८. पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय ( इयत्ता दहावी )

८. पर्यटन आणि इतिहास

स्वाध्याय

१. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

८. पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय

(१) कुकने ……….. विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला.

(अ) हस्तकौशल्याच्या वस्तू

(ब) खेळणी

(क) खाद्यवस्तू

(ड) पर्यटन तिकिटे

उत्तर :

कुकने पर्यटन तिकिटे विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला.

 

(२) महाबळेश्वरजवळील भिलार हे ……….. गाव म्हणून प्रसिद्ध आहे.

(अ) पुस्तकांचे (ब) वनस्पतींचे

(क) आंब्याचे (ड) किल्ल्यांचे

उत्तर :

महाबळेश्वरजवळील भिलार हे पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे.

 

(ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.

(१) माथेरान – थंड हवेचे ठिकाण

(२) ताडोबा – लेणी

(३) कोल्हापूर – देवस्थान

(४) अजिंठा – जागतिक वारसास्थळ

उत्तर : चुकीची जोडी : ताडोबा – लेणी

 

८. पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय

२. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

(१) आजच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे.

उत्तर : ( १ ) जहाज , रेल्वे आणि विमान या वाहतूक क्षेत्रांत झालेल्या प्रगतीमुळे आधुनिक काळात आंतरराष्ट्रीय पर्यटन सोपे झाले आहे .

( २ ) विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती व आर्थिक उदारीकरण यांमुळे जग अधिक जवळ आले आहे .

( ३ ) अभ्यास , व्यवसाय , चित्रपटांचे चित्रीकरण यांसारख्या विविध कारणांसाठी लोक जगभरातील ठिकाणांना भेटी देतात .

( ४ ) खेळ , आंतरराष्ट्रीय परिषदा , संमेलने , ऐतिहासिक – धार्मिक स्थळे पाहणे या उद्देशानेही लोक जगभर हिंडत असतात . त्यामुळे आजच्या काळात लोकांचे परदेशात जाण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढत आहे .

 

(२) आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे.

उत्तर : भारताला संपन्न असा नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे . हा वारसा आपण जपला पाहिजे ; कारण –

( १ ) आपल्या ऐतिहासिक वास्तू , किल्ले , ठिकाणे ही भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहेत . या ऐतिहासिक वारशामुळे आपल्याला प्रेरणा व स्फूर्ती मिळते .

( २ ) विविधतेने नटलेल्या भारतात अनेक नदया , पर्वत , जंगले , अभयारण्ये , समुद्रकिनारे आहेत व ते पाहण्यासाठी हजारो पर्यटक परदेशातून येतात .

( ३ ) भारतीय नृत्य , साहित्य , विविध कला , तत्त्वज्ञान यांचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील लोक भारतात येतात .

( ४ ) आपला नैसर्गिक आणि पूर्वजांनी दिलेला सांस्कृतिक वारसा हे आपले वैभव असून तो पुढील पिढ्यांसाठी आपण जपला पाहिजे .

८. पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय

३. टीपा लिहा.

(१) पर्यटनाची परंपरा

उत्तर : ( १ ) अन्नाच्या शोधासाठी आणि सुरक्षेसाठी अश्मयुगातील माणूस सतत भ्रमंती करीत होता . पण हे त्याचे पर्यटन नव्हते . नवाश्मयुगानंतर काही उद्देशाने माणूस पर्यटन करू लागला .

( २ ) भारताला पर्यटनाची परंपरा प्राचीन काळापासून लाभली आहे . तीर्थयात्रा करणे , परिसरातील जत्रा यात्रांमध्ये भाग घेण्यासाठी जाणे हे त्याचे धार्मिक पर्यटन होते .

( ३ ) व्यापारासाठी दूरवर प्रवास केला जाई . विद्याभ्यासासाठी दूरच्या प्रदेशात जाणे असेही पर्यटन होत असे . नालंदा , तक्षशिला अशा विद्यापीठांत शिकण्यासाठी बाहेरील देशांतील विद्यार्थी येत असत .

( ४ ) मानवाला फिरण्याची उपजतच आवड असल्याने प्राचीन काळापासून पर्यटनाला मोठी परंपरा लाभली आहे .

 

( २ ) मार्को पोलो .

उत्तर : ( १ ) मार्को पोलो या जगप्रवाशाचा जन्म इ.स. १२५४ मध्ये इटलीतील व्हेनिस या शहरात एका व्यापारी कुटुंबात झाला .

( २ ) तेराव्या शतकाच्या अखेरीस रेशीम मार्गावरून चीनपर्यंत प्रवास करणारा तो पहिला युरोपियन होय . त्याने लिहिलेले प्रवासवर्णन हा पश्चिम आशियाची माहिती देणारा स्रोतग्रंथ ठरला .

