सावित्रीबाई फुले भाषण मराठी 2023 | savitribai phule jayanti 2023 | Savitribai Phule Speech in Marathi with PDF

सावित्रीबाई फुले भाषण मराठी 2023 – नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी सावित्रीबाई फुले यांची माहिती, Savitribai Phule Speech in Marathi, सावित्रीबाई फुले जयंती 2023 savitribai phule jayanti 2023 निम्मित्त भाषण घेऊन आलो आहोत.

सावित्रीबाई फुले यांची माहिती

जन्म3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात
लग्न1840 मध्ये वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी लग्न झाले
पतीचे नावज्योतिराव फुले
शिक्षणपतीपासून शिक्षण सुरू झाले आणि पुढे प्रगती झाली
वडिलांचे नावखंडोजी नेवासे पाटील
आईचे नावलक्ष्मीबाई
मुलाचे नावयशवंत फुले
मृत्यू10 मार्च 1897 रोजी निधन झाले

सावित्रीबाई फुले भाषण मराठी | Savitribai Phule Speech in Marathi

जी माणसं इतिहास घडवतात,जी माणसं इतिहास घडवतात ते इतिहास कधी विसरू शकत नाही आणि जी माणसं इतिहास विसरतात, जी माणसं इतिहास विसरतात ते इतिहास कधी घडवू शकत नाहीं ,इतिहास कधी घडवू शकत नाही.

ज्या काळी सावित्रीबाई फूले यांचा जन्म झाला तो काळ म्हणजे जवळपास पावणे दोनशे वर्षापूर्वीचा काळ होय. त्या काळी समाजाची रचना विषमतेवर आधारित होती स्त्रियांची स्तीथी दुय्यम होती, स्त्रि शिक्षनासून वंचित होती. शिक्षण हे समाजातील काही विशिष्ठ लोकांपर्यंत मर्यादित होत.

अनेक अनिष्ट चालीरीती होत्या त्यात अस्पृश्यता, सतीची चाल, हुंडा पद्धती , केशवपन, जरठ-कुमारी विवाह अश्या अनिष्ट प्रथेखाली स्त्री भरडली जात होती स्त्रियांना कोणतेच अधिकार नव्हते.

सती जाणे म्हणजे काय हो? सती जाणे म्हणजे पतीच्या निधनानंतर पतीच्या जळत्या चितेवर पत्नीने स्वतःच शरीर झोकवून देने. बघा नुस्ती कल्पना करा अंगावर काटे येतील अशी दैनी अवस्था स्त्रियांची होती. फक्त ‘चूल आणि मुल’ फक्त ‘चूल आणि मुल ‘ रांधा वाढा, उष्टीं काढा तेवढ्यापुरत क्षेत्र स्रियांसाठी मर्यादित होत म्हणून ती अबला दुर्बल झाली होती.

म्हणून म्हणावसं वाटतं,म्हणून म्हणावसं वाटतं

स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी

हृदयी अमृत, नयनी पाणी

अशी परिस्थिती पाहून रुदय हेलावून जात पण विरोध कोण पत्करायचा, समाजाचा रोष कोणी ओढावून घ्यायचा. अश्या परिस्थितीत एका तेजोमय ज्ञानजोती सावित्रीबाई फुले यांचा ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी स्त्रियांच्या सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी भारतमातेच्या तेजस्वी इतिहासातील तेजस्वी नारीयोज्ञा पैकी एका तेजस्विनी चा जन्म झाला. वडील खंडोजी आणि आई लक्ष्मीबाई यांच्या घरी कन्यारत्न जन्माला आल्याने आनंद महोस्सव साजरा करण्यात आला परंतु मुलगी झाली की नाक मुर्डणारे,नाराज होणारे अशे असंख्य लोक आहेत ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.रूढी परंपरेनुसार वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी सावित्रीबाई फुले यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला.सावित्रीबाई फुले धित,हुशार, कर्तृत्ववान होत्या विवाहाच्या वेळी सावित्रीबाई काहीच शिकलेल्या नव्हत्या परंतू त्यांना शिकण्याची विलक्षण आवड होती.

