सर्वनाम मराठी – नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी सर्वनाम मराठी | सर्वनामाचे प्रकार व उदाहरण | Sarvanam in Marathi | Sarvanam examples in Marathi घेऊन आलो आहे.
सर्वनाम मराठी | Sarvanam in Marathi
सर्वनाम म्हणजे काय?
नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम म्हणतात.
वाक्यात वारंवार होणारा नामाचा उच्चार टाळण्यासाठी ज्या विकारी शब्दाचा उपयोग केला जातो, त्याला सर्वनाम असे म्हणतात.
सर्वनामांना प्रतीनामे असे देखील म्हणतात.
Sarvanam examples in Marathi
उदा. १) सनी सकाळी लवकर उठला नंतर सनी शाळेत गेला आणि सनी दुपारी शाळेतून घरी आला.
वरील उदाहरणामध्ये सनी शब्द वारंवार आलेला आहे. असे शब्द टाळण्यासाठी सर्वनामाचा वापर केला जातो.
जसे की, सनी सकाळी लवकर उठला नंतर तो शाळेत गेला आणि तो दुपारी शाळेतून घरी आला.
सनी ऐवजी तो या पुल्लिंगी सर्वनामाचा उपयोग केल्याने वाक्य वाचण्यासाठी व्यवस्थित वाटते.(सनी पुल्लिंगी नाव असल्याने सर्वनाम तो.)
कोणत्याही वाक्यात एखादे नाम येऊन गेल्याशिवाय सर्वनाम येऊ शकतं नाही.
सनी सकाळी लवकर उठला नंतर तो शाळेत गेला आणि तो दुपारी शाळेतून घरी आला.
जसे वरील वाक्यात बघा सनी हे नाम वाक्यात आधी आले नंतर सनी ऐवजी सर्वनाम म्हणजेच तो वापरले आहे.
उदा. २) श्रेया सकाळी लवकर उठली नंतर श्रेया शाळेत गेली आणि श्रेया दुपारी शाळेतून घरी आली.
आता या वाक्यात श्रेया एक स्त्रीलिंगी नाव असल्याने वाक्यात ती हे सर्वनाम वापरावा लागेल.
श्रेया सकाळी लवकर उठली नंतर ती शाळेत गेली आणि ती दुपारी शाळेतून घरी आली.
मराठीत ९ मूळ सर्वणामे आहेत.
१) मी
२) तू
३) तो / ती / त्या / ते
४) हा / ही/ हे / ह्या
५) जो / जी / जे / ज्या
६) कोण
७) काय
८) आपण
९) स्वतः
लिंगानुसार बदलणारी सर्वनामे ३ आहेत.
१) तो
२) हा
३) जो
लिंग | पुलिंगी | स्त्रीलिंगी | नपुसकलींगी |
१) | तो | ती | ते |
२) | हा | ही | हे |
३) | जो | जी | जे |
वचनानुसार बदलणारी ५ सर्वनामे आहेत.
१) मी
२) तू
३) तो
४) हा
५) जो
वचन | एकवचन | अनेकवचन |
१) | तो / ती / ते | त्या |
२) | हा / ही / हे | ह्या |
३) | जो / जी / जे | ज्या |
४) | मी | आम्ही |
५) | तू | तुम्ही |
लिंग आणि वचनानुसार न बदलणारी सर्वनामे ४ आहेत
१) कोण
२) काय
३) आपण
४) स्वतः
आत्मवाचक सर्वनाम दोन आहेत
१) आपन
२) स्वतः
सर्वनामाचे प्रकार व उदाहरण
सर्वनामाचे एकूण ६ प्रकार पडतात.
१) पुरुषवाचक सर्वनाम
२) दर्शक सर्वनाम
३) संबंधी सर्वनाम
४) प्रश्नार्थक सर्वनाम
५) सामान्य सर्वनाम / अनिश्चित सर्वनाम
६) आत्मवचक सर्वनाम
१) पुरुषवाचक सर्वनाम (purush vachak sarvanam)
जी सर्वनामे आपण एखाद्या पुरुषासाठी / व्यक्तीसाठी वापरतो त्या सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात.
वक्त्याने स्वतःसाठी, श्रोत्यासाठी आणि इतर कोणत्याही व्यक्तीसाठी वापरलेले सर्वनामाला पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात.
पुरुषवाचक सर्वनाम व्यक्तीसाठी वापरले जाते.
पुरुषवाचक सर्वनामाचे प्रकार
पुरुषवाचक सर्वनामाचे एकूण ३ प्रकार पडतात.
