Mazi Aai Marathi Nibandh – नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी माझी आई निबंध मराठी | My Mother Essay in Marathi या विषयावर निबंध घेऊन आलो आहे.
10+ माझी आई निबंध मराठी | Mazi Aai Marathi Nibandh | My Mother Essay in Marathi
1. | माझी आई निबंध मराठी 10 ओळी इयत्ता 1ली | My Mother 10 Lines in Marathi for class 1 |
2. | माझ्या आईवर निबंध 10 ओळी इयत्ता 2री | 10 Lines on My Mother in Marathi for class 2 |
3. | माझी आई निबंध मराठी इयत्ता 3री । My Mother Essay in Marathi for class 3 |
4. | माझी आई निबंध मराठी इयत्ता 4थी – Essay on My Mother in Marathi for class 4 |
5. | माझी आई निबंध मराठी निबंध इयत्ता 5वि , 6वि | Mazi Aai Marathi Nibandh Iyatta Pachavi, Sahavi |
6. | माझी आई निबंध मराठी | Mazi Aai Marathi Nibandh for class 7 & 8 |
7. | माझी आई निबंध मराठी इयत्ता 8वि , 9वि | My Mother Essay in Marathi for class 8 & 9 |
8. | माझी आई निबंध मराठी 10वी, 11वि, अणि 12वि – Mazi aai Marathi nibandh for Class 10, 11, & 12 |
9. | माझी आई कविता | Poem on Mother in Marathi Kavita |
10. | Faq’s- Essay On My Mother in Marathi Language |
माझी आई निबंध मराठी 10 ओळी इयत्ता 1ली | My Mother 10 Lines in Marathi for class 1
1. माझ्या आईचे नाव संगीता आहे आणि ती माझ्यावर खूप प्रेम करते.
2. माझी आई माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे.
3. माझी आई सकाळी लवकर उठून घरातील सर्व कामे करते.
4. माझी आई माझी आणि माझ्या कुटुंबाची पूर्ण काळजी घेते.
5. माझी आई मला शाळेसाठी तयार करते आणि मला शाळेत सोडते.
6. माझी आई मला चांगल्या गोष्टी शिकवते.
7. माझी आई दररोज अभ्यास घेते.
8. दर रविवारी माझी आई माझ्यासाठी माझे आवडते पदार्थ बनवते आणि मला खायला घालते.
9. माझ्या समस्या सोडवण्यासाठी माझी आई मला मदत करते.
10. माझी आई माझ्यावर खुप प्रेम करते.
माझ्या आईवर निबंध 10 ओळी इयत्ता 2री | 10 Lines on My Mother in Marathi for class 2
1. माझ्या आईचे नाव संगीता आहे आणि ती माझ्यावर खूप प्रेम करते.
2. माझी आई खूप प्रेमळ आणि समजूतदार आहे.
3. माझी आई माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे, जिला मी माझ्या मनातील सर्व काही विनासंकोच सांगतो.
4. माझी आई माझी आणि माझ्या कुटुंबाची पूर्ण काळजी घेते, ती नेहमी कुटुंबाच्या सुखाचा विचार करते.
5. मि आजारी पडल्यावर ती रात्रभर माझी काळजी घेते, म्हणून ती माझी डॉक्टर देखील आहे.
6. माझी आई मला शाळेसाठी तयार करते आणि मला शाळेत सोडते.
7. माझी आई माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे जी मला नेहमीच साथ देते.
8. दर रविवारी माझी आई माझ्यासाठी माझे आवडते पदार्थ बनवते आणि मला खायला घालते.
9. माझी आई मला चांगल्या गोष्टी शिकवते, जेव्हा मला कोणतीही अडचण येते तेव्हा माझी आई मला चांगला सल्ला देते.
10. सर्व प्रथम, मुलाला संस्कार आईकडून मिळतात, म्हणूनच मुलाची पहिली गुरू आई असते.
माझी आई निबंध मराठी इयत्ता 3री । My Mother Essay in Marathi for class 3
माझ्या आईचे नाव संगीता आहे आणि ती माझ्यावर खूप प्रेम करते.माझी आई खूप प्रेमळ आणि समजूतदार आहे.माझी आई माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे, जिला मी माझ्या मनातील सर्व काही विनासंकोच सांगतो.माझी आई माझी आणि माझ्या कुटुंबाची पूर्ण काळजी घेते, ती नेहमी कुटुंबाच्या सुखाचा विचार करते.