( ३ ) आशियातील समाजजीवन , सांस्कृतिक जीवन , निसर्ग आणि व्यापार यांची ओळख त्याने आपल्या ग्रंथातून जगाला करून दिली . यातूनच युरोप व आशिया यांच्यात संवाद व व्यापार सुरू झाला .

( ४ ) भारताच्या दक्षिण किनारपट्टीतूनही त्याने प्रवास केला . दक्षिणेतील मलबार प्रांताचे लोकजीवन , तेथील गूढविद्या यांचेही वर्णन स्थाने आपल्या पुस्तकात केले आहे .

 

(३) कृषी पर्यटन

उत्तर : ( १ ) शेती आणि शेतीशी संबंधित उपक्रम पाल्पासाठी केलेला प्रवास म्हणजे ‘ कृषी पर्यटन ‘ होय .

( २ ) अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात कृषी संशोधन चालू आहेत . त्यासाठी भारतभर कृषी संशोधन केंद्रे आणि कृषी विदयार्थी स्थापन झालेली आहेत .

( ३ ) कोणत्या पिकांना कोणती माती योग्य , तिचा दर्जा , गां शेती . शेततळी , फळबागा इत्यादी उपक्रम काही भागांत घेतले जातात , सिक्कीमसारखे राज्य सेंद्रिय उत्पादक राज्य म्हणून घोषित झाले आहे .

( ४ ) पावसाचे प्रमाण कमी असूनही इझाएलसारख्या देशाने शेतीच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली . हे सर्व अभिनव प्रकल्प व उपक्रम तसेच शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माहितीसाठी शेतकरी , विद्यार्थी , शहरी लोक जात असतात . परदेशी लोकही येतात . यामुळे आज कृषी पर्यटन झपाट्याने वाढत आहे .

८. पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय

४. पुढील प्रश्नांची सविस्‍तर उत्तरे लिहा.

(१) पर्यटनाच्या विकासासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे?

उत्तर : आधुनिक काळात पर्यटन ही रोजगाराभिमुख आणि देशाच्या विकासाला मदत करणारी बाब ठरली आहे . म्हणून पर्यटनाच्या विकासासाठी पुढील काळजी घेतली पाहिजे –

( १ ) पर्यटकांच्या जीविताची सुरक्षितता आणि सुरक्षित वाहतूक याकडे लक्ष दिले पाहिजे .

( २ ) पर्यटकांना उत्तम दर्जाची निवासव्यवस्था , प्रवासात उत्तम व स्वच्छ प्रसाधनगृहे उपलब्ध करून दिली पाहिजेत . सुखसोयी ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळे स्वच्छ व सुविधायुक्त ठेवली पाहिजेत .

( ३ ) पर्यटकांना प्रेक्षणीय स्थळांची माहितीपुस्तिका , नकाशे , मार्गदर्शिका , गाईड , दुभाषे इत्यादी सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत . दिव्यांगांच्या पर्यटनातील गरजांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे .

 

(२) पर्यटन व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर राेजगार निर्मिती कशी होते?

उत्तर : ( १ ) पर्यटनस्थळांच्या परिसरात बाजारपेठांचा विस्तार होऊन वस्तूंच्या खरेदी – विक्रीत वाढ होते .

( २ ) पर्यटकांना आवडणाऱ्या वस्तूंच्या निर्मितीत वाढ होते , त्यामुळे स्थानिक हस्तोदयोग व कुटीरोद्योगांचा विकास होतो . स्थानिक खादयपदार्थ , हॉटेल व्यवसाय व निवासी व्यवस्था या व्यवसायांचा विकास होतो .

( ३ ) प्रवाशांच्या वाहतुकीसाठी बस , रिक्षा , टॅक्सी अशा वाहतूक क्षेत्रातील व्यवसाय वाढतात .

( ४ ) प्रवासी एजंट , पर्यटन मार्गदर्शक ( गाईड ) , फोटोग्राफर इत्यादी असे नवे रोजगार निर्माण होतात . थोडक्यात पर्यटन व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती होते .

 

(३) आपल्या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने कसा विकास कराल?

उत्तर : आपला परिसर कसा आहे , हे विचारात घेऊन त्याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करायला हवा . त्या दृष्टीने पुढील बाबी करायला हव्यात –

( १ ) परिसरातील ऐतिहासिक वास्तू आणि मंदिरे जतन केली पाहिजेत . त्यांची माहिती फलकावर लावणे , स्वच्छतेकडे लक्ष देणे या बाबी विचारात घ्याव्यात . समुद्रकिनारे स्वच्छ करून पर्यटन वाढवता येईल .