१) प्रथम पुरुषवाचक सर्वनाम
२) द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम
३) तृतीय पुरुषवाचक सर्वनाम
१) प्रथम पुरुषवाचक सर्वनाम (Pratham purush vachak sarvanam)
बोलणारी व्यक्ती स्वतः विषयी उल्लेख करताना स्वतः च्या नामाऐवजी जी सर्वनामे वापरतो ती प्रथम पुरुषवाचक सर्वनामे असतात.
जी सर्वनाम आपण स्वतः साठी वापरतो त्या सर्वणामांना प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात.
बोलणारा स्वतः विषयी बोलतो तेव्हा वापरले जाणारे सर्वनाम प्रथम पुरुषी असते.
उदा. मी, आम्ही, आपण, स्वतः
प्रथम पुरुषवाचक सर्वनाम उदाहरण | Pratham purush vachak sarvanam examples in Marathi
१) मी उद्या शाळेत लवकर जाणार आहे.
या वाक्यामध्ये मी हे सर्वनाम आहे, मी हे सर्वनाम हे स्वतः साठी वापरलं त्यामुळे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम.
२) आम्ही उद्या गावाला जाणार आहे.
या वाक्यामध्ये आम्ही हे सर्वनाम आहे, आम्ही हे सर्वनाम देखील स्वतः साठी वापरलं त्यामुळे हेही प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे.
३) आपण उद्या खेळायला जाऊ.
या वाक्यामध्ये आपण हे सर्वनाम आहे, आपण हे सर्वनाम देखील स्वतः साठी वापरलं जात त्यामुळे हेही प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे.
४) स्वतः येऊन तुला भेटतो.
या वाक्यामध्ये स्वतः हे सर्वनाम आहे, स्वतः हे सर्वनाम देखील स्वतः साठी वापरलं जात त्यामुळे हेही प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे.
२) द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम (Dwitiya purush vachak sarvanam)
जी सर्वनामे आपण दुसऱ्या व्यक्तीसाठी वापरतो त्या सर्वणामांना द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात.
बोलणारा व्यक्ती समोरच्या व्यक्तीचे नाव न घेता त्या व्यक्तीसाठी जी सर्वनामे वापरतो त्या सर्वणामांना द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात.
उदा. तू, आपण, तुम्ही, स्वतः
द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम उदाहरण | Dwitiya purush vachak sarvanam examples in Marathi
१) तू उद्या शाळेत जाणार आहे का?
या वाक्यामध्ये तू हे सर्वनाम आहे, हे सर्वनाम आपण दुसऱ्या व्यक्तीसाठी वापरले आहे. त्यामुळे हे सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे.
२) आपण आलात, बरे वाटले.
या वाक्यामध्ये आपण हे सर्वनाम आहे, हे सर्वनाम आपण दुसऱ्या व्यक्तीसाठी वापरले आहे. त्यामुळे हे सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे.
३) तुम्ही चहा घेणार का?
या वाक्यामध्ये तुम्ही हे सर्वनाम आहे, तुम्ही हे सर्वनाम आपण दुसऱ्या व्यक्तीसाठी वापरले आहे. त्यामुळे हे सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे.
४) स्वतः च काम कर.
या वाक्यामध्ये स्वतः हे सर्वनाम आहे, स्वतः हे सर्वनाम आपण दुसऱ्या व्यक्तीसाठी वापरले आहे. त्यामुळे हे सर्वनाम देखील द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे.
३) तृतीय पुरुषवाचक सर्वनाम (tritiya purush vachak sarvanam)
जी सर्वनाम आपण तिसऱ्या व्यक्तीसाठी घटकासाठी वापरतो त्या सर्वणामांना तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात.
उदा. तो, ती, ते, त्या
तृतीय पुरुषवाचक सर्वनाम उदाहरण | tritiya purush vachak sarvanam examples in Marathi
१) तो माझा चांगला मित्र होता.
या वाक्यामध्ये तो हे सर्वनाम आहे, जे सर्वनाम स्वतः साठी नाही, समोरच्या व्यक्तीसाठी देखील नाही, तिसऱ्याच व्यक्तीसाठी वापरले आहे त्यामुळे तो हे सर्वनाम तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे.
२) ती खूप हुशार आहे.
या वाक्यामध्ये ती हे सर्वनाम आहे, जे सर्वनाम स्वतः साठी नाही, समोरच्या व्यक्तीसाठी देखील नाही, तिसऱ्यासाठीच वापरले आहे त्यामुळे ती हे सर्वनाम तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे.