मि आजारी पडल्यावर ती रात्रभर माझी काळजी घेते, म्हणून ती माझी डॉक्टर देखील आहे.माझी आई मला शाळेसाठी तयार करते आणि मला शाळेत सोडते.मि दररोज शाळेतून घरी आल्यावर काय शिकवले त्याचा अभ्यास आई माझ्याकडून करुण घेते, तिच्यामुळेच मी अभ्यासात हुशार आहे.
माझी आई माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे जी मला नेहमीच साथ देते.दर रविवारी माझी आई माझ्यासाठी माझे आवडते पदार्थ बनवते आणि मला खायला घालते.माझी आई मला चांगल्या गोष्टी शिकवते, जेव्हा मला कोणतीही अडचण येते तेव्हा माझी आई मला चांगला सल्ला देते.सर्व प्रथम, मुलाला संस्कार आईकडून मिळतात, म्हणूनच मुलाची पहिली गुरू आई असते.
माझी आई निबंध मराठी इयत्ता 4थी – Essay on My Mother in Marathi for class 4
माझ्या आईचे नाव संगीता आहे आणि ती गृहिणी आहे. ती जगातील सर्वोत्तम आई आहे. माझी आई घरातल्या सगळ्यांची काळजी घेते.ती नेहेमी शांत आणि हसतमुख असते.
माझी आई खूप मेहनती आहे, दररोज सकाळी लवकर उठते आणि आम्ही उठण्यापूर्वी कामाला सुरुवात करते.शाळेत जाताना आम्हाला ती तयार करते. पाण्याची बाटली आणि डबा भरून देते. अजून मला बुटाची लेस बांधता येत नाही, ती माझ्या बुटाची लेस बांधून देते. शाळेत जाताना आई नेहमी म्हणते बाहेरचे काही खाऊ नका, शाळेतून बाहेर कुठे जाऊ नका. आम्ही शाळेत गेल्यानंतर आई घराची साफसफाई करते.शाळेतून घरी आल्यावर माझी आई मला माझ्या अभ्यासात मदत करते.
ती कुटुंबाचा मुख्य भाग आहे. ती खूप दयाळू महिला आहे. माझ्या आईने नेहमी आम्हाला गरीब आणि गरजूंना मदत करण्याची शिकवण दिली आहे. ती सगळ्यांशी नम्रतेने बोलते. ती मला शाळेत माझ्या मित्रांसोबत जेवण वाटायला शिकवते.
मी आजारी पडलो तर रात्रंदिवस आई माझी काळजी घेते.मला रात्री गोष्टी सांगते, परीक्षेत चांगले मार्क मिळाले तर मला शाबासकी देते माझ्यापेक्षा तिलाच खूप आनंद होतो अशी माझी प्रेम स्वरूप आई मला खूप आवडते. मी डोळे मिटून विश्वास ठेवू शकतो अशी एकमेव व्यक्ती म्हणजे माझी आई.माझी आई माझ्यावर खुप प्रेम करते.
माझी आई निबंध मराठी निबंध इयत्ता 5वि , 6वि | Mazi Aai Marathi Nibandh Iyatta Pachavi, Sahavi
आई या पृथ्वीवरील आपले पहिले प्रेम, पहिली गुरू आणि पहिली मैत्रीण आहे. जेव्हा आपण जन्म घेतो तेव्हा आपल्याला काहीच कळत नाही आणि स्वतः काही करू शकत नाही, ही आईच आपल्याला आपल्या कुशीत वाढवते. ती आपल्याला जग समजून घेण्यास आणि त्यात जगण्यास सक्षम बनवते.
माझी आई खूप प्रेमळ आहे,ती खूप मेहनती, दयाळू आणि काळजी घेणारी आहे.ती गृहिणी आहे आणि नेहमी कामात व्यस्त असते. ती इतरांपेक्षा लवकर उठते आणि सर्वात शेवटी झोपते.दिवस उजाडल्यापासून तिच्या जबाबदाऱ्या चालू होतात.
सकाळी शाळेचा डबा बनवण्यापासून तिची धावपळ सुरु होते. तसेच बाबांना चहा नाश्ता आईच देते. मला शाळेत सोडायला येते. चांगले जेवण बनवते, आमचे कपडे धुते, आमच्या प्रत्येक गरजा आणि आरामाची काळजी घेते. माझी आई स्वयंपाक खुप स्वादिष्ट बनवते, सणादिवशी गोड स्वयपाक बनवाते जसे पुरण पोळी, भजी. तिच्याबद्दल आणखी एक मनोरंजक गोष्ट म्हणजे ती खूप छान गाते.