सावित्रीबाई फुले भाषण मराठी
सावित्रीबाई फुले भाषण मराठी

जोतिबा फुले यांनी स्त्रि शिक्षणाचे महत्त्व जाणले होते म्हणून त्यांनी सावित्रीबाईंना शिक्षणाचे धडे दिले.महात्मा फुले म्हणत विद्ये विना मती गेली। मती विना निती गेली॥

निती विना गती गेली। गती विना वित्त गेले।।

वित्त विना शुद्र खचले। एवढे अनर्थ एका अविद्येने केले॥

हा महात्मा फुले यांचा संदेश म्हणजे क्रांतीकारक तर आहेच पण एक नविन तत्वज्ञान मांडणारा आहे.

म्हणून १ जानेवारी १८४८ रोजी त्यांनी पुण्यातील बुधवार पेठेत स्त्रियांसाठी पहिली शाळा सुरू केली.अत्याचाराच्या द्रुष्टचक्रातून वाचवण्याचे काम या महापुरुषांनी वाटून घेतले आणि महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली करून दिली.

चांगल्या अश्र्वाला हाताळण्यासाठी उत्तम घोडेस्वाराची गरज असते, हत्तीला नियंत्रित ठेवण्यासाठी प्रशिक्षित महाहुताची गरज असते आणि मुलींना शिकवण्यासाठी एका स्त्री शिक्षीकेची गरज होती.

जोतिबा फुले यांनी प्रथमतः सावित्रीबाईं फुले यांना शिक्षण दिले आणि पुढे त्यांना स्त्री शिक्षिका म्हणून नेमले.

सावित्रीबाई फुलेंचे शिक्षणाचे कार्य सुरू असताना त्यांना अनेक कर्मठ लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात त्रास दिला. प्रसंगी त्यांच्या अंगावरच दगड शेण फेकून मारले आणि त्यांचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला तरीही सावित्रीबाई फुले यांनी अशा कर्मठ लोकांना भीक घातली नाही कारण त्यांच्या पाठीशी जोतीराव फुले हे खंबीरपणे उभे होते.

ज्याकाळी स्त्री घराबाहेर पडणे म्हणजे शाप समजले जात होते त्याकाळी महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा विडा उचलला होता आणि सावित्रीबाईंनी त्यांना सावलीप्रमाने साथ दिली. अनेक शिव्या, शाप शोषून प्रसंगी दगडफेक, शेण मारा सहन केला परंतू माघार घेतली नाही.कारण त्यांना माहित होत,

पुस्तक वाचल्याने मस्तक सुधारत आणि सुधारलेला मस्तक कोणासमोर नतमस्तक होत नसतं म्हणून पुस्तक हे वाचायचं असत म्हणून पुस्तक हे वाचायचं असत.

जी स्वप्न झोपेत पडतात ती खरी स्वप्न नसतात, पण जे स्वप्न झोपुच देत नाहीत तेची खरे स्वप्न असतात, स्वप्न जांचीच पूर्ण होतात जे स्वप्न बघण्याचे धाडस करतात. अशी स्वप्न जोतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी पाहिले होते म्हणून आज आपल्या माता बघीनींना आज आपण शिकताना पाहतोय आणि इतिहास ही अश्या सावित्रीबाई फुलें सारख्या स्त्रियांनीच घडविला आहे.

भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीमती. प्रतिभाताई पाटील,भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावला,नोबेल पारितोषिकाच्या पहिल्या महिला मानकरी मदर तेरेसा, पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी आणि आजच्या घडीला भारताच्या राष्ट्रपती पदी द्रौपदी मुर्मू विराजमान आहेत.

स्त्रियांनी दाखवून दिले की त्या कुठल्याच क्षेत्रात पुरुषांपेक्षा मागे नाहीत. शिक्षणक्षेत्र असो की व्यापार, मजुरी असो की विज्ञान तंत्रज्ञान, प्रत्येक प्रत्येक क्षेत्रात आज स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. त्यापेक्षा त्यांचे एक पाऊल पुढेच आहे असे म्हंटले तर जास्त समर्पक असेल.

है सर्व पाहून खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुलें यांचे स्वप्न अपल्याला साकार होताना दिसते.

‘मुलगी शिकली, प्रगती झाली’ हे बोधवाक्य आपण नेहमी वाचतो.