३) ते आमचे शिक्षक आहेत.
या वाक्यामध्ये ते सर्वनाम आहे, जे सर्वनाम स्वतः साठी नाही, समोरच्या व्यक्तीसाठी देखील नाही, तिसऱ्यासाठीच वापरले आहे त्यामुळे ते हे सर्वनाम तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे.
४) त्या आमच्या शिक्षिका आहेत.
या वाक्यामध्ये त्या सर्वनाम आहे, जे सर्वनाम स्वतः साठी नाही, समोरच्या व्यक्तीसाठी देखील नाही, तिसऱ्यासाठीच वापरले आहे त्यामुळे त्या हे सर्वनाम देखील तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे.
२) दर्शक सर्वनाम (Darshak sarvanam in marathi)
दर्शक म्हणजे दाखवणे.
जी सर्वनामे एखादी गोष्ट/वस्तू दाखवायची काम करतात त्यांना आपण दर्शक सर्वनाम म्हणतो.
दर्शक सर्वनाम उदाहरण | Darshak examples in marathi
उदा. १) तो आमचा कुत्रा आहे.
२) ती माझी मैत्रीण आहे.
३) ते अभयचे घर आहे.
४) ती माझी बाईक आहे.
वाक्य ज्याच्याबद्दल माहिती सांगते तो वाक्याचा कर्ता असतो. जर संपूर्ण वाक्य ‘हा, हो, हे’ किंवा ‘तो, ती, ते’ बद्दल माहिती सांगत असेल तर हे शब्द वाक्याचा कर्ता असतात व ते निर्देश करतात, म्हणून त्यांना दर्शक सर्वनामे म्हणतात.
दूरची वस्तू दाखविण्यासाठी- हा, ही, हे
जवळची वस्तु दाखविण्यासाठी – तो, ती, ते
उदा. १) तो माझा भाऊ आहे. ( दूरचा )
२) हा माझा भाऊ आहे. ( जवळचा )
दर्शक सर्वनामानंतर नाम कधीच येत नाही जर आले तर केवळ नामाचा उल्लेख दर्शवितो विशेष माहिती सांगत नाही.
उदा. 1) ते माकड आहे.
2) ही मुलगी आहे.
परंतू दर्शक सर्वनामानंतर नाम येऊन त्याबद्दल दर्शक सर्वनाम माहिती सांगत असेल तर ते दर्शक / सार्वनामिक विशेषण असते.
उदा. श्रेया डॉक्टर आहे. ( ती डॉक्टर आहे.)
या वाक्यात श्रेया विषयी माहिती सांगितली असल्याने तो वाक्याचा कर्ता आहे व कर्ता हा नेहमीच नाम किया अनाम असतो. त्यापुढे दिलेल्या वाक्यात श्रेया ऐवजी ‘ती’ हा शब्द वापरला आहे व वाक्यसुद्धा ‘ती’ बद्दलच माहिती सांगते, म्हणून नामऐवजी आल्यामुळे ते सर्वनाम होते व ते निर्देश करते; म्हणून ‘ती’ हा शब्द वाक्यात दर्शक सर्वनाम आहे.
उदा. हुशार श्रेया डॉक्टर आहे. ती श्रेया डॉक्टर आहे.
वरील वाक्यात मात्र ‘ती’ हा शब्द ‘हुशार’ या विशेषणाच्या ऐवजी असल्याने तो विशेषणच आहे व निर्देश करत असल्यामुळे ते दर्शक विशेषण आहे. याचा अर्थ असा होतो की, तो ती-ते-त्या, हा ही हे ह्या’ चा वापर कर्त्याच्या जागी केल्यास ती दर्शक सर्वनामे होतात. कर्त्यांपूर्वी केल्यास दर्शक विशेषणे होतात.
सर्वनाम कधीही नामानंतरच येते म्हणून नामानंतर वरील शब्दांचा वापर केल्यास ती दर्शक सर्वनामेच असतात.
उदा. गंगा ही भारताची पवित्र नदी आहे.
फक्त एका नामापूर्वी वरील शब्दांचा वापर केला तर ती दर्शक विशेषणे होतात.