मि दररोज शाळेतून घरी आल्यावर काय शिकवले त्याचा अभ्यास आई माझ्याकडून करुण घेते, तिच्यामुळेच मी अभ्यासात हुशार आहे.
मी आजारी पडलो तर रात्रंदिवस आई माझी काळजी घेते, मी बरा आणि निरोगी होईपर्यंत ती माझी काळजी घेण्यात कोणतीही कसर सोडत नाही.तिचे प्रेम आणि काळजी प्रेरणाचा एक मोठा स्रोत आहे. ते मला चांगले आरोग्य आणि आनंदी राहण्यास मदत करतात. माणसाने नेहमी नम्र असावे, मोठांचा आदर करावा. अशा अनेक गोष्टी शिकवते ती माझी आई.परीक्षेत चांगले मार्क मिळाले तर मला शाबासकी देते तेव्हा माझ्यापेक्षा तिलाच खूप आनंद होतो.त्यामुळे आई म्हणजे सर्वस्व आहे.
माझी आई निबंध मराठी | Mazi Aai Marathi Nibandh for class 7 & 8
एकत्र कुटुंबात मी लहानाचा मोठा झालो. आमच्या घरात भरपूर माणसे आहेत आणि ती एकमेकांशी ‘नात्याच्या रेशमी धाग्यांनी’ जोडलेली आहेत. माझी आई ही या घराची कर्णधार आहे असे म्हणायला हरकत नाही. चाळीशी ओलांडलेल्या माझ्या आईचा या घरात प्रेमळ वावर आहे. माझ्या आजीचा आणि माझ्या आईचा एकमेकींवर पूर्ण विश्वास आहे व परस्परांमध्ये दाट जिव्हाळा आहे.
अशी ही माझी आई दिवसातून फारच थोडा वेळ माझ्या वाट्याला येत असली, तरी तिचे माझ्या अभ्यासाकडे, माझ्या आवडीनिवडीकडे पूर्ण लक्ष असते. केवळ माझ्याच नव्हे तर आमच्या घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना स्वावलंबनाचे वळण लावण्यामागे, माझ्या आईचाच मोठा सहभाग आहे.
सुट्टीच्या दिवसांत आई घरातील सर्व मुलांना उत्तम पुस्तके वाचून दाखवते. त्यातून स्वाभाविकच आमच्यात वाचनाची आवड निर्माण झाली आहे. आईचे हस्ताक्षर उत्तम आहे. सुलेखन कसे करावे हे मला माझ्या आईनेच शिकवले. घरातील प्रत्येकाची आवडनिवड आईने लक्षात ठेवलेली आहे, त्यामुळे प्रत्येकजण तिच्यावर खूश असतो. नीटनेटकेपणा हा तिचा खास गुण आहे. त्यामुळे घरातल्या कुणालाही काही हवे असले की, त्याला माझ्या आईची आठवण येते आणि माझी आई त्याची नड तत्परतेने भागवते.
माझी आई उत्तम गृहिणी आहे. आल्यागेल्यांचे हसतमुखाने आतिथ्य कसे करावे, ते माझ्या आईकडून शिकावे. स्वयंपाक करण्यात ती कुशल आहे. माझे आजोबा व आजी आपल्या सूनबाईला ‘अन्नपूर्णा’ असे संबोधून सतत कौतुक करत असतात. शेजारच्या सर्व स्त्रिया अडीनडीला माझ्या आईकडे धावत येतात व आई त्यांना शक्य ती सर्व मदत करते. सदा हसतमुख असणारी ही माझी आई आमच्या घरची ‘लक्ष्मी’ आहे, असे सारेजण म्हणतात ते उगाच नाही !
माझी आई निबंध मराठी इयत्ता 8वि , 9वि | My Mother Essay in Marathi for class 8 & 9
“आई असते खूप प्रेमळ,
मन तिचे फार निर्मळ,”
आई हा जगातील सर्वात सोपा आणि मौल्यवान शब्द आहे.आई या एका शब्दात संपूर्ण जग सामावलेले आहे.आई हा जगातील एकमेव असा शब्द आहे ज्याला कोणत्याही व्याख्येची गरज नाही कारण तो शब्द नसून ती एक भावना आहे. आई ही प्रेम, त्याग आणि सेवेची मूर्ती आहे.
माझी आई माझ्या चेहऱ्यावर बघून ओळखून घेते मी आनंदात आहे कि दुःखात आहे.माझी आई माझ्या आयुष्यात अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावते, ती माझी शिक्षिका, मार्गदर्शक तसेच माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे. जेव्हा मी अडचणीत असतो, तेव्हा ती माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम करते. आज मी माझ्या आयुष्यात जो काही आहे तो फक्त माझ्या आईमुळेच आहे कारण माझ्या यश आणि अपयशात ती माझ्या सोबत असते.
