७. मानवी वस्ती

७. मानवी वस्ती

प्रश्न १. अचूक पर्यायांसमोरील चौकटीत ✓ अशी खूण करा.

७. मानवी वस्ती

(अ) वस्त्यांचेकेंद्रीकरण खालील प्रमुख बाबीशी निगडित

असते.

(i) समुद्र सान्निध्य

(ii) मैदानी प्रदेश

(iii) पाण्याची उपलब्धता

(iv) हवामान

 

(आ) ब्राझीलच्या अाग्नेय भागात प्रामुख्याने कोणत्या

प्रकारची वस्ती आढळते?

(i) केंद्रित

(ii) रेषाकृती

(iii) विखुरलेली

(iv) ताराकृती

 

(इ) भारतामधील विखुरलेल्या वस्त्यांचा प्रकार कुठे

आढळतो?

(i) नदीकाठी

(ii) वाहतूक मार्गांच्या लगत

(iii) डोंगराळ प्रदेशात

(iv) औद्योगिक क्षेत्रात

 

 (ई) नर्मदा नदीच्या खोऱ्यात केंद्रित वस्ती आढळते.

(i) वनाच्छादन

(ii) शेतीयोग्य जमीन

(iii) उंचसखल जमीन

(iv) उद्योगधंदे

 

 (उ) ब्राझीलमधील कमी नागरीकरण असणारे राज्य

कोणते?

(i) पारा

(ii) आमापा

(iii) एस्पिरितो सान्तो

(iv) पॅराना

 

प्रश्न २. भौगोलिक कारणे लिहा.

 

(अ) पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे.

उत्तर : (१) मानवास दैनंदिन जीवनात पिण्यासाठी व इतर अनेककारणांसाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते. शेती व इतर अनेक उद्योगांसाठी पाणी अत्यावश्यक असते.

(२) पाण्याची उपलब्धता नसल्यास शेतीचा व परिणामी इतर व्यवसायांचा विकास होत नाही. अशा प्रदेशात मानवी वस्तीचा विकास होत नाही.

(३) पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतीचा व परिणामी इतर व्यवसायांचा विकास होतो व मानवी वस्तीचा विकास होतो. अशा प्रकारे, पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे.

 

(आ) ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते.

उत्तर : (१) सुरुवातीच्या काळात युरोपमधील अनेक वसाहतवाद्यांनी ब्राझीलमध्ये लोकवस्त्या निर्माण केल्या. या वस्त्या प्रामुख्याने पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात निर्माण केल्या गेल्या.

(२) ब्राझीलमधील पूर्व किनारपट्टीच्या तुलनेने कमी रुंद पट्ट्यात सम व दमट हवामान, सुपीक जमीन, मुबलक पाणीपुरवठा व साधनसंपत्तीचा मोठ्या प्रमाणावरील साठा आढळतो.

(३) परिणामी, ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात शेती व इतर उद्योगांचा विकास झाला आहे. परिणामी या भागात लोकवस्त्याही विकसित झालेल्या आढळतात. त्यामुळे ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते.

 

(इ) भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे.

उत्तर : (१) ब्राझीलचा ईशान्य भाग हा ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडील पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. (२) या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण केवळ ६०० मिमी आहे. त्यामुळे

हा भाग अवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो.

(३) पर्जन्याच्या अल्प प्रमाणामुळे या भागात शेतीचा पुरेशा प्रमाणात विकास झालेला नाही. परिणामी, या भागात विखुरलेल्या ग्रामीण वस्त्या आढळतात. म्हणून ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत.

 

(ई) ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत.

उत्तर : (१) ब्राझीलचा ईशान्य भाग हा ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडील पर्जन्यछायेचा प्रदेश आहे.

(२) या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण केवळ ६०० मिमी आहे. त्यामुळे हा भाग अवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. (३) पर्जन्याच्या अल्प प्रमाणामुळे या भागात शेतीचा पुरेशा प्रमाणात विकास झालेला नाही. परिणामी, या भागात विखुरलेल्या ग्रामीण वस्त्या आढळतात. म्हणून ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत.

(इ) उत्तर भारतात अन्य राज्यांपेक्षा दिल्ली आणि चंदीगड इथे नागरीकरण जास्त झालेआहे.

उत्तर : (१) उत्तर भारतात अनेक राज्यांत हिमालयाचा पर्वतीय भाग असल्यामुळे तेथे शेती व इतर उद्योगांचा विकास पुरेशा प्रमाणात झाल्याचे आढळत नाही. परिणामी उत्तर भारतात अनेक राज्यांत नागरीकरणाचा वेग कमी आहे.

(२) याउलट, दिल्ली आणि चंदीगढ ही शहरे मैदानी भागात आहेत. दिल्ली ही भारताची राजधानी आहे आणि चंदीगढ पंजाब व हरियाणा या राज्यांची राजधानी आहे.

