५. वसंत हृदय चैत्र स्वाध्याय मराठी, Vasanthruday Chitra

५. वसंतहृदय चैत्र

. वसंतहृदय चैत्र (Full Question & Answer)

५. वसंतहृदय चैत्र

५. वसंत हृदय चैत्र स्वाध्याय मराठी, Vasanthruday Chitra

(१) पाठाच्या आधारे दिलेल्या वैशिष्ट्यांवरून झाडाचे नाव लिहा.

 वैशिष्ट्ये                              झाडाचे/वेलीचे नाव

अ) निळसर फुलांचे तुरे                         – कडुनिंबाचे झाड

आ) गुलाबी रंगांची कोवळी पालवी              – पिंपळ

इ) गुलाबी गेंद                                       –  मधुमालती

ई) कडवट उग्र वास                                 – करंजाचे  झाड

उ) दुरंगी फुले                                         – घाणेरी

ऊ) तीन पाकळ्यांचे फूल                           – माडाचे झाड

ए) पायापासून डोकीपर्यंत लादली गेलेली फळे  – फणस

५. वसंतहृदय चैत्र

(२) खालील संकल्पनांचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

(१) चैत्र हा खरा वसंतात्मा, मधुमास आहे.

उत्तर:वसंतऋतूतील सर्व सर्जन, निसर्गातील सौंदर्य, विविध वृक्षांवर डोलणारी मधुर रसांनी भरलेली फळे, यांमुळे वसंताचे खरेखुरे परिपूर्ण, उत्कट दर्शन चैत्रातच होते. म्हणून चैत्र वसंतात्मा व मधुमास आहे.(५. वसंतहृदय चैत्र कृति)

(२) काळीकबरी घरटी चित्रलिपीतली सुंदर विरामचिन्हे वाटतात. 

उत्तर:अवतीभोवती दिसणारी सुंदर सुंदर निसर्गदृश्ये म्हणजे निसर्गाची चित्रलिपीच होय. निसर्ग न्याहाळता न्याहाळता मन या घरट्यांजवळ थोडेसे रेंगाळते. पुढे सरकावे असे वाटतच नाही. इथे आपण जणू विराम घेतो.(५. वसंतहृदय चैत्र कृति)

(३) योग्य जोड्या जुळवा.

‘अ’ गट                                      ‘ब’ गट

(१) लांबलचक देठ                                (अ) माडाच्या लोंब्या

(२) अर्धवर्तुळ, पांढरी टोपी                      (आ) कैऱ्याचे गोळे

(३) भुरभुरणारे जावळ                           (इ) करंजाची कळी

उत्तरे:

(१) लांबलचक देठ                                कैऱ्याचे गोळे 

(२) अर्धवर्तुळ, पांढरी टोपी                      करंजाची कळी

(३) भुरभुरणारे जावळ                           माडाच्या लोंब्या

(४) खालील तक्ता पूर्ण करा.

५. वसंत हृदय चैत्र स्वाध्याय मराठी, Vasanthruday Chitra
(६) खालील शब्दांमधील प्रत्यय ओळखून तक्ता पूर्ण करा.

(५) खालील वाक्यांत योग्य ठिकाणी कंसातील योग्य वाक्प्रचार वापरून वाक्ये पुन्हा लिहा.

(रुंजी घालणे, कुचेष्टा करणे, पेव फुटणे, व्यथित होणे)

(अ) लहानसहान अपयशाने दु:खी होणे अयोग्यच.

(आ) गुंजारव करत भ्रमर फुलांच्या अवतीभोवती फिरत असतात.

(इ) मोठ्या माणसांबद्दल चुकीचे बोलणे हासुद्धा अपराधच.

(ई) सध्या घरामध्ये उंदरांची संख्या वाढल्याने अनेक पाहुण्यांच्या पिशव्या कुरतडल्या गेल्या आहेत.

उत्तरे:

(अ) लहानसहान अपयशाने व्यथित होणे अयोग्यच.

(आ) गुंजारव करत भ्रमर फुलांच्या अवतीभोवती रुंजी घालततात.

(इ) मोठ्या माणसांबद्दल कुचेष्टा करणे हासुद्धा अपराधच.

(ई) सध्या घरामध्ये उंदरांचा पेव फुटल्याने अनेक पाहुण्यांच्या पिशव्या कुरतडल्या गेल्या आहेत.

(६) खालील शब्दांमधील प्रत्यय ओळखून तक्ता पूर्ण करा.  

५. वसंत हृदय चैत्र स्वाध्याय मराठी, Vasanthruday Chitra
(६) खालील शब्दांमधील प्रत्यय ओळखून तक्ता पूर्ण करा.

(७) खालील वाक्यांतील अधोरेखित नामांचा प्रकार ओळखून चौकटींत लिहा.

सदर प्रश्नप्रकार कृतिपत्रिकेच्या आराखड्यात समाविष्ट नाही.

(अ) अश्विनीला पुस्तक वाचायला आवडते.

उत्तर:

(i) अश्विनी ⇒ विशेष नाम

(ii) पुस्तक ⇒ सामान्य नाम

(आ)अजय आजच मुंबईहून परत आला.

उत्तर:

(i) अजय ⇒ विशेष नाम

(ii) मुंबई ⇒विशेष नाम

(इ) गुलाबाचे सौंदर्य काही निराळेच असते.

