100+ मराठी म्हणी | मराठी म्हणी संग्रह व अर्थ | Marathi Mhani with Meaning List [With PDF]

Marathi Mhani – नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी 100+ मराठी म्हणी | मराठी म्हणी संग्रह व अर्थ | Marathi Mhani with Meaning List घेऊन आलो आहे.

मराठी म्हणी ओळखा, म्हण पूर्ण करा, म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा असे प्रश्न नेहमी तुम्हाला विचारले जातात, मराठी म्हणी स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी मराठी म्हणी संग्रह व अर्थ घेऊन आलो आहोत.

सदर पोस्टमध्ये मराठी म्हणी संग्रह व अर्थ आहे, प्रसिद्ध मराठी म्हणी नविन, जुन्या, गावरान, विनोदी, ऐतिहासिक, टोमणे मारणाऱ्या म्हणी अशा सर्व प्रकारच्या मराठी म्हणी अर्थासोबत तुम्हाला या पोस्टमधे बघायला मिळणार आहे. त्याआधी आपण म्हणी म्हणजे काय बघूया.

मराठी म्हणी व्याख्या

ज्यात लोकपरंपरेने आलेला अनुभव वा ज्ञान ग्रथित झालेले असते अशी लोकोक्ती, ते वाक्य म्हणजे म्हण होय. किंवा कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द समूहांना ‘म्हण’ असे म्हणतात.

मराठी म्हणीमुळे मराठी भाषेची आपली जवळीक वाढते, मराठी म्हणी आपल्याला शहाणे, आशावादी आणि आनंदी व्हायला शिकवतात.मराठी म्हणी आपल्याला जीवनातील शहाणपणाचे धडे देतात.पहिल्या पिढीने अनुभवलेले प्रत्यक्ष ज्ञान दुसर्‍या पिढीकडे जाण्यासाठी मराठी म्हणी उपयुक्त ठरतात. मराठी म्हणीमुळे आपल्याला खुप काही शिकायला मिळते.

मराठी म्हणी संग्रह व अर्थ – Marathi Mhani with Meaning List

अति तेथे मातीकोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो.
अति शहाणा त्याचा बैल रिकामा अति शहाणपण नुकसानकारक ठरते.
असतील शिते तर जमतील भुतेआपल्याजवळ पैसे असे तोवर मित्रांची वाण नसते.
अंथरूण पाहून पाय पसरावेआपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा.
चोराच्या मनात चांदणेवाईट कृत्य करणाऱ्याला ते उघडकीस येईल की काय याची सतत भीती वाटते.
ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी आपल्या अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे, उपकार घेतले की लाचारी.
झाकली मुठ सव्वालाखाचीआपले गुणावगुण झाकून ठेवावे, तोंडाने त्यांचा उच्चार करू नये.
टाकीचे घाव सोसल्यावाचून देवपण येत नाहीअपरंपार कष्ट केल्यावाचून वैभव प्राप्त होत नाही.
तळे राखील तो पाणी चाखीलआपल्याकडे सोपविलेल्या कामाचा प्रत्येक मनुष्य थोडातरी फायदा करून घेतोच.
थेंबे थेंबे तळे साचे थोडे थोडे जमवीत राहिले म्हणजे कालांतराने मोठा संचय होतो.

 

सर्व मराठी म्हणी व त्यांचे अर्थ | Marathi Mhani with Meaning List

दाम करी काम – पैश्याने सर्व कामे साध्य होतात.

दिव्याखाली अंधार – मोठया माणसाच्या ठिकाणी दोष हे असतातच .

दुरून डोंगर साजरे – कोणतीही गोष्ट लांबूनच चांगली दिसते, जवळून तिचे खरे स्वरूप कळून येते.

नाचता येईना अंगण वाकडे – आपल्यातील उणपणा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नावे ठेवणे.

अती खाणे मसणात जाणे – खाण्यापिण्यात अतिरेक झाल्यास परिणाम वाईट होतो.