माझी आई माझ्यासाठी या जगातील सर्वोत्कृष्ट शिक्षक आहे . तिला शाळेतील जास्त ज्ञान नसेल पण आयुष्याचे सर्वात उत्तम ज्ञान हे तिच्या जवळच आहे .
आपल्याला वर्षातून एक-दोन परीक्षा द्यावा लागतात, परंतु आईला मात्र दररोज परीक्षा असते. दररोज सकाळी उठल्यापासून तिची परीक्षा सुरू होते, सकाळी सर्वांच्या आवडी निवडी प्रमाणे नाश्ता बनविणे, वेळेवर शाळेत जाण्यासाठी माझी लयारी करणे, शाळेत जाण्यासाठी माझा डबा, बाटली वेळेवर भरून ठेवते ती आई, माझा अभ्यास घेणे ही कामे काही गृहपाठापेक्षा कमी आहे का? आणि जेव्हा माझी परीक्षा असते तेव्हा आईचीही परिक्षा असते.
माझी आई मला नेहमी चांगल्या गोष्टी शिकवत असते. दुसर्यांना मदत करायची, नेहमी खरं बोलावं, कोणासोबत भांडण करायचे नाही अशा चांगल्या गोष्टी मला माझी आई शिकवत असते.
कोणत्याच आईला असे वाटत नाही कि तिचे मुलं चुकीच्या मार्गावर जावे. आपल्या सुरवातीच्या आयुष्यात आपल्या आईकडून अशा खूप शिकवण दिल्या जातात ज्या आपल्या पूर्ण आयुष्यात एक सुखी आणि शांत जीवन जगायला मदत करतात . त्यामूळेच एक आदर्श जीवन जगताना आपल्या आईचा मोलाचा वाटा असतो.
“दुःखाचा डोंगर कोसळलेला असो की सुखाचा वर्षाव होत असो,
मनाला चिंतेचे ग्रहण लागलेलं असो कि आठवणीतले तारे लुकलुकत असो,
आठवते ती फक्त आई”.
माझी आई निबंध मराठी 10वी, 11वि, अणि 12वि – Mazi aai Marathi nibandh for Class 10, 11, & 12
“आई माझा गुरू,
आई माझा कल्पतरू,
सौख्याचा सागर,
माझी आई”.
साने गुरुजींनी लिहिलेल्या या ओळीमध्ये खुप सत्यता आहे.माझी आई माझे सर्वस्व आहे.आई हा शब्द जरी साधा, सोपा वाटत असला तरी संपूर्ण जगाला सामावण्याची ताकद या शब्दात आहे.
आई आपल्याला जन्म देते. यामुळेच जगातील प्रत्येक जीवनदायी वस्तूला आई ही संज्ञा देण्यात आली आहे. आपल्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात आपल्या सुख-दुःखात कोणी आपली सोबती असेल तर ती आपली आई आहे. संकटसमयी आपण एकटे आहोत हे आई आपल्याला कधीच जाणवू देत नाही. या कारणास्तव आपल्या जीवनात आईचे महत्त्व नाकारता येत नाही.
प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आई खूप महत्त्वाची भूमिका बजावत असते,आईबद्दल कितीही सांगितले तरी कमीच आहे. आपल्याला काही कळत नसते तेव्हापासून ते आपल्याला काही कळायला लागेपर्यंत आपली आई आपली काळजी घेत असते.
आपल्याला चांगले विचार आणि चांगली शिकवण आपली आईच देत असते.आई खूप प्रेमळ असते जी आपल्या संपूर्ण अस्तित्वासह आपल्याला अस्तित्वात ठेवते. ती प्रेम आणि काळजीचे प्रतीक आहे आणि तिच्यापेक्षा परिपूर्ण कुटुंबाची कोणीही कल्पना करू शकत नाही.
आईकडून समाजाचे मूलभूत नियम शिकायला मिळतात आणि ती मुलाला सर्व सामाजिक दुर्गुणांपासून वाचवते. आई ही ती आहे जी आपल्या मुलाचे पालनपोषण अत्यंत प्रेमाने आणि काळजीने करते.
आईला प्रेम आणि करुणेचे प्रतीक मानले जाते. जगभर दु:ख सोसूनही आई आपल्या मुलांना सर्वोत्तम सुखसोई देत असते. आई आपल्या मुलांवर खूप प्रेम करते. ती उपाशी झोपली तरी ती आपल्या मुलांना खाऊ घालायला विसरत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आई शिक्षकापासून ते पालनपोषणकर्त्यापर्यंत असते.
