[6 December] डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषण महापरिनिर्वाण दिन | Dr Babasaheb Ambedkar Speech in Marathi

[6 December] डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषण महापरिनिर्वाण दिन – नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी  Dr Babasaheb Ambedkar Speech in Marathi डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषण महापरिनिर्वाण दिनानिम्मित घेऊन आलो आहे.

तसेच डॉ.भीमराव आंबेडकरांचे विचार Dr. Bhimrao Ambedkar Quotes, डॉ. बी.आर आंबेडकर यांचे शैक्षणिक चरित्र Academic Biography of Dr.BR Ambedkar, डॉ. बी.आर. आंबेडकरांबद्दल काही कमी ज्ञात तथ्ये  Some Lesser Known Facts About Dr. B.R.Ambedkar, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या पुस्तकांची यादी | List of books written by Ambedkar in Marathi, GK questions and answers on Doctor B.R. Ambedkar या विषयी माहिती घेऊन आलो आहे.

Table of Contents

सदर पोस्टमध्ये आपन काय बघणार आहोत.

1.डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषण महापरिनिर्वाण दिन | Dr Babasaheb Ambedkar Speech in Marathi
2.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी | Dr Babasaheb Ambedkar Speech in Marathi
3.डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी | Dr Babasaheb Ambedkar Essay in Marathi
4.डॉ.भीमराव आंबेडकरांचे विचार Dr. Bhimrao Ambedkar Quotes
5.डॉ. बी.आर आंबेडकर यांचे शैक्षणिक चरित्र Educational Biography of Dr.BR Ambedkar
6.डॉ. बी.आर. आंबेडकरांबद्दल काही कमी ज्ञात तथ्ये  Some Lesser Known Facts About Dr. B.R.Ambedkar
7.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या पुस्तकांची यादी | List of books written by Ambedkar in Marathi
8.GK questions and answers on Doctor B.R. Ambedkar

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषण महापरिनिर्वाण दिन | Dr Babasaheb Ambedkar Speech in Marathi

मोजता येत नाही उंची, बाबासाहेबांच्या कार्याची,

त्यांनी जगाला शिकवली, भाषा माणुसकीची….

आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार !

आज ६ डिसेंबर ! हा दिवस आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘महा- परिनिर्वाण दिन’ म्हणून साजरा करीत आहोत. महापरिनिर्वाण हे बौद्ध धर्माचे तत्व व ध्येय आहे. बौध्द धर्मानुसार, जो निर्वाण प्राप्त करतो तो सांसारिक वासना, जीवनातील वेदना तसेच जीवनचक्रातून मुक्त होतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक वर्षे बौद्ध धर्माचा अभ्यास केला होता. त्यांनी आपल्या असंख्य अनुयायांसह सन १९५६ मध्ये बौद्ध धर्माचा स्विकार केला होता. त्यांच्या महान विचार व कार्यामुळे, त्यांची पुण्य- तिथी ‘महापरिनिर्वाण दिन’ म्हणून साजरी केला जातो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव डॉ. भिमराव रामजी आंबेडकर है होते. त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई हे होते.

बाबासाहेब आंबेडकर लहान- – पणापासून खूप हुशार व महत्त्वाकांक्षी विचारांचे होते. त्यांना शालेय वयात ‘अस्पृश्य’ म्हणून अपमान सहन करावा लागला पण ते मुळीच खचले नाहीत. त्यांनी खूप कष्टातून आपले उच्च शिक्षण पूर्ण केले.

त्यांनी अस्पृश्य व दीनदलितांचा उध्दार केला. उपेक्षितांच्या जीवनात अस्मितेची ज्योत पेटवली. स्वत: च्या अलौकिक बुध्दीचा वापर समाजासाठी केला. त्यांनी आपल्या बांधवांना ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ असा मोलाचा संदेश दिला. गोरगरीब, दीनदलितांच्या न्याय व हक्कांसाठी अनेक आंदोलने व सत्याग्रहे केली.