उदा. तो साप, ते फुल
दर्शक सर्वनाम | दर्शक विशेषण |
१) ती हुशार मुलगी आहे. | १) ती मुलगी हुशार आहे. |
२) ही माझी बॅग आहे. | २) ही बॅग माझी आहे. |
३) तो गरीब मुलगा आहे. | ३) तो मुलगा गरीब आहे. |
४) गंगा ही भारताची पवित्र नदी आहे. | ४) ही गंगा भारताची पवित्र नदी आहे. |
५) विराट हा चांगला खेळाडू आहे. | ५) हा विराट चांगला खेळाडू आहे. |
६) तो मुलगा आहे. | ६) तो मुलगा |
७) ती इंजिनिअर आहे. | ७) ती मुलगी इंजिनियर आहे. |
३) संबंधी सर्वनाम (sambandhi sarvanam)
वाक्यात दोन गोष्टीतील संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला किंवा वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामाला ‘संबंधी सर्वनाम’ म्हणतात.
जी सर्वानामे दोन गोष्टीतील संबंध दाखवतात ते संबंधी सर्वनाम असतात.
संबंधी सर्वनामांना अनुसंबंधा सर्वनामे असेसुद्धा म्हणतात.
संबंधी सर्वनाम जोडीने येतात
पहिल्या वाक्याच्या सुरुवातीला संबंधी सर्वनाम आल्यास दुसऱ्या वाक्याच्या सुरूवातीला दर्शक सर्वनामे आलेले असते व दोन्ही वाक्य एकत्रित असते.
संबंधी सर्वनामे | दर्शक सर्वनामे |
१) जो | तो |
२) जी | ती |
३) जे | ते |
४) ज्या | त्या |
संबंधी सर्वनाम उदाहरण मराठी sambandhi sarvanam examples in marathi
१) जो बाहेर उभा आहे तो माझा मित्र आहे.
२) ज्याने करावे त्याने भरावे.
३) जे चकाकते ते सोने नसते.
४) जी बाहेर उभी आहे ती माझी सायकल आहे.
५) जो करेल तो भरेल.
४) प्रश्नार्थक सर्वनाम (prashnarthak sarvanam)
ज्या सर्वनामाचा उपयोग प्रश्न विचारण्यासाठी केला जातो त्या सर्वनामाला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात.
ज्या सर्वनामान वाक्यात प्रश्न विचारला असेल त्याला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात.
उदा. कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी
प्रश्नार्थक सर्वनामात प्रश्नचिन्ह (?) येणार म्हणजे येणारच.
प्रश्नार्थक सर्वनाम उदाहरण prashnarthak sarvanam examples in marathi
१) संविधान कोणी लिहीले?
या वाक्यामध्ये कोणी या सर्वनामाने प्रश्न विचारला आहे, आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह (?) आहे त्यामूळे आपण याला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतो.
२) तू कोणाला सोबत घेऊन जाणार?
या वाक्यामध्ये कोणाला या सर्वनामाने प्रश्न विचारला आहे, आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह (?) आहे त्यामूळे आपण याला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतो.
३) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण?
या वाक्यामध्ये कोण या सर्वनामाने प्रश्न विचारला आहे, आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह (?) आहे त्यामूळे आपण याला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतो.
४) सर्वनाम म्हणजे काय?
या वाक्यामध्ये काय या सर्वनामाने प्रश्न विचारला आहे, आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह (?) आहे त्यामूळे आपण याला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतो.
प्रश्नार्थक सर्वनामांचा इतर अर्थाने वापर
१) कोण हे सर्वनाम प्रामुख्याने प्राण्यांसाठी व खासकरून मणुष्यासाठी वापरतात तर काय हे सर्वनाम बहुधा सुक्ष्म किंवा शुल्लक प्राणी, निर्जीव किंवा अमूर्त वस्तूंसाठी वापरतात.
उदा. १) कोणी मारला हा ससा ?
२) त्याने भाषणात काय सांगितले?
२) विलक्षणपणा व आश्चर्य दाखविण्यासाठी.
उदा. १) काय विषय आहे हा?
२) कोण शहाणपणा हा?
३) तुच्छता आणि तिरस्कार दाखवितांना.
१) कोण काय करणार आहे माझे ?
४) दोन गोष्टीतील फरक दर्शविण्यासाठी.
५) पृथकत्व, अगणितत्व व आश्चर्य दाखविण्यासाठी.
उदा. १) शाळेत कोण कोण आले होते? (पृथकत्व)
२) कोणाकोणाची म्हणून नावे सांगू तुला आता ?(अगणितत्व व आश्चर्य)
६) काय सर्वनामाचा काही वेळेला अव्ययासारखा वापर होतो अशा वेळी त्यातून प्रश्न, आश्चर्य किया असंभवता असा अर्थ व्यक्त होतो.