अन्नाचा मारलेला स्साली पाही, तलवारीचा मारलेला वर पाही – सोम्यपणामुळे मनुष्य नरम होतो, उद्धटपणामुळे तो आपला शत्रू बनतो.

असेल तेव्हा दिवाळी, नसेल तेव्हा शिमगा – अनुकूलता असेल तेव्हा चैन करणे, विपत्तीचे दिवस आले की रडणे.

अर्धी टाकून सगळीला धावू नये – संबंध वस्तू मिळविण्याचा प्रयत्न करीत असता हाती असलेली अर्धी वस्तू टाकून देणे मूर्खपणाचे होय.

अर्थी दान महापुण्य – संकटात सापडलेल्या माणसाला मदत केल्याने मोठे पुण्य लागते.

अर्ध्या वचनात असणे – आज्ञा होईल केव्हा व ती मी पाळीन केव्हा अशा उत्सुकतेने शब्द झेलणे.

 

मराठी म्हणी संग्रह व त्यांचे अर्थ । Marathi Mhani

  1. आकारे रंगती चेष्टा – मनुष्याच्या बाह्य स्वरूपावरून तो कोणती कृती करील हे व्यक्त होते.
  2. आधी बुद्धी जाते मग लक्ष्मी (भांडवल) जाते – बुद्धी नष्ट झाली की धनाचा ही नाश होतो.
  3. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन – अपेक्षा धरावी त्याहून जास्त लाभ होणे.
  4. आडात नाही तर पोह-यात कोठून येणार? – न्याय बुद्धीच नाही, तर न्याय कसा मिळेल?
  5. आपली पाठ आपणास दिसत नाही – स्वतःचे दोष दुस-यानी दाखविल्यावर कळतात (किंवा) आपल्या मागून केलेली स्तुती किंवा निंदा आपल्याला सांगितल्या शिवाय कळत नाही.
  6. आपला हात जगन्नाथ – आपली इच्छा पूर्ण करण्याचे सामर्थ्य आपल्या अंगी असता, काही कमी पडत नाही.
  7. आई जेवू घालीना, बाप भीक मागू देईना – दोन्ही कडून अडचण.
  8. आजा मेला, नातू झाला – घरातील एक माणूस कमी झाले तर दुसरीकडे एक वाढले एकूण सारखेच.
  9. आपला तो बाळ्या (बाब्या) दुस-याचे ते कारटे – स्वतः संबंधी जी उदार बुद्धी असते ती दुस-यांच्या बाबतीत न ठेवण्याची वृत्ती.
  10. आंधळ्या बहिच्याशी गाठ – परस्परंना मदत करण्यास असमर्थ असणा-यांची गाठ.

 

मराठी म्हणी व त्यांचे अर्थ | Marathi Mhani

  • आधीच तारे त्यात शिरले वारे – स्वतःच्या हौसेत दुस-यांच्या उत्तेजनाची भर पडणे.
  • आगीतून निघून फोपाट्यात पडणे – लहानशा संकटातून निघून मोठ्या संकटात सापडणे.
  • आठ पुरभय्ये नऊ चौके (व्यक्ति तितक्या प्रकृती) – एकमेकांशी जमवून घेऊ न शकणा-यांनी एकत्र येणे.
  • आभाळास ठिगळ कोठवर लावणार ? – फार मोठ्या संकटात सापडल्यावर बाहेर पडणे कसे शक्य होईल ?
  • आकाशपाताळ एक करणे – फार मोठ्याने आरडाओरड करणे.
  • आठ हात लाकूड व नऊ हात धलपी – अगदी अशक्य अशी गोष्ट सांगणे (कोणत्याही गोष्टीची अतिशयोक्ती करणे).
  • एकाने गाय मारली म्हणून दुस-याने वासरू मारू नये – एकाने एक मोठी वाईट गोष्ट केली म्हणून दुस-याने लहानशी का होईना ती वाईट गोष्ट करू नये. दोघे ही दोषीच.
  • एका हाताने टाळी वाजत नाही – घडणा-या प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात.
  • एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत – एकाच धंद्याची माणसे एकमेकांचा मत्सर केल्याशिवाय राहात नाहीत.
  • ऐकावे जनाचे, करावे मनाचे – लोकांचे मत समजून घ्यावे. पण आपल्याला योग्य वाटेल ते करावे.