डॉ. बाबासाहेबांचा भारतीय राज्यघटना लिहण्यात सिंहाचा वाटा आहे. त्यांना ‘भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात.

डॉ. बाबासाहेबांचे कार्य कोणालाही शब्दात मांडता येणार नाही. असा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा महामानव, युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर ६ डिसेंबर १९५६ रोजी काळाच्या पडद्याआड गेले. सारा देश हळहळला. दादरच्या चैत्यभूमीवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आजही लाखो अनुयायी ६ डिसेंबरला चैत्यभूमी. स भेट देतात व डॉ. बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहतात.

अशा या महामानवास माझे कोटी कोटी प्रणाम ! धन्यवाद ! जय हिंद, जय भारत, जय भीम!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी | Dr Babasaheb Ambedkar Speech in Marathi

भारतभूच्या मुकुटातील।

एक हिरा निखळला होता।।

विश्वाला करुनी प्रकाशित।

आज प्रज्ञा सूर्य मावळला होता।।

आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार !

होय मित्रांनो आजचाच तो 6 डिसेंबर 1956 चा दिवस होता जेव्हा महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले होते आणि दिनांक ७ डिसेंबर 1956 या दिवशी मुंबई येथील चैत्यभूमीवर लाखोंच्या जनसमुदायाच्या साक्षीने त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले. मित्रांनो येणाऱ्या पिढ्यांना बाबासाहेबांचे प्रचंड कर्तुत्व आणि असामान्य विचार करावेत म्हणून संपूर्ण भारतात आजच्याच दिवशी बाबासाहेबांना अभिवादन केले जाते, त्यांच्या विचारांचे स्मरण केले जाते.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काळाच्या अविरत प्रवाहात जन्मलेले एक अलौकिक युगपुरुष. ज्यांनी आपल्या कर्तृत्वातून काळाच्या प्रवाहालाच कलाटणी दिली. हजारो वर्षांपासून दारिद्र्य, शोषण आणि अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या माणसांना सन्मानाने जगायला शिकवलं. स्वतः दिव्याप्रमाणे जळून या माणसांची आयुष्य प्रकाशित केलीत.

मित्रहो, बाबासाहेबांचे आयुष्य एक धगधगते यज्ञकुंड होते. त्यांच्या संपूर्ण आयुष्याला एका शब्दात सांगायचे म्हटले तर तो शब्द म्हणजे संघर्ष…

संघर्ष शिक्षणासाठीचा।

संघर्ष सन्मानासाठीचा।।

संघर्ष सामाजिक जागृतीचा।

आणि संघर्ष संविधान निर्मितीचा।।

दिनांक ६ डिसेंबरच्या दिवशी या संघर्षाला पूर्णविराम मिळाला नाही तर बाबासाहेबांचा हा संघर्ष अमर झाला. क्रांतीच्या परिवर्तनाच्या आणि सुधारणेच्या वाटेवर चालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी जो संघर्ष दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करीत राहील. दुरस्त शिखराप्रमाणे प्रेरणा देत राहील. आजच्या दिवशी या प्रज्ञासूर्याला आठवताना आपण आपल्यालाच हा प्रश्न करायला हवा की त्यांच्या स्वप्नातला देश आपण बनवू शकलो आहोत काय. स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्यांवर आधारित समाजाची बाबासाहेबांची प्रतिज्ञा प्रत्यक्षात उतरली आहे काय. जात धर्म आणि समुदायाच्या पलीकडे बघण्याची जी दृष्टी संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेब आपल्याला देऊन गेलेत ती आपण अंगीकारली आहे काय?

प्रश्न थेट आहे, प्रश्न बिकट आहे परंतु करुणा आणि शांतीचे प्रतीक असलेल्या भगवान बुद्धांच्या या कर्मभूमीत, प्रभू रामचंद्राच्या या भारत भूमीत माणसांना उत्तर असाध्य नाहीत. आज पर्यावरण बदल, धार्मिक तेढ, व्यसनाधीनता, बेरोजगारी, स्त्रियांवरील अत्याचार, भ्रष्टाचार अशा अनेक समस्यांनी राष्ट्राला व्यापले आहे. या प्रश्नांची उत्तर शोधणाऱ्या माणसांना बाबासाहेबांचा “शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष” करा हा मंत्रच मार्ग दाखवू शकतो यावर माझा ठाम विश्वास आहे.

