६. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास
स्वाध्याय
१. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
६. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास
(१) महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार ……….. यांना मानतात.
(अ) संत ज्ञानेश्वर (ब) संत तुकाराम
(क) संत नामदेव (ड) संत एकनाथ
उत्तर : महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार संत नामदेव यांना मानतात.
(२) बाबुराव पेंटर यांनी ……… हा चित्रपट काढला.
(अ) पुंडलिक (ब) राजा हरिश्चंद्र
(क) सैरंध्री (ड) बाजीराव-मस्तानी
उत्तर : बाबुराव पेंटर यांनी सैरंध्री हा चित्रपट काढला.
(ब) पुढीलपैकी चुकीची जोडी आेळखून लिहा.
(१) रायगडाला जेव्हा जाग येते – वसंत कानेटकर
(२) टिळक आणि आगरकर – विश्राम बेडेकर
(३) साष्टांग नमस्कार – आचार्य अत्रे
(४) एकच प्याला – अण्णासाहेब किर्लोस्कर
उत्तर : चुकीची जोडी : (४) एकच प्याला – अण्णासाहेब किर्लोस्कर
६. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास
२. पुढील तक्ता पूर्ण करा.
उत्तर:
क्र.।मुद्दे | भजन | कीर्तन | लळित | भारूड |
१.गुणवैशिष्ट्ये | (१) टाळ व मृदंग यांच्या साथीने ईश्वराचे गुणगान. (२) अभंग व भक्ति कवनांतून ईश्वरस्तुती | (१) नमन, निरूपणाचा अभंग व निरूपण हा पूर्वरंग (२) आख्यान हा उत्तररंग | (१) उत्सवप्रसंगी देवतेकडे ‘मागणे’ मागीतले जाते. (२) नाट्यप्रवेशाप्रमाणे राम-कृष्णाच्या कथा सादर करणे. | (१) आध्यात्मिक व नैतिक शिकवण (२) सादरीकरणात नाट्यात्मकता व विविधता असते. |
२.उदाहरणे | (१) संत तुलसीदास (२) संत नामदेव यांची भजने | (१) नारदीय कीर्तने (२) महात्मा फुले यांची सत्यशोधकी कीर्तने | गोवा, कोकण या भागांत मोठ्या प्रमाणात प्रचलित. | (१) ज्ञानेश्वर, नामदेव यांची भारुडे. (२) संत एकनाथांची भारुडे सर्वांत लोकप्रिय आहेत. |
६. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास
३. टीपा लिहा.
(१) मनोरंजनाची आवश्यकता.
उत्तर : ( १ ) मनोरंजन हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे . म्हणूनच प्रत्येक मानवाला मनोरंजनाची आवश्यकता असते . व्यक्तीच्या निकोप वाढीसाठी निखळ मनोरंजन महत्त्वाचे असते .
( २ ) चाकोरीबद्ध जगण्यातला कंटाळा दूर करून मनाला चैतन्य व उत्साह येण्यासाठी मनोरंजन आवश्यक असते .
( ३ ) मनोरंजन मनाला उत्साह व कार्यशक्ती मिळवून देण्याचे काम करते . मनोरंजनातून छंद वाढीस लागतात व त्यातून व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो .
( ४ ) मनोरंजनामुळे मनाला विरंगुळा मिळतो व मनावरील ताण हलके होतात .
( २ ) मराठी रंगभूमी .
उत्तर : ( १ ) व्यक्तीने किंवा समुदायाने ललितकला सादर करण्याचे स्थान म्हणजे ‘ रंगभूमी ‘ होय . एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात मराठी रंगभूमीचा उदय झाला . विष्णुदास भावे हे ‘ मराठी रंगभूमीचे जनक ‘ होत .
( २ ) सुरुवातीच्या काळात ऐतिहासिक , पौराणिक नाटकांबरोबरच प्रहसने रंगभूमीवर आली . या नाटकांना लिखित संहिता नसे .
( ३ ) ‘ थोरले माधवराव पेशवे ‘ या नाटकामुळे संपूर्ण लिखित संहिता असलेली नाट्यपरंपरा सुरू झाली . एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस संगीत नाटकांची परंपरा सुरू झाली . सामाजिक प्रश्न आणि ऐतिहासिक विषय नाटकात हाताळले गेले .
( ४ ) मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात आचार्य अत्रे यांच्या नाटकांनी रंगभूमीला सावरले . वि . वा . शिरवाडकर , विजय तेंडुलकर , वसंत कानेटकर अशा लेखकांनी मराठी रंगभूमीला समृद्ध केले .
( ३ ) रंगभूमी व चित्रपट या क्षेत्रांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे .
उत्तर : रंगभूमी आणि चित्रपट यांच्याशी संबंधित पुढील अनेक व्यावसायिक क्षेत्रे आहेत –
( १ ) रंगभूमीसाठी नेपथ्य , वेशभूषा , केशभूषा , रंगभूषा करणाऱ्या अनेक तज्ज्ञांची गरज असते . दिग्दर्शक , कलाकार , छाया व प्रकाशयोजना करणारे तंत्रज्ञ व साहाय्यक यांची गरज असते . लेखक , त्यांचे सल्लागार , संगीत व भाषा यांतील जाणकार या सर्वांची आवश्यकता असते .