Marathi Mhani | मराठी म्हणी 100+

  • एक पंथ दो काज – एकाच वाटेवरची दोन कामे एका खेपेत करणेच योग्य.
  • एक घाव दोन तुकडे – पटकन निकाल लावणे.
  • एक ना धड भाराभर चिंध्या – एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्यास त्यातले एक ही काम धड होत नाही. सगळेच अपूर्ण राहते.
  • एका माळेचे मणी – सगळे सारखेच.
  • एका कानाने ऐकावे व दुस-या कानाने सोडून द्यावे – एखादी गोष्ट दुस-यांची ऐकावी पण ती मनावर घेऊनये किंवा तसे वर्तन ही करायला जाऊ नये.
  • एकदा कानफाट्या नाव पडले की पडले – लोकांमध्ये एखाद्याचे नाव वाईट झाले तर ते सुधारणे कठीण (अशक्य) असते.
  • एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी – दूसरा संकटात सापडला असता त्याला मदत करायची सोडून थोडासा का होईना स्वत:चा फायदा होत असल्यास तो करून घेणे.
  • एका पायावर तयार (सिद्ध) असणे – तत्पर असणे, फार उत्कंठित होणे.
  • पळसाला पाने तीनच – सगळीकडे सारखीच परिस्थिती असते.
  • पडलेले शेण माती घेऊन उठते – चांगल्या मनुष्यावर एखादा आरोप आला, आणि त्याने सर्वांशी विचार विनिमय करून त्याचे निरसन केले, तरी त्याची थोही तरी बदनामी होतेच.
  • परदुःख शीतल – दुस-यांच्या दुःखाची खरी कल्पना लोकांना नसते म्हणून त्यांना त्या दुःखाची तीव्रता जाणवत नाही.

हे देखील वाचा: 5+ मी पाहिलेला अपघात मराठी निबंध | Mi pahilela Apghat Marathi Nibandh | Mi Pahilela Apghat Marathi Essay

100+ Famous Marathi Mhani List | प्रसिद्ध मराठी म्हणी 100+

  • पळणा-यास एक वाट, शेधणा-यास बारा वाटा – लबाडी करणे सोपे असते. पण ती शोधून काढणे कठीण असते.
  • पडत्या फळाची आज्ञा – तात्काल मान्यता देणे.
  • पदरी पडले, पवित्र झाले – कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की तिला नावे न ठेवता तिच्या बाबतीत समाधान मानावे.
  • परसातली भाजी – श्रम न करता सहजपणे मिळणारी गोष्ट.
  • पंढरीची वारी – सामान्यपणे वारंवार होणारी वेप.
  • पराय घरपर लक्ष्मी नारायण – (आइजीच्या जिवावर बाइजी उदार) दुस-यांच्या जिवावर गंमत करणारा.
  • पंचप्राणाची आरती ओवाळणे – एखादे काम अगदी मनापासून करणे. (मनांतील सर्व भावनेने आरती ओवाळणे).
  • पाचामुस्वी परमेश्वर – अनेक लोक सांगतात तेच खरे मानावे.
  • पालथ्या घड्यावर पाणी – एखाद्याला कितीही उपदेश केला तरी त्याचा उपयोग न होणे.
  • पादर्‍याला पावट्याचे निमित्त – एखादा मनुष्य आपल्या वर्तनाला निमित्तच शोधू लागला, तर ते त्याला कोठे ही सापडू शकेल.

 

Marathi Mhani – मराठी म्हणी आणि त्यांचे अर्थ

१. पायातली वहाण पायात बरी – प्रत्येकाला त्याच्या दर्जेप्रमाणेच वागवावे.

२. पाचही बोटे सारखी नसतात – कोणतीही एक गोष्ट दुस-या गोष्टी सारखी असू शकत नाही. सर्व माणसे सारख्या स्वभावाची असू शकत नाहीत.