या देशाच्या संविधानावर पूर्ण विश्वास असलेल्या, आपल्या हक्कांच्या प्रती जागरूक आणि कर्तव्यांच्या प्रती जबाबदार असणाऱ्या, न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांवर विश्वास असणाऱ्या सुदृढ समाजाची आपण जेव्हा निर्मिती करू तीच या मानवाला खरी श्रद्धांजली असेल असे मला वाटते.

शेवटी एवढच म्हणेन,

पुस्तकांच्या मशाली हातात घेऊन।

अज्ञानाच्या काळोखांशी समर असतात।।

मोठी माणसे गेलीत तरीही त्यांचे।

विचार मात्र अमर असतात।।

! जय हिंद, जय महाराष्ट्र!

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी | Dr Babasaheb Ambedkar Essay in Marathi

‘तळपत राहून सूर्यासारखे, अविरत झिजलात चंदनासमान, ” बनवलं माणूस शिकवली मानवता, झाले मनामनावर विराजमान ! | साऱ्या भारत विश्वाची तुम्ही शान, गाऊ किती मी तुमचे गुणगान !!”

आजच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष, पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या विद्यार्थी मित्रांनो…….

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भिमाबाई होते. शाळेत व महाविद्यालयात अस्पृश्यतेमुळे त्यांचा अनेकदा मानभंग झाला होता. त्यांचे माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झाले. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड व कोल्हापूरचे शाहू महाराज यांच्या आर्थिक सहाय्याने परदेशात जाऊन त्यांनी अर्थशास्त्र या विषयात एम. ए., पीएचडी या पदव्या मिळवल्या आणि ते बॅरिस्टरही झाले.

उच्चवर्णीयांकडून वर्षानुवर्ष होणाऱ्या पिळवणुकी दलित समाज भरडला जात होता, अशा या निद्रिस्त समाजाला जागृत करण्याचे अवघड कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. दलित समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी 1927 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडला चवदार तळे येथे सत्याग्रह केला. अस्पृश्यांना मदिरात प्रवेश मिळावा म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या काळाराम मंदिरातील प्रवेशा- साठीही सत्याग्रह करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिण्याचे महान कार्य केले. त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्या लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले.

! जय हिंद, जय महाराष्ट्र!

डॉ.भीमराव आंबेडकरांचे विचार Dr. Bhimrao Ambedkar Quotes

१.” जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत.”

2. “शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा.”

3. “मला स्वातंत्र्य, समानता आणि बंधुभाव शिकवणारा धर्म आवडतो”

4. “आयुष्य मोठे न होता महान असावे”.

5. “धर्म माणसासाठी आहे आणि माणूस धर्मासाठी नाही.”

6. “मनाची मशागत करणे हे मानवी अस्तित्वाचे अंतिम उद्दिष्ट असले पाहिजे”.

7. “जर तुमचा आदरपूर्ण जीवन जगण्यावर विश्वास असेल, तर तुमचा स्व-मदतीवर विश्वास आहे जी सर्वोत्तम मदत आहे”.

8. “आपण स्वतःच्या पायावर उभे राहून आपल्या हक्कांसाठी जमेल तेवढे लढले पाहिजे. त्यामुळे तुमची चळवळ चालू ठेवा आणि तुमचे सैन्य संघटित करा. सत्ता आणि प्रतिष्ठा तुम्हाला संघर्षातूनच मिळेल.

9. माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची

10. “महिलांनी मिळवलेल्या प्रगतीच्या प्रमाणात मी समाजाची प्रगती मोजतो.”