( २ ) गांडूळ प्रकल्प , शून्य कचरा प्रकल्प , सोलर वीज प्रकल्प , जैविक शेती असे विविध प्रकल्प राबवल्यास ते पाहण्यासाठी पर्यटक येतील .

( ३ ) परिसरातील कला , संस्कृती , हस्तोदयोग , कुटीरोद्योग यांना चालना दिल्यास हे उदयोग पाहण्यासाठी , खरेदीसाठी पर्यटक येतील . आपल्या परिसराचा औदयोगिक , भौगोलिक , सांस्कृतिक , शैक्षणिक विकास केल्यास पर्यटन निश्चितच वाढेल , असे मला वाटते .

८. पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय

५. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

उत्तर:

८. पर्यटन आणि इतिहास

८. पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय

६. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

(१) पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे स्पष्ट करा.

उत्तर : पर्यटनाशी संबंधित अशी पुढील व्यावसायिक क्षेत्रे आहेत –

( १ ) पर्यटकांच्या राहण्यासाठी असणारी निवासस्थाने ( लॉजेस ) चालवणे ती बांधण्यासाठी संबंधित असणारे उद्योग .

( २ ) खाद्य पदार्थांची दुकाने , हॉटेल्स , खानावळी इत्यादी उदयोग .

( ३ ) हस्तोदयोग व कुटीरोदयोग आणि त्यांच्या विक्रीची दुकाने .

( ४ ) हॉटेलांशी संबंधित दूध , भाज्या , किराणा इत्यादी शेती व पशुउद्योग .

( ५ ) पर्यटकांच्या वाहतुकीसाठी असणारे बस , रिक्षा , टॅक्सी आदी उद्योग .

( ६ ) प्रवासी एजंटस् , फोटोग्राफर , मार्गदर्शक ( गाईडस् ) , ठिकाणांची माहिती छापणारा मुद्रण व्यवसाय इत्यादी व्यवसायही पर्यटनाशी संबंधित असतात . त्यामुळे माझ्या मते पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा व्यवसाय होऊ शकतो .

 

(२) पर्यटनाचे कोणतेही तीन प्रकार स्पष्ट करा.

उत्तर : पर्यटनाचे अनेक प्रकारांत वर्गीकरण करण्यात येते . यांतील प्रमुख तीन प्रकार –

( १ ) ऐतिहासिक पर्यटन : पर्यटन आणि इतिहास यांचे नाते अतूट आहे . म्हणूनच जगभरातील पर्यटकांचा ऐतिहासिक ठिकाणे पाहण्यासाठी ओघ वाढतच आहे . आपल्या पूर्वजांचे पराक्रम , त्यांनी निर्मिलेल्या वास्तू पाहणे हा कुतूहलाचा विषय असतो . शिवरायांनी बांधलेले किल्ले , राजांचे राजवाडे , स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांची स्मारके , महात्मा गांधी , आचार्य विनोबा भावे यांसारख्या विभूतींचे आश्रम अशा ऐतिहासिक स्थळांना पर्यटक भेटी देतात , जगभरातच असे ऐतिहासिक पर्यटन मोठ्या प्रमाणात केले जाते .

( २ ) भौगोलिक पर्यटन : अभयारण्ये , समुद्रकिनारे , नद्यांचे संगम , लोणारसारखी उल्कापाताने निर्माण झालेली सरोवरे , बेटे , धबधबे , पर्वतराजी व अभयारण्ये हे प्रत्येक देशाचे वैभव असते . निसर्गराजीत राहायला , निसर्गाचा आनंद उपभोगायला प्रत्येकालाच आवडतो . निसर्गाची ओढ , कुतूहल आणि विरंगुळा यांसाठी जगभरातील लोक अशा ठिकाणांना भेटी देतात . हे भौगोलिक पर्यटन होय .

( ३ ) आंतरराष्ट्रीय पर्यटन : आधुनिक काळात झालेल्या वाहतुकीच्या सोयींमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन वाढले आहे . आंतरराष्ट्रीय परिषदा , विश्वसंमेलने , बैठका , व्यावसायिक कामे , स्थलदर्शन , धार्मिक स्थळांना भेटी आदी निमित्ताने आंतरराष्ट्रीय पर्यटन मोठ्या प्रमाणात चालते . आर्थिक उदारीकरण आणि जागतिकीकरण यांमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना मिळालेली आहे .

 

उपक्रम

ऐतिहासिक स्थळांच्या जतन व संवर्धनाची गरज

स्पष्ट करा. यासाठी कोणत्या उपाययोजना करता

येतील, याची चर्चा करा.

 

Print Friendly, PDF & Email
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.