आपल्या आयुष्यात जर कोणी सर्वात महत्वाचे असेल तर ती आपली आई आहे. कारण आईशिवाय जीवनाची कल्पनाच करता येत नाही. म्हणूनच आपण नेहमी आपल्या आईची आज्ञा पाळली पाहिजे आणि तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
1. माझी आई कविता | Poem on Mother in Marathi Kavita
“आई ही आई असते
दुधावरची साय असते’
बाहेरून कठोर असते
पण आतून मात्र मऊ असते,
सगळ्यांच्या आधी ती उठते आणि
सगळ्यांच्या नंतर ती झोपते,
मर मर कष्ट करून
पोट सगळ्यांच ती भरते,
रागवते पण ती समजून ही सांगते
ती कोणाची दुश्मन नसते,
ना कोणाची वैरी
सगळ्यांसाठी तीची माया एकच असते,
जी घरासाठी आपले
सर्वस्व पणाला लावते,
आपल्या अनेक अवताराने
ती घर मनापासून जपते
ती आई असते…..
आई तुझा आशिर्वाद,
लाभो माझ्या आयुष्याला’
तुझ्या आशिर्वादाने जिंकेन मी
जगाला”
2. माझी आई कविता | Poem on Mother in Marathi Kavita
दाटता कंठ माझा, गहिवरले शब्द लेखणीचे
ऋण तुझे अनेक, आई शब्दातच सामावले जग सारे,
वात्सल्याची तू मूर्ती, प्रत्येक स्त्री मध्ये तूच वसे
लेकरावर जीव ओवळणारी शिकवते निस्वार्थ प्रेम कसे,
आई तुझा दिवस नाही तुझ्यामुळेच सारे दिवस दिसे
लाभ देत पुण्याई अशी, सारे जन्म तुझ्याच उदरात मिळे!
3. माझी आई कविता | Poem on Mother in Marathi Kavita
“शिकवणारे जगात खूप असतात
पण, खरी शिक्षण देणारी आई असते
सारेच जण समजवणारे असतात
पण, अश्रू पुसणारी आई असते,
पाळणा हलविणारे खूप असतात
पण, अंगाई गाऊन निजवणारी आई असते
तिच्या सारखी जगी मूर्ती नाही
आई ती, फक्त आईच असते,
पंक्तीत वाढणारे खूप असतात
पण, घास भरवणारी आई असते
बोलणारे खूप असतात जगात
पण, जवळ घेणारी आई असते’
पाहणारे खूप असतात मंचावर
पण, कौतुक करणारी आई असते.
टाळ्या हजारो वाजतात पण,
आशीर्वाद देणारी आई असते”.
Faq’s- Essay On My Mother in Marathi Language
Q.आईचे महत्त्व
जगात माणसाचे अस्तित्व केवळ त्याच्या आईमुळेच आहे. मग तो माणूस असो वा प्राणी. आई प्रत्येक रुपात आपल्या मुलांची काळजी घेते. माणसाच्या यशामागे त्याच्या आईने दिलेले संस्कार असतात. आई शिक्षित असो वा नसो पण जगात दुर्मिळ आणि महत्त्वाचे ज्ञान आपल्याला आपल्या आईकडूनच मिळते.आई आपल्या मुलावर कोणत्याही लोभाशिवाय प्रेम करते. आई ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अनमोल व्यक्ती असते, ज्याचे वर्णन शब्दात करता येत नाही.
Q.मदर्स डे कधी साजरा केला जातो?
मे महिन्याच्या दुसर्या रविवारी साजरा होतो मदर्स डे
Q.सर्वप्रथम कोणी साजरा केला मदर्स डे ?
ऍना जार्विस या अमेरिकन महिलेने पहिल्यांदा मदर्स डे साजरा करण्यास सुरूवात केली.
Q.आई चा समानार्थी शब्द काय आहे?
तर मित्रांनो 10+ माझी आई निबंध मराठी | Mazi Aai Marathi Nibandh | My Mother Essay in Marathi या निबंधांचा आपण योग्य पद्धतीने सराव करावा अशी आमची इच्छा आहे. खास करून आपण सर्वांकरीता या लेखात उत्तम निबंधांचा समावेश करण्यात आलेला आहे. आशा आहे आपणास हे निबंध आवडले असतील. आपले विचार कमेन्ट करून नक्की कळवा.
धन्यवाद…