मुलीच्या शिक्षणाने समाज सुधारतो. एक शिकलेली मुलगी मोठेपणी सबंध कुटुंब सुशिक्षित करते. स्त्री कुटुंबाचा आस असते. पूर्ण कुटुंब तिच्याभोवती फिरत असते. शिक्षणच स्त्रीउद्धाराचे व समाज परिवर्तनाचे साधन आहे, म्हणून मुलींना शिक्षण देणे फार गरजचे आहे.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव भारतीय स्त्री शिक्षणाच्या जन्मदात्या म्हणून त्यांची ख्याती अजरामर आहे. देशातील कुनिही अश्या थोर सावित्रीबाईंचे नाव कधीही विसरणार नाही आणि भारतीय स्त्रिया त्यांचे नाव सतत कुटकुटत राहिल्याशिवाय राहणार नाही.

सावित्रीबाई फुले यांचा सत्कार

1 जानेवारी 1848 ते 15 मार्च 1852 पर्यंत त्यांनी कोणतेही आर्थिक पाठबळ न घेता पती ज्योतिबा फुले यांच्या सहकार्याने महिलांच्या शिक्षणासाठी 18 शाळांची स्थापना केली.

मुस्लिम महिला आणि मुलांना शिकवण्यासाठी त्यांनी 1849 मध्ये उस्मान शेख नावाच्या मुस्लिम बांधवाच्या घरी एक शाळा उघडली.

सावित्रीबाईंनी या क्षेत्रात सातत्याने प्रयत्न केले कारण त्या स्त्री शिक्षणाच्या उद्देशाने प्रेरित होत्या.

ब्रिटिश सरकारने 16 नोव्हेंबर 1852 रोजी सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांना त्यांच्या शिक्षणातील योगदानाची दखल घेऊन उचित सन्मान दिला.

जोतिराव-सावित्रीमाता यांनी सुरू केलेल्या शैक्षणिक उपक्रमांची ब्रिटिश अधिकाऱ्यांनी दखल घेतली. फुले दाम्पत्याचा 16 नोव्हेंबर 1852 रोजी पुणे येथे विश्रामबागेजवळ सत्कार करण्याचे ठरले होते. ब्रिटीशांच्या मान्यतेच्या या कार्यक्रमात पुण्यातील शिक्षणतज्ञ, जिल्हाधिकारी, प्राध्यापक आणि अनेक विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मेजर कँडी यांनी सावित्री माता आणि ज्योतिरावांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव केला.

सत्कारप्रसंगी कँडी साहेब म्हणाले, “सावित्रीबाईंनी महिलांना सेवा दिली. विरोधकांच्या आक्षेपांना न जुमानता त्यांनी जिद्दीने काम केले. त्यांनी हार मानली नाही. भारतीय इतिहासात त्यांचे कार्य अपूर्ण आहे. स्त्रियांसाठी शिक्षणाची सोय केली.”

हा अद्भुत सत्कार ब्रिटिश सरकारच्या कृतीचा परिणाम होता. खरे सांगायचे तर, मी तुमचे अभिनंदन करायला हवे होते,असे जोतीराव सावित्रीबाईंना कार्यक्रम संपल्यानंतर म्हणाले. शाळेची स्थापना करण्याचे कारण मीच आहे. पण असंख्य अडथळे असतानाही तुम्ही त्या संस्थांची उभारणी केली. असे दुःख सहन करून यशस्वी झाल्याबद्दल मला याचा अभिमान आहे.

सावित्रीबाई या पहिल्या भारतीय शिक्षिका होत्या ज्यांना ब्रिटिश सरकारकडून सन्मान मिळाला. त्यामुळे त्यांना भारतीयांचे खरे बुद्धीचे देवता असे संबोधणे चुकीचे ठरणार नाही.