३. पाय धू म्हणे तोडे केवढ्याचे – जे काम आपल्याला करावयाचे आहे ते सोडून भलत्या गोष्टीची उठाठेव करणे.

४. पाण्यात काठी मारली तर, का पाणी दोन जागी होते? – दृढ मैत्री क्षुल्लक कारणाने तुटते का?

५. पायाखाली मुंगी मरणार नाही – अतिशय सावकाश चालणारा माणूस किंवा अत्यंत निरुपद्रवी माणूस.

६. पाठीवर मारा, पोटावर मारू नका – शारीरिक शिक्षा करवी, पण पोटापाण्याचे कमी करू नये.

७. पिंडी ते ब्रह्मांडी – आपल्यावरून जग ओळवावे.

८. पिशाचाच्या हातात कोलीत – (आधीच मर्कट तशातही मद्य प्याला). वाईट माणसांच्या हातात वाईट काम करावयास दिले तर ते वाईटच होणार

९. पी हळद, हो गोरी – कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करू नये.

१०. आ‌ई भाकर देत नाही अऩ बाप भिक मागू देत नाही – सर्व बाजूने अडचणीची स्थती निर्माण होणे.

 

Marathi Mhani With Meaning | Marathi Mhani List

1. घर पहावे बांधून, लग्न पहावे करून – अनुभवाने माणूस हुशार होणे.

2. आली अंगावर, घेतली शिंगावर – जश्यास तसे उत्तर देणे.

3. अपुऱ्या घड्याला डबडब फार – विद्वत्ता नसताना उगीव्ह बढाया मारणे.

4. असेल हरी तर दे‌ईल खाटल्यावरी – सगळ्या गोष्टी आयते मिळण्याची अपेक्षया करणे

5. अड्याण्याचं काम, अंगाले आला घाम – अति परिश्रम केले तरीही फळ नाही.

6. अन्नाचा येते वास, कोरीचा घेते घास – अन्न न खाणे पण त्यात मन असणे.

7. अति तेथे माती – कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसान कारक ठरतो.

8. असे साहेब किती, सांमटीत हिंडे राती – नावाचे साहेब कितीतरी असतात पण त्यांचा काही उपयोग नसतो.

9. अंधारात केले पण उजेडात आले – कितीही लपून केलेले काम असो शेवटी ते नजरेसमोर येताच.

10. अडाण्याच्या गायी देव झोपीत नाही – गरीबाचा पालनकर्ता देवच असतो.

हे देखील वाचा: माझी आई निबंध मराठी | My Mother Essay in Marath

मराठीतील सर्व म्हणी

  • काप गेले नी भोके राहिली – सारे ऐश्वर्या गेले आणि आता फक्त आठवणी राहिल्या.
  • अर्धी खाव पण सुखानं खाव – थोडेसेच असावे पण शांतीने उपभोगावे.
  • जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही – बाह्य देखाव्याने माणूस हुशार होत नाही.
  • अकातली गाय अन् काटे खाय – दुःखी व्यक्ती काहीही करायला तयार असतो.
  • तळे राखील तो पाणी चाखील – सोपावलेले काम पूर्ण करून आपला फायदा करून घेणे.
  • अस्तुरीचा बात अन इड्याले नको काथ – मोठ्यांच्या गप्पाच अधिक असतात.
  • काकडीची चोरी फाशीची शिक्षा – अपराध खूप लहान पण त्याची शिक्षा मात्र खूप मोठी.
  • अन्नाला मारलेला खाली पाही, तरवारीचा मारलेला वर पाही – ज्याला आपण पोसतो तो आपल्याशी मिंधेगिरीने वागतो; पण जो आपण सत्तेच्या जोराने चिरडतो तो ताट्याने वागतो.
  • भरवशाच्या म्हशीला टोणगा – पूर्ण निराशा करणे.
  • अभ्यासापेक्षा दप्तर जड – कामापेक्षा दगदगच फार.
  • पाण्यात राहून माशाशी वैर – बलवानाशी शत्रुत्व काय कामाची.
  • अंगावरचे लेणे जन्मभर देणे – दागिन्याकरीता कर्ज करून ठेवून ते जन्मभर फेडीत बसणे.
  • अंगावर पडले ऊन दादला घेतो बायकोचे गुण – स्त्री जर आळशी असेल तर ती अंगावर ऊन पडेपर्यंत निजून उठली नाही तर नवऱ्यालाच प्रथम उठून सकाळची कामे उरकावी लागतात.