उदा. १) तो शाळेत गेला काय? (प्रश्न)
२) ती काय सुंदर आहे!(आचर्य)
३) तो काय करणार आहे. (असंभव)
५) सामान्य सर्वनाम / अनिश्चित सर्वनाम
कोण, काय हे सर्वनाम वाक्यात नेमक्या कोणत्या नामासाठी आले आहे हे निश्चित सांगता येत नाही म्हणून त्या सर्वनामाला सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम म्हणतात.
सामान्य / अनिश्चित सर्वनामाचा वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी उपयोग करत नाहीत.
उदा- १) कोणी यावे कोणी जावे.
२) त्या पेटीत काय आहे ते सांग पाहू.
३) कोणी कोणास काय म्हणावे.
विधानार्थी व उद्गारवाचक वाक्यात वापरलेले कोण व काय हे शब्द सामान्य सर्वनामे किंवा अनिश्चित सर्वनामे असतात; परंतु वरील सर्वनामांचा वापर प्रश्नार्थक वाक्यात केल्यास ती प्रश्नार्थक सर्वनामे होतात.
वैचित्र्य किंवा विविधता दाखविण्यासाठी सामान्य सर्वनामे वापरतात.
१) कोणी चांगला तर कोणी वाईट असतो. तूला सर्वच अनुभव येतील.
२) कोणी प्रेमळ तर कोणी कपटी.
अनिश्चित सर्वनामाचा वापर संबंधी सर्वनामा प्रमाणे सुद्धा होतो. १) तो काय (जे) वाटेल ते बोलतो.
६) आत्मवाचक सर्वनाम (atma vachak sarvanam)
जेव्हा ‘आपण’ या पुरूषवाचक सर्वनामाचा वापर स्वतः या अर्थाने होतो त्यास आत्मवाचक सर्वनाम म्हणतात.
आत्मवाचक सर्वनाम उदाहरण atma vachak sarvanam examples in marathi
१) तो स्वतः हून माझ्या घरी आला.
२) ती स्वतः हून माझ्याशी बोलली.
३) त्याने स्वतः हून माझी माफी मागितली.
वाक्यात आपण व स्वतः या पुरुषवाचक सर्वनामाचा उपयोग कसा केला आहे त्यानुसार पुरुषवाचक सर्वनाम व आत्मवचक सर्वनाम ओळखावे.
स्वतः हे सर्वनाम कर्त्याच्या जागी वापरल्यास ते पुरुषवाचक असते. परंतु कर्त्या नंतर वापरल्यास ते आत्मवाचक होते. जर स्वतः हे सर्वनाम वाक्याच्या सुरुवातीस आले व असे वाक्य संपूर्ण मानवजातीला उद्देशून असेल तर ते आत्मवाचकच मानावे;कारण अशा वाक्यातील कर्ता लिहिलेला नसतो.
निज हा शब्द फक्त आत्मवाचक सर्वनाम म्हणूनच वापरतात.
आपण हे सर्वनाम पुरूषवाचक म्हणून आले असेल तर ते वाक्याच्या सुरूवातीला आणि अनेकवचनात येईल.
आपण हे सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम म्हणून आले असेल त्या अगोदर नाम किंवा सर्वनाम येईल आणि त्याचा उपयोग वाक्यात दोन्ही वचनात होतो.
सर्वनाम नामाच्या ऐवजी येत असल्याने नामांना जे विभक्तीचे प्रत्यय लागतात तेच प्रत्यय सर्वनामांना लागतात.
सर्वनामाची संबोधन विभक्ती होत नाही कारण सर्वनामाने हाक मारता येत नाही.
Sarvanam examples in Marathi
दर्शक सर्वनाम ओळखा
१) कोण
२) आपण
३) काय
४) ते
४) ते
‘येता का आपण शिकारीला ? वाक्यातील सर्वनाम ओळखा
१) शिकारीला
२) का
३) आपण
४) येता
३) आपण
पुढील शब्दांतील सर्वनाम ओळखा.
१) दशरथ
२) ते
३) गाणे
४) तिथ
२) ते
‘टेबलावरील ती माझी वही आहे’ या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.
१) पुरुषवाचक सर्वनाम
२) दर्शक सर्वनाम
३) संबंधी सर्वनाम
४) प्रश्नार्थक सर्वनाम
५) सामान्य सर्वनाम / अनिश्चित सर्वनाम
६) आत्मवचक सर्वनाम
२) दर्शक सर्वनाम
‘आपण’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे ?