उत्तर:

(i)गुलाब ⇒ विशेष नाम

(ii)सौंदर्य ⇒  भाववाचक नाम

(ई) रश्मीच्या आवाजात वेगळाच गोडवा आहे.

उत्तर:

(i)रश्मी ⇒ विशेष नाम

(ii)गोडवा ⇒ भाववाचक नाम

(८) खालील ओळी वाचून दिलेल्या शब्दांसाठी त्यातून योग्य पर्यायी शब्द शोधून लिहा.

जो आपल्या आनंदात सोबत असतो, दु:खात सोबत करतो आणि आपण जर वाट चुकत असू तर कान पकडून आपल्याला योग्य वाट दाखवतो, तोच खरा मित्र असतो. काय करावे हे सांगत असताना काय करू नये हे सांगणेही महत्त्वाचे असते.

(अ) कर्ण-  कान

(आ) सोबती- मित्र

(इ) मार्ग- वाट

(९) स्वमत.

(अ) चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीच्या रूपाचे सौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा

उत्तर: चैत्रात नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या विविध रंगांच्या फुलानी डवरून गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन घडले की समजावे हा वसंतऋतूच आहे. वसंतऋतूची सुरुवात फाल्गुनात होते. चैत्रामध्ये वसंतऋतू एन भरात आलेला असतो. त्यातही पिंपळाची पालवी डोळ्यांचे पारणे फेडून टाकते. हिरव्या पोपटी रंगांच्या अनेक छटा झाडांवर लहरत असतात. पिंपळाचे झाड जसजसे या नवपल्लवांनी डवरून जाते, तसतशी ही गहिऱ्या गुलाबी रंगाची पाने उन्हात झळाळू लागतात. जणू काही गुलाबी रंगाचे सुंदर सुंदर गेंदच झाडावर फुलले आहेत, असा भास होऊ लागतो. हे दृश्यरूप डोळ्यांत साठवता साठवता पानांची सळसळ ऐकावी ती पिंपळाचीच, किंबहुना पिंपळ पानांच्या सळसळीवरूनच ‘झाडांच्या पानांची सळसळ’ हा शब्दप्रयोग रूढ झाला आहे. आनंददायक, आल्हाददायक, मनमोहक, मनोरम, हृदयंगम, विलोभनीय, नितांत रमणीय, रम्य ही सर्व विशेषणे चैत्र महिन्यातील पालवीने डवरलेल्या पिंपळाला एकाच वेळी लावता येतील.

(आ) चैत्र महिन्यातील पक्ष्यांच्या घरट्यांना लेखिका वसंताच्या चित्रलिपीतली विरामचिन्हे म्हणतात, या विधानाची सत्यता पटवून द्या.

उत्तर : चैत्र महिन्यात सृष्टी सौंदर्याने न्हाऊन निघते. अनेक रंगांचे विविध आकार फुलांच्या रूपांत डोळ्यांचे पारणे फेडतात. सर्वत्र नवनिर्मितीचा उल्हास भरलेला असतो. या सर्वांचा कळस गाठला जातो तो पक्ष्यांच्या घरट्यांत. पक्ष्यांची घरटीसुद्धा कशी, अनेक लोभस आकारांत निर्मिलेली. काही कबरी घरटी लक्ष वेधून घेतात. काही लोंबत्या आकारांची काही वाटोळ्या आकारांची, काही पसरट गोल, अशी विविध रूपांतील असतात. ही घरटी रमणीय निर्मितीचे दर्शन घडवतात. ही घरटी म्हणजे जणू चित्रलिपीच वाटते. चैत्रामध्ये निसर्गाचे जे रूप दिसते, ते जणू निसर्गाचे साहित्य होय. हे साहित्य वाचताना आपण घरट्याजवळ रेंगाळतो. म्हणून ती विरामचिन्हे ठरतात.

(इ) वसंतऋतूशी निगडित तुमची एखादी आठवण समर्पक शब्दांत लिहा.

उत्तर : आम्ही एकदा आमच्या गावी गेलो होतो. वसंतऋतूच होता तो. त्या काळात रानातून नुसता फेरफटका मारणे म्हणजे फक्त आनंद आणि आनंदच असतो. काही खायला नको किंवा काही प्यायला नको. फक्त डोळे भरून निसर्गाचे दर्शन घ्यायचे.असेच फिरत असताना आम्रफुलांचा सुगंध आला. आमचे जवळच्याच आंब्याच्या झाडाकडे लक्ष गेले. झाड मोहराने भरलेले होते. अनेक फांदयांवर टरटरून फुगलेल्या टवटवीत कैऱ्या दिसल्या. आमच्या तोंडाला पाणी सुटले. नकळत आमच्या हातात दगड आलेच. ते भराभर झाडावर मारू लागलो. बाजूने जाणारा एकजण कळवळला. झाडावर दगड मारण्यामुळे त्याला वेदना झाल्या होत्या. त्याने आम्हांला थांबवले. स्वतः झाडावर चढला. आम्हांला कैऱ्या काढून दिल्या. लगोलग घरी गेलो. आईने मीठ-मसाल्याची फोडणी दिलेले तेल कैऱ्यांना लावले. आणि काय सांगू? हे लिहितानाही माझ्या तोंडाला पाणी सुटले आहे. त्या दिवसाची ती कैरीची चव मी अजूनही विसरलेलो नाही. अजूनही वसंतऋतू म्हटला की मला ती कैरी आठवतेच.

Print Friendly, PDF & Email
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.