मराठी म्हणी व म्हणींचे अर्थ Marathi Mhani List With Meaning

  1. कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात – चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मूर्खपणा करणे.
  2. अंगी उणा तर जाणे खाणाखुणा – जेव्हा एखाद्या दोषाबद्दल बोलणे निघाले तर आपणांसंबंधीच बोलत आहेत असे वाटते.
  3. जीत्या हुळहुळे आणि मेल्या कानवले – जीवंतपणी दुर्लक्ष करायचे आणि मेल्यावर गोड कौतुक करायचे.
  4. अंगी नाना कळा पण वेष बावळा – एखादा मनुष्य फार गुणी असतो पण त्याच्या पोषाखावरून त्याच्या बुद्धीची प्रथम कल्पना येत नाही.
  5. तरण्याचे कोळसे म्हातार्‍याला बाळसे – उलट गुणधर्म असणे.
  6. अंगी धावे कामासाठी गती झाली उफराटी – एखादा मनुष्य काम करण्यासाठी खूप परिश्रम करतो पण योग्य दिशा न मिळाली तर त्याचे श्रम व्यर्थ जातात.
  7. आंधळं दळतं कुत्रं पिठ खातं – एकाने काम करावे दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा.
  8. अटकाव नाही तेथे धुडगूस – जेथे प्रतिबंध नाही तेथे गोंधळ होतो.
  9. अती खाणे मसणात जाणे – अति खाणे नुकसानकारक असते.
  10. अडले गि-हाईक दुकानदाराचे पाय धरी – एखाद्याचे अडले की ज्याचेजवळ आपल्याला पाहिजे ती वस्तू आहे त्याची मनधरणी करावी लागते.

हे देखील वाचा: समानार्थी शब्द मराठी 1000 | Samanarthi Shabd In Marathi | Synonyms In Marathi

मराठी म्हणी ओळखा

  • राईचा पर्वत करणे – मूळ गोष्ट लहान पण ती उगाचच मोठी करून सांगणे.
  • अढीच्या दिढी सावकाराची सढी – अडलेला माणूस सावकाराच्या पाशात सापडतो.
  • लग्नाला गेली आणि बारशाला आली – खूप उशिराने पोहोचणे.
  • अधिक सून पाहुण्याकडे – ज्या वक्तीची किंवा वस्तूची काळजी घेणारे कोणी नसते ती कुठेतरी पडली असते.
  • वळणाचे पाणी वळणावर जाणे – ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच राहणार.
  • अनुभवाची सावली तीच विद्येची माऊली – अनुभवानेच ज्ञान प्राप्त होत असते.
  • विशी विद्या तिशी धन – योग्य वेळेत योग्य कामे केली की त्यावरून कर्तुत्वाचा अंदाज बांधता येतो.
  • अनोळखी उपाख्या आणि नऊ पट होम -अपरिचित माणसाशी केलेल्या व्यवहारात नुकसानच होते.
  • आणितो उसनवारी, मिरवितो जमादारी – दरिद्री मनुष्य मोठेपणाचा आव आणतो.
  • लाज नाही मला कोणी काही म्हणा – निर्लज्ज मनुष्य दुसऱ्याच्या टीकेची पर्वा करत नाही.