१) सर्वनाम
२) विशेषण
३) भाववाचक नाम
४) क्रियापद
१) सर्वनाम
‘मी परीक्षेला आलेलो आहे. सर्वनाम ओळखा?
१) मी
२) परीक्षेला
३) आलेलो
४) आहे
१) मी
‘कोण काय करणार आहे माझे? या विधानातील सर्वनार कोणती भावना व्यक्त करणारे आहे ?
१) आश्चर्य
२) तुच्छता
३) अगतिकता
४) विलक्षणपणा
२) तुच्छता
खालील दिलेल्या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. जो अभ्यास करेल तो परीक्षेत पास होईल.
१) दर्शक सर्वनाम
२) संबंधी सर्वनाम
३) प्रश्नार्थक सर्वनाम
४) आत्मवचक सर्वनाम
२) संबंधी सर्वनाम
……लोक वृक्षारोपण करतात, ते पर्यावरणाचे महत्व जाणतात. या वाक्यात येणारे संबंधी सर्वनाम ओळखा?
१) हे
२) तेच
३) जे
४) कुणी
३) जे
‘कोण ही गर्दी! या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता?
१) प्रश्नार्थक सर्वनाम
२) सामान्य नाम
३) दर्शक नाम
४) धातुसाधित नाम
२) सामान्य नाम
मी रोज योगासने करतो या वाक्यात सर्वनाम काय?
१) करतो
२) मी
३) रोज
४) योगासने
२) मी
खालील शब्दातील सर्वनामे ओळखा?
१) राम
२) हा
३) गाणे
४) सुंदर
२) हा
खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते आहे?
१) तो
२) हा
३) कोण
४) स्वतः
४) स्वतः
कोण नाचत यावे. अधोरेखित अथवा ठळक शब्दाची जात ओळखा?
१) दर्शक सर्वनाम
२) संबंधी सर्वनाम
३) सामान्य सर्वनाम
४) आत्मवचक सर्वनाम
३) सामान्य सर्वनाम
आपण मार्मिक बोलता. अधोरेखित शब्दाची जात ओळखा?
१) द्वितीय पुरूषवाचक सर्वनाम
२) अनिश्चित सर्वनाम
३) प्रथम पुरूषवाचक सर्वनाम
४) पुरूषवाचक सर्वनाम
१) द्वितीय पुरूषवाचक सर्वनाम
खालीलपैकी कोणत्या वाक्यात द्वितीय पुरूषवाचक सर्वनाम वापरले आहेत?
१) तो आपण होऊन माझ्याशी बोलला
२) आपण आता जाऊ या
३) आपण आता यावे
४) आपण मुर्ख आहोत
आपण येता का फिरायला? या वाक्यातील सर्वनाम ओळखा?
१) आपण
२) का
३) येता
४) फिरायला
मी आपण होवून त्याच्याकडे गेलो या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा?
१) प्रश्नार्थक सर्वनाम
२) दर्शन सर्वनाम
३) आत्मवाचक सर्वनाम
४) पुरुषवाचक सर्वनाम
३) आत्मवाचक सर्वनाम
पुढील वाक्यातील सर्वनामाचा पर्याय ओळखा?
‘खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते, पण ती शोधावी लागते.’
१) गुणवत्ता
२) खेड्यापाड्यामध्ये
३) शोधावी
४) ती
४) ती
‘आम्ही’ या सर्वनामाचा प्रकार ओळखा?
१) आत्मवाचक
२) दर्शक
३) प्रश्नार्थक
४) पुरुषवाचक
४) पुरुषवाचक
ज्याला कर नाही त्याला डर कशाला? अधोरेखित सर्वनामाचा प्रकार सांगा?
१) दर्शक सर्वनाम
२) संबंधी सर्वनाम
३) प्रश्नार्थक सर्वनाम
४) सामान्य सर्वनाम
२) संबंधी सर्वनाम
सर्वनामाचे मुख्य प्रकार किती?
१) पाच
२) सहा
३) आठ
४) तीन
२) सहा
खालीलपैकी लिंगानुसार बदलणारे सर्वनाम ओळखा?
१) मी
२) तुम्ही
३) हा
४) आम्ही
३) हा
sarvanam in marathi examples
पुरूषवाचक सर्वनामाचे किती प्रकार पडतात?
१) चार
२) तीन
३) नऊ
४) आठ
२) तीन
काय ते एकदाच सांगूनच टाक. या वाक्यातील सर्वनाम ओळखा ?