11. “पुरुष नश्वर आहेत. तसेच कल्पना आहेत. एखाद्या वनस्पतीला जितके पाणी पिण्याची गरज असते तितकीच एखाद्या कल्पनेचा प्रसार आवश्यक असतो. नाहीतर दोघेही कोमेजून मरतील.”

12. “एक देश दुसऱ्या देशावर राज्य करण्यास योग्य नाही असे मिलच्या मताची पुनरावृत्ती करणाऱ्या प्रत्येक माणसाने हे मान्य केले पाहिजे की एक वर्ग दुसऱ्या वर्गावर राज्य करण्यास योग्य नाही.”

14. “सामाजिक जुलूमशाहीच्या तुलनेत राजकीय जुलूम काहीच नाही आणि समाजाचा अवमान करणारा सुधारक हा शासनाचा अवमान करणाऱ्या राजकारण्यापेक्षा अधिक धैर्यवान माणूस आहे.”

15. “महान माणूस प्रतिष्ठित व्यक्तीपेक्षा वेगळा असतो कारण तो समाजाचा सेवक होण्यास तयार असतो.”

16. “कायदा आणि सुव्यवस्था हे शरीराच्या राजकारणाचे औषध आहे आणि जेव्हा राजकीय शरीर आजारी पडते तेव्हा औषध दिले पाहिजे.”

डॉ. बी.आर आंबेडकर यांचे शैक्षणिक चरित्र Educational Biography of Dr.BR Ambedkar

Dr. B. R. Ambedkar (MA., Ph.D., M.Sc., D.Sc., Barrister-at-Law, L.L.D., D.Litt)

1. प्राथमिक शिक्षण, 1902 सातारा, महाराष्ट्र

2. मॅट्रिक, 1907, एल्फिन्स्टन हायस्कूल, बॉम्बे पर्शियन इ.,

3. इंटर 1909, एल्फिन्स्टन कॉलेज, बॉम्बे पर्शियन आणि इंग्रजी

4. B.A, 1913, एल्फिन्स्टन कॉलेज, बॉम्बे, बॉम्बे विद्यापीठ, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र

5. M.A, 1915 समाजशास्त्र, इतिहास तत्वज्ञान, मानववंशशास्त्र आणि राजकारणासह अर्थशास्त्रात प्रमुख

6. Ph.D., 1917, कोलंबिया विद्यापीठाने पीएच.डी.ची पदवी प्रदान केली.

7. M.Sc, 1921 जून, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, लंडन. प्रबंध – ‘ब्रिटिश भारतातील इम्पीरियल फायनान्सचे प्रांतिक विकेंद्रीकरण’

8. बॅरिस्टर-एट-लॉ 30-9-1920 ग्रेज इन, लंडन लॉ

(१९२२-२३, जर्मनीतील बॉन विद्यापीठात अर्थशास्त्र वाचण्यात थोडा वेळ घालवला.)

9. D. SC नोव्‍हेंबर 1923, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, लंडन ‘द प्रॉब्लेम ऑफ द रुपी – इट्स ओरिजिन अॅण्ड इट्स सोल्युशन’ ही पदवी अर्थशास्त्रातील पदवीसाठी स्वीकारली गेली.

10. L.L.D (Honoris Causa) 5-6-1952 कोलंबिया युनिव्हर्सिटी, न्यू यॉर्क त्यांच्या उपलब्धी, नेतृत्व आणि भारताच्या संविधानाचे लेखन

11. D.Litt (ऑनॉरिस कॉसा) 12-1-1953 उस्मानिया युनिव्हर्सिटी, हैदराबाद त्यांच्या कामगिरीसाठी, नेतृत्व आणि भारताची राज्यघटना लिहिण्यासाठी

डॉ. बी.आर. आंबेडकरांबद्दल काही कमी ज्ञात तथ्ये  Some Lesser Known Facts About Dr. B.R.Ambedkar

डॉ.बी.आर. परदेशात अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवणारे आंबेडकर हे पहिले भारतीय होते.

१९३५ मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेत आंबेडकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

1927 चा महाड सत्याग्रह हा आंबेडकरांचा पहिला महत्त्वाचा धर्मयुद्ध होता.

