५. भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने
स्वाध्याय
१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
५. भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय
(१) लोकशाहीमध्ये ……… निवडणुकीत सामील होऊन सत्तेत प्रवेश करतात.
(अ) राजकीय पक्ष (ब) न्यायालये
(क) सामाजिक संस्था (ड) वरीलपैकी नाही.
उत्तर : लोकशाहीमध्ये राजकीय पक्ष निवडणुकीत सामील होऊन सत्तेत प्रवेश करतात.
(२) जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे ……….. .
(अ) धार्मिक संघर्ष
(ब) नक्षलवादी कारवाया
(क) लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर नेणे.
(ड) गुंडगिरीला महत्त्व
उत्तर : जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर नेणे.
५. भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय
२. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
(१) लोकशाही टिकवण्यासाठी दक्ष राहावे लागते.
उत्तर : हे विधान बरोबर आहे ;
कारण – ( १ ) लोकशाही व्यवस्था केवळ शासकीय पातळीवर असून चालत नाही ; तर ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे .
( २ ) लोकशाहीतील लोकांचे हक्क , स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सतत जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात .
( ३ ) भ्रष्टाचार , हिंसा , गुन्हेगारीकरण यांसारख्या लोकशाहीला आव्हान देणाऱ्या समस्या वेळीच नष्ट कराव्या लागतात . त्यासाठी लोकांना आणि शासनालाही सतत दक्ष राहावे लागते .
( २ ) डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व वाढत आहे .
उत्तर : हे विधान चूक आहे ;
कारण – ( १ ) जमीनदारांनी शेतकरी आणि आदिवासी यांच्या जमिनी बळकावल्या .
( २ ) यामुळे हा अन्याय दूर करून भूमिहीनांना जमिनी परत मिळवून देण्यासाठी नक्षलवाद्यांनी , म्हणजेच डाव्या उग्रवादयांनी चळवळ सुरू केली .
( ३ ) परंतु , मूळ उद्देश बाजूला पडून ही चळवळ सरकारविरोधात हिंसक कारवाया करू लागली , पोलिसांवर हल्ले करू लागली . हिंसेलाच अधिक महत्त्व आले , म्हणून डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व कमी झाले आहे .
( ३ ) निवडणुकीतील भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो .
उत्तर : हे विधान बरोबर आहे ;
कारण – ( १ ) लोकशाही मजबूत बनण्यासाठी न्याय्य व खुल्या वातावरणात निवडणुका होणे आवश्यक असते .
( २ ) परंतु काही वेळा निवडणूक प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार होतो .
( ३ ) बनावट मतदान होणे , मतदानासाठी पैसे वा वस्तूंचे वाटप होणे , मतदार वा मतपेट्या पळवून नेणे असे प्रकार वाढत जातात . त्यामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो .
५. भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय
३. संकल्पना स्पष्ट करा.
( १ ) डावे उग्रवादी .
उत्तर : ( १ ) भूमिहीन शेतकरी , आदिवासी यांच्यावर जमीनदारां कडून होणारा अन्याय दूर करण्यासाठी आणि त्यांच्याकडील जमिनी बळकावण्यासाठी पश्चिम बंगाल राज्यात नक्षलवादी चळवळ सुरू झाली .
( २ ) या चळवळीवर मार्क्सवादाचा प्रभाव असल्याने त्यांना डाव्या विचारसरणीचे ‘ म्हणून संबोधले जाते .
( ३ ) सुरुवातीच्या उद्दिष्टांपासून भरकटत जाऊन ही चळवळ आता उग्रवादी बनली आहे .
( ४ ) शेतकरी – आदिवासी यांना न्याय देण्याऐवजी ही चळवळ सरकारला हिंसक पद्धतीने विरोध करीत आहे . राजकीय नेते , पोलीस , लष्कर यांच्यावर सशस्त्र हल्ले केले जात आहेत .
( २ ) भ्रष्टाचार .
उत्तर : ( १ ) कायद्याचा भंग करून , वाजवीपेक्षा अधिक पैसे घेणे , दुसऱ्यांना नाडणे याला ‘ भ्रष्टाचार ‘ असे म्हणतात .
( २ ) प्रष्टाचार केवळ आर्थिक स्वरूपाचाच असतो , असे नाही ; तर सामाजिक , राजकीय , धार्मिक , सरकारी पातळीवर असा सर्वत्र होत असतो .
( ३ ) अधिकारांचा गैरवापर हाही भ्रष्टाचारच असतो . निवडणुकीतील गैरप्रकार , लाच देणे वा स्वीकारणे , मालाची साठवणूक करून अधिक किमतीला विकणे हे सर्व प्रकार भ्रष्टाचाराचेच .
( ४ ) भारतात सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांत भ्रष्टाचार ही मोठी समस्या बनलेली आहे . वाढत्या भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडू शकतो .
५. भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय
४. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत ?
उत्तर : भारतात लोकशाहीच्या यशासाठी पुढील बाबींची आवश्यकता आहे . –
( १ ) लोकशाही निर्णयप्रक्रियेत सर्व धार्मिक , वांशिक , भाषिक व जातीय गटांना सहभागी होण्याची संधी मिळाली पाहिजे .
( २ ) राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कडक शिक्षा असणारे कायदे असावेत व असे गुन्हेगारीकरण रोखणारी स्वतंत्र न्यायालये असावीत .
( ३ ) केवळ शासकीयच नव्हे ; तर सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवरही लोकशाही यशस्वी होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत .
( ४ ) शासनव्यवहारात सर्व पातळ्यांवरील नागरिकांचा सह वाढला पाहिजे .
( २ ) राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्यामुळे कोणते परिणाम होतात ?
उत्तर : राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचे पुढील परिणाम होतात –
( १ ) राजकारणामध्ये पैसा आणि गुंडगिरी यांचे महत्त्व व वर्चस्व वाढते .
( २ ) निवडणुकीच्या वेळी हिंसाचाराचा वापर होऊन मुक्त वातावरणात निवडणुका घेणे अशक्य होते .
( ३ ) दहशतीचे वातावरण निर्माण होऊन शासनव्यवहारात लोकांचा सहभाग कमी होतो .
( ४ ) सहिष्णुता संपते , यामुळे लोकशाही विकसित होत नाही .
( ३ ) राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात ?
उत्तर : राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी पुढील प्रयत्न केले जातात –
( १ ) निवडणुका खुल्या आणि न्याय्य वातावरणात घेण्यासाठी स्वतंत्र निवडणूक यंत्रणा निर्माण केली जाते .
( २ ) राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कडक शिक्षा देणारे कायदे निर्माण केले जातात .
( ३ ) राजकारणात आणि निवडणुकीत भ्रष्टाचार होऊ नये ; म्हणून कायदेनिर्मिती केली जाते .
( ४ ) भ्रष्टाचारी , गुन्हेगार अशांना दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीची शिक्षा झाली असल्यास राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्यास न्यायालयांनी बंदी घातली आहे .
उपक्रम
(१) भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी तुम्ही कोणत्या उपाययोजना सुचवाल याची यादी करा.
(२) ‘भारतातील दहशतवाद’ या समस्येवर वर्गात गटचर्चेचे आयोजन करा.
(३) ‘व्यसनमुक्ती’ या विषयावर पथनाट्य सादर करा.