१) एकदाच
२) काय
३) सांगून
४) टाक
२) काय
खालीलपैकी आत्मवाचाक सर्वनाम असलेले वाक्य कोणते ते ओळखा?
१) तो उद्या शाळेत जाणार नाही.
२) ही माझी टोपी आहे.
३) आपण आमच्याकडे उद्या याल का ?
४) पत्येकाने आपणाला राष्ट्रभक्त मानले पाहिजे.
४) पत्येकाने आपणाला राष्ट्रभक्त मानले पाहिजे.
जेव्हा बोलणारा स्वतः विषयी बोलतो तेव्हा तो कोणत्या सर्वनामाचा उपयोग करतो?
१) प्रथम पुरूषवाचक सर्वनाम
२) द्वितीय पुरूषवाचक सर्वनाम
३) तृतीय पुरूषवाचक सर्वनाम
४) यापैकी नाही
१)प्रथम पुरूषवाचक सर्वनाम
ते खूप कठोर आहेत. या वाक्यात सर्वनाम कोणते?
१) ते
२) खूप
३) कठोर
४) आहेत
१) ते
पुढीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते?
१) काय
२) कोण
३) जो
४) आपण
४) आपण
नामाच्या जागी वापर केलेला शब्द कोणता?
१) विशेषण
२) सर्वनाम
३) क्रियापद
४) संज्ञा
२) सर्वनाम
मी सिंहगड पाहिला या वाक्यातील मी काय आहे?
१) नाम
२) सर्वनाम
३) विशेषण
४) क्रियाविशेषण
ज्याच्या विषयी बोलायचे त्या व्यक्तीचा उल्लेख करतांना काय वापरतात?
१) तृतीय पुरूषवाचक सर्वनाम
२) पुरूषवाचक सर्वनाम
३) द्वितीय पुरूषवाचक सर्वनाम
४) यापैकी नाही
आम्ही या सर्वनामाचा प्रकार ओळखा?
१) आत्मवाचक
२) दर्शक
३) प्रश्नार्थक
४) पुरूषवाचक
१) आत्मवाचक
‘ज्याच्या हाती ससा तो पारधी यामध्ये आलेली सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत ?
१) सामान्य
२) पुरूषवाचक सर्वनामे
३) संबंधी आणि सामान्य
४) संबंधी आणि दर्शक
४) संबंधी आणि दर्शक
सर्वनाम म्हणजे
१) नामाचे गुणविशेष सांगणारा शब्द
२) सृष्टीतील व्यक्ती, वस्तू इत्यादींचा बोध करून देणारा शब्द
३) नामाऐवजी येणारा शब्द
४) कोणतीही कृती या क्रिया दर्शविणारा विकारी शब्द
३) नामाऐवजी येणारा शब्द
‘देवा, तू मला आशीर्वाद दे ‘या वाक्यातील तू हा शब्द काय आहे?
१) क्रियापद
२) क्रियाविशेषण
३) शब्द योगी अव्यय
४) सर्वनाम
४) सर्वनाम
खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा?
१) कोण
२) आपण
३) ते
४) काय
३) ते
खालीलपैकी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कोणते?
१) तू
२) तो
३) मी
४) यापैकी नाही
२) तो
दूरची वस्तू किंवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात?
१) आत्मवाचक
२) संबंधी
३) दर्शक
४) सामान्य
३) दर्शक
खालीलपैकी कोणता सर्वनामाचा प्रकार नाही?
१) पुरूषवाचक सर्वनाम
२) दर्शक सर्वनाम
३) विशेष सर्वनाम
४) आत्मवाचक सर्वनाम
३) विशेष सर्वनाम
अतुलने स्वतः बाग फुलवली.
१) दर्शक सर्वनाम
२) प्रश्नार्थक सर्वनाम
३) आत्मवाचक सर्वनाम
४) भाववाचक सर्वनाम
३) आत्मवाचक सर्वनाम
खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा. आपण गरिबांना मदत करावी.
१) गरिबांना
२) आपण
३) मदत
४) करावी
२) आपण
‘आपण’ या सर्वनामाचा अर्थ जेव्हा ‘स्वतः’ असा होतो,तेव्हा ते …….. सर्वनाम असते.
१) दर्शक
२) प्रश्नार्थक
३) स्तुतिवाचक
४) आत्मवाचक
४) आत्मवाचक
‘हा, ही, हे’ सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत?