डॉ.बी.आर. आंबेडकरांनी भारतात कामाचे तास 14 तासांवरून 8 तास केले.

आंबेडकरांचे आत्मचरित्र कोलंबिया विद्यापीठात पाठ्यपुस्तक म्हणून वापरले जाते.

डॉ.बी.आर. आंबेडकरांनी भारतीय संविधानातील कलम ३७० ला विरोध केला होता

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या पुस्तकांची यादी | List of books written by Ambedkar in Marathi

  1. भारतातील जाती: त्यांची यंत्रणा, उत्पत्ती आणि विकास (1916)
  2. मूक नायक (1920)
  3. द प्रॉब्लेम ऑफ द रुपी: इट्स ओरिजिन अँड इट सोल्युशन (1923)
  4. बहिष्कृत भारत (1927)
  5. जनता (१९३०)
  6. जातीचे उच्चाटन (1936)
  7. फेडरेशन विरुद्ध स्वातंत्र्य (1939)
  8. थॉट्स ऑन पाकिस्तान (1940)
  9. रानडे, गांधी आणि जिना (1943)
  10. मिस्टर गांधी आणि अस्पृश्यांची मुक्ती (1943)
  11. काँग्रेस आणि गांधींनी अस्पृश्यांसाठी काय केले (1945)
  12. पाकिस्तान किंवा भारताचे विभाजन (1945)
  13. राज्य आणि अल्पसंख्याक (1947)
  14. शूद्र कोण होते (1948)
  15. भाषिक प्रांत म्हणून महाराष्ट्र (1948)
  16. अस्पृश्य (१९४८)
  17. बुद्ध किंवा कार्ल मार्क्स (1956)
  18. बुद्ध आणि त्याचा धम्म (1957)
  19. हिंदू धर्मातील कोडे (2008)
  20. मनु आणि शूद्र

GK questions and answers on Doctor B.R. Ambedkar

Q.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोणता पुरस्कार  मिळाला?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांना 1990 साली भारतरत्न पुरस्कार मिळाला.

Q.डॉ. बाबासाहेब कुठे आंबेडकरांनी अभ्यास केला?

एल्फिन्स्टन हायस्कूल (1904-1907)

एल्फिन्स्टन कॉलेज (1908-1912)

कोलंबिया विद्यापीठ (१९१३-१९१५)

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स (1916-1921)

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स (1923)

Q.डॉ.बी.आर. आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्त्व कसे सांगितले?

त्यांच्या मते, “शिक्षण हे माणसाला निर्भय बनवते, त्याला एकतेचा धडा शिकवते, त्याला त्याच्या हक्कांची जाणीव करून देते आणि त्याच्या हक्कांसाठी संघर्ष करण्याची प्रेरणा देते.” त्यांचा नारा होता- शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा.

Q.डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.

1. ते एकमेव भारतीय आहेत ज्यांचा लंडन संग्रहालयात कार्ल मार्क्सच्या बाजूने पुतळा उभारण्यात आला आहे.

2. डॉ. बी.आर. आंबेडकर यांचे वैयक्तिक ग्रंथालय राजगिर्ह, 50 हजारांहून अधिक पुस्तके असलेले जगातील सर्वात मोठे खाजगी ग्रंथालय होते.

Q.भीमराव आंबेडकरांनी कोणत्या बँकेच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

Q.”द प्रॉब्लेम ऑफ द रुपी: इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन” या पुस्तकाचे लेखक कोण होते?

Dr. B.R. Ambedkar

तर मित्रांनो हे होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषण महापरिनिर्वाण दिन | Dr Babasaheb Ambedkar Speech in Marathi या भाषणाचा आपण योग्य पद्धतीने सराव करावा अशी आमची इच्छा आहे.आशा आहे आपणास हे भाषण आवडले असतील. आपले विचार कमेन्ट करून नक्की कळवा.

धन्यवाद…

मराठी निबंध अणि भाषण

 

Print Friendly, PDF & Email
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.