्रसारमाध्यमे आणि इतिहास

उत्तर :

क्र.मुद्देवर्तमानपत्रेआकाशवाणीदूरदर्शन
.सुरुवात / पार्श्वभूमीजेम्स ऑगस्टस हिकी याने २९ जानेवारी १७८० रोजी ‘बेंगॉल | गॅझेट’ हे इंग्रजी भाषेतील पहिले | वृत्तपत्र कोलकाता येथे सुरू केले.१९२४ साली मद्रास (चेन्नई) येथे ‘इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी’ हे पहिले खाजगी रेडिओ केंद्र सुरू झाले. ज्याला नंतर ‘आकाशवाणी’ असे नाव दिले गेले.१५ सप्टेंबर १९५९ रोजी भारतात प्रथम दिल्ली दूरदर्शन केंद्र सुरू झाले.
.माहितीचे /कार्यक्रमांचे 
स्वरूप
मुख्यतः बातम्या, लेख, अग्रलेख, लोकांची मते, जाहिराती, विविध प्र सदरे असे वृत्तपत्रांचे स्वरूप असते.विविध मनोरंजनपर, माहितीपर,
प्रबोधनपर आणि साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर होतात. बातमीपत्रही असते.
जगभरच्या घटना, विविध मालिका, चित्रपट व गाणी, नैसर्गिक व ऐतिहासिक ठिकाणांची माहिती, मुलाखती इत्यादी कार्यक्रम सादर होतात.
.कार्ये(१) दैनंदिन घटनांच्या
बातम्या
लोकांपर्यंत पोहोचवणे
(२) लोकजागृती व करणे व लोकशिक्षण
(३) माहिती पुरवणे, लोकशाही बळकट करणे
(४) अन्यायाला विरोध करून विकासात्मक कामांना प्रसिद्धी देणे.
(१) विविध क्षेत्रांतील बातम्या देणे
(२) संगीत, गीत, नाट्यछटा इत्यादी कार्यक्रमांद्वारे मनोरंजन करणे
(३) कार्यक्रमांद्वारे सामाजिक
समस्या मांडून लोकशिक्षण
करणे
(४) व्याख्यानांद्वारे, चर्चाद्वारे
पर्यावरण संस्कृती
संवर्धनाविषयीचे कार्यक्रम
सादर करणे.
(१) मनोरंजन करणे, दैनंदिन घटना, माहिती प्रक्षेपित करणे
(२) लोकशिक्षण करणे
(३) समाजोपयोगी उपक्रमांना प्रसिद्धी देणे
(४) सामाजिक समस्यांबाबत व वाईट रूढी-परंपरांविरुद्ध
समाजप्रबोधन करणे.
Print Friendly, PDF & Email
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.