१) संबंधी सर्वनाम
२) प्रश्नार्थ सर्वनाम
३) दर्शक सर्वनाम
४) आत्मवाचक सर्वनामे
३) दर्शक सर्वनाम
नामाऐवजी वापरल्या जाणऱ्या शब्दाला —————– असे म्हणतात.
१) क्रियापद
२) विषेशनाम
३) सर्वनाम
४) प्रतिनामे
३) सर्वनाम
हरी, घरी कोण येऊन गेले? सर्वनाम ओळखा.
१) हरी
२) घरी
३) कोण
४) गेले
३) कोण
जो, जी, जे ही कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत?
१) पुरूषवाचक
२) सबंधी
३) दर्शक
४) प्रश्नार्थके
२) सबंधी
सर्वनामाचा प्रकार ओळखा : जो
१) पुरूषवाचक
२) सबंधी
३) दर्शक
४) प्रश्नार्थके
२) सबंधी
अधोरेखित शब्दाची जात ओळखा? ‘कुठे आहे तो भामटा? तो बघा पळाला’
१) पुरूषवाचक
२) सबंधी
३) दर्शक
४) यापैकी नाही
३) दर्शक
आम्हां मुलांना कोण विचारतो? वरील वाक्यातील अधोरेखित शब्दाची अचूक शब्दजात सांगा?
१) सर्वनामिक विशेषण
२) सबंधी विशेषण
३) दर्शक विशेषण
४) प्रश्नार्थक विशेषण
४) प्रश्नार्थक विशेषण
‘कोणी यावे कोणी जावे’ हे विधान सर्वनामाच्या कोणत्या प्रकारात येते ?
१) पुरूषवाचक
२) दर्शक
३) सामान्य
४) संबंधी
३) सामान्य
खाली दिलेल्या कोणत्या पर्यायी उत्तरात आत्मवाचक सर्वनाम असणारे वाक्य आहे?
१) धीराने उभा राहणाराच लोकोत्तर लाभाचा धनी होतो.
२) मनुष्याचा सर्वांत मोठा शत्रू तो स्वतः असतो.
३) सावित्रीबाईंचे सार काम आटोपलं होते.
४) त्यांनी त्याला चांगलेच पाणी पाजले.
२) मनुष्याचा सर्वांत मोठा शत्रू तो स्वतः असतो.
खालीलपैकी एक सर्वनाम लिंग-वचन भेदानुसार बदलत नाही, ते कोणते?
१) मी
२) तुम्ही
३) जो
४) कोण
४) कोण
‘गर्जेल तो करील काय’ या वाक्याचे संबंधी सर्वनाम (अध्याहृत) ओळखा.
१) गर्जेल
२) तो
३) जो
४) काय
३) जो
आपण स्वतः दोन शब्द बोला.
१) प्रश्नार्थक सर्वनाम
२) पुरूषवाचक सर्वनाम
३) आत्मवाचक सर्वनाम
४) दर्शक सर्वनाम
२) पुरूषवाचक सर्वनाम
निष्कर्ष
सर्वनाम मराठी | सर्वनामाचे प्रकार व उदाहरण | Sarvanam in Marathi | Sarvanam examples in Marathi चा आपण योग्य पद्धतीने सराव करावा अशी आमची इच्छा आहे. खास करून आपण सर्वांकरीता या लेखात उत्तम माहिती चा समावेश करण्यात आला आहे. आशा आहे आपणास हा लेख आवडला असेल. आपले विचार कमेन्ट करून नक्की कळवा.
धन्यवाद…
हे देखील वाचा: नाम म्हणजे काय, नामाचे प्रकार, मराठी व्याकरण, marathi grammar pdf
10+ माझी आई निबंध मराठी | Mazi Aai Marathi Nibandh | My Mother Essay in Marathi
5+ माझे गाव निबंध मराठी 2022 | Maze Gav Marathi Nibandh | My village essay in marathi
चंद्र समानार्थी शब्द मराठी 20+ | Moon Synonyms | Chandra Samanarthi Shabd In Marathi
मराठी म्हणी 100+ | मराठी म्हणी संग्रह व अर्थ | Marathi Mhani with Meaning List
पत्र लेखन मराठी 9वी, 10वी | Marathi Letters Writing | Patra Lekhan Marathi [With PDF]
सर्वनाम मराठी | सर्वनामाचे प्रकार व उदाहरण | Sarvanam in Marathi | Sarvanam examples in Marathi
विद्यार्थी मित्रांनो खाली दिलेले PDF button वर क्लीक करून तुम्ही pdf download करू शकता, PRINT काढू शकता आणि Email द्वारे मित्रांना share करू शकता.