सावित्रीबाई फुले यांची प्रकाशित पुस्तके

काव्यफुले (काव्यसंग्रह)
सावित्रीबाईंची गाणी (१८९१)
सुबोध रत्नाकर
बावनकशी

सावित्रीबाई फुले यांचे शेवटचे दिवस

सत्यशोधक चळवळीसाठी सावित्रीबाई फुलेंचे श्रम वृद्ध असतानाही सुरूच होते. ती शारीरिकदृष्ट्या थकली होती, पण तिचे मन थकले नव्हते. जोपर्यंत लोक जागृत होत नाहीत आणि त्यांचे अज्ञान आणि अंधश्रद्धा नाहीसे होत नाहीत तोपर्यंत सर्वसामान्यांच्या भल्यासाठी समाज बदलणार नाही हे सावित्री मातेला समजले. परिणामी, ते कोणत्याही प्रकारची असो, कोणत्याही समस्यांना तोंड देत असत. हा सिलसिला चालूच राहिला आणि निसर्ग संतप्त झाला.

भूकंप असो, वादळ असो, मुसळधार पाऊस असो किंवा भयंकर आजार असो, निसर्गाच्या प्रकोपापुढे माणूस शक्तीहीन असतो. आणि ते निसर्गाच्या सूडाचे लक्ष्य आहेत.

त्यावेळी विज्ञान प्रगत नव्हते. शिक्षणाच्या अभावामुळे भारतात रुग्णालये नव्हती. मानवजात अज्ञान, अंधश्रद्धा आणि हानिकारक रूढींनी त्रस्त होती. या साथीच्या आजारामुळे नारू, देवी, कॉलरा, विषमज्वर, कावीळ आणि प्लेग यासारख्या आजारांचा फैलाव होईल आणि प्रत्येक घरातील चार ते पाच व्यक्तींचा मृत्यू होईल. आजाराच्या संसर्गजन्य स्वरूपामुळे, आजारी व्यक्तीची योग्य काळजी घेतली नाही तर तो देखील मरतो. परिणामी, त्या काळात जन्म आणि मृत्यूचे प्रमाण जवळपास समान होते.

सावित्रीमातेने दुष्काळावर मात करून उदयास आल्यानंतर दुसरे पर्यावरण संकट सुरू झाले. 1897 मध्ये उंदीर नष्ट होऊ लागले आणि प्लेगचा प्रादुर्भाव सुरू झाला. पुण्यात प्लेगने थैमान होते. पुणे विभागात शेकडो लोकांचा मृत्यू होऊ लागला. या आकस्मिकतेने ब्रिटिश प्रशासनाचाही गोंधळ उडाला. एका व्यक्तीला हा आजार दुसऱ्या व्यक्तीकडून होऊ शकतो. हा रोग सुरुवातीला हाँगकाँगच्या बंदरातून उद्भवला.

संवादाने तिथे आणले तेव्हा मुंबईची लागण झाली. त्यानंतर प्लेगचे विषाणू तेथून पुण्यापर्यंत पोहोचले. त्यामुळे ब्रिटिश सरकारने सुरुवातीला दळणवळणावर बंदी घातली होती. पीडिताचा शोध घेण्यासाठी सैनिकांना विनंती करण्यात आली. आजारी व्यक्तींच्या शोधात ब्रिटिश सैनिक गावोगाव भटकू लागले. या सैनिकांनी घर साफ करण्याच्या बहाण्याने व्यक्तींचा मानसिक छळ सुरू केला. त्यांनी लोकांना शारीरिक धमकावण्यास सुरुवात केली. ज्या क्षणी त्यांनी रुग्णाला घरामध्ये पाहिले, त्यांनी त्याला बाहेर काढले, त्याला रुग्णवाहिकेत भरले आणि जनावरासारखे तेथे सोडून दिले. इंग्रज सैनिकांना लोकांची खूप भीती वाटत होती.

हे दृश्य सावित्री मातेला दिसत नव्हते. या शिपायाचा मृत्यू रोखण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची बैठक बोलावली, “प्लेग प्रतिबंधक महिला समिती” तयार केली आणि सावित्रीमाता तडक जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला. जेव्हा आई कलेक्टरला भेटली तेव्हा तिने त्याच्याकडे सैनिकांकडून नागरिकांवरील अत्याचाराबद्दल तक्रार केली आणि त्याला हे थांबवण्याची विनंती केली.