 

मराठी व्याकरण म्हणी Maraṭhi vyakaran म्हणी व त्याचे अर्थ

  1. आधी शिदोरी, मग जेजुरी – आधी भोजन मग देवपूजा.
  2. वासरात लंगडी गाय शहाणी – मूर्ख माणसांमध्ये थोडे ज्ञान असणारा श्रेष्ठ असतो.
  3. आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी – गरज असलेल्याला मदत न करता ज्याला गरज नाही त्याच्या मदतीला धावणे.
  4. विश्वासही ठेवला घरी चारी सुना गरवार करी – विश्वासघात करणे.
  5. आले अंगावर तर घेतले शिंगावर – आयता मिळालेला फायदा करून घेणे.
  6. काप गेले नी भोके राहिली – सारे ऐश्वर्या गेले आणि आता फक्त आठवणी राहिल्या.
  7. जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही – बाह्य देखाव्याने माणूस हुशार होत नाही.
  8. तळे राखील तो पाणी चाखील – सोपावलेले काम पूर्ण करून आपला फायदा करून घेणे.
  9. काकडीची चोरी फाशीची शिक्षा – अपराध खूप लहान पण त्याची शिक्षा मात्र खूप मोठी.
  10. अर्थी दान महापुण्य – गरजूंना दान करणे हे पुण्य काम आहे.

सर्व Marathi Mhani व त्यांचे अर्थ | 100+Marathi Proverbs

  1. आवळा देऊन कोहळा काढणे – स्वार्थासाठी छोटी वस्तु देऊन मोठा फायदा करून घेणे.
  2. गर्जेल तो पडेल काय – नुसता बोलणं कृती काही नाही.
  3. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे – अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्ती होणे.
  4. उंटावरचा शहाणा – मूर्ख सल्ला देणारा.
  5. नाचता येईना अंगण वाकडे – स्वतःला काही येत नसताना दुसऱ्यात दोष काढणे.
  6. उंटावरून शेळ्या हाकणे -आळस, हलगर्जीपणा करणे.
  7. घोडमैदानजवळ असणे – परीक्षा लवकरच होणे.
  8. वरातीमागून घोडे – योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे.
  9. शेरास सव्वाशेर – प्रतिपक्षापेक्षा श्रेष्ठ.
  10. तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले – मुर्खपणामुळे कामाच्या गोष्टी हातातून जाणे.

मराठी म्हणी व त्यांचे अर्थ

  1. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नही – कष्ट केल्याशिवाय यश प्राप्त होत नाही.
  2. कुंपणानेच शेत खाणे – सुरक्षा करणाऱ्यानेच घात करणे.
  3. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे – वेळ सगळ्यांवर येते.
  4. पालथ्या घड्यावर पाणी – सगळे प्रयत्न अपयशी होणे.
  5. रात्र थोडी सोंगे फार – कमी वेळात जास्त काम करणे.
  6. कामापुरता मामा – स्वार्तासाठी गोड बोलणे.
  7. आधी पोटोबा मग विठोबा – पहिले पोट भरणे नंतर देवाचे पूजन करणे.
  8. काखेत कळसा गावाला वळसा – स्वतःकडे असून सगळीकडे शोधणे.
  9. लकडी दाखविल्या शिवाय मकडी वळत नाही – धाका शिवाय शिस्त नाही.
  10. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये – चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये.

निष्कर्ष

तर मित्रांनो या सर्व Marathi Mhani चा आपण योग्य पद्धतीने सराव करावा अशी आमची इच्छा आहे. खास करून आपण सर्वांकरीता या लेखात उत्तम मराठी म्हणी व त्यांचे अर्थ समावेश करण्यात आलेला आहे. आशा आहे आपणास या सर्व Marathi Mhani आवडल्या असतील. आपले विचार कमेन्ट करून नक्की कळवा.

धन्यवाद…

हे देखील वाचा: विरुद्धार्थी शब्द मराठी 1000 | Virudharthi Shabd In Marathi | Antonyms Marathi | Opposite words In Marathi

Marathi Mhani With PDF

विद्यार्थी मित्रांनो खाली दिलेले PDF button वर क्लीक करून तुम्ही Marathi Mhani ची pdf download करू शकता, त्याची PRINT काढू शकता आणि  Email द्वारे मित्रांना share करू शकता.

Print Friendly, PDF & Email
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.