( २ ) चित्रपटासाठीही या सर्वांची आवश्यकता असते ; त्याचबरोबर कॅमेरामन , संवादलेखक , कथालेखक , नृत्य दिग्दर्शक , गीतकार अशा तज्ज्ञांची आवश्यकता असते . ही सर्व व्यावसायिक क्षेत्रे रंगभूमी व चित्रपट या क्षेत्रांशी संबंधित अशी आहेत .
६. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास
४. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे.
उत्तर : ( १ ) ऐतिहासिक घटनांवर आणि व्यक्तींवर चित्रपट बनवताना इतिहासाचा आधार घ्यावाच लागतो .
( २ ) ऐतिहासिक कथाविषय असल्यास तो वास्तववादी होण्यासाठी तत्कालीन वातावरणाची निर्मिती करावी लागते .
( ३ ) पात्रांच्या तोंडची भाषा , चालण्या – बोलण्याच्या पद्धती याही माहीत असाव्या लागतात .
( ४ ) त्या वेळची केशभूषा , वेशभूषा , रंगभूषा इत्यादींचे नियोजन करावे लागते
एकूण, चित्रपटाचे वातावरण काळानुरूप वाटण्यासाठी चित्रपटाच्या माध्यमात इतिहास हा विषय आणि त्यातील जाणकार महत्त्वाचे आहेत .
( २ ) संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली .
उत्तर : संत एकनाथांनी लोकशिक्षणाच्या हेतूने अनेक भारुडे लिहिली .
( १ ) या भारुडांच्या विषयांत विविधता आणि नाट्यात्मकता होती .
( २ ) विनोदाच्या माध्यमातून लोकांना शिक्षण देण्याचा उपदेश करण्याचा हा प्रकार लोकांनाही आवडला .
( ३ ) ही भारुडे चालींवर गायली जात असत . त्यामुळे लोकसंगीताच्या आधारे ती गायली जात असत .
( ४ ) व्यवहारातील साध्या साध्या उदाहरणांतून आणि विनोदाच्या माध्यमातून रचलेली संत एकनाथांची ही भारुडे म्हणूनच लोकप्रिय झाली .
६. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास
५. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
(१) भारतीय चित्रपटसृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती का आहे?
उत्तर : ( १ ) भारतात चलतचित्रपटाचा प्रारंभ महादेव गोपाळ पटवर्धन कुटुंबीयांनी १८८५ मध्ये केला .
( २ ) १८९९ मध्ये हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर उर्फ सावेदादा यांनी भारतातील पहिला लघुपट तयार करून तो मुंबईत आझाद मैदानावर दाखवला .
( ३ ) दादासाहेब तोरणे , करंदीकर , पाटणकर व दिवेकर यांनी परदेशी तंत्रज्ञांची मदत घेऊन ‘ पुंडलिक ‘ हा कथापट १९१२ मध्ये मुंबईत दाखवला .
( ४ ) दादासाहेब फाळके यांनी १९१३ मध्ये संपूर्ण भारतीय तंत्रज्ञान वापरून स्वतः दिग्दर्शित केलेला ‘ राजा हरिश्चंद्र ‘ हा पहिला भारतीय चित्रपट मुंबई येथे प्रदर्शित केला . अशा रितीने भारतात पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करून प्रदर्शित करण्याचा मान महाराष्ट्राकडे जातो ; म्हणून ‘ भारतीय चित्रपटसृष्टीची जननी ‘ अशी महाराष्ट्राची ख्याती आहे .
( २ ) ‘ पोवाडा ‘ म्हणजे काय , हे स्पष्ट करा .
उत्तर : ( १ ) घडलेल्या प्रसंगातील नाट्य किंवा वीर पुरुषांच्या गुणांचे स्तुतीपर वर्णन करणारी वीररसयुक्त रचना म्हणजे ‘ पोवाडा ‘ होय .
( २ ) पोवाडा हा गद्य – पदयमिश्रित सादरीकरणाचा प्रकार आहे .
( ३ ) तो पूर्वी राजदरबारात वा लोकसमूहासमोर आवेशपूर्णरीत्या डफाच्या तालावर सादर केला जात असे . ( ४ ) पोवाड्यातून तत्कालीन सामाजिक , धार्मिक व राजकीय स्थितीचे , सामाजिक रीतिरिवाजांचे वर्णन केलेले असते .
( ५ ) लोकजागृती आणि मनोरंजन हा पोवाड्यांचा मुख्य हेतू असतो .
( ६ ) दरबारी प्रथा , युद्धांच्या पद्धती , शस्त्रांची नावे यांचे उल्लेख असतात , म्हणून पोवाडा हा इतिहासलेखनाचे उपयुक्त साधनही आहे .
उपक्रम
संत एकनाथांचे एखादे भारुड मिळवून शाळेच्या
सांस्कृतिक कार्यक्रमात साभिनय सादर करा.