(३) दिल्ली व चंदीगढ या दोन्ही शहरांत अनेक प्रशासकीय कार्यालये, विविध उदयोग, बँका, इतर सोईसुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे, उत्तर भारतात अन्य राज्यांपेक्षा दिल्ली आणि चंदीगढ इथे नागरीकरण जास्त झाले आहे.

प्रश्न ३. थोडक्यात उत्तरे लिहा.

(अ) भारत आणि ब्राझील या देशांचा नागरीकरणाबाबत तुलनात्मक आढावा घ्या.

उत्तर : (१) भारत व ब्राझील या दोन देशांपैकी ब्राझीलमध्ये ● अधिक नागरीकरण व भारतात कमी नागरीकरण झाल्याचे आढळून येते.

(२) २०११ च्या आकडेवारीनुसार भारतातील नागरीकरणाचे प्रमाण हे केवळ ३१.२ टक्के होते. याउलट २०१० च्या आकडेवारीनुसार ब्राझीलमधील नागरीकरणाचे प्रमाण हे सुमारे ८४.६ टक्के होते.

(३) १९६१ ते २०११ या पन्नास वर्षांच्या कालखंडात भारतातील जागरी लोकसंख्येच्या टक्केवारीत १८ टक्क्यांपासून ३१.२ टक्क्यांपर्यंत सातत्याने वाढ झाली आहे.

(४) भारताप्रमाणेच, १९६० ते २०१० या पन्नास वर्षांच्या कालखंडात ब्राझीलमधील नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीतही ४७.१ टक्क्यांपासून ८४.६ टक्क्यांपर्यंत सातत्याने वाढ झाली आहे.

(५) भारतात १९६१ ते २०११ या पन्नास वर्षांच्या कालखंडात एकूण नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीत सातत्याने वाढ होत गेली असल्याचे आढळते.

(६) भारतात १९६१ ते २०११ या पन्नास वर्षांच्या कालखंडात प्रत्येक दशकात नागरी लोकसंख्येच्या वाढीचा दर कमी-अधिक असल्याचे आढळून येते.

(७) ब्राझीलमध्ये १९६० ते २०१० या पन्नास वर्षांच्या कालखंडात प्रत्येक दशकात एकूण नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीत सातत्याने वाढ होत गेली.

(८) परंतु, ब्राझीलमध्ये १९६० ते २०१० या पन्नास वर्षांच्या कालखंडात प्रत्येक दशकातील नागरी लोकसंख्येच्या वाढीचा दर हा क्रमशः घटत जाणारा आढळून येतो.

 

(आ) गंगा नदीचे खोरेआणि ॲमेझॉन नदीचे खोरे यांतील मानवी वस्त्यांबाबत फरक स्पष्ट करा.

उत्तर : (१) गंगा नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात सौम्य हवामान आढळते. (२) गंगा व तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे गंगा

नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात सुपीक मृदा आढळते.

(३) गंगा नदीच्या खोऱ्यातील सुपीक जमिनीवर शेतीचा विकास झाला आहे. परिणामी, इतर उद्योगांचाही विकास झाला आहे.

(४) गंगा नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात वाहतुकीच्या सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. त्यामुळे गंगा नदीच्या खोऱ्यात दाट व केंद्रित स्वरूपाची मानवी वस्ती आढळून येते.

(५) अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात रोगट हवामान आढळते.

(६) अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यातील घनदाट वर्षावनांमुळे तेथील प्रदेश दुर्गम बनला आहे.

(७) अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यातील नैसर्गिक साधनसंपत्तीच्या शोधावर व त्यांच्या वापरावर नैसर्गिकरीत्या मर्यादा आल्या आहेत.

(८) अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात पुरेशा प्रमाणात वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात विरळ व विखुरलेल्या स्वरूपाची मानवी वस्ती आढळून येते.

(इ) मानवी वस्त्यांची वाढ विशिष्ट स्थानीच झालेली का आढळते?

उत्तर (१) अवर्षणग्रस्त प्रदेश, वाळवंटी प्रदेश, नापीक जमिनीचे प्रदेश, अपुरा सूर्यप्रकाश, रोगट हवा इत्यादी घटक मानवी वस्तीस प्रतिकूल ठरतात.

(२) अशा प्रदेशांत शेती व इतर उद्योगांचा विकास होत नाही. परिणामी, अशा प्रदेशांत मानवी वस्तीची वाढ होत नाही.

(३) स्वच्छ हवा, पुरेसा सूर्यप्रकाश, पाण्याची उपलब्धता, सुपीक जमीन, पुरेसे पर्जन्य इत्यादी घटक मानवी वस्तीस अनुकूल ठरतात.

(४) मानवी वस्तीस अनुकूल ठरणारे घटक ज्या प्रदेशांत आढळतात, अशा प्रदेशांत शेती व इतर उद्योगांचा जलद गतीने विकास होतो व त्यामुळे अशा प्रदेशांत मानवी वस्तीची वाढ होते. अशा प्रकारे, मानवी वस्त्यांची वाढ विशिष्ट स्थानीच झालेली आढळते.

७. मानवी वस्ती

*****

Print Friendly, PDF & Email
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.