सावित्री मातेने आपल्या सहकाऱ्यांसह “प्लेग प्रतिबंधक महिला समिती” मार्फत व्यक्तींना मदत करण्यास सुरुवात केली. त्यावेळी डॉक्टरेट मिळवून सावित्रीमातेचा मुलगा यशवंत अहमदनगरला नोकरीला होता. त्याला पुण्याला बोलावून वानवडी येथे खाजगी प्रॅक्टिस सुरू केली, जिथे सशांची शेती होती. डॉ. यशवंतरावांनी आपल्या आईच्या मानवतावादी प्रयत्नांमध्ये योगदान देऊन सुरुवात केली. सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांनी आजारी माणसाला उचलून रुग्णालयात नेले होते. वर, डॉ. यशवंत काळजी देत ​​होते. सावित्रीमाता या काळात पायांना भिंगरी बांधल्याप्रमाणे फिरत असे. या वाढत्या वयातही ते लोकांच्या सेवा तत्परतेने देत होते.

सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू केव्हा व कुठे झाला?

1897 मध्ये पुण्यात एक भयानक प्लेग ची साथ पसरली . प्लेगच्या रूग्णांची सेवा करत असताना सावित्रीबाई फुले स्वत: देखील प्लेगच्या बळी पडल्या आणि 10 मार्च 1897 रोजी त्यांचे निधन झाले.

 

Faq’s –

सावित्रीबाई फुले कोण होत्या?

सावित्रीबाई फुले या महाराष्ट्रातील भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते.

सावित्रीबाई फुले जयंती केव्हा साजरी केली जाते?

सावित्रीबाई फुले जयंती ३ जानेवारी रोजी साजरी केली जाते?

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली.

सावित्रीबाईंच्या आईचे नाव काय होते?

सावित्रीबाई फुले यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई होते.

भारतातील पहिली महिला शिक्षक कोण?

भारतातील पहिली महिला शिक्षिका होण्याच आणि शिक्षित महिला होण्याचाही मान सावित्रीबाई फुले यांना जातो.सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या बालिका विद्यालयाच्या प्रिन्सिपल होत्या.

बालिका दिन किती तारखेला असतो?

महाराष्ट्र शासनाने बालिका दिन हा ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त घोषित केला आहे.

 

हे देखील वाचा: मराठी निबंध लेखनअणि भाषण

10+ माझी आई निबंध मराठी | Mazi Aai Marathi Nibandh | My Mother Essay in Marathi

हे देखील वाचा: 5+ मी पाहिलेला अपघात मराठी निबंध | Mi pahilela Apghat Marathi Nibandh | Mi Pahilela Apghat Marathi Essay

5+ माझे गाव निबंध मराठी 2022 | Maze Gav Marathi Nibandh | My village essay in marathi

हे देखील वाचा: सूर्य समानार्थी शब्द मराठी 20+ | Surya samanarthi shabd in Marathi | Surya Paryayvachi Shabd in Hindi

हे देखील वाचा: विरुद्धार्थी शब्द मराठी 1000 | Virudharthi Shabd In Marathi | Antonyms Marathi | Opposite words In Marathi

चंद्र समानार्थी शब्द मराठी 20+ | Moon Synonyms | Chandra Samanarthi Shabd In Marathi

मराठी म्हणी 100+ | मराठी म्हणी संग्रह व अर्थ | Marathi Mhani with Meaning List

पत्र लेखन मराठी 9वी, 10वी | Marathi Letters Writing | Patra Lekhan Marathi [With PDF]

निष्कर्ष

तर मित्रांनो सावित्रीबाई फुले भाषण मराठी | savitribai phule jayanti 2023 | Savitribai Phule Speech in Marathi with PDF  चा आपण योग्य पद्धतीने सराव करावा अशी आमची इच्छा आहे. खास करून आपण सर्वांकरीता या लेखात उत्तम सावित्रीबाई फुले यांची माहिती चा समावेश करण्यात आलेले आहेत. आशा आहे आपणास हे भाषण आवडले असतील. आपले विचार कमेन्ट करून नक्की कळवा.

धन्यवाद…

savitribai phule jayanti 2023 | savitribai phule bhashan | Savitribai Phule Speech in Marathi with PDF

विद्यार्थी मित्रांनो खाली दिलेले PDF button वर क्लीक करून तुम्ही savitribai phule jayanti 2023 | savitribai phule bhashan | Savitribai Phule Speech in Marathi with PDF download करू शकता, PRINT काढू शकता आणि  Email द्वारे मित्रांना share करू शकता.

Print Friendly, PDF & Email
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.